Best 10 Marathi movies on Amazon Prime Video । सर्वोत्तम १० मराठी चित्रपट !

ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ हा चित्रपट पाहण्याचा एक सुखद अनुभव देत असतो. एकदा घेतलेल्या मेंबरशिपमधून तुम्ही खूप सारे चित्रपट विनामूल्य पाहू शकता. विविध वेब सिरीज, चित्रपट, लघुपट तुम्ही या स्तरावर पाहू शकता. खूप सार्‍या ऑफर्सदेखील ॲमेझॉन प्राईम व्हिडिओतर्फे दिलेल्या असतात. मराठी व्यतिरिक्त तुम्ही अन्य भाषेत देखील खूप सारे चित्रपट, वेब सीरीज पाहू शकता.

Amazon prime video Marathi | Amazon Prime Video Marathi Movie list –
मराठी चित्रपट सूची –

१. ६६ सदाशिव ( 66 sadashiv )


२०१९ मध्ये रिलीज झालेला ” ६६ सदाशिव ” नामक, मोहन जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी रेटिंग केलेला आहे. फक्त १.९९ डॉलर इतक्या खर्चात तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. आणि प्राईम मेंबरशिप वर विनामूल्य पाहू शकता.

२. मुंबई पुणे मुबई – ३ ( Mumbai Pune Mumbai 3 )

२०१८ मध्ये रिलीज झालेला “मुंबई पुणे मुबई – ३” नामक, स्वप्निल जोशीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ५/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

३. टेक केअर गुड नाईट ( Take Care Good Night )

२०१८ मध्ये रिलीज झालेला “टेक केअर गुड नाईट” नामक, महेश मांजरेकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ४/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

४. वेडिंग चा शिनेमा ( Wedding Cha shinema )

२०१९ मध्ये रिलीज झालेला “वेडिंग चा शिनेमा” नामक, शिवराज यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ४.८/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

५. स्माईल प्लीज ( Smile Please )

२०१९ मध्ये रिलीज झालेला ” स्माईल प्लीज ” नामक, मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ५/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

६. एका लग्नाची आधीची गोष्ट ( Eka lagnachi adhichi gosht )

२०१९ मध्ये रिलीज झालेला “एका लग्नाची आधीची गोष्ट” नामक, प्रविण कदम यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी रेटिंग केलेला आहे. फक्त १.९९ डॉलर इतक्या खर्चात तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. आणि प्राईम मेंबरशिप वर विनामूल्य पाहू शकता.

७. एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी ( Ek Nirnay swatahcha swatahsathi)

२०१९ मध्ये रिलीज झालेला ” एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी ” नामक, सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ३.३/५ असा रेटिंग केलेला आहे. फक्त ०.९९ डॉलर इतक्या खर्चात तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. आणि प्राईम मेंबरशिप वर विनामूल्य पाहू शकता.

८. एक सांगायचंय ( Ek sangaychay )

२०१८ मध्ये रिलीज झालेला ” एक सांगायचंय ” नामक, के के मेनन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ५/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

९. ट्रीपल सीट ( Triple seat )

२०१९ मध्ये रिलीज झालेला ” ट्रीपल सीट ” नामक, अंकुश चौधरी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ५/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

१०. डी एन ए (DNA)

२०१९ मध्ये रिलीज झालेला ” डी एन ए ” नामक, प्राजक्ता करंदीकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच जणांनी ४.७/५ असा रेटिंग केलेला आहे. प्राईम मेंबरशिप वर हा चित्रपट तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

Top 10 Best Marathi Movies । सर्वोत्तम मराठी चित्रपट

Top 10 Best Marathi Movies

मराठी चित्रपटसृष्टी तशी खूपच नावाजलेली आहे कारण दर्जेदार विषयांवर कमीत कमी खर्चात उत्तम फिल्म बनवणे हे खूपच विशेष म्हणावं लागेल. 10 Best Marathi movies निवडणे तसे अवघडच काम आहे. परंतु विशिष्ट प्रकारानुसार आणि विशिष्ट काळात बनवला गेलेला चित्रपट हा त्या काळातच तुलनात्मक असू शकतो. तरीही रंगीत सिनेमा आल्यापासून बनवले गेलेले खालील १० सर्वोत्तम मराठी चित्रपट हे प्रत्येक विषयानुरूप निवडले गेलेले आहेत आणि प्रत्येकाने ते पहावेत असेच आहेत. 

Best Marathi Movies । सर्वोत्तम मराठी चित्रपट

१. डोंबिवली फास्ट:

dombivali fast

माधव आपटे नामक सामान्य व्यक्तीची ही कहाणी आहे. साधा, सरळ व्यक्ती सिस्टिम विरूध्द बंड निवडतो आणि तो स्वतः मग भ्रष्टाचार आणि अन्यायात अडकतो. याची सविस्तर कथा या चित्रपटात दाखवली आहे.

हा व्यक्ती सुशिक्षित असल्याने बुद्धीची कुवत चांगली दाखवण्यात आलेली आहे.

Marathi Movie Download 2019 | नवीन मराठी चित्रपट डाउनलोड करा आता फ्री मध्ये

२. पिंजरा:

Pinjara

दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी पहिला रंगीत मराठी चित्रपट “पिंजरा” बनवला. श्रीराम लागू, संध्या आणि निळू फुले हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार होते.

