अनारसे रेसिपी बनवा अगदी सोप्या पद्धतीने! Anarse Recipe in Marathi |

दिवाळीत अनारसे हमखास बनवले जाते. अनारसे बनवण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज लागत नाही परंतु अनारसे पीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. चवीला गोड असा हा पदार्थ आपण नाश्त्याला देखील खाऊ शकतो. चला तर मग बघू अनारसे कसे बनवावे.

Anarse Recipe Ingredients :

साहित्य:

• तांदूळ – १ वाटी

• किसलेला गूळ – १ वाटी

• तूप – १ चमचा

• खसखस

• तेल

How to make anarsa

कृती:

• तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी चालेल.

• त्यानंतर चाळणीत ठेवून नितळून घ्यावे. तांदूळ आता कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे.

• किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाकावा. सर्व मिश्रण एकत्र मळून घ्यावे. मिश्रण घट्ट मळावे. घट्ट मळलेला गोळा चार – पाच दिवस डब्यात ठेवावा. (प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी डब्यात ठेवावी.)

• तळण्यासाठी आता पीठ बाहेर काढून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे करावे.  पुरीसारखे लाटून घ्यावे.

• लाटताना त्यावर खसखस वापरावी.  (काहीवेळा राजगिरा वापरला तरी चालतो.)  आणि तळताना पुरीची बाजू बदलू नये, नाहीतर खसखस करपेल.

• लाटलेली पुरी तेलात तळताना जास्त हलवू नये. मध्यम आचेवर ठेवून पुरी छान लालसर तळून घ्यावी.

• तेल चांगले अनारस्यातून नितळून घ्यावे.

टीप – मळलेले मिश्रण (पीठ) खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे तळताना जर अनारसेफेसाळले तर पीठ तसेच ठेवून काही दिवसांनी तळावे.

छोले भटुरे बनवा घरच्या घरी | Chole Bhature Recipe in Marathi |

उत्तर भारतात छोले भटुरे (Chole Bhature) खूपच प्रसिद्ध आहेत. हळूहळू आता संपूर्ण भारतात ही रेसिपी उपलब्ध होऊ लागली आहे. ठिकठिकाणी ढाबे, हॉटेल्स असल्याने सर्व राज्यातील सर्व डिशेस हमखास मिळतात. त्यामध्ये छोले भटुरे हा नाश्त्यासाठी तयार केलेला पदार्थ असतो. 

आपल्याकडे हरभरा जसा बनवला जातो, त्याच पद्धतीने छोले म्हणजे काबुली चणे एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात आणि त्याबरोबर खाण्यासाठी मैदा – बटाटा एकत्र करून बनवलेल्या पुऱ्या म्हणजेच भटुरे दिले जातात. 

चला तर जाणून घेऊ छोले भटुरे सोप्यात सोप्या पद्धतीने कसे बनवाल. हा पदार्थ गरम गरम छान लागतो. कांदा, टोमॅटो किंवा काकडी  कापून सलाड म्हणून या रेसिपीसोबत सर्व्ह करू शकता.

छोले भटुरे रेसिपी – Chole Bhature Recipe in Marathi

Ingredients of Chole Bhature | छोले भटुरेसाठी लागणारी सामग्री :-

१ – छोले बनवण्यासाठी साहित्य –
• काबुली चने – २५० ग्रॅम

• जिरे – अर्धा चमचा

• कांदा – १ बारीक चिरलेला

• आले – लसूण पेस्ट – १ चमचा 

• छोले मसाला – २ चमचे

• लाल तिखट – २ चमचे

• आमसूल पावडर – २ चमचे

• हळद – अर्धा चमचा

• धने पावडर – अर्धा चमचा

• तेल

• मीठ

२ – भटूरे बनवण्यासाठी साहित्य – 
• मैदा – १ वाटी

• बटाटे – ३ उकडलेले

• तेल

• मीठ

Chole Bhature Recipe | छोले भटुरे कृती :

१ – छोले बनवण्याची कृती :

• काबुली चणे प्रथमतः रात्रभर भिजवलेले असावेत. असे चणे पाण्यात उकडून घ्यावेत. पाणी जास्त उकळायचे नाही.
• एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, आले – लसूण पेस्ट टाका. कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्या. 
• आता त्यामध्ये आमसूल, हळद, लाल तिखट,  धने पावडर आणि मीठ घाला. ५ ते १० मिनिट चांगले परतून घ्या. 
• त्यानंतर त्यामध्ये छोले मसाला, उकडलेले काबुली चणे, थोडे पाणी टाका. घट्ट हवे असल्यास कमी पाणी टाका अथवा जास्त पाणी टाका. चांगले १० मिनिट कढू द्या.

