मधुमेह असेल तर ही फळे खाण्याअगोदर सावधान! | Diet in Diabetes in Marathi

खाण्यावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे फक्त नियंत्रणामुळे तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. परंतु पूर्वी झालेल्या चुकांमधून जर तुम्हाला मधुमेह झालाच असेल तर खाण्याबाबतीत काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मधुमेही लोकांनी काही पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे. 

रक्तातील साखरेचे प्रमाण आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा देत असते. परंतु ते प्रमाण नियंत्रणात असणेही तेवढेच महत्वाचे आहे. उपचारापेक्षा काळजी घेतलेली बरी अशी एक म्हण आहे. त्यामुळे अगोदर काळजी घेऊन तुम्ही अनेक रोगांपासून स्वतःला वाचवू शकता.

 साखरेचे प्रमाण कमी असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. अशावेळी ती फळे खाल्ल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. खाली दिलेली फळांबद्दल माहिती फायदेशीर ठरेल आणि त्यांचे सेवन मधुमेही लोकांनी जपून करावे.

Fruits with Sugar content | साखरेचे प्रमाण जास्त असलेली फळे – 

चेरी – साखरेचे प्रमाण चेरीमध्ये खूप असते. सुमारे ७ ते ८ ग्रॅम एवढे प्रमाण चेरीमध्ये असते. चेरीचे अति प्रमाणात सेवन मधुमेही लोकांच्या आरोग्याला कधीच हितावह नसते. रक्तातील साखरेचे प्रमाण अगोदरच जास्त असल्याने चेरिमुळे ते आणखी वाढू शकते. चेरीचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. परंतु मधुमेही लोकांनी दोन हात दूर राहिलेले बरे! 

आंबा – अनेक जण आश्चर्य व्यक्त करतील की मधुमेहात आंबा खाऊ नये! खाल्ला तरी चालेल परंतु नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण आंब्यामध्ये जास्त असते. त्यामुळे अगोदर रक्तातील शर्करा नियंत्रणात नसल्याने मधुमेही लोकांनी तरी आंबा खाणे टाळावे. सुमारे ४० ते ४५ ग्रॅम एवढी साखर एका आंब्यामध्ये असते. म्हणून सावधान व्हा. वर्षातून एकदा सीझन येत असला तरी तुमच्या आरोग्याबाबत खेळ करू नका. 

द्राक्षे – द्राक्षे खाताना थोडी काळजी घ्यावी लागेल. थोडीशी द्राक्षे ठीक आहेत कारण अर्धा पावशेर द्राक्ष म्हणजे ३० ते ३५ ग्रॅम साखर! म्हणून त्रास वाचवण्यासाठी द्राक्षे सेवन न केलेलीच बरी. द्राक्षे खाल्ल्यानंतर रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.  

डाळिंब – डाळिंब हे जीवनसत्त्वयुक्त असे फळ आहे. रक्तातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन वाढवण्याचे काम डाळिंब करत असते. परंतु साखरेचे प्रमाणदेखील त्यात जास्त आहे. जवळजवळ ३५ ग्रॅम साखर एका डाळिंबामध्ये असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन करून रक्तातील साखरेचे प्रमाण आणखी वाढवू नये.

लिची – १ वाटी लिची फळामध्ये साखरेचे जवळजवळ ३० ग्रॅम एवढे प्रमाण असते. जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या फळांच्या प्रकारात लीचीचे देखील नाव आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी लिची फळ खाऊ नये.  

सैल स्तन ताठ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय !

सुंदरता कायम टिकून राहिली पाहिजे असे प्रत्येक महिलेला वाटते. त्यासाठी शरीर फिट आणि तंदुरुस्त असणे अत्यावश्यक आहे. स्तन हा महिलांच्या शरीरात उभारी आणण्याचे काम करतो. स्तन सैल असणे म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे प्रतीक आहे.

स्तन नेहमी ताठ आणि कसदार असणे आवश्यक आहे. स्तन कसदार दिसण्यासाठी विविध प्रकारचे ब्रा महिला नेहमी वापरतात. परंतु स्तन कसदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय महिला करू शकतात ज्याद्वारे स्तन आणखीनच आकर्षक आणि सुडौल दिसतील. 

काही घरगुती उपाय : 

पपई : पपई बारीक करून घ्या. त्यामध्ये हळद आणि लिंबू रस मिसळा. सर्व मिश्रण चांगले फेटून घ्या. १० मिनिटे मालिश करून घ्या. १० मिनिट मिश्रण स्तनांवर तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

अंडे : अंड्यातील पांढरा भाग हा शरीरात ताठपणा येण्यासाठी लिंबाच्या रसाबरोबर लावू शकता. त्यामुळे एकप्रकारे त्वचा थोड्या प्रमाणात आकुंचन पावते आणि स्वस्थ बनते. स्तनावर उपयोग करताना हलक्या हाताने मालीश करावी. थोडा वेळ तसेच ठेवावे आणि काही वेळाने धुवून टाकावे. 
अंड्यातील पिवळा भाग आणि काकडी एकत्र बारीक करून फेटून घ्या. ते मिश्रण हळुवारपणे गोलाकार दिशेने स्तनांवर १० मिनिट लावून घ्या. त्वचा मऊ पडेल आणि नंतर मात्र स्तन ताठ आणि कसदार होतील. 

कोरफड : कोरफड ही गुणकारी समजली जाते. तिचा त्वचेच्या आणि केसांच्या सुंदरतेसाठी नेहमी वापर केला जातो. कोरफड जेल किंवा नैसर्गिक कोरफड सोलून त्यातला आतील भाग  स्तनांवर लावावा. हळुवारपणे १० ते १५ मिनिट  गोलाकार मालिश करावी. नंतर लगेच धुवून टाकावे.

