काय असं घडलं की, भाजपाची सत्तेची गणिते चुकायला लागली…?

भारतीय जनता पक्ष हा २०१४ आणि २०१९ साली दोन्ही वेळेस सत्तेत आरूढ झाला. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा साफ पराभव होत आहे. केंद्रातर्फे घेण्यात येणारे निर्णय हे धाडसी आणि दूरगामी दृष्टिकोन बाळगून आहेत. काही राज्यातून त्यांचा विरोध हा होतच आहे. राज्य आणि राष्ट्र यांची धोरणे ठरवताना भाजपला पुन्हा एकदा कंबर कसावी लागेल.  

कोणती राज्ये ठरली भाजपविरोधी

भाजपचा बालेकिल्ला असणारी मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगडमधील सत्ता आता भाजपकडे राहिली नाही. आंध्रप्रदेश देखील भाजपने गमावला. जम्मू काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सरकार बरखास्त झाले. महाराष्ट्रात निवडून आल्यानंतरही राजकीय समीकरणे बदलून तीन पक्ष एकत्र सत्तेत आले. झारखंडमध्ये देखील आता भाजप विरोधात निकाल लागला आहे. केंद्रात काँग्रेसकडे पुरेसे बळ नसताना या सर्व राज्यांच्या निवडणुकीत मात्र त्यांनी स्वतःची संधी साधली आहे.

आत्ताची राजकीय परिस्थिती

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा विरोध होताना दिसत नाही. परंतु राज्यपातळीवर भाजप हटाव मोहीम सुरू झाली आहे. आत्ता झारखंड आणि एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रात त्याचा प्रत्यय आला. २०१८ अखेरपर्यंत तब्बल २२ राज्यांत सत्ता स्थापन करणारी भाजप आता आपली ७ राज्यांतील सत्ता गमावून बसली आहे.

अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे जरी सातत्य राखून असले तरी भाजपा पक्षाकडे राज्य पातळीवर कुठलेही खंबीर धोरण नसल्याचे या दीड वर्षात दिसून आले. सर्व मित्र आणि विरोधी पक्ष भाजपविरोधी एकत्र येत आहेत आणि यशस्वी होत आहेत. मतदारांची टक्केवारी भाजपची थोडीशीच घसरली आहे परंतु मित्रपक्ष साथ देत नसल्याने भाजपची चांगलीच कोंडी झालेली आहे.    

मोठमोठी राज्ये गमावल्याने पुढील लोकसभा निवडणूक कशी असेल? राज्यव्यापी धोरणे भाजप स्पष्ट करू शकेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

कसे असतील पुढील राजकीय निकष

शेतकरी आणि बेरोजगार तरुण हे मुद्दे वारंवार उचलले गेले. भाजपचा मुद्दा विकासाभिमुख म्हणजे तंत्रज्ञान आणि स्वयंरोजगार असा असला तरी राज्यात पायाभूत व्यवसाय आणि त्याची संरचना ही थोडी वेगळी आहेत. असे असल्याने योजनांचा थेट फायदा सामान्य व्यक्तीला होईलच असे सांगता येत नाही.

भाजपविरोधी राज्य सरकार यावर चांगलीच नजर ठेवून आहे. राज्यातील धोरणे राज्यसरकारला आता व्यवस्थित ठरवावी लागतील कारण विरोधी पक्ष आता खुद्द भाजपच आहे जे फक्त काही काळापूर्वी सत्तेत होते.

हे यूट्यूब चे ॲप लहान मुलांत भलतच होत आहे वायरल…  

एक्झिट पोल सध्या तरी विरोधकांच्या विरोधात..!

Maharashtra exit poll

‘एक्झिट पोल’ हा भाजप – शिवसेना युतीला सहाय्यक असा दाखवला गेला आहे. महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे चित्र दाखवले जात आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची मात्र ‘दिल की धडकन’ तेज होऊ लागली आहे.राज्यात विविध ठिकाणी मातब्बर नेतेमंडळी पडण्याचे आसार आहेत.   

यावेळची निवडणूक म्हणजे दिवाळीअगोदर एक पर्वणीच होती. २१ तारखेला झालेल्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी एक्झिट पोल दाखवले होते. सर्वच पोल आघाडी विरोधात असल्याने अनेक मातब्बर मंडळींचा विरोध निश्चित मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. अनेक विरोधीपक्षनेते जसे की धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागा धोक्यात असल्याची चिन्हे आहेत. परंतु एक्झिट पोल म्हणजे एक अंदाज असतो त्यामुळे जनमाणसात महायुतीचे सरकार येईल परंतु एवढे मताधिक्य मिळणार नाही अशी चर्चा आहे.