एक सुसंस्कृत शिक्षक तमाशातील स्त्रीला बदलण्याचा प्रयत्न करतो परंतु स्वतः तिच्या प्रेमात पडतो याचे जिवंत चित्रण या चित्रपटात केले आहे.  

३. नटसम्राट:

natsamrat

Best marathi movies पैकी हा एक चित्रपट आहे. नाना पाटेकर यांच्या उत्तम अभिनयाने सुसज्ज झालेला हा सिनेमा अनेक प्रश्न मागे ठेऊन जातो. एका अभिनेत्याची होणारी तगमग आणि उतारवयात होणारा कौटुंबिक कलह उत्तमरित्या सादर करण्यात आला आहे. दर्जेदार अभिनय आणि संवाद ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत.

४. श्वास:

shwas

श्वास २००४ च्या ऑस्करमध्ये भारतीय प्रवेश म्हणून पाठविलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. आजोबा आणि नातू यांच्या नात्यातील मर्म आणि संवेदना दिग्दर्शकाने व्यवस्थित दाखवल्या आहेत. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे या चित्रपटातून कळते.

५. अशी ही बनवा बनवी:

Ashi hi banava banavi

हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत एक क्लासिक विनोदी चित्रपट म्हणून ओळखला जातो. सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा चित्रपट अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन बनवण्यात आला होता. यामध्ये सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुशांत रे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

६. जोगवा:

jogava

अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता “जोगवा” हा चित्रपट सामाजिक असमतोल दाखवतो. महाराष्ट्रातील देवदासी परंपरा आणि त्यांच्या समस्या या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आहेत. या चित्रपटातील विषय खूपच संवेदनशील असून दिग्दर्शक राजीव पाटील यांनी तो व्यवस्थित हाताळला आहे. चित्रपटात संगीत आणि अभिनय खूपच दर्जेदार आहे.

७. हरिश्चंद्राची फॅक्टरी:

 हरिश्चंद्राची फॅक्टरी

भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात कशी झाली आणि भारतातला पहिला चित्रपट बनवणारे दादासाहेब फाळके या मराठमोळ्या व्यक्तीची ही कहाणी आहे.  दादासाहेब फाळके यांच्या जीवनात चित्रपट बनवताना आलेले अनुभव या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत. दादासाहेब फाळके सतत हसतमुख आणि आत्मविश्वासाने भरलेले दाखवलेले आहेत. 

८. शाळा:

shala

मिलिंद बोकील यांच्या शाळा कादंबरीवरून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. शालेय जीवन आणि त्यातील किशोरवयीन प्रेम या दोन्हीतील गुंतागुंत या चित्रपटात मांडली आहे. शाळेतल्या खूपशा आठवणी या चित्रपटातून जाग्या होतात. एक सुंदर अनुभव हा पाहिल्यानंतर प्राप्त होतो.

९. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय:

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

दिनकर भोसले नामक मध्यमवर्गीय व्यक्तीची होणारी हेळसांड, त्याच्यावर असणारी जबाबदारी आणि त्याची त्यातून आलेली निराशा ही जीवन जगण्यास विरोध करते. आणि त्याचा दोष तो स्वतःला न देता स्वतःच्या जातीवर ठेवतो अशा परिस्थितीतून जात असताना स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्याला मोलाचे मार्गदर्शन करतात आणि त्याच्यात अमुलाग्र बदल घडवून आणतात. चित्रपटात सर्व अभिनेते उत्तम अभिनय सादर करतात. 

१०. देऊळ:

Deool

देऊळ चित्रपट मानवी स्वभावावर आणि सामाजिक नैतिकतेच्या दृष्टिकोनावर व्यवस्थित भाष्य करतो. धार्मिक विषय किती संवेदनशील असतो याचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे.

गावच्या ठिकाणी धर्मामुळे निर्माण झालेली तेढ,  व्यावसायिक संदर्भ आणि राजकारण यांचे मार्मिक उदाहरण हा चित्रपट स्पष्ट करतो. गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांनी दर्जेदार अभिनय केला आहे.

तर तुम्हाला हि Top 10 Best Marathi Movies ची लिस्ट कशी वाटली ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. आम्ही तुमच्या कंमेंट्स ची वाट पाहतोय.


Marathi Movie Download 2020 | नवीन मराठी चित्रपट डाउनलोड करा आता फ्री मध्ये

marathi movie download

Marathi Movie Download । मराठी चित्रपट डाउनलोड

जेव्हा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपल्याला प्रथम आठवते ती मूवी. अशा परिस्थितीत, मला वाटतं की आपणास चित्रपट किंवा चित्रपटांपेक्षा उत्तम समाधान कदाचित सापडेल. मोकळ्या वेळात कोणाला काय आवडते हे जर आपण एखाद्याला विचारले तर अशा परिस्थितीत आपणास 90% पेक्षा जास्त लोकांचे उत्तर चित्रपट किंवा चांगली मालिका मिळेल. आणि त्यात तुम्ही मराठी असाल तर Marathi Movie Download करून पाहायला नक्कीच आवडेल.

त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला Marathi Movie Download कशी करायची किंवा कोणती साधने उपलब्ध आहेत व कोणत्या websites आहेत ज्या तुम्हाला latest Marathi Movie Download करायला मदत करतील हे सांगणार आहोत. सोबत आपण Movie Piracy बद्दल सुद्धा बोलणार आहोत.