मेथी दाणे :मेथीदाणा रात्र भर पाण्यात भिजवून सकाळी बारीक करून घ्या. त्यामध्ये सरसो तेल किंवा नारियल तेल मिसळा आणि स्तनांवर १० मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने धुवून घ्या. 

द्राक्ष बिया : द्राक्ष बिया देखील गुणकारी ठरू शकतात. त्यांचे तेल मिळाल्यास नक्की विकत घ्या. त्या तेलाने मालिश करून स्तन ताठ होऊ शकतात. हा परिणाम चांगला टिकणारा असू शकतो. 

बर्फ :बर्फाचा तुकडा हा तात्पुरता पर्याय ठरू शकतो. तुम्हीच बघा, थंडी आल्यावर आपोआपच स्तन ताठ होतात. त्या पद्धतीने जर कुठे कार्यक्रमाला जायच्या अगोदर जर बर्फाने मालिश केली तर परिणाम तात्पुरता पण चांगला होऊ शकतो. बर्फामुळे स्तनांमध्ये कडकपणा येतो. 

लिंबु :नुसत्या लिंबाचा रस स्तनांवर लावून घ्या. त्वचा अगोदर आकसेल परंतु नंतर पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मऊ आणि ताठ होईल. 

Water Chestnut in marathi | शिंगाडा – आहार मूल्ये आणि उपयोग !

शास्त्रीय नाव: इलेओकरिस डल्सिस ( Eleocharis dulcis )

शिंगाडा (water chestnut) ही आशिया खंडात प्रामुख्याने आढळणारी वनस्पती आहे. ही एक पाणथळ जागेत वाढणारी तृण वनस्पती आहे. या वनस्पतीचे कंद खाद्य म्हणून वापरले जाते. किंचितसे गोड असे गरयुक्त असे हे फळ असते. शिंगाडा अनेक पौष्टिक मूल्यांची कमतरता भरून काढतो. शिंगाड्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्याची शेती उत्तर भारतात व विदर्भात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मध्यप्रदेशात देखील याची शेती केली जाते.

Water chestnut as food
खाद्य म्हणून उपयोग –

शिंगाड्याचे कंद महाराष्ट्रात उपवासात खाल्ले जातात. कंद असल्याने त्यांना उकडून खाल्ले जाते. तसेच पीठ देखील बनवले जाते. या पिठापासून अनेक रेसिपीज बनवल्या जातात. हा कंद आपण कच्चा, भाजून किंवा उकडून खाऊ शकतो. शिंगाड्याच्या पिठापासून लाडू, रवा, उपिट, चिप्स असे नानाविध खाद्य प्रकार बनवले जातात.

Water Chestnut benefits
शिंगाडा खाण्याचे फायदे व औषधी गुणधर्म :

आयुर्वेदात याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात पित्तशामक आणि शक्तिवर्धक अशी विशेषणे यासाठी वापरली गेलेली आहेत. याचप्रमाणे मुत्रासंबंधी कुठल्या व्याधी किंवा त्रास असल्यास शिंगाडा उपयुक्त ठरतो. शरीरातील सूज आणि अति रक्तस्राव शिंगाडा कमी करू शकतो.

अत्यंत कमी कॅलरीज आणि फॅट्स असणारा शिंगाडा खूप साऱ्या आजारांत उपयोगी आहे. शरीरातील पाण्याची व जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढत असल्याने त्याचा उपयोग डीटॉक्सीफिकेशन मध्ये केला जातो.

उष्णतेचा दाह कमी होऊ शकतो त्यामुळे याचे सेवन उन्हाळ्यात नियमित करावे. तसेच डोळ्यांची जळजळ, त्वचाविकार, हातापायांची आग यामध्येदेखील शिंगाडा गुणकारी आहे.

शिंगाडा सेवनाने संसर्गजन्य रोग होत नाहीत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अगोदर सांगितल्याप्रमाणे त्वचा आरोग्य राखले जाते. त्यामुळे अनेक त्वचाविकार व त्याच्या औषधांमध्ये शिंगाड्याचा वापर केला जातो.

शिंगाडा सेवनाने सगळी जीवनसत्त्वे पूर्ण होत असल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत. केसांच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

पोटॅशियम आणि आयोडिन चे प्रमाण जास्त असल्याने वजन व शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मज्जासंस्था आणि मांसपेशी बळकट होतात.

एका प्रयोगानंतर असे आढळले की शिंगाड्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा, थायरॉईड, फुफ्फुस आणि हाडांच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ दडपण्यास मदत झाली.

खेळाडू व कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी हा उपयुक्त असा आहार आहे.

गर्भवती महिलांनी तर जरूर याचे सेवन करावे. अतिरिक्त पौष्टिक मूल्ये बाळाच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात.

अनेक आयुर्वेदीक कल्प, बुटी व रसायन यामध्ये शिंगाडा असतो. शरीराची कांती उजळण्याचे काम शिंगाड्यामार्फत होते.

अनेक आजारांमध्ये शरीराची झीज होते. ती झीज भरून काढण्याचे काम शिंगाडा करतो.

असा हा शिंगाडा खूप आयुर्वेदिक, औषधी गुणधर्म असणारा आहे. याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. तसेच वेगवेगळ्या प्रकारे रेसिपीज बनवून शिंगाडा आणखीनच स्वादिष्ट बनवू शकता.

Kidney stone information in Marathi | मुतखडा – सविस्तर माहिती !

अनेक वेळा मुतखडा हे नाव ऐकले असेल परंतु तो निर्माण होण्यामागची कारणे आणि उपाय आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्णपणे संदर्भ लेख आहे.