स्ट्राँग रूम व जामरची मागणी

ईव्हीएम टेम्परिंग ची शक्यता असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी परिसरात ‘जामर’ बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी व मतदान यंत्राबाबत संकट निर्माण झाल्यास मतमोजणी चार वेळा करावी व 50 टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.     

साताऱ्याच्या नवलेवाडी येथे ईव्हीएम बिघाडाची घटना धक्कादायक स्वरूपाची आहे. प्रत्येक मत भाजपलाच जात होते. ही घटना समोर आल्याने ईव्हीएम मशीनबद्दल शंका निर्माण झाली आहे. तरी मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय व बुथनिहाय निकाल जाहीर करावेत अशी मागणीही त्यांनी केली.

निवडणुकी पूर्वीच विखुरला विरोधी पक्ष…असा होईल शिवसेना-भाजपाला याचा फायदा

शिवसेना-bjp

निवडणूक घोषणेच्या अगोदरच भाजप-शिवसेनेविरोधात एकत्र येण्याची विरोधकांची योजना संपुष्टात आलेली दिसते. समाजवादी पक्ष कॉंग्रेसला सोबत न घेता एकट्याने निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांनीही स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कोणत्याही वेळी जाहीर केल्या जाऊ शकतात. सत्ताधारी भाजप-शिवसेनेसमोर विरोधी पक्ष कोसळत आहेत. एकदा कॉंग्रेससमवेत एकत्र निवडणुका लढवण्याची घोषणा करणारा समाजवादी पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसीही फुटले आहेत.

‘एकला चलो रे…’

या तीन पक्षांच्या प्रमुखांनी ‘एकला चलो’ अशी घोषणा देत अधिकाधिक विधानसभा जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व विरोधी पक्षांना व्यासपीठावर आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. काहींनी विधानसभा निवडणुकीत अधिक जागांचे आश्वासनही दिले. परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडी आणि ओवैसीच्या एमआयएमने कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच टक्कर देत निवडणूक लढवली.

युतीसाठी भाजपचा नवीन फॉर्मुला, आता शिवसेनेच्या निर्णयावर लक्ष.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यश मिळू शकले नाही. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांचे तुकडे होऊ लागले आहेत, जे सत्ताधारी पक्ष भाजपा-शिवसेनेसाठी टॉनिकपेक्षा काही कमी नाही. तसे, सत्ताधारी पक्षातही जागावाटपाबाबत वाद निर्माण झाला आहे.

‘२०१४ विसरलो नाही’

कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान आणि इतर नेत्यांनी समाजवादी पक्षाशी युती करण्यासाठी महाराष्ट्र सपाचे प्रमुख अबू असिम आझमी यांच्याशी चर्चा केली आहे, परंतु कॉंग्रेसचा कोणताही नेता जबाबदारी घ्यायला तयार नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सपाला अंतिम समयी कॉंग्रेसने टांग दिली होती. आजही त्या घटनेला आझमी विसरले नाहीत.

आझमी म्हणतात, ‘दूध का जला छाछ भी फूंक-फूंककर पीता है।

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसमुळे, मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांकडे बी-फॉर्म पोहचवू शकलो नाही, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कॉंग्रेसने त्यांना युतीसाठी लटकवले. म्हणूनच निवडणुकीत आम्ही फारच कमी उमेदवार उभे करू शकलो. आम्ही आता ती चूक पुन्हा करणार नाही.

वंचित बहुजन सर्व जागांवर लढणार…

एमआयएमशी युती तुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व २८८ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २८८ जागांसाठी त्यांनी ५६९५ उमेदवारांची मुलाखत घेतल्याचे सांगितले आहे. सुमारे ७५ टक्के जागांवर उमेदवारांची निवड झाली आहे. उर्वरित जागांची मुलाखत घेतली जात आहे. अशी अपेक्षा आहे की २० सप्टेंबरपूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल.

MIM एकट्याने लढा देईल…

महाराष्ट्रात असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाच्या एमआयएमने नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. एमआयएमला केवळ 8 विधानसभा जागा देण्याचे प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केले. आंबेडकर औरंगाबाद मध्यवर्ती जागा एआयएमआयएमला देण्यास तयार नाहीत. यामुळे एमआयएमने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता एमआयएमने आपल्या उमेदवारांची निवड सुरू केली आहे. असा विश्वास आहे की पक्ष ७५ ते ८० जागांवर निवडणूक लढवू शकेल.

