छत्रपती शिवाजी महाराज अप्रतिम निबंध | Shivaji Maharaj Marathi Nibandh |

shivaji Maharaj Marathi Nibandh

छत्रपती शिवाजी महाराज निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) लिहताना त्यांची ओळख, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांचे लोकहित कार्य मुद्देसूद स्वरूपात वर्णन करायचे असते. तसेच शून्यातून निर्माण केलेले स्वराज्य, आलेल्या संकटांचा धैर्याने केलेला सामना आणि त्यांचा रयतेकडून राजा छत्रपती म्हणून झालेला स्वीकार अशा सर्व बाबींचा उल्लेख देखील निबंधात करायचा असतो.

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले (Chhatrapati Shivajiraje Shahajiraje Bhosale) हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि विश्वाला आदर्शवत असे राजे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित निबंध लिहताना प्रत्येक व्यक्ती तसेच विद्यार्थी आनंदाने आणि अभिमानाने भरून जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज या विषयवार निबंध लिहताना खालील मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करू शकता.

• ओळख आणि प्रस्तावना
• शिवरायांचे बालपण व शिक्षण
• आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग
• राज्यकारभार आणि विस्तार
• राज्याभिषेक
• जीवन निष्कर्ष

छत्रपती शिवाजी महाराज – मराठी निबंध | Shivaji Maharaj Essay In Marathi |

स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.

माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत.

शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.

“अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.

शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले.

इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.

शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.

शिवरायांचे अखंड कर्तृत्व निबंध स्वरूपात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankrant Marathi Nibandh |

makar sankrant marathi nibandh

प्रस्तुत लेख हा मकर संक्रांत या सणाबद्दल सर्व माहिती सांगणारा असा निबंध आहे. वर्षाच्या सुरुवातीस येणारा हा सण धार्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या अति महत्त्वाचा सण मानला जातो. विद्यार्थ्यांना या सणाबद्दल सर्व आवश्यक माहिती मुद्देसूद स्वरूपात लिहावी लागते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा मकर संक्रांत मराठी निबंध (Makar Sankrant Marathi Nibandh)!

मकर संक्रांत सण – निबंध लेखन | Makar Sankrant Essay In Marathi |

मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व ठेवणारा सण आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर इसवी सनाच्या सुरुवातीच्या काही दिवसात सूर्य मकर राशीत संक्रमण करत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य पूर्णपणे मकर राशीत प्रवेश करतो.

मकरसंक्रांत हा सण १४ जानेवारी आणि लिप वर्ष असल्यास १५ जानेवारीला असतो. या दिवसांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. ववसा देणे, ओटी भरणे, आणि हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम या सणात साजरे केले जातात.

भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवशी साजरा होणाऱ्या मकर संक्रांत या सणाला महाराष्ट्रात शेतकीय महत्त्व देखील आहे. हरभरा, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ असे सर्व पदार्थ देवाला अर्पण केले जातात.

संक्रांतीअगोदरचा दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. या दिवसांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळ यांची एकत्र अशी मिश्र भाजी बनवली जाते. त्यासोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी आवर्जून खाल्ली जाते.

सुगड पूजन म्हणजेच पाच छोटी मडकी पूजण्याची प्रथा देखील केली जाते. यामध्ये भोगी दिवशी बनवलेले थोडेसे जेवण ठेवले जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला ते जेवण प्रसाद म्हणून सर्वांना वाटले जाते.

संक्रांतीच्या दिवशी सर्व कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व शेजारी-पाजारी सर्वांना तिळगुळ वाटले जातात. “तिळगुळ घ्या गोड बोला” असे बोलले जाते. तिळगुळ वाटण्यातून सर्वांप्रती असणारा स्नेहभाव व प्रेमभाव दर्शविला जातो.

स्त्रियांसाठी मकर संक्रांती दिवसापासून हळदी-कुंकू लावण्यास सुरुवात होते. हळदी-कुंकू लावण्याचा शेवट “रथसप्तमी” या दिवशी होतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी काळी साडी नेसण्याची प्रथा देखील आहे.

तिळात खूप स्निग्धता असल्याने त्याचा वापर तिळगुळ बनवण्यात करतात. स्नेहाची गोडी वाढावी म्हणून गुळात टाकून तिळगूळ बनवले जातात. येथे स्नेह म्हणजे तिळ असे अभिप्रेत आहे, तर गूळ हा गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे.

मकर संक्रांत मराठी निबंध (Makar Sankrant Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा… धन्यवाद!

भोगी सण संपूर्ण माहिती | Bhogi Information In Marathi |

Bhogi Information In Marathi

भोगी हा सण का व कसा साजरा करतात याबद्दलची सर्व माहिती आपण भोगी सण मराठी माहिती (Bhogi Information In Marathi) या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच निमित्ताने प्रत्येक सण व प्रथा ही का व कशी साजरी केली जाते याबद्दलचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत भोगी या सणाविषयी खूपच रंजक आणि महत्त्वपूर्ण माहिती!

भोगी सण – २०२१ | Bhogi Information In Marathi | मकरसंक्रांत २०२१ |

मकर संक्रांतीचे तीन महत्त्वपूर्ण दिवस असतात. त्यामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. भोगी शब्दानुसार या सणाला “उपभोगाचा सण” असे देखील म्हटले जाते.

भोगी – आहार महत्त्व | Food Importance on Bhogi |

जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या, पिके उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात.

वाल, पावटा, घेवडा, वाटाणा जे काही शेतात पिकेल त्याचा मसाले भात तयार केला जातो.

सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यामध्ये चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्‍या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो.

तीळयुक्त बाजरीची भाकरी ही या दिवशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.

हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते. म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो.

भोगी सण कसा साजरा करावा?

भोगी हा सण उपभोगाचा सण असल्याने या दिवशी आहार आणि सौख्य उपभोगण्याची प्रथा आहे.

सकाळी लवकर उठून स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. नवीन अलंकार परिधान करतात. घरासमोर रांगोळी काढतात आणि उपभोगाचे प्रतिक असणाऱ्या इंद्रदेवाची पूजा केली जाते.

त्यानंतर जेवणात तीळयुक्त बाजरीची भाकरी, सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी, मसाले(फोडणी) भात, मुगडाळ, दही – लोणी, असा सर्वगुण संपन्न, उर्जादायक, उष्णता निर्माण करणारा आहार घेतला जातो.

भोगीला सुगड पुजण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी “वाण पूजन प्रथा” असेही म्हटले जाते. यामध्ये पाच छोटी मडकी पुजली जातात. या पाच मडक्यांत भाजी – भाकरी ठेवले जाते. सुगडांतील भाजी – भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला खायची प्रथा आहे.

संक्रांतीच्या दिवशी या सुगडांचा सवाष्णी स्त्रियांना ववसा असतो. त्यानंतर ओटी भरणी आणि हळदी – कुंकू असे कार्यक्रम घेतले जातात.

वाचकांसाठी थोडेसे –

भोगी सण माहिती (Bhogi Information In Marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा… त्याबद्दल तुमचा अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा… धन्यवाद!

स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi |

Swami Vivekanand Information In Marathi

प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information in Marathi) देण्यात आलेली आहे. माहितीचा आधार हा आपले ज्ञान वाढवण्यासाठी असतो. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे जीवन माहीत करून घेणे आपल्या ज्ञानात आणि आयुष्याच्या वाटचालीत उपयुक्त ठरेल अशी आशा करूया…

स्वामी विवेकानंद यांचे जीवन (Swami Vivekanand Life) आपण फक्त त्यांनी केलेल्या कर्तृत्वावर जाणू शकतो. अशा कर्तुत्वाची झेप घेण्याची ऊर्मी सर्व मानव जातीत येण्यासाठी सर्वांना स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट (Swami Vivekanand Biography) माहिती असणे आवश्यक आहे.

स्वामी विवेकानंद – माहिती | Swami Vivekanand Information In Marathi |

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण, कार्य आणि अध्यात्मिक उन्नती अशा काही पैलुंमध्ये त्यांचे जीवन विस्तारित करता येईल. संपूर्ण जीवनपट मांडताना काही महत्त्वपूर्ण घटनांचा आणि कर्तुत्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

स्वामी विवेकानंद जीवनपट संक्षिप्त (Swami Vivekanand Biography In Marathi)

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला त्यांचे निधन ४ जुलै १९०२ रोजी झाले. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते.

साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती.

रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी “रामकृष्ण मिशन” स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि अध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले.

स्वामी विवेकानंद यांचे बालपण | Swami Vivekanand Early Life |

विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी, सोमवारी (पौष कृष्ण सप्तमी) झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अ‍ॅटर्नी (वकील) होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी यादेखील धार्मिक वृत्तीच्या होत्या.

स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले होते. त्यामध्ये गायन आणि वादन या दोन्हींचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त शारीरिक सुदृढतेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रांत ते पारंगत होते.

तर्कसंगत विचार आणि कृती यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रध्दा, जातीव्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण ( Swami Vivekanand Education )

स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये झाले.

त्यांनी १८७९ मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला.

त्या शिक्षणानंतर त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तेथे तर्कशास्त्र, इतिहास, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान इ. विषय हाताळले.

त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८८१ साली फाइन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बी.ए. चे शिक्षण १८८४ साली पूर्ण केले.

स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान | Swami Vivekanand Philosophy |

स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचे शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले.

यामध्ये बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी अभ्यासताना त्यांना ज्ञानाची जी भूक लागली होती ती आत्मिक होती. सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते. त्यानंतर त्यांनी बंगाली आणि प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासायला सुरुवात केली.

शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होतेच शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच “शृतिधर” म्हणून देखील ओळखू लागले.

तार्किक आणि बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाहीये अशी मनोधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक आणि अध्यात्मिक प्रवास सुरू केला तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने! स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवातून प्रकट झालेले आहेत.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस | Swami Vivekanand and Ramkrushna Paramhans |

स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आता आत्मिक अनुभवाची ओढ लागली होती. “देव आहे का?” या एका प्रश्नाने त्यांना एवढे ग्रसित केले होते की त्याचे उत्तर देणारा समर्पक व्यक्ती किंवा गुरु त्यांना सापडत नव्हता.

ब्रह्मा समाजाचे नेते महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या संपर्कात विवेकानंद काही काळ होते. त्यांना कदाचित उत्तर माहीत असेल म्हणून त्यांच्याकडे विवेकानंद गेले परंतु महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर हे देखील विवेकानंदांना आत्मिक अनुभव प्राप्ती मिळवून देण्यात असमर्थ होते.

प्रश्नाच्या शंकेने आणि गुरूच्या शोधात असताना विवेकानंद हे एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटले. सर्वप्रथम विवेकानंद यांनी वाटले की आपण प्रश्न विचारू आणि परमहंस गुरु काहीतरी उत्तर देतील पण तसे झालेच नाही.