कुठल्या ही पदार्थाचे सेवन जास्त झाल्यास तो लवकर पचवला जात नाही, अशातच त्या पदार्थाचे बारीक कण मूत्रपिंडात साठत राहतात आणि त्याचे कालांतराने खडे बनतात. मग मूत्रमार्गात असे खडे आल्याने खूप वेदना सुरू होतात. जेवढे खडे निर्माण झाले असतील मग ते विविध प्रक्रियेद्वारे मुत्रा वाटे बाहेर फेकले जातात. परंतु ही प्रक्रिया खूप मोठी असते. याला खूप दिवस लागतात. त्यामुळे पचायला जड असणारे पदार्थ कमी सेवन करणे कधीही हितावह ठरते.

मुतखडा होण्यामागची कारणे –

मूत्रमार्गात किंवा मूत्रपिंडात जे खडे निर्माण होतात त्यांना मुतखडा असे संबोधले जाते. असे खडे आपण डॉक्टरांकडे निदान केल्यानंतर पाहू शकतो. मुतखडा होण्याची अनेक कारणे सांगितली जातात परंतु त्यांचा संबंध किती सत्य आहे हे देखील पडताळून पाहिले पाहिजे. त्यापैकी काही कारणे पुढीलप्रमाणे

१ – बियाणेयुक्त फळे व भाज्या खाणे –

बियाणे युक्त भाज्या व फळे खाणे चांगले असते. परंतु त्याची मात्रा अधिक होऊ देऊ नका. व्यवस्थित पचन न झाल्याने त्यातील काही वरवरचा भाग हा मूत्रपिंडात साचू लागतो व्यवस्थित हालचाल व व्यायाम नसल्याने त्याचे विसर्जन व्यवस्थित होत नाही व मुतखडा निर्माण होतो.

२ – जंक फूड, मांसाहार आणि व्यसन –

कुठल्याही प्रकारचे व्यसन हे वाईटच असते. त्यातील विषारी पदार्थ हे व्यवस्थित विसर्जित होत नाहीत. अति प्रमाणात जंक फूड, मांसाहार आणि त्याबरोबर व्यसन केल्याने मुतखडा होऊ शकतो. शरीरातील न लागणारे घटक मुत्रा वाटे बाहेर फेकले जातात परंतु वारंवार या प्रक्रियेत अडथळा येत राहिल्यास मुतखडा होऊ शकतो.

३. कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्याने

शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शिअम तयार झाले पाहिजे. जसे की सूर्यप्रकाश आणि विविध प्राणीजन्य आहार घेतल्याने कॅल्शिअम ची कमतरता पूर्ण होते. परंतु तुम्ही जर कॅल्शिअम च्या गोळ्या, पावडर सेवन करत असाल तर ते मात्र शरीरासाठी हानिकारक ठरेल. कॅल्शिअम व्यवस्थित शरीरात शोषले गेले पाहिजे. नाहीतर अधिकचे कॅल्शिअम मुतखडा होण्यास कारणीभूत ठरेल.

४. पाणी प्रमाण

शरीरात सर्व प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची गरज असते. जर तुम्ही बैठे काम करत असाल आणि खाणे जास्त असेल तर नक्कीच तुम्ही स्थूल व्हाल. त्यातच जर पाणी कमी पिऊ लागला तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडणार नाहीत. मूत्रपिंडात व मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.

खड्यांचे प्रकार –

१ – कॅल्शियमचे खडे
२ – युरिक आम्लाचे खडे
३ – सिस्टाईन खडे
४ – स्ट्रुव्हाईट खडे

मुतखडा झालेल्यांची लक्षणे –

१ – ओटीपोटाच्या खाली किंवा पाठीत वेदना सुरू होतात.

२ – एका किंवा दोन्ही बाजूला वेदना वाढत जाते व आखडल्यासारखी ही वेदना गुप्तांगाच्या भागात पसरते.

३ – मळमळणे, उलट्या सुरू होतात.

४ – वारंवार लघवी होणे. सारखे लघवीला जावेसे वाटणे. लघवीला कमी होणे. लघवीत अडथळा येणे. लघवीचा रंग बदलणे.

५ – लघवीची जागा दुखणे. वारंवार ताप व थंडी वाजून येणे.

मुतखडा संबंधित तपासणी आणि चाचण्या –

लघवीची तपासणी केली जाते. पोटाचा, मूत्रपिंडाचा एक्स – रे काढला जातो. पेशंटचे वक्तव्य व वेदना ध्यानात घेतल्या जातात. या सर्वांच्या निदानानंतर योग्य तो उपचार सुरू केला जातो. काही चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात त्यांची नावे पुढीलप्रमाणे –

१ – मूत्रपिंडाचे अल्ट्रासाऊन्ड

२ – आयव्हीपी (इंट्राव्हेनस पायलोग्राम)

३ – ओटीपोटाची क्ष-किरण तपासणी

४ – रेट्रोग्रेड पायलोग्राम

५ – ओटीपोटाचा सीटी स्कॅन

६ – ओटीपोटाची । मूत्रपिंडाची एमआरआय

चाचण्यांमधून रक्त किंवा मूत्रातील कॅल्शियमची पातळी कळून येते. मूत्रमार्गाचे संक्रमण कळून येते. मूत्रवाहीनीत अडथळा निर्माण झालेला कळतो. मूत्रपिंडाचे झालेले नुकसान कळून येते.

Precautions to prevent kidney stone –
प्रतिबंध –

मुतखडा होऊच नये म्हणून जंक फूड, मांसाहार कमी करा. व्यसन करू नये. योग्य व्यायाम व शारीरिक हालचाल ठेवावी. द्रव पदार्थ सेवन करावेत. (पाणी, फळांचे ज्यूस, सरबत, काढा ई.)