२ – भटुरे बनवण्याची कृती :

• मैदा आणि उकडलेले बटाटे एकत्र कुस्करून त्याचे मिश्रण बनवा. त्यात एक चमचा तेल टाका. चांगली घट्ट कणिक बनवा.
• छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटून घ्या. कढईत तेल गरम करून सर्व पुऱ्या तळून घ्या. 

टिप – छोले बनवताना लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता.

श्रीखंड कसे बनवावे ! Shrikhand Recipe in Marathi |

सणाला किंवा सुट्टीच्या दिवशी काही गोडधोड जेवण केले तर श्रीखंड नक्कीच अशा जेवणात समाविष्ट असतो. श्रीखंड बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य अगदी अल्प आहे. प्रत्येक वेळी श्रीखंड विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरचे घरी श्रीखंड तयार करू शकता. चला तर मग पाहुयात श्रीखंड कसे बनवावे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने !

Shrikhand Recipe Ingredients:

साहित्य:

• दही – १०० ग्रॅम
• साखर – १०० ग्रॅम
• वेलची पूड – अर्धा चमचा
• बदाम – पिस्ता – बारीक तुकडे
• पुरण यंत्र 
• दूध ( केशर मिसळण्यासाठी थोडेसे पाव वाटी )
• केशर

How to make shrikhand ? 

कृती:

• दही स्वच्छ कापडात घ्या. त्याला २ तास लटकवून ठेवा म्हणजे दह्यात असलेलं पाणी निघून जाईल.
• नंतर ते बिना पाण्याचं घट्ट बनलेल दही एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये साखर आणि वेलची मिक्सरमधून बारीक करून टाका. 
• दही पुरणयंत्रातून फिरवून घ्या. व्यवस्थित फेटून झाल्यानंतर दही एकदम मुलायम झाले पाहिजे. त्यामध्ये आता बदाम, पिस्ता तुकडे टाका.
• एका दुसऱ्या भांड्यात दूध आणि केशर मिसळा. त्याला एकसंध रंग आला की त्यामध्ये मुलायम दही मिश्रण मिक्स करा.
• सर्व मिश्रण एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यानंतर खायला घ्या. 

टिप – साखरेचे प्रमाण व्यवस्थित असू द्या. अति गोड श्रीखंड छान लागत नाही.

Shingada Flour Laddoo Recipe in Marathi | शिंगाडा पिठाचे लाडू

शिंगाडा पिठाचे लाडू ( shingada Pithache Ladu ) बनवण्यासाठी अत्यंत कमी साहित्याची आवश्यकता भासते. तसेच हे लाडू चविष्टही बनतात. शिंगाडा किती पौष्टिक आहे हे काय सांगण्याची आवश्यकता नाही, ते सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्याच्या पिठापासून बनवलेले लाडू हे उपवासाला देखील चालतात. 

Shingada Flour laddoo Ingredients 

साहित्य –

• घट्ट तूप – ८ चमचे 
• शिंगाडा पीठ – २ वाटी 
• पिठीसाखर – अर्धा वाटी
• वेलची पावडर – अर्धा चमचा
• सुक खोबरे – अर्धा वाटी ( भाजून बारीक किसून )

How to make shingada flour laddoo

कृती:

• गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यावर कढई ठेवा.
• कढईत घट्ट तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ भाजून घ्या.
• चांगले खरपूस भाजल्यानंतर त्यात किसलेले खोबरे, वेलची पावडर आणि पिठीसाखर टाकावी. 
• लाडू चांगले वळून घ्यावेत. 
टीप – साखरेचा किंवा गुळाचा पाक करून पिठीसाखरे ऐवजी वापरू शकता. लाडू घट्ट बनतात. 

Paneer Paratha Recipe in Marathi | पौष्टिक पनीर पराठा रेसिपी !

पराठा बनवणे खूपच सोपे आहे. वेगळी भाजी न बनवता फक्त पनीर पराठा बनवून तुम्ही मस्तपैकी पोटभरून आस्वाद घेऊ शकता. पनीर पराठा हा उत्तर भारतात जास्त बनवला जातो परंतु त्याची सर आता सर्वच ठिकाणी येत आहे. पनीर पराठा बनवण्यासाठी अत्यल्प साहित्य आवश्यक आहे.

