Dal Tadka Recipe in Marathi | डाळ तडका बनवा सोप्या पद्धतीने !

डाळ तडका (Dal Tadka) कोणाला आवडत नाही? आजची पिढी ही आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदातरी धाब्यावर जेवायला जातेच. अशातच काही जण जर शाकाहारी असले तर हमखास भाताबरोबर डाळ तडका मागवतात. तडका मारलेली डाळ ही खूपच चविष्ट लागते. तुम्हीही घरच्याघरी डाळ तडका बनवण्याचा नक्की प्रयत्न करा.

Dal Tadka Recipe Ingredients
साहित्य :

• तुरीची डाळ अर्धी वाटी

• चणा डाळ २ चमचे

• मुगाची डाळ पाव कप

• बारीक चिरलेला टोमॅटो – २

• बारीक चिरलेले कांदे – २

• लाल मिरच्या सुक्या – अख्ख्या २

• लाल तिखट – १ चमचा

• लसूण पाकळ्या – ५

• तेल – फोडणीसाठी १ चमचा.

• मोहरी आणि हिंग – एकत्र पाव चमचा

• जिरे – चिमूटभर

• हळद – पाव चमचा

• कढीपत्ता पाने – ५

• कोथिंबीर – एक चमचा चिरलेली

• मीठ – चवीनुसार

How to make Dal Tadka
कृती :

१ – सर्व डाळी एकत्र कुकरमध्ये शिजवून घ्या.

२ – दुसऱ्या भांड्यात तेल टाकून मोहरी, हिंग, कढीपत्ता फोडणीसाठी टाका.

३ – आता बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाका.

४ – या मिश्रणात आता हळद आणि लाल तिखट टाका. सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.

५ – मग शिजवलेली डाळ एकत्र चागली घोटून टाका. त्यानंतर कोथिंबीर टाका. थोडे पाणी आणि मीठ टाकून मध्यम आचेवर डाळ चांगली समरस होऊ द्या. डाळ घट्ट झाली पाहिजे.

६ – आता शेवटी तडका देण्याची वेळ. एका कढईत थोडे तेल गरम करा. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, जिरे आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या. आणि डाळीचे सर्व घट्ट मिश्रण यामध्ये टाका.

७ – डाळ तडका हा भाताबरोबर जास्तीत जास्त खाल्ला जातो.

टीप – डाळीचे मिश्रण तडका देण्याअगोदर घट्ट असावे. जास्त पातळ बनवल्यास चव बिघडू शकते.

Leave a Comment