Paralysis information in Marathi । पक्षाघात – सविस्तर माहिती !

पक्षाघात होणे ही काही सामान्य बाब नाही. आयुष्यभर किंवा काही वर्षे व्यंधत्व आल्यावर त्याची कारणे फक्त निदान केली जातात आणि तो होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. संपूर्ण उपचार होणे याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्याबाबत सजग राहणे केव्हाही चांगले. पक्षाघाताचा झटका ( स्ट्रोक ) आल्यास लगेच उपचार मिळणे खूप गरजेचे आहे.

मेंदूला नियमित रक्तपुरवठा होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित कार्य करू शकते. अन्यथा शरीरातील काही भाग लुळा पडतो. पक्षाघाताचे विविध प्रकार आहेत. या मध्ये पक्षाघात होण्याच्या तीव्रतेनुसार शरीराचे नुकसान होत असते. मेंदूला रक्‍तपुरवठा करणार्‍या एखाद्या धमनीमध्‍ये अडथळा निर्माण झाल्‍यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या ज्या भागाला हानी पोहोचते, मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा शरीरातील भाग निकामी होऊ शकतो. असे नुकसान तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे देखील असू शकते. तुम्हाला वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास नुकसान वाचवू शकता व रक्तपुरवठा सुरळीत होऊ शकतो.

पक्षाघाताची लक्षणे –

१ – शरीराचे काही भाग अचानक सुन्‍न किंवा कमकुवत होणे. उदा. हात, पाय, चेहरा.

२ – दृष्टीमध्ये अंधुकपणा येणे किंवा दिसणे बंद होणे. (एका डोळ्याने दिसणे बंद होऊ शकते)

३ – दुसरा काय बोलत आहे ते न समजणे किंवा बोलायला न येणे.

४ – डोके अचानक दुखू लागणे, चक्कर येणे, तोल जाऊन खाली पडणे.

अशी लक्षणे वारंवार दिसत असल्यास ती तुम्ही वॉर्निंग समजू शकता. यालाच वैद्यकीय भाषेत ट्रान्जियंट इस्केमिक अटॅक ( लहान पक्षाघात ) असे म्हणतात. कालांतराने पक्षाघात होऊ शकतो. अशी लक्षणे आढळत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पक्षाघात होण्यातील शक्यता –

१ – ऍथरोसिलेरोसिस (धमन्‍या कठोर होणे) :

रक्तवाहिन्या, धमन्या कठोर झाल्यास मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो व स्ट्रोकची शक्यता वाढते.

२ – अनियंत्रित मधुमेह :

साखर रक्तामध्ये असणे हितावह असते त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. परंतु याचे प्रमाण वाढल्यास अनेक प्रकारचे रोग जडतात. अनियंत्रित मधुमेह असेल तर मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही.

३ – उच्‍च रक्‍तदाब :

वारंवार ताणतणाव , टेन्शनचे वातावरण असेल तर रक्तदाब वाढतो. मनावर आणि सवयींवर नियंत्रण नसेल तर अनामिक भीती निर्माण होते. अशा भीतीतून कोणतीही परिस्थिती संकट वाटते आणि रक्तदाब वाढू लागतो. अशाने मग पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.

४ – उच्‍च कोलेस्टेरॉल पातळी :

कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू न देणे यासाठी विशेष सजगता ठेवावी लागेल. अनेक प्रकारे असे नियंत्रण आपण ठेऊ शकतो. कोलेस्टेरॉलची चाचणी नियमित करावी.

५ – धूम्रपान आणि इतर व्यसने :

सर्व व्यसने कोणत्या न कोणत्या तरी कारणाने आजार घेऊन येतातच. व्यसनाची सवय रक्तदाब वाढवते. त्यातच स्ट्रोकची शक्यता देखील वाढते.

६ – हृदय विकार :

हृदय विकार कधीही जडू देऊ नका. रक्तदाब, व्यसन, मधुमेह, स्थूलपणा अशी प्रमुख करणे हृदय विकाराची आहेत. या रोगात देखील शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही परिणामी पक्षाघात होऊ शकतो.

७ – कॅरोटिड धमनी (मेंदूला रक्‍तपुरवठा करणारी धमनी) :

ही धमनी जर व्यवस्थित काम करत नसेल किंवा त्याद्वारे रक्तपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होत असतील तर स्ट्रोक येऊ शकतो.

Prevention is better than cure –
प्रतिबंध –

१ – वरील ज्या शक्यता सांगितलेल्या आहेत त्यानुसार आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

२ – उच्च रक्तदाब , मधुमेह, स्थूलपणा आणि आणखी काही विकार असल्यास उपचार चालू ठेवणे. नियमित तपासणी करून घ्या.

३ – फॅट आणि कोलेस्टेरोलयुक्‍त पदार्थ खाणे टाळा.

४ – धूम्रपान, व्यसन, मद्यपान टाळा.

५ – नियमित व्यायाम करावा. आहार आणि विहार, कमी ताणतणाव, हसते खेळते वातावरण असावे.

Ayurvedik vanaspati information in Marathi । आयुर्वेदिक वनस्पतींचे गुणधर्म !

आयुर्वेद हा शब्दच आपल्याला निसर्गाशी जोडत असतो. प्रकृती आणि प्रवृत्ती याचे सविस्तर लेखन आपल्याला आयुर्वेदात सापडते. आयुर्वेदिक वनस्पती या अशाच प्रकारे मानवाला त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीशी जोडतात. अनेक नानाविध वनस्पतींचा उल्लेख भारतीय प्राचीन ग्रंथात आलेला आहे. अशाच ५ वनस्पतींची माहिती आपण आज घेणार आहोत. या वनस्पतींनी मानवी आरोग्यात महत्वाचे स्थान मिळवले आहे.