दिवसेंदिवस मूवी तिकीट वाढत असताना विनामूल्य चित्रपट पाहणे खरोखर वरदान आहे. आता चित्रपट कुठून डाउनलोड करावे आणि कसे डाउनलोड करावे, ही समस्या सर्वांना सतावते. परंतु आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे की आज आम्ही काही tricks बद्दल माहिती देणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही New Marathi Movie Download करू शकता.

जरी ह्या वेबसाइट्स पायरेटेड चित्रपट देत असल्या तरी, ती लोकांना विनामूल्य चित्रपट डाउनलोड करण्याची संधी देते. त्यामुळेच आज मी विचार केला की तुम्हाला अशा Tricks बद्दलची सर्व आवश्यक माहिती Marathi मध्ये देऊया. आपल्यासाठी या गोष्टी सर्व दृष्टिकोनातून जाणून घेणे महत्वाचे आहे. मग विलंब न करता प्रारंभ करूया.

Marathi movies 2019 full movie download कशी कराल? Where can I download Marathi movies from?

Where can I download Marathi movies from? अशा प्रकारचे प्रश्न आजकाल इंटरनेटवर खूप विचारले जातात कारण खूप कमी वेबसाइट्स आहेत ज्या अशाप्रकारचे Marathi movie free Download करण्यास मदत करतात. मुळात नसल्यासारखेच आहेत. आजकाल सर्वाना New marathi movie download करायचे असतात. त्यामुळे सर्वजण अशा लिंक च्या शोधात असतात ज्या त्यांना Marathi movies 2019 full movie download करून देतील आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देखील होऊ नये.

आता यूट्यूबने मराठी चित्रपटांसाठी खास चॅनेल तयार केले आहेत आणि तेथे मराठी भाषा, मराठी गाणी, बॉलिवूड चित्रपट आणि हिंदी चित्रपटांशी संबंधित इतर अनेक चित्रपट चॅनेल आहेत. म्हणजेच, तुम्ही महागड्या मराठी चित्रपटाची डीव्हीडी खरेदी करण्याऐवजी किंवा नवीनतम / सर्वाधिक लोकप्रिय / जुन्या मराठी चित्रपटांसाठी इंटरनेटवर पाहण्याऐवजी केवळ यूट्यूबवर कीवर्ड शोधून ते सहजपणे मराठी चित्रपटाचे व्हिडिओ मिळवू आणि पाहू शकता. तर मग Marathi movie free download प्रक्रियेपासून कसे प्रारंभ करावे आणि नंतर Download केलेले Latest Marathi movie पीसीमध्ये साठवून ठेवू शकाल आणि जाहिरातींशिवाय घरात फिल्मचा आनंद घेऊ शकाल.

marathi movie download

आपणास Windows 10/8/7 / Vista / XP इ. सह सुसंगत एक विनामूल्य ऑनलाइन मूव्ही व्हिडिओ संगीत डाउनलोडर हवा असल्यास WinX HD व्हिडिओ कनव्हर्टर डिलक्स डाउन्लोड करावा लागेल. हे विशेषतः आपल्याला डेलीमोशन, व्हिमियो आणि 1000+ व्हिडिओ साइट वरून 8 के / 4 के / एचडी 1080 पी / 720 पी एमपी 4, 3 जीपी, एफएलव्ही इ. मधील उच्च दर्जाचे पूर्ण चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हिंदी, इंग्रजी किंवा अन्य भाषांमध्ये. एमपी 4 एचडी / 4 के मध्ये शीर्ष हॉलिवूड चित्रपट मिळविण्यासाठी हे साधन डाउनलोड करा

How to Download Full HD Marathi Movie Free? । पूर्ण मराठी चित्रपट एचडी विनामूल्य डाउनलोड कसे करावे?

सर्व काही करण्यापूर्वी, कृपया विन्क्स यूट्यूब डाउनलोडर विनामूल्य डाउनलोड करा आणि आपल्या PC वर त्याला install करा. Full HD Marathi Movie Download प्रक्रिया खूप सोपी आहे आणि मल्टी-थ्रेड आणि मल्टीकास्ट टेकच्या समर्थनामुळे मराठी चित्रपट डाउनलोड करण्यास तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

Latest Marathi movie Download करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

Step 1: मराठी चित्रपटाचा URL कॉपी आणि पेस्ट करा.

YouTube वर हवा असलेला मराठी चित्रपट चॅनेल किंवा इतर मराठी चित्रपट शोधा, आपला लक्ष्यित चित्रपट निवडा आणि आपण डाउनलोड करू इच्छित असणाऱ्या मराठी चित्रपटाचा संपूर्ण URL कॉपी करा.

पुढे, WinX यूट्यूब डाउनलोडरमध्ये जा आणि वरच्या बारमधील “+ यूआरएल” नावाचे पहिले बटण क्लिक करा.

Step 2: डाउनलोड केलेल्या मराठी चित्रपटासाठी आउटपुट स्वरूप आणि रिझोल्यूशन निवडा.

मराठी चित्रपटाचे स्वरूप, आकार, कोड आणि रिझोल्यूशन शोधण्यासाठी आता “विश्लेषण” वर क्लिक करा. आपणास पाहिजे तसे एमपी 4 वेबएम 1080 पी 720 पी निवडण्यास मोकळे आहे आणि नंतर “ओके” क्लिक करा.

Step 3: मराठी चित्रपट व्हिडिओ फ्री डाउनलोड सुरु करा.