विवेकानंद म्हटले, “देव आहे का?”, रामकृष्ण उठले आणि सरळ विवेकानंद यांना म्हटले “आत्ताच जाणून घेणार का?” आणि असा साक्षात्कार दिला की विवेकानंद सफल झाल्यासारखे अनुभवू लागले.

त्यानंतर खऱ्या आत्म साक्षात्कारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांनादेखील ज्ञान आणि धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदांसारखा एक बुद्धिमान, अद्भुत आणि धाडसी व्यक्ती हवा होता, तो त्यांना मिळाला होता. इथून पुढे अध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस देव यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता.

परमहंस यांच्या अध्यात्मिक सहवासामुळे विवेकानंद उन्नत होत होते. त्यांच्यासह अन्य तरुण साधकांनी गुरु रामकृष्ण यांच्या समवेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली आणि आत्मिक अनुभव प्राप्त केला.

स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक कार्य | Swami Vivekanand Spiritual Work |

गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.

कोलकात्याजवळ वराहनगर भागात गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीत झाली. विवेकानंदांनी रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्म व अस्थी – कलश त्या मठात नेऊन ठेवल्या. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्‍त तेथे राहू लागले.

स्वामी विवेकानंद यांचे भारतभ्रमण | Swami Vivekanand Bharat Bhraman |

रामकृष्ण मिशनचे कार्य आणि धर्मप्रसार हा उद्देश्य ठेवून विवेकानंद हे भारतभ्रमण करण्यासाठी बाहेर पडले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन खिन्न झाले. त्यानंतर भारतीय तरुण जर अध्यात्मिक बनू शकला तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांना विश्वास होता.

तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्ये त्यांनी स्वीकारली. अत्यंत कमी वयात आत्मज्ञान झाल्याने शारीरिक साथ त्यांना मिळत नव्हती. त्यांनी त्वरित भारताबाहेर देखील जगभरात प्रवास सुरू केला. अद्वैत ब्रम्हज्ञान हेच मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोहचवणे हे एकच उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्यासमोर होते.

शिकागो येथील सर्वधर्म परिषद आणि जगभरात धर्मप्रसार |

शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करीत होते.

स्वामीजींनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत पण जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या विचारांनी आणि व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील वृत्तपत्रांनी स्वामीजींच वर्णन “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी”(Cyclonic Monk From India) असे केले होते.

वेदान्त आणि योग यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशांमध्येसुद्धा व्याख्याने दिली. १८९५ मध्ये अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांनी त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. यावेळी भगिनी निवेदिता ही त्यांची शिष्य बनली.

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू | Swami Vivekananda Death |

स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. मानसिक आणि आत्मिक दिशेने जीवन गती झाल्याने शारीरिक स्वास्थ्य मात्र त्यांनी गमावले.

४ जुलै १९०२ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. ते अत्यंत अल्प म्हणजे फक्त ३९ वर्षे जगले. इतक्या कमी काळात त्यांनी अफाट धर्म कार्य केले. त्यांचे कार्य हे येणाऱ्या सर्व पिढ्या सदैव लक्षात ठेवतील. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभे आहे.

धार्मिक वास्तू आणि आश्रम – Swami Vivekanand Ashram |

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमांची स्थापना केली ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचे कार्य पूर्ण करता येईल. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्निया मधील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होतो.

स्वामी विवेकानंद – मराठी माहिती थोडक्यात !
Swami Vivekanand Information in Marathi in short |

स्वामी विवेकानंद आयुष्य सार – Life of Swami Vivekanand in short

लहानपणापासून प्रखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वामीजींची ओळख होती.

स्वामीजींच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.

शिक्षण, तर्क, संगीत अशा क्षेत्रांत पारंगत असलेला नरेंद्र हा विवेकानंद म्हणून ओळखला जाऊ लागला.

आयुष्याच्या एका टप्प्यावर परमहंस देव यांच्याशी भेट प्रसंग घडून आल्यानंतर खऱ्या आणि उदात्त जीवनाची अनुभूती स्वामीजींना आली.

स्वामी विवेकानंद हे आध्यात्मिक उन्नती साधल्यानंतर पूर्ण भारतभर आणि त्यानंतर विश्वभर धर्म आणि आध्यात्मिकतेचा प्रसार करण्यात यशस्वी ठरले.

जन्म – 12 जानेवारी 1863
समाधी – 04 जुलै 1902

स्वामी विवेकानंद यांचे अद्भुत विचार / संदेश –
Swami Vivekanand Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. प्रस्तुत ५ सर्वोत्तम स्वामी विवेकानंद यांचे संदेश (Top 5 Quotes by Swami Vivekanand) तुमच्या जीवनाची दिशा आणि गती बदलण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

१ – “उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.”

२ – “एखादा मूर्ख जगातील सर्व पुस्तके विकत घेऊ शकतो आणि ती त्याच्या लायब्ररीत देखील असतील; परंतु तो तीच पुस्तके वाचेल जी पुस्तके वाचण्यास तो सक्षम असेल.”

३ – “प्रत्येक काम या टप्प्यांमधून जावे लागते – उपहास, विरोध आणि नंतर स्वीकृती. जे लोक आपल्या वेळेच्या पुढचा विचार करतात त्यांच्याबद्दल आत्ता गैरसमज होणे नक्कीच आहे.”

४ – “आपण आत्ता जे आहोत त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि आपण जे काही बनू इच्छितो ते बनण्याची शक्ती आपल्यात असते. जर आपण आत्ता जसे आहोत ते आपल्या स्वतःच्या भूतकाळातील क्रियांचा परिणाम झाला असेल तर भविष्यात आपल्याला जे काही हवे आहे ते आपल्या सध्याच्या कृतीतून तयार केले जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला माहीत असायला हवे की आपली कृती कशी असावी.”