१. अडुळसा –

अडुळसा ही सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती आशियाई देशांत आढळते. प्रामुख्याने भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर या वनस्पतीची लागवड करतात. अडुळसा २.५ मीटर उंचीपर्यंत वाढते. पाने मध्यम आकाराची व लांबट असतात.

• औषधी गुणधर्म –

– अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधी उपयोगात आणली जातात.

– कफ, दमा, खोकला आणि श्वसन या प्रकारातील आजारांवर अडुळसा औषध मोठ्या
प्रमाणावर वापरतात.

– दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात
असावा, अशी आयुर्वेदात नोंद आहे.

– पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो.

– पानांचा उपयोग हृदयाच्या आजारांत केला जातो.

२. आवळा

हिंदीत आमला किंवा आँवला या नावाने या वनस्पतीला ओळखले जाते. आवळा चवीला तुरट व आंबट असतो. हे फळ अत्यंत औषधी आहे.आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आवळा हा अनेक समस्यांवर गुणकारी आहे. आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. आवळा भाजला, उकडवला, अंबावला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत.

• औषधी उपयोग –

– आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे तेल बनवतात.आवळ्यात असलेले पाच रस (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट) बऱ्याच आजारांवर
गुणकारी आहेत.

– कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व आवश्यक रस मिळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

– आवळा प्रामुख्याने पुष्टीवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. याचा उपयोग च्यवनप्राश बनवण्यात देखील केला जातो.

– आवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.

३. गवती चहा

गवती चहा ही एक तृणवर्गीय सुवासिक वनस्पती आहे. ही वनस्पती महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या वनस्पतीचे औषधी गुणधर्म खूप आहेत. पण प्रामुख्याने चहाबरोबर या वनस्पतीची पाने उकळली जातात. या वनस्पतीचे तेलदेखील अनेक विकारांवर गुणकारी आहे.

•औषधी उपयोग –

– तेल उत्तेजक व शामक असल्यामुळे जंतनाशक, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.

– सांधेदुखी असल्यास हे तेल मालीश करण्यासाठी वापरतात.

– कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.

– या वनस्पतीचा काढा ज्वरनाशक आहे.

४. ज्येष्ठमध –

ही दक्षिण युरोपात व आशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.

• औषधी उपयोग –

– ज्येष्ठमध शक्तिवर्धक आहे. ते अशक्तपणा दूर करते.

– ज्येष्ठमध सेवनाने कफ दूर होतो.

– ज्येष्ठमधाच्या रस घेतल्याने स्वरभंग दूर होऊ शकतो.

– अशक्तपणा असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून ते चूर्ण मध किंवा तूपातून जेवणापूर्वी खाण्यास द्यावे.

५. निरगुडी

बऱ्याच अजीर्ण आजारांवर ही वनस्पती गुणकारी आहे. या वनस्पतीचे तेल देखील उपयोगात आणले जाते. निरगुडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. छोटा निरगुडीचा वृक्ष ३ ते ७ मीटरपर्यंत वाढतो. कोवळ्या फांद्यावर, पानांच्या खालच्या बाजुला व मंजिऱ्यांवर पांढरे केस असतात

• औषधी उपयोग –

– स्नायु शिथिल आणि मोकळे होण्यासाठी या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग करतात.

– स्नायूंचे दुखणे तसेच शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. संधिवात, त्वचा रोग, डोकेदुखी, इ. आजारांमध्ये देखील गुणकारी आहे.

– आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या रोगांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर दिल्यास चांगले असते.

What is Detoxification ? शब्द ऐकलाय पण “डीटॉक्सीफिकेशन” म्हणजे नक्की काय?

डीटॉक्सीफिकेशन हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो पण त्याचा नक्की अर्थ आपल्याला माहित नसतो. डीटॉक्सीफिकेशन म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. परंतु ही विषारी द्रव्य बाहेर टाकताना जर नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला तर जास्त फायदेशीर ठरते. त्याच्याविषयी घेतली जाणारी काळजी ही आपल्याला माहीत पाहिजे. आपण रोज खात असलेल्या अन्नामुळे किंवा प्रदूषित वातावरणामुळे आपल्या शरीरात खूप सारी विषारी द्रव्ये तयार होतात. या विषारी द्रव्य बाहेर फेकण्याचे काम लघवीद्वारे व घामाद्वारे केले जाते. तुम्ही जर खूप शारीरिक कष्ट करत असाल तर तुम्हाला डिटॉक्सीफिकेशनची गरज नसते. परंतु कामाचे स्वरूप जर बैठ्या स्वरूपात असेल तर मात्र तुम्हाला डीटॉक्सीफिकेशनची गरज आहे, नाहीतर काही कालांतराने तुमच्या शरीरात तीच विषारी द्रव्य साठून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते.

तुम्ही जर मद्य, चहा – कॉफी, सिगारेट जर जास्त प्रमाणात पित असाल तर विषारी द्रव्य खूप प्रमाणात शरीरात तयार होतात. शरीराच्या यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा पदार्थांचे सेवन न करणेच चांगले. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघून जाण्यासाठी ६० ते ७० टक्के पातळ पदार्थ आणि फक्त ३० ते ४० टक्के घनपदार्थ घेणे गरजेचे असते हे करत असताना शरीरातील पाण्याची पातळी कायम राखणे गरजेचे आहे.