आपण फोल्डर बदलू इच्छित असल्यास “ब्राउझ” बटणावर टॅप करा. आणि शेवटची पायरी म्हणजे मराठी चित्रपट डाउनलोड करण्यास सुरु करण्यासाठी “डाउनलोड” बटण दाबा.

Marathi movie download website List । मराठी चित्रपट डाउनलोड साईट्स

भारतात अनेक Marathi movie Download sites आहेत ज्या आपल्याला Pirated movie provide करतात. तसेच अशा मूवी Downloading वर सरकारने बंदी सुद्धा घातली आहे. परंतु थिएटर मध्ये जाऊन पैसे घालवण्यापेक्षा अशा प्रकारच्या मूवी डाउनलोड करून पाहणे आजकाल कॉमन झाले आहे. परंतु अशा Marathi movie Download करणे कधीही घातकच. तरीही भरपूर लोक अशा वेबसाइट्स search करत असतात त्यामुळे आम्ही अशा काही वेबसाइट्स ज्यावर pirated कन्टेन्ट provide केला जातो पण त्यावर शासनाची बंदी आहे त्या पुढील प्रमाणे आहेत-

Marathi movie Download sites

 • 123Movies
 • 1Movies
 • 7starHD
 • 8XFilms
 • 9XMovie
 • 9XRockers
 • Bolly4u
 • Cinemavilla
 • Coolmoviez
 • Downloadhub

या वेबसाइट्स वरून तुम्ही कोणत्याही भाषेत चित्रपट डाउनलोड करू शकता. तसेच तो Share हि करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीने रेसुलुशन सेट करता येते आणि यात मोबाइल वर डाउनलोड करण्याचा option देखील असतो. परंतु वेळोवेळी या वेबसाइट्स वर बंदी आल्याने या वेबसाइट्स च्या लिंक्स नेट वरून काढून घेतल्या जातात. तसेच अशा लिंक्स सहारे करण्यावर देखील शासनाच्या तर्फे बंदी घातली आहे. त्यामुळे आम्ही अशा लिंक्स provide करत नाही आणि त्याचा प्रचार हि करत नाही याची सर्वानी दाखल घ्यावी.

सरकार अशा पाइरेटेड साइट्सवर बंदी का घालत नाही?

या पायरेटेड साइटवर बरेच नियम बनविलेले आहेत. परंतु सरकारच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता, अशा साईट्स नेहमीच नवीन साइटवरून त्याचे कार्य सुरू ठेवतात. यामुळे मूव्ही इंडस्ट्रीचे बरेच नुकसान झाले आहे. म्हणूनच आमचा असा विश्वास आहे की या प्रकारचे अवैध डाउनलोडिंग वेबसाइटपासून नेहमीच दूर असले पाहिजे.

जेव्हा सरकारने त्यांची मुख्य वेबसाइट गूगलवर प्रतिबंधित केली, तेव्हा त्यांनी पुन्हा नवीन डोमेनसह ही साइट सुरू केली. अशा अनेक साईट्स वर बंदी आहे परंतु ते नेहमी नवीन डोमेनसह त्यांचा व्यवसाय सुरू करतात.

या वेबसाइट्स मुख्यतः त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशीत मूळ मूव्ही सामग्रीची पायरेटेड आवृत्ती प्रकाशित करतात. म्हणूनच आपण ह्या सर्व वेबसाइट्सपासून दूर रहाणे चांगले आहे.

बंदी असूनही लोक या पायरेटेड साइट्स का वापरतात?

ते म्हणतात ना की आपण जितकी जास्त बंदी घालू तितके लोक त्याचा वापर करण्यास तळमळतील. चित्रपटांच्या पायरेसीबाबतही हेच घडते. याचा अर्थ असा की सरकार जितके यावर कडक नियम लावते तितके लोक डाउनलोड करण्यासाठी अधिक त्यांचा शोध घेतात.

त्याच वेळी, यासारख्या वेबसाइटची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यामध्ये आपणास दर आठवड्याला बरेच चित्रपट सूचीबद्ध केले जातात, जे आपण इच्छिता तेव्हा सहज डाउनलोड करू शकता. ज्या लोकांकडे मूव्ही हॉलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात त्यांचे मोबाइल किंवा स्मार्टफोनवर हे चित्रपट सहजपणे डाउनलोड आणि पाहणे हे मुख्य कारण आहे.

Disclaimer । अस्वीकरण

कोणत्याही मूळ सामग्रीची चोरी करणे भारतीय कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. Daily Marathi News या चाच्यागिरीला तीव्र विरोध करते. येथे दर्शविलेली सामग्री केवळ आपल्याला बेकायदेशीर क्रियाकलापांबद्दल आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी आहे.

चाचागिरी आणि अनैतिक कृत्यांना कोणत्याही प्रकारे प्रोत्साहित करण्याचा त्याचा हेतू मुळीच नाही. कृपया अशा वेबसाइट्सपासून दूर रहा आणि चित्रपट डाउनलोड करण्यासाठी योग्य मार्ग निवडा.