५ – “एका वेळी एक गोष्ट करा आणि ते करत असताना इतर सर्व गोष्टी वगळून आपले सर्व अस्तित्व त्या गोष्टीत ओतून द्या.”

राष्ट्रीय युवक दिवस / स्वामी विवेकानंद जयंती – १२ जानेवारी | National Youth Day / Swami Vivekanand Jayanti |

भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

स्वामी विवेकानंद यांचे कार्य हे सर्व युवकांना प्रेरक असल्याने भारतीय युवाशक्ती धर्म, देश, अध्यात्म, अशा उदात्त दिशांनी प्रवाहित होण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येतो.

खालील लेखामध्ये राष्ट्रीय युवक दिवस – १२ जानेवारी (National Youth Day) कसा साजरा केला जातो याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली आहे.

वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information In Marathi) कशी वाटली? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा. या लेखाबद्दल काही सूचना असल्यास नक्की कळवा… धन्यवाद!

स्वामी विवेकानंद हे थोर पुरुष होते. त्यांनी मानवी गुण जपत जी अध्यात्मिक प्रगती साधली त्यामुळे आपण सर्वजण त्यांना पुजतो. समाजातील सर्व घटकांना त्यांच्याबद्दल आदर आहे. स्वामी विवेकानंद माहिती हा लेख संदर्भ लेखन आहे आणि ते प्रकाशित (publish) करताना आम्हाला आनंद आहेच परंतु ही माहिती चुकीची आढळल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

राष्ट्रीय युवक दिवस माहिती | National Youth Day Information in Marathi|

National Youth Day

प्रस्तुत लेखामध्ये राष्ट्रीय युवक दिवस – १२ जानेवारी (National Youth Day) कसा आणि कधी साजरा केला जातो याबद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय युवा दिन | Rashtriya Yuva Din |

प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. अशा संकल्पनेची आठवण म्हणून आणि प्रत्येक युवक देशाप्रती अभिमानाने देश सेवा करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य म्हणजे एक प्रकारचे तपच म्हणता येईल. यामध्ये त्यांचे कार्य युवकांसाठी खूप प्रेरक होऊ शकेल. त्याचा प्रत्यय म्हणून प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात विविध कार्यक्रम साजरे करून त्यांचे कार्य तरुणांसमोर आणले जाईल अशी भावना राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागे आहे.

१२ जानेवारीला प्रत्येक शाळेत, कार्यालयात, जेथे युवा लोक जास्त प्रमाणात असतील त्या ठिकाणी तेथील युवक परेड करतात. विविध कला जसे की नृत्य, संगीत, नाटक सादर केले जातात. या दिवशी देशभक्ती, योगा, स्वामी विवेकानंद साहित्य, आणि इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर कला सादर केली जाते. या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान देखील दिले जाते.

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

राष्ट्रीय युवक दिनाचे महत्त्व | Importance of National Youth Day |

देशाची युवा शक्ती एका महापुरुषाकडे पाहून स्वतःचा आदर्श ठरवेल तर तसा व्यक्ती स्वामी विवेकानंदांव्यतिरिक्त दुसरा कोणी नसेल.

भारतीय धर्म, योग, ध्यान, अध्यात्म, आणि मानवी विकास यांचा प्रसार खऱ्या अर्थाने जागवायचा असेल तर भारतीय तरुण तशा स्वप्नाने भारावून गेला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे जीवन हे तार्किक आणि आध्यात्मिक अनुभवाच्या कसोटीवर पारखून घडलेले आहे.

तो आदर्श समोर ठेऊन अंधश्रद्धा न पाळता, व्यसन तसेच क्षणिक सुखाच्या आहारी न जाता भारतीय युवक देशसेवेसाठी आणि धर्मासाठी झटला पाहिजे अशी भावना हा दिवस साजरा करण्यामागची आहे. तो दिवस १२ जानेवारी हा एकदम सूचक असा दिवस आहे कारण याच दिवशी स्वामीजींचा जन्म झालेला होता.

तुम्हाला राष्ट्रीय युवक दिवस – १२ जानेवारी (National Youth Day) या दिनाबद्दल माहिती कशी वाटली, त्याबद्दलचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा…

नक्की पाहा – स्वामी विवेकानंद मराठी निबंध!

शिवजयंती माहिती | Shivjayanti Information In Marathi | शिवजन्मोत्सव |

शिवजन्मोत्सव

महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे. अशा सणाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किशोर पिढी, तरुण पिढी आणि इतर सर्व घटकांना माहिती होणे अत्यावश्यक आहे. त्याचाच विचार करून आम्ही या लेखामध्ये शिवजयंती माहिती (Shivjayanti Information in Marathi) दिलेली आहे.

शिवजयंती २०२१ उत्सव | Shivjayanti 2021 Utsav |

शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. सर्व स्तरांतून शिवजयंती साजरी होताना प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. काहीजण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. कलापथके त्यांच्या कलेमार्फत शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगतात. त्यासाठी नृत्य, संगीत, वादन, अभिनय अशा विविध कलांचा उपयोग केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असतो. छ. शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाला शिवजयंती (Shivjayanti), शिवजन्मोत्सव (Shiv Janmotsav) असेही म्हणतात. शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जात असते.

शिवजयंती तारीख ( Shivjayanti Date )

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्यांच्या जन्म तारखेबद्दल पूर्वी खूप वाद होते. आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीया (६ एप्रिल १६२७) आणि मराठी पंचांगा प्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे दोन दिवस शिवरायांचे जन्मदिवस म्हणून मानले जातात.

