अनारसे रेसिपी बनवा अगदी सोप्या पद्धतीने! Anarse Recipe in Marathi |

दिवाळीत अनारसे हमखास बनवले जाते. अनारसे बनवण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज लागत नाही परंतु अनारसे पीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. चवीला गोड असा हा पदार्थ आपण नाश्त्याला देखील खाऊ शकतो. चला तर मग बघू अनारसे कसे बनवावे.

Anarse Recipe Ingredients :

साहित्य:

• तांदूळ – १ वाटी

• किसलेला गूळ – १ वाटी

• तूप – १ चमचा

• खसखस

• तेल

How to make anarsa

कृती:

• तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी चालेल.

• त्यानंतर चाळणीत ठेवून नितळून घ्यावे. तांदूळ आता कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे.

• किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाकावा. सर्व मिश्रण एकत्र मळून घ्यावे. मिश्रण घट्ट मळावे. घट्ट मळलेला गोळा चार – पाच दिवस डब्यात ठेवावा. (प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी डब्यात ठेवावी.)

• तळण्यासाठी आता पीठ बाहेर काढून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे करावे.  पुरीसारखे लाटून घ्यावे.

• लाटताना त्यावर खसखस वापरावी.  (काहीवेळा राजगिरा वापरला तरी चालतो.)  आणि तळताना पुरीची बाजू बदलू नये, नाहीतर खसखस करपेल.

• लाटलेली पुरी तेलात तळताना जास्त हलवू नये. मध्यम आचेवर ठेवून पुरी छान लालसर तळून घ्यावी.

• तेल चांगले अनारस्यातून नितळून घ्यावे.

टीप – मळलेले मिश्रण (पीठ) खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे तळताना जर अनारसेफेसाळले तर पीठ तसेच ठेवून काही दिवसांनी तळावे.

1 thought on “अनारसे रेसिपी बनवा अगदी सोप्या पद्धतीने! Anarse Recipe in Marathi |”

Leave a Comment