Girlz Movie Poster पाहिला आणि सलील कुलकर्णी हे काय बोलून गेले…?

girlz movie poster

येत्या २९ नोव्हेंबरला गर्ल्स हा चित्रपट येणार आहे. मुलींची चर्चा आणि त्यांचे भावविश्व अशी काहीशी कथा असलेला हा चित्रपट एका वेगळ्याच वादात सापडला आहे. आयुष्यावर बोलू काही असं नाव वापरून या कार्यक्रमाची थट्टा करण्यात आलेली आहे असं सलील यांचं वक्तव्य आहे. गर्ल्स चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अंकिता नामक अभिनेत्री असभ्य वर्तन करताना दिसत आहे आणि तिचा टीशर्ट हाच वादाचा खरा मुद्दा बनला आहे. 

FamilySucks हा हॅश टॅग आणि आयुष्यावर बोलू काही, असं प्रिंट केलेला टी-शर्ट परिधान करून अश्लील हालचाली करणे हे अजिबात योग्य नाही, असं सलील यांनी म्हटलं आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’ हे सलील कुलकर्णींच्या कार्यक्रमाचं नाव आहे. हा कार्यक्रम खूपच प्रसिद्ध आहे. आयुष्यातील काही नात्यांमध्ये भावना जपणारा हा कार्यक्रम आणि त्याची केली गेलेली अशी अवहेलना सलील यांना मान्य नाही.

याबाबतीत त्यांची फेसबुक पोस्ट अशी ”नाती, आई-बाबा, घर या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा- आयुष्यावर बोलू काही. आपल्या या कार्यक्रमाबद्दल हा आदर? गेली सोळा वर्षे हाऊसफुल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाचा असा अपमान? काय विचार असेल यात? मी, संदीप खरे, आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ आणि मित्रमंडळी असे आम्ही सर्वजण याचा तीव्र निषेध करतो.”

Girlz Marathi Movie Teaser, Girlz Bold Poster पाहून तरुणाई झाली बेभान

girlz marathi movie

‘बॉइज’ आणि ‘बॉइज 2’ या दोन्ही सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर आता सज्ज झालेत ते मुलींच्या दुनियेत न्यायला गर्ल्स सिनेमातून. या आगामी सिनेमाचा Girlz marathi movie teaser आणि Girlz Marathi movie Poster नुकतंच रिलीज केलं गेलं आहे.

Girlz marathi movie teaser । गर्ल्स टिझर

Girlz teaser Review: या वर्षी “गर्ल्स” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉईज आणि बॉईज – २ या दोन्ही चित्रपटांना टक्कर देईल असाच हा चित्रपट असेल. बॉईज चित्रपटात मुलांच्या तारुण्यात घडणाऱ्या घटना आणि त्यांचा मुलींविषयी असणारा दृष्टिकोन हा दाखवण्यात आला होता. 

आता या वेळी गर्ल्स या चित्रपटात देखील अशाच मुलींचा अवखळपणा व मौज मस्ती थोड्याशा जुजबी स्वरूपात दाखवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट जसे सामाजिक आणि निर्भिड विषय हाताळत आहेत तसेच प्रयोग मराठीतही सुरू झालेले आहेत. कामुक विनोदी असा खूपच बोल्ड विषय यावेळी हाताळण्यात आला आहे. विशाल देवरुखकर या दिग्दर्शकानं  उचललेलं हे पाऊल कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे चित्रपट आल्यावरच कळेल.    

मुली ज्या पद्धतीत वागतात, बोलतात त्यांचा समन्वय लावणे कधीकधी अवघड होऊन जाते. परंतु मुलींची चर्चा, त्यांचे विषय हेदेखील मुलांसारखे खट्याळ असतात पण उघड नसतात. हा चित्रपट पाहताना मात्र मज्जा येईल हे नक्की !

Girlz Movie Cast । गर्ल्स मूवी कास्ट

 • प्रमुख भूमिका –  पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड, केतकी नारायण, अंकिता लांडे, अन्विता फलटणकर.
 • दिग्दर्शक – विशाल सखाराम देवरुखकर.
 • स्टुडिओ –  एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स.
 • निर्माता –  नरेन कुमार, सुजाता कुमार.
 • सहाय्यक निर्माता – अमित भानुशाली.
 • कथा आणि पटकथा – हृषिकेश कोळी.
 • छायाचित्रकार  – सिध्दार्थ.
 • संगीत – प्रफुल्ल आणि स्वप्नील, समीर.

Girlz Marathi Movie Poster । गर्ल्स मराठी मूवी पोस्टर

Girlz marathi movie poster: या मूवी चा बोल्ड पोस्टर देखील खूप चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये तिन्ही नायिका टॉपलेस होताना दिसत आहेत आणि हेच आजच्या तरुणाईला आवडलेल दिसतंय. कारण बॉलीवूड प्रमाणे मराठीमध्ये देखील बोल्डनेस येताना दिसत आहे.

girlz marathi movie poster

“आईच्या गावात बाराच्या भावात” हे गाणं होतंय प्रसिद्ध.   

नुकतंच हे गाणं आलेलं आहे. यूट्यूबवर आणि चॅनेलवर हे गाणं येताच प्रसारमाध्यमांनी चांगलच उचलून धरलं आहे. तब्बल चौदा प्रयत्नानंतर हे गाणं यशस्वीरीत्या रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. प्रफुल आणि स्वप्नील यांना प्रत्येक रेकॉर्डिंग नंतर हे गाणं काही अधुरं आहे असं वाटत होतं, असे १३ वेळा रेकॉर्डिंग झाल्यानंतर हे गाणं १४ व्या वेळी पूर्ण करण्यात आलं. 