महाराष्ट्र सरकारने २००१ मध्ये या वादावर निर्णय घेत फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. सर्व सरकारी – खाजगी शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि उद्योगांना या दिवशी सुट्टी असते. सर्व लोक मोठ्या परंपरेने आणि उत्साहात शिवजयंती साजरी करतात.

शिवजयंतीची सुरुवात |

शिवजयंती प्रथम कोणी साजरी केली? किंवा शिवजयंतीची सुरुवात कशी झाली? असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यांची आपल्याला माहिती असणे अत्यावश्यक आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर एक एक पोवाडा लिहिला.

शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि नेतृत्व कसे होते हे लोकांपर्यंत पोहचवण्याचे सर्वप्रथम काम महात्मा जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती साजरी करून केले. तीच महाराजांची पहिली शिवजयंती होती आणि तो सर्व कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यांच्या व्यतिरिक्त लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला शिवजयंती माहिती (Shivjayanti Information In Marathi) कशी वाटली? याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आणि कर्तृत्व रुजवण्याचा प्रयत्न असू द्या… धन्यवाद!

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतरही माहिती तुम्ही मिळवू शकता. पुढील लिंकवर क्लिक करा आणि मिळवा शिवाजी महाराजांबद्दल आणखी अप्रतिम माहिती!

chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi

किवी फळ माहिती आणि फायदे | Kiwi Fruit Information and Benefits |

Kiwi Fruit Information in marathi

किवी हे फळ आता सर्वांना माहीत झाले आहे. आजारपणात सफरचंद आणि किवी फळ आवर्जून खावे असे सांगितले जाते. या लेखामध्ये किवी फळाची माहिती (Kiwi fruit Information in marathi), किवी फळाचे आरोग्यदायी फायदे ( Kiwi Fruit Benefits ) सांगण्यात आलेले आहेत. सर्व संशोधनानंतर किवी हे फळ खूपच पौष्टिक आणि ऊर्जादायी असल्याचे सिद्ध झाले आहे. चला तर मग पाहुयात किवी या फळाची माहिती आणि फायदे!

किवी फळ माहिती – (Kiwi Fruit Information)

किवी हे चॉकलेटी रंगाचे आंबट-गोड फळ आहे. हे फळ मूळचे चीन देशाचे राष्ट्रीय फळ आहे. या फळाच्या झाडाला चायनीज गूजबेरी (Chinese Gooseberry) असेही म्हटले जाते.

शीत आणि उष्ण (समशीतोष्ण) प्रदेशात किवी फळाचे झाड चांगले येऊ शकते. चीन व न्यूझीलंड देशामध्ये याचे उत्पादन होते. तसेच भारतात आता हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मेघालय, सिक्कीम, व जम्मू काश्मीर या राज्यांत किवीचे उत्पादन घेतले जाते.

किवीचे झाड म्हणजे एक प्रकारचा वेल असतो. तो वेल कोणत्याही आधाराद्वारे वाढवला जातो. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात किवी फळाचा बहर सर्वात जास्त असतो. कच्चे असताना किवी फळ तोडले जाते आणि त्याची योग्य प्रकारे साठवण केली जाते.

किवी फळातील तत्त्वे – (kiwi fruit Ingredients)

किवी फळात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, के आणि ई असते. तसेच फॉलीक एसिड, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

किवी फळ फायदे – Kiwi Fruit Benefits

१. किवी फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे आपल्याला कोणत्याही रोगाशी मुकाबला करता येतो. आपले शरीर आतून सुदृढ आणि मजबूत बनत जाते.

२. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम किवी फळ करते.

३. कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने शरीर हलके बनत जाते.

४. डेंग्यू आणि कॅन्सरसारख्या आजारांत किवी फळ सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर अवश्य देतात.

५. इतर फळांच्या तुलनेत मिनरल व फायबरचे प्रमाण जास्त असल्याने शरीराचा फिटनेस दिवसभर टिकून राहू शकतो.

६. शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचे काम किवी फळ करते.

७. या फळाचे रोज सेवन केल्याने त्वचा तजेलदार होते आणि सुरकुत्या पण निघून जातात.

८. डायबिटीज रुग्णांसाठी किवी फळ म्हणजे वरदानच आहे. किवी फळ रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी करते.

९. पोटॅशियमचे प्रमाण केळी आणि किवीमध्ये सारखेच असते. परंतु कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने हृदयासाठी किवी फळ चांगले असते. रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो.

१०. संत्र्याच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात व्हिटॅमिन सी किवीमध्ये आढळते.

११. किवी फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार दूर होण्यास मदत होते.

आज संपूर्ण जगभरात सुखसुविधा आल्याने आजारांचे आणि उपचारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये आरोग्यदायी आहाराचे महत्त्व वाढत चालले आहे. फळे आणि भाज्या यांचे सेवन पचनाला चांगले असते तसेच सर्व पोषक घटक आपल्याला त्यांच्यातून मिळत असल्याने त्याचे काहीच नुकसान मानवी शरीराला होत नाही.

किवी देखील एक असेच फळ आहे ज्यामुळे आपल्याला फायदे आहेतच आणि ते बाजारातही सहज उपलब्ध आहे. महाग असले तरी किवी फळ आपण आठवड्यातून एकदा – दोनदा नक्कीच खाऊ शकतो. किवी फळ माहिती (kiwi fruit Information in Marathi) आणि किवी फळाचे फायदे (kiwi fruit benefits) तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर नक्की कमेंट करा.. धन्यवाद!