Paneer Paratha Recipe Ingredients

साहित्य –

• पनीर – २५० ग्रॅम
• गव्हाचे पीठ – ३ वाटी
• तेल – गरजेनुसार
• लाल तिखट – १ चमचा
• हळद – पाव चमचा
• जिरे – बारीक करून 
• धने – बारीक करून 
• मीठ – चवीनुसार
• कोथिंबीर – बारीक चिरून 

How to make paneer paratha ? 

कृती –

१ – पनीर किसणीवर किसून घ्यावे. त्यामध्ये जिरे, धने बारीक करून टाकावे. हळद आणि लाल तिखट गरजेनुसार टाकावे. 
२ – आता मीठ, कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यावे. थोडेसे तेल हातावर लावून मिश्रण पुन्हा एकदा मळावे.
३ – एका परातीत किंवा भांड्यात गव्हाचे पीठ पाणी टाकून मळून घ्यावे. चपाती बनवतो तसे बारीक गोळे करून घ्यावेत. 
४ – पनीर मिश्रण आता सारण म्हणून वापरावे. चपातीचा गोळा लाटून घ्यावा. त्यामध्ये हे सारण टाकून पुन्हा एकदा गोळा बनवावा. व्यवस्थित लाटून घेऊन नॉनस्टिक तव्यावर तेलात भाजून घ्यावा.

टीप – पनीर मिश्रण खूप सैल किंवा घट्ट मळू नये.

Kothimbir Vadi Recipe in Marathi | स्वादिष्ट कोथिंबीर वडी रेसिपी !

वडी कोणाला आवडत नाही? एकदा तयार केलेली वडी दोन दिवस देखील आपण खाऊ शकतो. वडीचा स्वादच काही निराळा असतो. ज्या पद्धतीने वडी बनवली गेली पाहिजे तशी एकदम सोप्पी पद्धत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. कोथिंबीर वडी बनवताना थोडी काळजी घ्यावी लागेल. चला तर मग सुरू करूया बनवायला – कोथिंबीर वडी!

Kothimbir Vadi Recipe Ingredients  साहित्य:

• कोथिंबीर – ३ जुड्या (बारीक चिरलेली)
• चण्याचे पीठ – एक वाटी
• हिरव्या मिरच्या – ५-६
• तांदूळ पीठ – १ चमचा
• हळद – १ चमचा 
• लसूण – ६-७ पाकळ्या
• आले – छोटा तुकडा किसून
• जिरे – १ चमचा
• तेल – २ चमचे
• मीठ – स्वादानुसार

How to make kothimbir Vadi कृती:

१ – अगोदर चणा पिठात पाणी आणि तांदूळ पिठ घालून घट्ट भिजवावे. गुठळ्या राहता कामा नये.
२ – लसूण, आले यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सरमध्ये मिरच्या बारीक करून घ्याव्या. सर्व लागणारे पदार्थ एकत्र ठेवावे.
३ – आता कढईत १ चमचा तेल गरम करावे. आले – लसूण पेस्ट, बारीक केलेल्या मिरच्या, हळद आणि जिरे या सर्वांची फोडणी द्यावी. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकावी. 
४ – भिजवलेले पीठ घालावे आणि सतत हलवत राहावे. चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण अशा प्रकारे ढवळावे की गुठळ्या होता कामा नये. गॅस मंद आचेवर ठेवावा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळावे. एकदम घट्ट झाले की त्यावर झाकण ठेऊन वाफ काढून घ्यावी.
५ – मिश्रण वाफलायला थोडा वेळ लागतो. प्रत्येक पाच मिनिटानंतर मिश्रण वडी बनवण्यासारखे तयार झाले आहे का ते पाहावे. एका परातीला तेल लावून ठेवावे. सर्व मिश्रण त्या परातीत थापून घ्यावे.
६ – मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या हव्या तशा वड्या पाडाव्यात. आता तयार झाल्या कोरड्या वड्या..
७ – त्या वड्या तळण्यासाठी एका कढईत थोडे तेल टाका. वरचेवर तळून घ्या. झाल्या तयार लुसलुशीत आणि खमंग वड्या…
८ – वड्या जास्त वेळ टिकवून ठेवायच्या असतील तर जास्त तेलात चांगल्या तळून घ्या.

Dal Tadka Recipe in Marathi | डाळ तडका बनवा सोप्या पद्धतीने !

डाळ तडका (Dal Tadka) कोणाला आवडत नाही? आजची पिढी ही आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदातरी धाब्यावर जेवायला जातेच. अशातच काही जण जर शाकाहारी असले तर हमखास भाताबरोबर डाळ तडका मागवतात. तडका मारलेली डाळ ही खूपच चविष्ट लागते. तुम्हीही घरच्याघरी डाळ तडका बनवण्याचा नक्की प्रयत्न करा.