इथे पाहू शकता संपूर्ण गाणं-

Aaichya Gavat Song Video – Movie Girlz | Marathi Songs | Vishal Sakharam Devrukhkar | Praful-Swapnil

Aaichya Gavat Song Video – Movie Girlz | Marathi Songs | Vishal Sakharam Devrukhkar | Praful-Swapnil

आईच्या गावात बाराच्या भावात’ हा प्रसिद्ध डायलॉग मंदार चोळकर यांनी हेरला आणि गाणं लिहल. त्यांच्या शब्दांना प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि वैशाली सामंत, कविता राम आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.

जर त्यादिवशी त्याचे विमान सुटले नसते तर आज तो कदाचित सुपरस्टार अक्षय कुमार नसता.

akshay kumar

आज बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार याचा वाढदिवस. राज हरिओम भाटिया ते बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा त्याचा प्रवास जेवढा संघर्षमय आहे तेवढाच तो प्रेरणादायक सुद्धा आहे. सुमारे १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या अक्षय कुमारला भारतातील बऱ्यापैकी प्रत्येक सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

२०१६ साली आलेल्या त्याच्या “रुस्तम” या सिनेमासाठी त्याला “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा” राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला.

अक्षय कुमारचा जन्म अमृतसर पंजाब येथे झालेला असून त्याचे वडील भारतीय सैन्यात होते. अक्षय कुमारला लहानपणापासूनच कराटे शिकण्याची आवड. त्यामुळे ब्लॅक बेल्ट मिळाल्यानंतर मार्शल आर्ट शिकण्यासाठी त्याने बँकॉक गाठले. थायलंडमध्ये असताना बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याने काही काळ हॉटेलमध्ये शेप व वेटर म्हणून काम केलं. तसेच थायलँड मधून भारतात परतल्यानंतर त्याने कोलकत्ता शहरातील एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये सुद्धा काम केले.

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याला सिनेसृष्टी मध्ये येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. एवढेच काय तर त्याने जेव्हा मॉडलिंग सुरू केले तेव्हा एका फर्निचरच्या शोरूम मध्ये मॉडेल म्हणून काम करू लागला. काही काळ त्याने मोबदला न घेता सुद्धा काम केले. तसेच भारतातील एक प्रसिद्ध फोटोग्राफर कडे सुद्धा त्याने कसलेही पैसे न घेता 18 महीने काम केले.

अक्षय कुमारने त्याच्या सुरुवातीच्या काळात काही सिनेमासाठी बॅकग्राऊंड डांसर म्हणून सुद्धा काम केले. एकेदिवशी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार बंगलोरला असताना वेळेच्या गफलतीमुळे त्याचे विमान त्याच्या आधीच निघून गेले. आता काय करावं हा प्रश्न समोर असताना त्याने आपलं नशीब बॉलीवूड मध्ये आजमावण्याचा निश्चय केला आणि निराश झालेला अक्षय कुमार आपल्या फोटोचा अल्बम घेऊन बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते प्रमोद चक्रवर्ती यांच्याकडे गेला. त्यांना तो अल्बम एवढा आवडला की त्यांनी अक्षय कुमारला त्यांच्या दिदार या सिनेमासाठी प्रमुख भूमिकेसाठी घेतले. आणि त्याचा अभिनेता म्हणून प्रवास सुरु झाला.

म्हणतात ना, “जो होता है अच्छे के लिये होता है” काही असच त्याच्यासोबत सुद्धा घडलं…

यानंतरचा त्याचा हा सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास हा सगळ्यांना माहीत आहे. आजच्या काळातील एका सिनेमासाठी सर्वात जास्त पैसे घेणारा अभिनेता ते सर्वात जास्त सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या या भारतीय सिनेमातील योगदानामुळे त्याला भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरविले. तसेच आशिया खंडातील नावाजलेला “द एशिअन” अवॉर्ड सुध्दा त्याला देण्यात आला आहे.

लवकरच अक्षय कुमारचा हाउसफुल ४, लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यशराज फिल्म्स ने आगामी “पृथ्वीराज” हा सिनेमा अक्षय कुमार बरोबर पुढच्या दिवाळीत प्रदर्शित होईल असे जाहीर केले.

अशाच या देशी सुपरस्टारला आमच्या टीम तर्फे “वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा”

हे सुद्धा वाचा- “साहो” ने केलं निराश, कथा आणि Review वाचून तुम्हीही व्हाल…

“साहो” ने केलं निराश, कथा आणि Review वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

saaho movie review

कलाकार: प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी, जैकी श्रॉफ, चंकी पांडे, मुरली शर्मा, टीनू आनंद, महेश मांजरेकर, अरुण विजय, एवलिन शर्मा.

दिग्दर्शक: सुजीत

मूवी टाइप: अ‍ॅक्शन, ड्रामा

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘साहो’ च्या रिलीजची बरेच दिवस चाहते वाट पाहत होते. हा चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपटांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. जोरदार अ‍ॅक्शन सिक्वेन्स आणि दीर्घकाळ चाललेल्या स्टार कास्टने सजलेल्या या चित्रपटाची कहाणी ट्विस्ट आणि टर्नने परिपूर्ण आहे आणि आपल्याला नायकासमोर अनेक खलनायक पहायला मिळतात.