सूचना –

वरील सर्व लेख हा फक्त माहितीनुसार लिहलेला आहे. कोणत्याही आजारावर उपचार म्हणून किवी फळाचे सेवन करायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक | Chhatrapati Sambhaji Rajyabhishek |

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek

छ्त्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji Maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आहेत. त्यांच्या निमित्ताने स्वराज्य निर्मिती झाली, पण तिचा कार्यभार जबाबदारीने सांभाळणे आणि मराठा साम्राज्य वाढवण्याचे खरे काम स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapti SambhajI Maharaj) यांनी केले. त्यांना छत्रपती म्हणून मिळालेली पदवी त्यांचे माहात्म्य सिद्ध करते. या लेखात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Rajyabhishek) कसा झाला याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक पूर्वकाळ | श्रीशंभुराज्याभिषेक|Chhatrapti Sambhaji Maharaj Rajyabhishek |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या निधनानंतर रयत पुन्हा एकदा बिथरली जाऊ शकत होती. स्वराज्याचे धाकले मालक संभाजी महाराज हे राज्यकारभार पाहतच होते परंतु आता राज्याला छत्रपतींची गरज होती. त्या गरजेला ओळखून शंभूराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. स्वराज्य व्यवस्थित आणि नेटाने चालवण्याचे आव्हान त्यांनी या दिवसानंतर पेलले.

राज्याभिषेक सहज व्हावा आणि तो सर्वमान्य असावा अशी परिस्थिती असताना देखील जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या गेल्या. छ्त्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकावेळी शंभू महाराज युवराज होते तेव्हाच स्पष्ट झाले होते की संभाजी महाराजच भावी छत्रपती असतील.

राजा शंभू हे शिवाजी महाराजांबरोबर लहानपणापासून दौडत होते. त्यांच्या सोबत राहिले होते. सर्व युद्धकला, शास्त्र, आणि राजकारण यामध्ये तरबेज झाले. त्यामुळेच शिवछत्रपतींचाच्या आदेशावरून पन्हाळा गडावरून त्यांनी स्वतःची
कारकीर्ददेखील सुरू केली. तेथील परिसराचा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.

छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यानंतर आणि शंभूराजांच्या गैरहजेरीत वयाने खूपच लहान असलेले राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला पण शंभूराजांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. गादीसाठी फुटीर राजकारण स्वराज्यात होऊ शकते याचे भान राखून शंभूराजांनी राज्याभिषेक करवून घेण्याचा निर्णय घेतला.

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच २० जुलै १६८० रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि स्वतः स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाल्याचे घोषित केले.

(तारखे संदर्भात विविध मतभेद आढळतात याची नोंद घ्यावी)

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा | chhatrapati sambhaji maharaj Rajyabhishek |

बिकट काळात आणि वातावरणात मंचकरोहणात राज्याभिषेक झाला होता पण शास्त्रार्थ दृष्टीने त्यामध्ये दोष असल्याचे सर्वांना आढळले. विधियुक्त राज्याभिषेक झाला पाहिजे असे शंभूराजांना पण वाटू लागले त्यानुसार मग रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२ म्हणजेच १४, १५ व १६ जानेवारी १६८१ यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

राज्याभिषेकावेळी पूर्व कैद्यांना मुक्त करणे अशी परंपरा असल्याने शंभू राजांनी त्यांना मुक्त केले. राज्याभिषेक प्रसंगी छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नावे नवीन नाणी (चलन) बनवून घेतली. पुढील बाजूस “श्री राजा शंभूछत्रपती” अशी अक्षरे कोरली तर मागील बाजूस “छत्रपती” हे अक्षर कोरले.

छत्रपती संभाजीराजे यांचे प्रधान मंडळ | Chhatrapati Sambhaji Maharaj Pradhan Mandal |

संभाजी राजे छत्रपती झाल्यानंतर लगेच त्यांनी प्रधान मंडळाची स्थापना केली. ते प्रधान मंडळ पुढीलप्रमाणे –

छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.

श्री सखी राज्ञी जयति (राजाच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी) – येसुबाई संभाजीराजे भोसले.

सरसेनापती – हंबीरराव मोहिते.

कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश.

पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे.

मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी.

चिटणीस – बाळाजी आवजी.

दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव.

सुरनीस – आबाजी सोनदेव.

मुजुमदार – अण्णाजी दत्तो.

डबीर – जनार्दनपंत.

वाकेनवीस – दत्ताजीपंत.

तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Rajyabhishek) हा लेख कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा…धन्यवाद!

वाचकांसाठी आवाहन –

ऐतिहासिक घटना या काळाप्रमाणे वाढवून आणि बदलून सांगितल्या जातात. त्यामध्ये अधिक रस येण्यासाठी कधीकधी अतिशयोक्ती देखील केलेली असते. आत्ताच्या पिढीत झालेले लिखाण हे मागील पिढीतील केलेल्या लिखाणावर आधारित असते म्हणून खरा इतिहास आपल्याला कळण्याचे मार्ग तसे खूप कमी आहेत. अशा संदर्भाने आम्ही प्रसिद्ध केलेले लेख हे एक प्रकारे माहितीचा आधार घेऊन केलेले ऐतिहासिक वर्णन आहे. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. माहिती चुकीची आढळल्यास त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

शिवप्रताप दिन – संपूर्ण माहिती ! Shiv Pratap Din Information in Marathi|

Shiv Pratap Din Information in Marathi

शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) हा पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमान आणि शौर्याचा दिवस आहे. स्वराज्यावर आक्रमण करून आलेला अफजलखान आणि योजना बनवणारा आदिलशाह यांच्यासाठी राजा शिवबा एकटाच पुरेसा होता. अत्यंत युक्तीपूर्ण पद्धतीने आणि प्रसंगावधान राखून अफजलखानाचा केलेला वध उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.