• कोणत्या पदार्थांचा करावा आहारात समावेश?

डीटॉक्सीफिकेशन करताना फळांचे सेवन उत्तम राहते. कलिंगड, पपई यासारख्या फळांचा रस ही चांगला असतो. तसेच हिरव्या पालेभाज्या कोबी फ्लावर देखील खावेत. जेवणात कांद्याचा समावेश केला तरी उत्तम. तसेच कोणत्याही फळांचा ज्यूस घेतल्यास फायद्याचे ठरते. म्हणजेच ताजी फळे, पालेभाज्या, ज्यूस लिंबूपाणी, नारळ पाणी, दही-ताक, मोड आलेली कडधान्य व भरपूर पाणी प्यावे. मल्टिव्हिटॅमिन पदार्थ टाळावेत.

डीटॉक्सीफिकेशन केव्हा करावे?
वर्षातून तीन ते चार वेळा डीटॉक्सीफिकेशन केलेले चांगले असते. तुम्हाला जर उच्च रक्तदाब किंवा मधुमेह याचा त्रास असेल तर दोन महिन्यातून देखील डीटॉक्सीफिकेशन करू शकता. डिटॉक्स करताना समतोल आहाराची गरज असते, नाहीतर अशक्तपणा येऊ शकतो. हे करताना तीन चार दिवस तरी जंक फूड्स, चरबीयुक्त आहार, साखर टाळावी.

• विषद्रव्ये तयार झालेली कशी कळतील ?

१ – वारंवार थकवा जाणवणे.

२ – अशक्तपणा येणे.

३ – स्वभावदोष निर्माण होणे.

४ – विनाकारण चिडचिड करणे.

५ – एकाग्रता कमी होणे.

६ – डोकेदुखी, अंगदुखी जाणवणे.

७ – त्वचाविकार उद्भवणे.

८ – पचनक्रिया बिघडणे.

ही सर्व कारणे जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला डिटॉक्सीफिकेशनची खूप गरज आहे. फक्त तीन ते चार दिवसाच्या अनुभवानंतर तुम्ही खूपच फ्रेश अनुभव कराल.

• डीटॉक्सीफिकेशनचे फायदे –

१ – संपूर्ण चयापचय संस्थेत एकसंतता आणली जाते.

२ – रक्ताभिसरण सुधारते.

३ – नैसर्गिक ऊर्जा वाढते आणि पचन संस्थेची स्वच्छता होते.

४ – रक्त शुद्ध होते.

आहार हा आहारतज्ञांच्या मार्गदर्शनाने घ्यावा. तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन देतील. परंतु आहारात समावेश असणाऱ्या सर्व पदार्थात जास्त प्रोटीन असलेले, चरबीयुक्त पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

(टीप – हा लेख पूर्णपणे संदर्भानुसार लिहिला आहे. तुम्ही डीटॉक्सीफिकेशन करताना आहार तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

शेवगा औषधी गुणधर्म आणि फायदे –

शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे फायदे आणि गुणधर्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

• शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा
• हवामान – या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.
• उंची – साधारण उंची १० मी. असते.

• प्रमुख उपयोग –

 • शेवग्याच्या शेंगा कालवण, कढी, आमटी किंवा सुकी भाजीत शिजवून खाल्ल्या जातात.
 • या झाडाची पाने, फुले, फळं, साल, आणि मुळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उपचारात केला जातो. बियांपासून तेल सुद्धा काढले जाते आणि पानांपासून आपण भाजी बनवू शकतो.
 • शेवगा हा हाडांसाठी वरदान आहे. यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अशी भरपूर जीवनसत्त्वे शेवग्यामध्ये आढळतात.
 • कोवळ्या पानांची भाजी महाराष्ट्रात मृग नक्षत्रात केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील वातदोष वाढलेला असतो म्हणून ही भाजी तेव्हा आवर्जून खाल्ली जाते.

• शेवग्याचे आयुर्वेदिक गुणधर्म –

१. हाडे मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता शेवग्याची भाजी नियमित सेवन करावी.

२. वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप बनवून प्यावे. नियमित पिल्यास चरबीचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच नियमित व्यायाम देखील करावा.

३. शारीरिक दौर्बल्य असल्यास शेवग्याच्या शेंगा नियमित आहारात घ्याव्यात.

४. तसेच संधिवात, नेत्ररोग, स्नायूंची कमजोरी या व्याधी देखील बऱ्या होतात.

५. शेवगा हा उष्ण आहे म्हणून त्याचा वात आणि कफ या प्रकारच्या विकारांवर उत्तम उपयोग होतो.

६. शेवगा हा उत्तम पाचक आहे. पोटातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन रक्तप्रवाह सुधारतो.

७. शरीरावर किंवा शरीराच्या आतील भागात आलेली सूज शेवग्याच्या सालीच्या काढ्याने कमी होते.

८. डोकेदुखी व जडपणा यावर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.

९. शेवगा जंतनाशक असल्याने पोटातील कृमी विष्ठेवाटे बाहेर पडतात.

१०. रक्तदोष, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांमध्ये शेवगा गुणकारी आहे.

• सौंदर्य खुलवण्यासाठी उपयोग –

अनेक जीवनसत्त्वांची कमतरता शेवगा भरून काढतो. जसे अन्न तसे मन आणि शरीर, या उक्तीप्रमाणे तुम्ही शेवगा नियमित सेवन करत असाल तर तुमचे साैंदर्य खुलवण्यात नक्कीच सहयोग होईल. त्वचाविकार, थकवा, आणि डोळ्यांचे विकार यामध्ये शेवगा नियमित सेवन करा. नक्कीच लाभ होईल व शारीरिक कांती उजळेल.