Dal Tadka Recipe Ingredients
साहित्य :

• तुरीची डाळ अर्धी वाटी

• चणा डाळ २ चमचे

• मुगाची डाळ पाव कप

• बारीक चिरलेला टोमॅटो – २

• बारीक चिरलेले कांदे – २

• लाल मिरच्या सुक्या – अख्ख्या २

• लाल तिखट – १ चमचा

• लसूण पाकळ्या – ५

• तेल – फोडणीसाठी १ चमचा.

• मोहरी आणि हिंग – एकत्र पाव चमचा

• जिरे – चिमूटभर

• हळद – पाव चमचा

• कढीपत्ता पाने – ५

• कोथिंबीर – एक चमचा चिरलेली

• मीठ – चवीनुसार

How to make Dal Tadka
कृती :

१ – सर्व डाळी एकत्र कुकरमध्ये शिजवून घ्या.

२ – दुसऱ्या भांड्यात तेल टाकून मोहरी, हिंग, कढीपत्ता फोडणीसाठी टाका.

३ – आता बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाका.

४ – या मिश्रणात आता हळद आणि लाल तिखट टाका. सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.

५ – मग शिजवलेली डाळ एकत्र चागली घोटून टाका. त्यानंतर कोथिंबीर टाका. थोडे पाणी आणि मीठ टाकून मध्यम आचेवर डाळ चांगली समरस होऊ द्या. डाळ घट्ट झाली पाहिजे.

६ – आता शेवटी तडका देण्याची वेळ. एका कढईत थोडे तेल गरम करा. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, जिरे आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या. आणि डाळीचे सर्व घट्ट मिश्रण यामध्ये टाका.

७ – डाळ तडका हा भाताबरोबर जास्तीत जास्त खाल्ला जातो.

टीप – डाळीचे मिश्रण तडका देण्याअगोदर घट्ट असावे. जास्त पातळ बनवल्यास चव बिघडू शकते.

Samosa Recipe in Marathi । गरमागरम खमंग समोसा ! एकदा नक्की करून पहा.

एखाद्या स्वीट मार्ट मध्ये गेल्यावर समोसा खाणे म्हणजे एक पर्वणीच असते. भजी आणि वडापाव यांच्या तुलनेत जरी प्रसिद्ध नसला तरी समोसा वारंवार खाल्लाच जातो. एखाद्या दिवशी जर तुम्ही घरीच समोसा बनवला तर? चला तर मग जाणून घेऊ खूप विशिष्ट कष्ट न घेता सोप्या पद्धतीने समोसा कसा बनवायचा.

Samosa Recipe in Marathi ingredients.
साहित्य :

समोसा आवरण बनवण्यासाठी साहित्य –

१. मैदा – २०० ग्रॅम

२. तेल – २ चमचे

३. मीठ

४. जिरे – अर्धा चमचा

बटाटा सारणासाठी लागणारे साहित्य –

१. बटाटे उकडलेले – ५

२. कांदा बारीक चिरून – २

३. आले बारीक करून ( पेस्ट ) – १ चमचा

४. कोथिंबीर

५. हळद अर्धा चमचा

६. हिरव्या मिरच्या बारीक चिरून -४

७. धणे – जिरे – मोहरी पूड

८. तळण्यासाठी आवश्यक तेवढे तेल.

Samosa recipe in Marathi process
समोसा बनवण्याची कृती :

आवरण –
१. प्रथमतः समोस्याचे आवरण बनवून घेऊ. मैदा, मीठ व तेल घेऊन भांड्यात चांगले मिसळून घ्या.त्यात पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा.
२. बेकिंग सोडा कणिक मध्ये मिसळा व त्याच्या पुऱ्या लाटा. पुऱ्या खूप पातळ होणार नाहीत याची काळजी घ्या.

बटाटा सारण –
१. उकडलेल्या बटाट्याची साल काढून चांगले बारीक करून घ्या.
२. कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात कांदा, जिरे, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.
३. आता त्यात बटाटा घाला. त्यात हळद, मीठ, जिरे – धणे – मोहरी पूड टाका.
४. सारण/ मिश्रण मस्तपैकी एकजीव केल्यानंतर थोडे थंड होऊ द्या.

समोसा –
१. आता लाटलेल्या पुऱ्या घ्या. त्यात एकदम थोडेसे सारण घाला.
२. समोस्याचा त्रिकोणी आकार देऊन तेलात तळून घ्या. थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्या.
३. समोसा चटणीसोबत मस्तपैकी सर्व्ह करा.

टीप –
मैद्याच्या पुऱ्या लाटताना विशेष काळजी घ्या.