कथाः चित्रपटाच्या ट्रेलर मधेच आपल्याला समजत कि ‘साहो’ मधील प्रभासचे पात्र विलनचे संपूर्ण साम्राज्य नष्ट करते. चित्रपटाची कहाणी मुंबईत एका मोठ्या दरोड्याने सुरू होते. आणि एका ब्लॅक बॉक्स चा शोध घेत कथा बर्‍याच शहरांशी जोडली जाते. या ब्लॅक बॉक्स शी सर्व पत्रे जोडली गेली आहेत. सर्वांच्या नशिबाची किल्ली यात आहे.

आमचं मत: एक्शन चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्यापासून सुरू होते. प्रभासची स्क्रीन हजेरी सुरुवातीपासूनच सुरू होते. प्रभास या भूमिकेत फिट दिसत असला तरी चित्रपटात त्याचे ‘बाहुबली’ आकर्षण आपल्याला दिसणार नाही. प्रभासची व्यक्तिरेखा रहस्यमय बनली आहे, असा लोकांचा अंदाज आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर ग्लॅमरस आहे पण तिचे पात्र चांगले लिहिलेले नाही. तिला एक मजबूत पोलीस दर्शविण्याऐवजी, तिला एक कमकुवत दुवा बनविला आहे ज्याला नायकाला पुन्हा पुन्हा वाचवावे लागते. प्रभास आणि श्रद्धा यांच्यातील केमिस्ट्रीतसुद्धा तुम्हाला काहीतरी missing वाटेल.

जिथे व्हिलनचा प्रश्न आहे, चंकी पांडे नक्कीच तुम्हाला प्रभावित करील. व्हिलनची उर्वरित पात्रं खूप हलकी लिहिली गेली आहेत. चित्रपटाचे संगीत चांगले आहे पण कथेमध्ये गाणी चुकीची आहेत, जी या चित्रपटाला अधिक लांब करतात.

आपल्याला चित्रपटाचे एक्शन सीन आवडतील परंतु कोठेतरी आपल्याला त्याचे विशेष प्रभाव जाणवणार नाहीत. जर पाहिले तर चित्रपटाच्या कमकुवत कथेची आणि कमकुवत दिग्दर्शनाची या चित्रपटाला झळ पोहचली आहे.

का पहावा?: प्रभासचे डाय हार्ट फॅन असल्यास आपण हा चित्रपट पाहू शकता.

आमची रेटिंग: 2.5/5

हे जरूर वाचा- हेच ते चमत्कारिक मंदिर ज्याचे खांब हवेत तरंगतात…शास्त्रज्ञांनाही अजून उलगडले नाही याचे रहस्य

हनी सिंग बद्दल या ५ गोष्टी कदाचित तुम्हाला अजूनही माहिती नसतील…

Know about honey Singh

‘यो यो हनी सिंग….’ अस आपल्याला ज्या गाण्यात ऐकू येईल ते समजून जायचं की हनी सिंगचं गाणं आहे. रॅप व पाश्चात्य संगीताचा अभ्यास असणाऱ्या या गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेता अशा हरहुन्नरी ‘देसी कलाकार’ व्यक्तिमत्वाला आपल्या आयुष्यात गायनात खूप खस्ता खाव्या लागल्यात. आपल्या संगीत कौशल्याने पूर्ण जगाला वेड लावणाऱ्या या संगीतकाराबद्दल थोडं जाणून घेऊयात.

१.खरं नाव व शिक्षण– 

‘हिर्देश सिंग’ हे आपले मूळ नाव न वापरता ‘यो यो हनी सिंग’ नावाने करियर घडवणाऱ्या या व्यक्तीच संगीत शिक्षण ट्रिनिटी कॉलेज,यु.के. येथे झालं. संगीताचं शिक्षण घेतल्याने एखाद गाणं उत्तम बनवून ते कसं हिट होऊ शकतं याचं त्याला पुरेपूर ज्ञान आहे. त्याचा कल हा रॅप संगीताकडे जास्त आहे हे आपल्याला वारंवार जाणून येतं.

२. ‘यो यो’ चा अर्थ

‘यो यो’ म्हणजे ‘आपका अपना’ म्हणजेच मराठीत ‘तुमचा स्वतःचा’ किंवा ‘ तुमचा आपला’. या नावाबद्दल एका मुलाखतीत विचारले असता तो म्हणाला की जेव्हा मी गाण्यात यो यो वापरतो तेव्हा मला आपलेपणाची जाणीव होत असते.

३. सर्वात महागडा गायकसंगीतकार

सर्व चित्रपट कधी कधी १ कोटी रुपयांपर्यंत पूर्ण होतो. पण आपल्या फक्त आवाजाची जादु आजमावण्यासाठी व वाढती लोकप्रियता बघून ‘मसान’ आणि ‘कॉकटेल’ या दोन चित्रपटांकरिता गायनाचे त्याने तब्बल ७० लाख रुपये मानधन म्हणून स्वीकारलं. जे कुठल्याही संगीतकार गायकासाठी जास्तच आहे.

४.स्टाईल व लुक्स

२०१५-१६ या वर्षी तर सर्व तरुण हनी सिंगची जशी केशरचना होती तीच केशरचना करून घेण्यात व्यस्त होते. लहान लहान मुले तर गाण्याचा ‘हनी सिंग कट मारा’ असाच रट्टा घेऊन बसलेली असायची. या वर्षीदेखील त्याचा नवा लुक पहावयास मिळतो आहे. ‘मखना’ हे गाणं जर कोणी बघितलं असेल तर त्याच्या नवीन केशरचनेची कल्पना आपल्याला येईल.