शिवप्रताप दिन – Shiv Pratap Din |

शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम | अफजलखानाचा वध ! Shivaji Maharaj and Afjal Khan History |

शिवराय स्वराज्य चालवत असल्याची चाहूल विजापूर दरबारी कळली होती. आदिलशाही ताब्यातील अनेक गडकिल्ले शिवाजी महाराज स्वतःच्या ताब्यात घेत होते. त्यामुळे एक दिवस शिवरायांचा बिमोड करायचा म्हणून आदिलशाही दरबारात योजना आखल्या जात होत्या. आदिलशाहीतील सर्व सरदार, बहादुर सेनानी, वजीर सर्वजण उपस्थित होते.

बडी बेगम त्यावेळी दरबारात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त?” सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त आक्रमण करून करणे आणि सह्याद्रीच्या कुशीत जाऊन शिवरायांना ललकारणे तेवढे सोप्पे नव्हते.

यावर तोडगा म्हणून अफजलखान नावाचा धिप्पाड सरदार पुढे आला. शिवाजीला जिवंत किंवा ठार मारून घेऊन येण्याचे वचन भर दरबारात अफजलखानाने दिले. कारण अफजलखानाची ताकद म्हणजे पोलादी! लोहाची हत्यारे आपल्या हातांनी वाकवणारा असा हा अफजलखान शिवरायांना पकडण्यासाठी स्वराज्यावर आक्रमण करण्यास तयार होतो.

अफजलखानाला सह्याद्री आणि आसपासचा प्रांत बऱ्यापैकी माहीत होता. राजगडावर असताना शिवरायांना ही बातमी कळली. खानाचा मुकाबला भर युद्धात आपण करू शकत नाही याची जाणीव शिवरायांना होती. शिवरायांचे सैन्य आणि राज्य सध्या लहान होते. त्याचा निभाव खानाच्या फौजेपुढे लागणे शक्य नव्हते.

अफजल खानाशी मुकाबला हा युक्तीनेच होऊ शकतो हे शिवरायांना समजले होते. कारण अफजल खान मोठे सैन्यबळ घेऊन चालून आला होता. शिवराय त्यांची योजना आखून प्रतापगडावर रवाना होतात. शिवराय प्रतापगडावर गेल्यावर खान चांगलाच चिडला. त्याला भलेमोठे सैन्य प्रतापगडावर नेणे शक्य नव्हते. प्रतापगड डोंगरात वसला असल्याने तिथे पोहचणे म्हणजे चांगलेच अडचणीत आणणारे काम होते.

शिवाजी महाराज स्वतः उतरून खाली यावे यासाठी खानाने रयतेचा छळ करण्यास सुरुवात केली. असे केल्याने शिवराय खाली येतील असा खानाचा समज खोटा ठरला. मोठा संयम दाखवत शिवाजी महाराजांची ही चाल यशस्वी ठरली. खानाने मग शिवरायांना भेटण्यासाठी संदेश पाठवला.

“आमचे किल्ले परत द्या आणि आदिलशाहीत सामील व्हा आम्ही तुम्हाला सरदारकी देऊ इच्छितो.” असा संदेश शिवरायांना कळताच ते आणखीनच सावध झाले. मोठ्या बुद्धीने परतीचा संदेश म्हणून शिवराय खानास घाबरतात आणि खानाने खुद्द शिवाजींना भेटण्यासाठी प्रतापगडावर यावे असे सांगितले.

अफजलखान मोठमोठ्याने हसू लागला, “हा शिवाजी तर डरपोक निघाला. आम्ही त्याच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कथा खोट्या होत्या, आम्हीच जातो त्याला भेटायला आणि चिरडून टाकतो,” असे म्हणत खान “प्रतापगडावर भेटू!” असा संदेश पाठवतो. प्रतापगड येथील खालची माची येथे भेटण्याचा बेत ठरला.

भेटीच्या वेळी दोघांचेही एक एक अंगरक्षक सोबत असतील आणि बाकीचे अंगरक्षक शामियान्याच्या बाहेर असतील असे ठरले. छान असा शामियाना उभारण्यात आला. भेटीची वेळ ठरवण्यात आली. आपल्याबरोबर काही दगा झाला तर किल्ल्यावरील बाकीचे सैन्य आक्रमण करेल आणि अफजल खान देखील माघारी जाता कामा नये, याची पुरेपूर व्यवस्था शिवाजी महाराज करतात.

भेटीचा दिवस उजाडला. शिवराय भवानी देवीचे दर्शन घेतात. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप आणि पट्टा, वाघनखे आणि बिचवा अशी शस्त्रे शिवराय परिधान करत त्यावरून आपला पोशाख चढवतात. सर्व सरदार आणि सेवकांना सूचना देत शिवराय भेटीसाठी तयार झाले. शामियान्यात जिवाजी महाला याला शिवराय सोबत नेण्याचा बेत करतात. अफजलखान बडा सय्यद नामक आपल्या सेवकासोबत बसलेला असतो.

शिवराय शामियान्याच्या दाराशी येऊन थांबतात. “शिवाजी आत का येत नाही?” असे अफजलखान महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ यांना विचारतात. “शिवाजी राजे बडा सय्यदला घाबरतात”, असे उत्तर मिळताच बडा सय्यद थोडा दूर झाला. “या राजे, भेटा आम्हाला.” असे म्हणत अफजलखान उभा राहतो.