एकंदरीतच विरोधकांची हि परिस्थिती पाहता या सर्वांचा शिवसेना-भाजप युतीला फायदा होताना दिसत आहे. कारण विरोधकांची हि विखुरलेली परिस्थिती पाहता कोणत्याच प्रकारचा मोठा लढा हे देऊ शकतील असे आत्ता तरी वाटत नाही.

युतीसाठी भाजपचा नवीन फॉर्मुला, आता शिवसेनेच्या निर्णयावर लक्ष.

bjp shivsena yuti

जस जशी निवडणुक जवळ येत आहे तस तशी जागावाटपाची उत्कंठा वाढतच आहे कारण मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्ष प्रवेशांमुळे जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. परंतु यावर भाजप ने एक उपाय सुचवला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपने आपला फॉर्म्युला तयार केला असून, यामध्ये निम्म्या-निम्म्या जागांची मागणी तुर्तास अमान्य केली आहे.

भाजपने शिवसेनेला १२० जागा देऊ केल्या असून, स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर शिवसेनेच्या भूमिकेकडे भाजपचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या काळात शिवसेनेने साथ दिल्याने आता विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, विधानसभा निवडणुका भाजपने स्वबळावरच लढवाव्यात, अशी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे. भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते. मात्र लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मेगाभरतीने भाजपचे काही वरिष्ठ नेते स्वबळावर लढण्याचा आग्रह धरीत आहेत.

शिवसेनेने निम्म्या जागांची मागणी केली आहे. मात्र, सध्या १२२ जागी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भाजपला मान्य नाही. शिवसेनेने १२० जागा लढवाव्यात, मित्र पक्षांना १२ जागा द्याव्यात व स्वत:कडे १५६ जागा ठेवाव्यात, असा फॉर्म्युला भाजपने तयार केला असून, तसा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने त्यांच्या जागांची भाजपला अदलाबदल हवी आहे.

जागावाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटाला मात्र स्वबळावर लढूनही भाजप सत्ता स्थापन करील, असे वाटत असून, एकट्याने निवडणूक लढवण्याची हीच वेळ असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शब्द दिलेला असल्यानेच युतीधर्म पाळावा लागणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असल्यामुळे युती होईलच, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे.

सौजन्य- महाराष्ट्र टाइम्स


हि ‘आचारसंहिता’ नक्की असते तरी काय? जाणून घ्या याबद्दल सर्वकाही.

code of conduct

निवडणूका सुरू झाल्या की एक शब्द आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो तो म्हणजे आचारसहिता. पण आचारसंहिता लागू झाली म्हणजे काय झाले? हे खूप जणांना माहित नसते त्याचे उत्तर आज आम्ही आपणाला देणार आहोत.

निवडणूका जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करते. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाने ठराविक नियम केलेले असतात व ते नियम पाळणे राजकीय पक्षांना व उमेदवारांना पाळणे बंधनकारक असते. याचा अर्थ असा होतो निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी तसेच त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये तसेच कोणते नियम पाळावे? त्याचे उल्लंघन केल्यानंतर काय कारवाई करावी? असे नियम म्हणजेच “आचारसंहिता” होय.

निवडणुका घेण्यासंबंधी चे सर्वाधिकार हे वेगळे असतात. साधारणतः मतदान तारखेच्या २१ दिवस आधी आदर्श आचारसंहिता लागू होत असते तसेच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निर्देश व नियम राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार पाळत आहेत की नाही हे पाहण्याचे काम निवडणूक आयोगातील कर्मचारी करत असतात. तसेच एखाद्या उमेदवाराने या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एवढेच काय तर त्याला निवडणूक लढवण्यापासून मज्जाव ही करू शकते.

काय असतात नियम?

1)मतदारांना आमिष दाखवणे किंवा धमकावणे हे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते.

2) प्रतिस्पर्ध्यावर किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय धोरणाबद्दल टीका-टिप्पणी करू शकतात पण
मतांसाठी एकमेकांवर जात किंवा धर्मावर टीका करू शकत नाहीत.

3) निवडणुकीच्या काळात कोणतीही बैठक सभा किंवा रॅली घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेणे
बंधनकारक असते.

4) आदर्श आचारसहिता सुरू असताना मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना कोणतीही नवीन योजना
आणता येत नाही व त्यासंबंधी घोषणा करता येत नाही तसेच त्यासाठी कोणताही निधी जाहीर करता येत
नाही.

5) मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले कर्मचारी, अधिकारी व मतदार यांनाच जाण्याची परवानगी असते त्याव्यतिरिक्त कुणालाही मतदान केंद्रात जाण्याची परवानगी नसते.

6) मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत कोणीही उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही.

7) तसेच कोणताही प्रचार रात्री दहाच्या आत संपवणे उमेदवारासाठी बंधनकारक असते. तसेच सभेच्या एक
दिवस आधी कार्यक्रमाची वेळ, प्रचारकार्य स्थळ याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक असते. जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तर संबंध सभा रद्द बंद करण्याचा अधिकार पोलिसांना व निवडणूक आयोगाला आहे.

जरूर वाचा- या जिओ सिम ऑफर ने उडवले सगळ्या कंपन्यांचे होश! मार्केटमध्ये आला आहे हा नवीन प्लॅन.

छगन भुजबळांची होऊ शकते “घर वापसी”, पक्षात घेण्याबाबत मात्र शिवसेनेत दोन मतप्रवाह…

chhagan bhujbal can rejoin shivsena

कॉंग्रेस आणि एनसीपीचे नेते एक-एक करून पार्टी सोडून जात असताना अजून एक नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि ते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ. बहुतेक सर्व नेते भाजप मध्ये जात असताना भुजबळ मात्र घरवापसी करण्यास उत्सुक असल्याचे कळते.

छगन भुजबळांसह अजून काही नेते शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश झालाच तर तो विधान सभा निवडणुकीच्या आधी होऊ शकतो. तथापि, भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ म्हणाले की, “हे सर्व मला प्रसारमाध्यमांद्वारे समजत आहे” अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु भुजबळांच्या एका निकटवर्तीयाने शिवसेना नेत्यांसोबत या विषयावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

दुसर्‍या बाजूला, भुजबळांसोबत सुनील तटकरे यांचाही शिवसेनेत लवकरच समावेश होईल असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच जर असे घडून आले तर हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असू शकतो हे नक्की. दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावर बोलताना सांगितले कि, योग्य वेळ आल्यावर आपण यावर निर्णय घेऊ, कोणत्याही नेत्यांपेक्षा पक्ष मोठा असतो आणि यावर निर्णय घेण्याआधी पक्षाशी चर्चा केली जाईल.

बघायला गेलं तर यावेळी बहुतेक प्रवेश भाजपा मध्ये झाले असताना भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेनेसाठी फायद्याचा ठरू शकतो कारण शिवसेनेकडे ओबीसी चा कोणताही मोठा चेहरा नाही. परंतु भुजबळांना पार्टीत घेऊ नये या मताचा देखील एक मोठा वर्ग शिवसेनेत आहे. स्वर्गीय बाळासाहेबांना ज्या व्यक्तीने त्रास दिला त्याव्यक्तीला शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा आवाज शिवसेनेत उठत आहे. म्हणजेच भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश फायद्यासोबत डोकेदुखी सुद्धा ठरू शकतो.

छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या काही नेत्यांत याविषयी चर्चा झाल्याचे कळते. जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर छगन भुजबळ काही नेत्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील. याचाच अर्थ लवकरच भुजबळांची घरवापसी होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर शिवसेना यावर कोणती भूमिका घेतं, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवसेनेत येण्यासाठी राज्यातील नेते उत्सुक

या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने !

aditya thakre

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप झाल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर तर बुधवारी सांगली व सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये भेट दिली.

या चार जिल्ह्याच्या भेटीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली. त्यांनी या आपल्या दौऱ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कुठे कसली कमतरता निर्माण झाली असेल तर त्याच्यावर निर्णय घेऊन ती कमतरता पूर्ण केली. त्यांनी ग्रामीण व शहरी भागात जाऊन लोकांशी चर्चा केली.

त्यांनी लोकांना आश्वस्त केले की हे सरकार आपले आहे व ही शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणें उभी आहे असेही लोकांना सांगितले. महापुराच्या आपत्तीने आपण उभे राहिलात! गणपती बाप्पा चा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून तुम्ही कधीही हाक मारा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. धर्म, जात, भाषा न पाहता प्रत्येकाला घरोघरी जाऊन मदत करू, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

aditya thakre

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त भागात शिवसहाय्य कीट चे वाटप करण्यात आले व त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे सुध्दा यावेळी वाटप करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी ज्या 22 मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करण्यात आल्या आहेत तसेच त्या सगळ्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

लोकांमध्ये जाऊन लोकांना मदत करणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्यांना दिलासा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या साठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली.

उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

उध्दव ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयान (ईडी) ने नोटीस पाठवल्यापासून त्याचे परिणाम महाराष्ट्रभर दिसत आहेत. राज्यातील प्रत्येक ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा व मनसेसैनिक हा या प्रकारांमुळे संतापला असून त्याचा रोष २२ ऑगस्ट रोजी निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपप्रणीत सरकार हे एक प्रकारचे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप याठिकाणी केला जात आहे. अशातच मातोश्रीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल मत व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या ईडी च्या चौकशीत काहीही सापडणार नाही. त्याबरोबरच याविषयाबद्दल जास्त काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी ईडी ने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी शांतता पाळण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान मुंबई व ठाण्यातील कार्यकर्त्यांनी दोन्ही शहरे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते पण राज ठाकरे यांनी त्यासाठी मज्जाव केला असून नागरिकांना त्रास होईल असा कोणताही प्रकार न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

त्यासाठी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून जाहीर आवाहन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी ची नोटीस पाठवल्यापसून मनसे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले असून पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मनसेच्या २०-२५ जणांना नोटीस पाठवली आहे.

मी योग्य वेळी बोलेनच, तुम्ही शांत रहा…राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मी योग्य वेळी बोलेनच, तुम्ही शांत रहा…राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

raj-thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडी संचानालायाने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.अशावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते जमू शकतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनेही होऊ शकतात. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्र सैनिकांना शांतता राखण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर व फेसबुक अकाउंट वरून त्याबद्दल जाहीर आवाहन केले आहे. ते खालीलप्रमाणे

जाहीर आवाहन
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस
आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या
अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू.
इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा
सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा.
सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी
घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.
तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण
तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा
जमू नये.
आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.
आपला नम्र
राज ठाकरे

तसेच या दरम्यान मनसे नेत्यांनी सुध्दा पत्रकार परिषद घेऊन शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की ईडी ने राज साहेबांना सकाळी ११.३० वाजता बोलवले आहे. तसेच त्यादिवशी मनसेचे कार्यकर्ते शांतता पाळतील व आम्हाला पूर्ण कल्पना आहे की आमचे कार्यकर्ते पक्षाच्या आदेशानुसार वागतील त्याच्या बाहेर जाणार नाहीत.

हे जरूर वाचा- आज काश्मीर तोडले उद्या मुंबई आणि विदर्भ असेल – राज ठाकरे

शिवसेनेत येण्यासाठी राज्यातील नेते उत्सुक

शिवसेना

राजकारणात पक्षनिष्ठा कशी असावी याचे सर्वात चांगले उदाहरण द्यायचे झालेच तर शिवसैनिक हा शब्द त्यासाठी योग्य ठरेल. पण ज्याप्रमाणे सत्ता बदलत जाते त्याप्रमाणे सत्तेच्या मागे जाणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. गेल्या ५ वर्षात भाजपा मध्ये झालेले पक्षप्रवेश हे त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ३० जुलै रोजी भाजपामध्ये अनेक जणांचे इन्कमिंग झाले त्यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप आता फुल्ल झाला आहे त्यामुळे यापुढे पक्षप्रवेश करताना मर्यादा येणार आहेत. याचाच अर्थ असा की भाजप आणि शिवसेना युती होणार असून पक्षात घेण्यासाठी आता भाजप कडे जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.

युतीत जरी अजून जागा ठरल्या नसल्या तरी दोघांनी आपआपल्या प्रभावाखाली असणाऱ्या जागांवर लढायची तयारी केलेली आहे. अशातच शिवसेनेत होणारे प्रवेश हे सुध्दा एक यात विशेष बाब समोर आली आहे. राज्यातील अनेक नेते शिवसेनेत यायला तयार आहेत. त्यासाठी मातोश्री वर येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक जिल्ह्यात छोटे मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. अशातच अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित. कारण त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे.

निर्मला गावित या काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. आदिवासी बहुल भागातून निवडून येणाऱ्या निर्मला गावित यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा हा काँग्रेस साठी आगामी काळात डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक असणारे दुसरे नाव आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी च्या नेत्या रश्मी बागल.

रश्मी बागल यांचे वडील मंत्री तर आई ह्या आमदार होत्या. त्यांचाही लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. एवढंच काय तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सुध्दा शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ मांडण्यात येत आहे.

जरूर वाचा- हि ५ राज्ये आहेत भारतातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध राज्ये.