५. ग्रॅमी अवॉर्ड जिंकण्याचं स्वप्न-

आजच्या युगात गाणं हिट पाहिजे तर रॅप पाहिजेच. जर कुणी खऱ्या अर्थाने रॅप संगीताला हिट केलं असेल तर तो आहे ‘हनी सिंग’. प्रत्येक संगीतकार आपल्या चित्रपटात यो यो ला गाणं गायला देणारचं असा ट्रेंडच निर्माण झाला होता. त्याला भारतातर्फे संगीतातील मानाचा समजला जाणारा ‘ग्रॅमी’ अवॉर्ड जिंकायचा आहे.

हे जरूर वाचा- आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गायक अॅकाॅन गाणार मराठीत?

मीका सिंगवर बंदी, पाकिस्तानमध्ये जाऊन गायले गाणे…

mika Singh banned by Bollywood

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही काळापासून तणावाचे वातावरण सुरू आहे. त्याचवेळी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंग पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स देऊन वाईट प्रकारे अडकला आहे. मीका सिंग ला गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर संतप्त चाहत्यांच्या प्रतिक्रियाला सामोरे जावे लागत आहे.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदी सोहळ्यात मीका सिंगने गाणे गायल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते. मीकाची कामगिरी पाहण्यासाठी भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे कुटुंबही उपस्थित असल्याचे वृत्त आहे. या सगळ्याखेरीज मीका सिंगवरही नवीन संकट आले आहे.

पाकिस्तानमधील परफॉर्मन्समुळे अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने (एआयसीडब्ल्यूए) मीका सिंगवर बंदी घातली आहे. अखिल भारतीय सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी याबाबत अधिकृत निवेदन देऊन याबाबत माहिती दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले की, “मीकाच्या चित्रपटाचे प्रॉडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाइन कंटेंट प्रोव्हायडर यांच्याबरोबर त्यांच्या सर्व करारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त असोसिएशननेदेखील मीकाचे सर्व चित्रपट, गाणी आणि करमणूक कंपनीबरोबर काम करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले की, मीका सिंग समवेत चित्रपट उद्योगातील कोणीही काम करणार नाही याची काळजी अखिल भारतीय सिने कामगार संघटना (एआयसीडब्ल्यूए) घेईल. जर कोणी असे केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याला न्यायालयात हजर व्हावे लागेल. ते म्हणाले, ‘जेव्हा दोन देशांमधील तणाव चरम सीमेवर होता, त्यावेळी मीका ने देशाच्या अभिमानापेक्षा पैशांना जास्त महत्त्व दिले.

8 ऑगस्ट रोजी कराची येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये मीकासिंगही उपस्थित होता. पाकिस्तानी पत्रकाराने सांगितले की, वरिष्ठ अधिकारी, सैन्य आणि पोलिस अधिकारी आणि क्रिकेटर जावेद मियांदाद यांच्याशिवाय स्टार क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

पाकिस्तान सरकारने कोणत्याही भारतीय कलाकार किंवा चित्रपट व्यक्तिमत्त्वाच्या अभिनयावर बंदी घातली आहे. या कार्यक्रमात कामगिरी केल्यानंतर मीका सिंग च्या संकटात वाढच झाली.

ही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत…

परिणीती चोप्राला करायचंय मराठी चित्रपटात काम…

Parineeti Chopra wants to work in marathi

परिणीती आजकाल तिच्या जबरिया जोडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्या सोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आहे. पुणे टाइम्सला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत परिणीती म्हणाली की तिला प्रियांकाप्रमाणेच हॉलिवूड आणि मराठी सिनेमातही काम करायचे आहे. ती पुढे म्हणाली, ‘मला प्रियांकाच्या मार्गावर जायचे आहे. पण सध्या मी bollyvood मध्ये काम करून खुश आहे आणि मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहे. ‘जबरीया जोडी’ मधील माझे पात्र आणि सिद्धार्थला पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.’

तिला कोणत्या प्रकारची भूमिका साकारायला आवडेल असे विचारले असता परिणीती म्हणाली की तिला एक दिवस मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. परिणीती म्हणाली, ‘मी सिद्धार्थशी मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलत होते. माझ्या मते मराठी चित्रपटात खरोखर गुणवत्ता आहे. वर्षात किमान चार चित्रपट येतात ज्यात नवीन गोष्टी, विषयांवर चर्चा असते.

आम्ही बॉलिवूड आणि बंगाली सिनेमाबद्दल बरेच बोलतो, पण मला वाटते की मराठी चित्रपट अप्रतिम आहेत. सचिन खेडेकर माझे आवडते आहेत. मला एक दिवस नक्कीच एक मराठी चित्रपट करायला आवडेल. जरी मला मराठी भाषा बोलता येत नसली तरी या चित्रपटांमधून ज्या प्रकारचे विषय उपस्थित झाले आहेत त्या मुळे मला नक्कीच मराठी चित्रपट करायला आवडेल.’

सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’ ची कमकुवत सुरुवात

निक जोनास बद्दल बोलताना परिणीती म्हणाली, निक एक फॅमिली मॅन आहे. त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्याभोवती असले पाहिजे. त्याला प्रत्येकाची जास्त काळजी आहे आणि तो एक सकारात्मक विचारसरणीचा माणूस आहे. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा कसा आनंद घ्यावा हे निकने मला शिकवले.