Aloo paratha recipe in Marathi |आलू पराठा बनवा अगदी सोप्या पद्धतीने!

उत्तर भारतात आलू पराठा खूपच प्रसिद्ध आहे. आता तर पूर्ण भारतभर देखील हा पदार्थ बनवला जातो. अगदी थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत बटाट्याचे सारण टाकून हा पदार्थ लगेच बनवू शकतो. ज्यांना नाश्ता पोटभरून करायची सवय आहे त्यांना हा पदार्थ खूपच आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिकष्ट घ्यायची गरज नसते. सोप्यात सोप्या पद्धतीने आलु पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

Aloo Paratha Ingredients –
साहित्य:

• बटाटे – ४

• लसूण – ७ ते ८ पाकळ्या

• खोबरे – बारीक तुकडा

• लाल तिखट (चटणी) – २ बारीक चमचे

• कोथिंबीर

• जिरे

• हळद – अर्धा चमचा

• मीठ

• गव्हाचे पीठ

• तेल

How to make aloo paratha
कृती:

१ – गव्हाचे पीठ मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. चांगली मऊसर कणिक तयार करावी.

२ – एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बटाटे शिजवून घ्यावेत. आता हे बटाटे किसून बारीक करावे.

३ – लसूण – खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.

४ – आता किसलेल्या बटाट्यात लसूण – खोबरे पेस्ट, लाल तिखट, हळद, जिरे, कोथिंबीर आणि थोडे मिठ टाकून चांगले सारण बनवून घ्यावे.

५ – बटाट्याच्या सारणाचे लहान लहान गोळे करावेत.

६ – गव्हाच्या कणकेचे गोळे करून थोडेसे लाटून घ्यावे त्यावर बटाट्याचे सारण ठेवावे. लाटलेली चपाती सारणावरून बंद करून घ्या.

७ – पुन्हा अलगद लाटून घ्या. आता हा पराठा चपाती बनवतो तसा बनवून घ्या.

टीप:
• लाल तिखटऐवजी हिरवी मिरची पेस्टदेखील वापरू शकता.
• तेलाऐवजी तूपाचा वापर करून पराठा बनवू शकता.

Puran Poli recipe in Marathi | पुरणपोळी बनवण्याची सोप्पी पध्दत!

महाराष्ट्रात सणाला कुठला पदार्थ बनवला जात असेल तर तो म्हणजे पुरणपोळी! पुरण पोळी सर्व ठिकाणी आवडीने खाल्ली जाते. पुरणपोळी-गुळवणी आणि भाताबरोबर लसूण खोबऱ्याचा कटयुक्त रस्सा ! असा आस्वाद घेणे म्हणजे पोटपुजाच म्हणायची. ही पुरणपोळी बनवण्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते. पोळी जास्त गोड न बनवता सहजरीत्या कशी बनवू शकता याबद्दल या लेखामध्ये सांगितले आहे.

Ingredients for puranpoli recipe
साहित्य:

१ – चणाडाळ १ वाटी

२ – गूळ १ वाटी बारीक किसलेला

३ – वेलची पूड १ चमचा

४ – गव्हाचे पीठ

५ – तेल

Puran poli recipe process –
कृती :

१) चणाडाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ जास्त शिजता कामा नये. डाळ शिजल्यावर पाणी निथळून घ्यावे.

२) आता डाळीत किसलेला गूळ टाकावा. मंद आचेवर हे मिश्रण आटवून घ्यावे. मिश्रण आटवताना ढवळत राहावे. मिश्रण भांड्याला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.

३) आता मिश्रणात वेलची पूड टाकावी.

४) सर्व मिश्रण घट्ट झाल्यावर त्याला पाट्यावर वाटून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. या मिश्रणाला पुरण असे म्हणतात.

५) गव्हाचे पीठ मळून घ्यावे. चपाती करताना मळतो तसे. ( थोडा मैदा मिक्स केला तरी चालेल )

६) गव्हाचे कणिक घेवून त्याचे बारीक गोळे बनवावे. ते गोळे पातळसर लाटून त्यामध्ये पुरण ठेवावे. आता लाटलेल्या गोळ्याला बंद करून घ्यावे.

७) हलकेसे लाटून घ्यावे. गोळ्यातील पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. तव्यावर आता पुरण पोळी खरपूस भाजून घ्यावी.

८) पुरण पोळी गुळवणी सोबत सर्व्ह करू शकता. गुळवणी बनवण्यासाठी पाण्यात गूळ टाकून चांगला कढवून घ्यावा. गूळ पूर्णपणे विरघळू द्यावा.