छोले भटुरे बनवा घरच्या घरी | Chole Bhature Recipe in Marathi |

उत्तर भारतात छोले भटुरे (Chole Bhature) खूपच प्रसिद्ध आहेत. हळूहळू आता संपूर्ण भारतात ही रेसिपी उपलब्ध होऊ लागली आहे. ठिकठिकाणी ढाबे, हॉटेल्स असल्याने सर्व राज्यातील सर्व डिशेस हमखास मिळतात. त्यामध्ये छोले भटुरे हा नाश्त्यासाठी तयार केलेला पदार्थ असतो. 

आपल्याकडे हरभरा जसा बनवला जातो, त्याच पद्धतीने छोले म्हणजे काबुली चणे एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात आणि त्याबरोबर खाण्यासाठी मैदा – बटाटा एकत्र करून बनवलेल्या पुऱ्या म्हणजेच भटुरे दिले जातात. 

चला तर जाणून घेऊ छोले भटुरे सोप्यात सोप्या पद्धतीने कसे बनवाल. हा पदार्थ गरम गरम छान लागतो. कांदा, टोमॅटो किंवा काकडी  कापून सलाड म्हणून या रेसिपीसोबत सर्व्ह करू शकता.

छोले भटुरे रेसिपी – Chole Bhature Recipe in Marathi

Ingredients of Chole Bhature | छोले भटुरेसाठी लागणारी सामग्री :-

१ – छोले बनवण्यासाठी साहित्य –
• काबुली चने – २५० ग्रॅम

• जिरे – अर्धा चमचा

• कांदा – १ बारीक चिरलेला

• आले – लसूण पेस्ट – १ चमचा 

• छोले मसाला – २ चमचे

• लाल तिखट – २ चमचे

• आमसूल पावडर – २ चमचे

• हळद – अर्धा चमचा

• धने पावडर – अर्धा चमचा

• तेल

• मीठ

२ – भटूरे बनवण्यासाठी साहित्य – 
• मैदा – १ वाटी

• बटाटे – ३ उकडलेले

• तेल

• मीठ

Chole Bhature Recipe | छोले भटुरे कृती :

१ – छोले बनवण्याची कृती :

• काबुली चणे प्रथमतः रात्रभर भिजवलेले असावेत. असे चणे पाण्यात उकडून घ्यावेत. पाणी जास्त उकळायचे नाही.
• एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, आले – लसूण पेस्ट टाका. कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्या. 
• आता त्यामध्ये आमसूल, हळद, लाल तिखट,  धने पावडर आणि मीठ घाला. ५ ते १० मिनिट चांगले परतून घ्या. 
• त्यानंतर त्यामध्ये छोले मसाला, उकडलेले काबुली चणे, थोडे पाणी टाका. घट्ट हवे असल्यास कमी पाणी टाका अथवा जास्त पाणी टाका. चांगले १० मिनिट कढू द्या.

२ – भटुरे बनवण्याची कृती :

• मैदा आणि उकडलेले बटाटे एकत्र कुस्करून त्याचे मिश्रण बनवा. त्यात एक चमचा तेल टाका. चांगली घट्ट कणिक बनवा.
• छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटून घ्या. कढईत तेल गरम करून सर्व पुऱ्या तळून घ्या. 

टिप – छोले बनवताना लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता.

Leave a Comment