हे देखील वाचा – Indurikar Maharaj Information | निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ “इंदुरीकर”

Giloy in Marathi । गुळवेल वनस्पतीचे आश्चर्यकारक गुणधर्म

धकाधकीच्या जीवनात आज कोणाकडेच स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये. असे असताना आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही चिंताजनक बाब आहे.आपले केमिकल्स, गोळ्या यांचे सेवन अशा प्रमाणात वाढले आहे की आपण साधेसुधे घरगुती उपाय करणे विसरूनच जातो. आपल्याला चटकन रिझल्ट हवा असल्याने आपण हे उपाय करतो परंतु त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम आपल्याला माहित नसतात.

आज मी तुम्हाला गुळवेल (Giloy) या आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे जी वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या बागेत, परिसरात, गुळवेलची लागवड कराल. इंग्रजीमध्ये गिलोय या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म आता पूर्ण जगभरात पसरू लागले आहेत. परंतु खूप हजार वर्षांपूर्वीच आयुर्वेदात गुळवेल या वनस्पतीबद्दल लिहून ठेवले आहे.

अशा या बहुउपयोगी “गुळवेल” वनस्पतीबद्दल आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. गुळवेलाचे सेवन कसे करावे? किती प्रमाणात करावे? याबद्दल देखील आढावा घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे त्याचे फायदे व दुष्परिणाम देखील सांगण्यात आले आहेत.

• गुळवेल किंवा गुळवेल सत्त्व म्हणजे काय? (What is Giloy or Giloy satva)

गुळवेल म्हणजेच गुडुची वनस्पती. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया ( Tinospora cordifolia) असे आहे. या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर विविध प्रकारच्या औषधात केला जातो. गुळवेल सत्त्व असे देखील याला म्हटले जाते.

उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये म्हणजे दक्षिण आशियामध्ये ही वनस्पती आढळते. ह्यात प्रामुख्याने भारत, श्रीलंका आणि म्यानमार या देशांचा समावेश होतो.

ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.

महाराष्ट्रामध्ये गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेल हा आकाराने मोठा असतो. मोठ्या झाडांवर किंवा कुंपणावर देखील पसरते. या वनस्पतीचे खोड खूप जाड असते. पान हे हृदयाकृती असते. पाने हाताला गुळगुळीत जाणवतात आणि फुले ही पिवळी हिरवी अशी असतात. फळे ही छोटी गोलाकार आकारात असतात. फुले व फळे येण्याचा काळ हा साधारणतः नोव्हेंबर ते जून दरम्यान असतो.

• गुळवेल घनवटी ( Giloy Ghanvati )

 • गुळवेल वेलीचे सत्व काढून त्यापासून गोळ्या बनवल्या जातात त्याला गुळवेल घनवटी असे म्हटले जाते.
 • गूळवेलाचा प्रथम अर्क काढला जातो. या अर्कालाच आयुर्वेदामध्ये ‘ घन ‘ असे संबोधले जाते. घन बनवण्यासाठी गुळवेलाच्या फांद्या वेगळ्या काढून कुटतात. थोड्या वेळासाठी त्या पाण्यात ठेवल्या जातात.
 • थोडे समरस झाल्यावर त्यापासून काढा बनवला जातो. काढा नंतर गरम करून घट्ट होईपर्यंत उकळला जातो. या सर्व प्रक्रियेला वेळ द्यावा लागतो.
 • घट्ट झाल्यावर काढा उन्हात ठेवला जातो. गोळ्या बनवल्या जातील असा घट्ट झाल्यावर त्याला व्यवस्थित उन्हातून काढून बाजूला घेतात. नंतर घनवटी म्हणजेच गोळ्या बनवल्या जातात.
 • गुळवेल उष्णता शामक असल्याने सर्व प्रकारच्या तापांमध्ये गुणकारी आहे. ही घनवटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. तसेच घनवटी बुद्धिवर्धक, शक्तिवर्धक आणि आयुवर्धक आहे. तसेच कावीळ, त्वचारोग, खोकला, भूक न लागणे या आजारांवर देखील गुळवेल घनवटी उपयोगी आहे.

• गुळवेल – उपयोग आणि औषधी गुणधर्म

गुळवेल वनस्पतीचा औषधी उपयोग खूप प्रकारे केला जातो. खाली काही आजारांची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये गुळवेल वापरला जाऊ शकतो.
आयुर्वेदिक संदर्भ आणि आधुनिक मेडिकल प्रमाणित असे गुणधर्म गुळवेल दर्शवते.

१. रोगप्रतिकारशक्ती

गुळवेलीचे सेवन म्हणजे घनवटी किंवा काढा घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. साथीचे आजार तुम्हाला सहजासहजी होणारच नाहीत.

२. मधुमेह

गुळवेलमध्ये हाइपोग्लिसीमिक हे साखर कमी करणारे घटक असतात. या घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. ज्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात येऊ शकतो. मधुमेही गुळवेल काढा नियमित सल्ल्यानुसार घेऊ शकतात.

३. ताप

जीर्ण ताप तसेच कोणत्याही तापात गुळवेल म्हणजे वरदानच आहे. तापावरील औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो.

४. पचनक्रिया सुधारते.

पचनक्रिया बिघडण्यामागे खूप कारणे आहेत. परंतु त्यावर एक रामबाण उपाय म्हणजे गुळवेल. पचनक्रिया सुधारणे आणि शरीरातील विषाणू बाहेर टाकण्याचे काम गुळवेल करते. घन वटी किंवा काढा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास पोट बिघडण्याच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता.