अफजलखान शिवरायांना आलिंगन देण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो. शिवराय त्याचे आलिंगन स्वीकारतात. शिवराय अफजलखानापुढे खूपच लहान होते. त्यांना मिठीत घेऊन चिरडून टाकावे असा मनसुबा खानाचा होता. शिवराय मिठीत येताच त्यांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. अंगात चिलखत असल्याने शिवराय बचावले. प्रसंगावधान राखून शिवरायांनी वाघनख्या आणि बिचवा काढून अफजलखानाचा पोटळा बाहेर काढला.

खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे सरसावताच एका पट्ट्याच्या वारातच शिवराय त्यांना ठार करतात. सय्यद आता वार करणार एवढ्यात जिवाजी महालाने त्याला ठार केले. संभाजी कावजी, जिवाजी महाला आणि शिवराय हे तिघे या संघर्षात सहभागी होते. या घटनेनंतर “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली.

शिवरायांनी केलेली विजयी सूचना सगळे मावळे ऐकतात आणि खानाच्या फौजेवर तुटून पडतात. अफजलखानाचा मुलगा फाजलखान या चकमकीत निसटतो आणि विजापूरला पोहचतो. विजापूरच्या दरबारात एवढ्या बलाढ्य सरदाराचा मृत्यू संपूर्णपणे हाहाकार उडवून देतो. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आता सर्वदूर पसरली. स्वराज्याचा राजा शिवछत्रपती म्हणून उदयास येऊ लागला होता.

वाचक कॉर्नर –

शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) कसा साजरा केला जातो?प्रतापगड (Pratapgad) कोठे आहे? घडलेल्या प्रसंगाची आठवण म्हणून प्रतापगडावर कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला फक्त थोडीशी सर्च करण्याची मेहनत घेऊन मिळतील. खालील keywords वापरून तुम्ही नेटवर सर्व माहिती मिळवू शकता.

Shivaji Maharaj – Afjal khan Incident.
Shiv Pratap Din History.
Shiv Pratap Din real history.
Shiv Pratap Din Date.
Pratapgad Location in Maharashtra.
Afzal khan kabar.
Hota jiva mhanun vachla shiva.
Chhatrapati Shivaji Maharaj History on Pratapgad.
प्रतापगड उत्सव (Pratapgad Utsav)

एफआरपी संपूर्ण माहिती, ऊसाचा एफआरपी दर | FRP Rate for Sugarcane |

What is FRP

ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्याशी सरळसरळ संबंधित असलेला एफआरपी (FRP) दर म्हणजे काय? असा प्रश्न सर्व स्तरांतून विचारला जातो. एफआरपी दर कसा ठरवतात आणि तो दर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? अशा आणखी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.

एफआरपी म्हणजे काय? What is FRP

साखर कारखान्यांसाठी ऊस जेवढा आवश्यक आहे, तसेच ऊस उत्पादकांना कारखाने गरजेचे आहेत. ऊसाचा दर एका निर्धारित नियमावलीत ठरवला जातो. त्यामध्ये ऊस उत्पादकांपासून ते कारखानदार या सर्वांचाच फायदा बघितला जातो. प्रतिटन ऊसामागे उत्पादकांना मिळणारा दर म्हणजे एफआरपी!

एफआरपी विस्तृत अर्थ – FRP long form

एफआरपीचा विस्तृत अर्थ म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर!

एफआरपी ठरवण्याबाबतचे नियम व कायदे | Laws Regarding FRP Rate

• वैधानिक किमान भाव (Minimum Support Price)

साखर उत्पादनासाठी आणि तो विकत घेण्यासाठी प्रत्येक हंगाम असतो. त्या हंगामासाठी २००९ पूर्वी ऊसदर नियंत्रण कायदा, १९९६च्या खंड ३ मधील तरतुदीनुसार केंद्र सरकार ऊसाचा वैधानिक किमान भाव (MSP) निश्चित करत असे. नंतर सरकारने २२ ऑक्टोबर २००९ रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात फेरबदल केले. या कायद्यात ऊस उत्पादकांचा खर्च लक्षात घेण्यात आला. त्यांना प्रत्येक हंगामासाठी माफक नफा मिळण्याची तरतूद करण्यात आली.

• रास्त आणि किफायतशीर दर (Fair and Remunerative Price)

उत्पादकांसाठी माफक दर मिळावा यासाठी २००९ नंतर साखरेच्या हंगामांचा रास्त आणि किफायशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्यात येऊ लागला. तो निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारचा कृषी आयोग एफआरपी ठरवत असते.

साखर कारखाने एफआरपी दरापेक्षा कमी दर देऊ शकत नाहीत. परंतु जर कधी साखर कारखाने आणि राज्य सरकारला जास्त एफआरपी द्यायचा असल्यास तशी तरतूद करावी लागते.

साखर कारखाने ऊस उत्पादकांना प्रतिटन भाव देत असतात त्यामध्ये ऊसाचा एकूण उत्पादन खर्च व साधारण १५ टक्के नफा गृहित धरुन एफआरपी ठरवतात.

• वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला एफआरपी बद्दल सर्व माहिती ऑनलाइन मिळू शकते. त्यासाठी सर्च इंजिनवर पुढील प्रश्न टाईप करा….

What is FRP for sugarcane?

Who recommended MSP and issue price?

What is MSP sugar?

Who decides on MSP?

Sugarcane FRP Maharashtra

FRP sugarcane full form

FRP for sugarcane UPSC

sugarcane frp for this year

तुम्हाला एफआरपी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर मिळाले असल्यास आणि त्या व्यतिरिक्त एफआरपीबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवू शकता.