५. खोकला

खोकला खूप जुना असल्यास तुम्ही गुळवेल घेऊ शकता. काढा दररोज घेतल्यास काही दिवसातच खोकल्यापासून सुटका मिळते.

६. दृष्टी सुधारते

गुळवेल उगाळून तो काढा किंवा त्यातील वरवरचे पाणी डोळ्याला लावल्यास दृष्टी सुधारते. सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या समस्या दूर होतात. चष्म्याचा नंबर देखील कमी झाल्याचा खूप लोकांचा अनुभव आहे. आवळा रस आणि गुळवेल काढा एकत्र करून प्यायल्यास नजर तीक्ष्ण होते.

• गुळवेलाचे फायदे –

 • पचनक्रिया सुधारून रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
 • स्मरणशक्ती सुधारते
 • कावीळ आजारात गुणकारी. कावीळ आजारात आलेला अशक्तपणा गुळवेल घेतल्याने दूर होतो.
 • हातापायांची जळजळ थांबवते.
 • पोटाच्या सर्व तक्रारींवर गुणकारी.
 • सर्व रक्तदोष दूर करते. त्यामुळे त्वचाविकार बरे होण्यास मदत होते.

• गुळवेलाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम –

 • या वनस्पतीचे दुष्परिणाम काहीच नाहीत. परंतु अति सेवन टाळावे आणि विविध काळात जर दुसरे उपचार चालू असतील तर याचे सेवन टाळा.
 • कोणत्याही प्रकारे गुळवेलाचे सेवन पूर्ण माहितीनुसार करा नाहीतर दुष्परिणाम होतीलच .
 • अति केल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो.
 • मधुमेहाचे उपचार चालू असतील तर गुळवेलाचे सेवन करू नका.

• गुळवेल काढा ( giloy juice )

गुळवेलाची वनस्पती पूर्णपणे न तोडता त्याचा मांसल भाग म्हणजेच खोड आणावे. त्याला कुटून घ्यावे. कुटताना जास्त रस वाया जाऊ देऊ नये. कुटलेली साल, त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका कपात घ्यावी. एका छोट्या भांड्यात पाणी घ्यावे. पाण्यात कुटलेली साल टाकावी. हे मिश्रण उकळून घ्यावे. हा काढा खूप कडू असतो.

टीप :
(” अमृता ” असे संबोधन असलेली ही वनस्पती अत्यंत लाभदायक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करावे. दिलेली सर्व माहिती संदर्भानुसार आहे.)

हे उपाय करून चमत्कारिकरीत्या पिवळे दात करा पांढरे!

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणे अवघड होऊन बसले आहे. घराबाहेर दहा – बारा तास काम आणि परत घरी येणे त्यात परत झोप, यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. सकाळी एकदा ब्रश केल्यानंतर नंतर कधीही दिवसभर आपण दाताकडे लक्ष देत नाही. एखाद्या दिवशी सुट्टी असल्यास तेवढ्यापुरते आपले दात पिवळे झाल्याची जाणीव आपल्याला होते, परंतु काही वेदना नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष आपल्याला महागात पडू शकते. काही दिवसांनी आपले दात किडू शकतात.

दाताच्या आतील बाजूने पिवळा थर साचत जातो. यामुळे आपण वारंवार डॉक्टरकडे जाऊन दात स्वच्छ करतो. यावर उपाय म्हणून आम्ही तुम्हाला आज काही घरगुती आणि नैसर्गिक पद्धती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःचे दात चमत्कारीकरित्या पांढरे करू शकता.


• दात पिवळे होण्याची प्रमुख कारणे –


१. तंबाखूचे सेवन, सिगारेट, पौष्टिक आहार न घेणे, दातांची स्वच्छता न करणे यामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो.

२. ब्रशचा उपयोग वरचेवर गडबडीत केला जातो.

३. टूथपेस्ट व्यतिरिक्त कुठलेच दुसरे माध्यम दात स्वच्छ करण्यासाठी वापरले जात नाही.

४. जेवल्यानंतर दातांची स्वच्छता केली जात नाही.


• घरगुती उपाय –

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती व नैसर्गिक वस्तूंचा वापर करता येतो. या पदार्थांमधील गुणधर्म हे जंतुनाशक असतात, ज्यामुळे दातांची स्वच्छता तर होतेच शिवाय ते चमकू पण लागतात. हे पदार्थ कोणते आहेत, ते कसे वापरावेत, यासंदर्भातील माहिती आपण घेणार आहोत.
१. दातांवर बेकिंग सोडा लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
२. संत्र्याचे साल वाळवून पावडर बनवून दातांवर लावल्याने दातांची चमक वाढते. 
३. ऑलिव्ह ऑइल दातांवर लावावे. आणि पाच मिनिटांनंतर पाण्याने धुवावे. यामुळे दात चमकतात.
४. ब्रश केल्यानंतर दातांवर खोबरेल तेल लावल्यास दातांची चमक टिकते. 
५. स्ट्रॉबेरी बारीक करून पेस्ट बनवून त्याने दातांची हलक्या हाताने मालिश केल्याने दात चमकतात.
६. सफरचंदाचा पल्प दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात.
७. सुकामेवा, कडधान्ये, फळे खावीत, जेणेकरून तुम्हाला जास्त चावून खावे लागेल. चावून खाल्ल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो. 
८. लिंबाचे साल दातांवर घासल्याने दातांची चमक वाढते. 
याचा अर्थ असा की, ज्या पदार्थात जास्त प्रथिने, क आणि ड जीवनसत्त्व आहे असे पदार्थ दातांवर घासावे किंवा ते चांगले चावून खावे.

हे सुद्धा वाचा- त्वचा आणि केसांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, येथे वाचा टिप्स.