वसुबारस – संपूर्ण माहिती | Vasu baras Information In Marathi |

Vasubaras

आपल्याला मराठी संस्कृतीबद्दल आणि साजरे करत असलेल्या सणांबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या जगण्यात स्वतःच्या कामाचा, वस्तूंचा आणि सजीवांचा समावेश होत असतो, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा केला जातो. त्याचीच एक प्रचिती म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस! महाराष्ट्रात “वसुबारस” (Vasubaras) या दिवसापासून दिवाळीला खरी सुरुवात होते.

वसुबारस म्हणजे काय? What Is Vasubaras |

भारतात दिवाळी हा सण खूपच प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे तसेच गाई, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसु – बारस!

वसु बारस हा दिवस, कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो. या द्वादशीस गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते. वसु या शब्दाचे खूप अर्थ सांगितले जातात. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन! आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे “सर्वांमध्ये वास करणारा” असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस!

वसुबारस कशी साजरी केली जाते?

गाई हा हिंदू संस्कृतीत पवित्र प्राणी आहे. त्याची उपासना करण्याचा भारतात इतिहास आहे. वसु बारस या दिवशी गाईची तिच्या पाडसासह आणि आता तर त्यासोबत इतर प्राण्यांचीही सायंकाळी पूजा केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गाईचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला आणि वासराला खाऊ घालतात. त्याअगोदर गाईच्या व वासराच्या पायावर पाणी घालून व त्याबरोबर हळदी – कुंकू वाहून त्यांची आरती ओवाळली जाते.

वसु बारस या दिवशी ज्यांच्या घरी गाई – वासरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते. सर्व देवतांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी दूध तसेच दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. वसु बारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरण पोळीचे जेवण बनवले जाते. काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील पकडतात.

वसुबारस या दिवसानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे दिवस दिवाळी या सणात साजरे केले जातात. संपूर्ण रोषणाईने आसमंत उजळून टाकणारा हा सण आणि त्यामध्ये वसु बारस या दिवसाने होणारी सुरुवात म्हणजे सर्वत्र आल्हाददायक वातावरण असते तसेच या मंगल दिनी सर्वजण विविध देवतांची, कुलदेवता, ग्रामदेवता या सर्वांची उपासना करतात.

वाचकांसाठी थोडेसे :

वसुबारस या दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्हाला या दिवशी कुठला मंगल अनुभव आला असेल किंवा तुमची वसु बारस (Vasu Baras) साजरी करण्याची वेगळी प्रथा असेल तर नक्की आम्हाला कळवा…धन्यवाद!

धनत्रयोदशी – संपूर्ण माहिती | Dhantrayodashi Information In Marathi |

Dhantrayodashi Information In Marathi

महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा एक सांस्कृतिक आणि प्रादेशिक महत्त्व ठेवतो. त्यामध्ये दिवाळी हा सण तर कृषी, कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषता स्पष्ट करतो. त्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी विविध कृत्ये वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जातात. त्यामधील या लेखात आपण धनत्रयोदशी (Dhantrayodashi) या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

धनत्रयोदशी संपूर्ण माहिती | धनत्रयोदशी म्हणजे काय?
Dhantrayodashi in Marathi | Dhanteras Information in Marathi |

 • महाराष्ट्रात दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस असतो वसुबारस! धनत्रयोदशी हा दिवस आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला असतो. या दिवसाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात तसेच या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व देखील मोठे आहे.
 • देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते.
 • धन, संपत्ती आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. यामध्ये उपजिविकेसाठी उपयोगी असलेल्या सर्व वस्तूंचे म्हणजेच आपले काम व त्यासाठी उपयोगी असलेल्या वस्तूंचे पूजन केले जाते. ज्याद्वारे आपण धनप्राप्ती करतो त्याचेही पूजन केले जाते.
 • इंद्रदेव आणि असुर यांच्यामध्ये समुद्र मंथन चालले असताना मंथनातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. त्यामुळे या दोघांचीही पूजा या धनत्रयोदशीला केली जाते.
 • धन्वंतरी हे वेदांमध्ये निष्णात होते तसेच मांत्रिक आणि तांत्रिक विद्या ते जाणत होते. अनेक उत्तमोत्तम औषधींचा लाभ त्यांच्यामुळे सर्व देवांना झाला. अमृतकुंभ रूपाने अनेक औषधांचा सार देवांना प्राप्त झाल्याने त्यांना देवांच वैद्यराज म्हटले जाऊ लागले.
 • व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने, त्यामधील साहित्य या सर्वांची पूजा करतात. तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे.

धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीच! Dhanteras In Marathi |

महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस! परंतु आजची स्थिती पाहता सर्व लोक गाईची उपासना करताना दिसत नाहीत. त्यामुळे धनत्रयोदशी हाच दिवस दिवाळीचा आहे असे सद्य दिनदर्शिकेमध्ये दर्शवले आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर नवीन पोशाख परिधान केला जातो. घराबाहेर पणत्या लावल्या जातात. दिवाळीसाठी केलेला गोड तिखट फराळ खाल्ला जातो.

लहान – मोठी मुले फटाके वाजवतात तर मुली घराबाहेर रांगोळी काढतात. दिवसभर सर्वांना शुभेच्छा संदेश दिल्यानंतर आणि आप्तेष्टांच्या घरी फराळ करून झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी सर्वजण एकत्र जमतात, फटाके फोडतात. आकाशकंदील आणि दिवेलागणी केली जाते. आजकाल तर मोबाईलमध्ये फोटो काढून स्टेटस ठेवूनच दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते.

वाचकांसाठी थोडेसे –

आज सर्वजण मोबाईल आणि इंटरनेट वापरतात, तुम्हाला धनत्रयोदशी बद्दल आणखी माहिती हवी असल्यास नक्की सर्च करा खालील प्रमाणे –

• Dhantrayodashi katha
• Dhantrayodashi Information In marathi
• What is Dhantrayodashi?
• Dhanteras Information
• Dhanteras puja
• Dhanwantari upasana
• Diwali Information in Marathi

तुम्हाला धनत्रयोदशी (Dhantrayodashi) हा लेख कसा वाटला ? आवडला असल्यास कमेंट करायला विसरू नका. तसेच दिवाळी सण आणि धनत्रयोदशीबद्दल आणखी माहिती असल्यास नक्की कळवा!

कोरोना व्हायरस – Corona Virus | कलम १४४ नक्की आहे तरी काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती देत अधिकृत कलम १४४ लागू होईल असे सांगितले. कोरोना गुणाकार पद्धतीने पसरतो आहे. त्याची झळ महाराष्ट्रात सर्वात जास्त बसलेली आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोना व्हायरसच्या संदर्भात आपण संवेदनशील महत्त्वाच्या टप्प्यात आहोत. प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्रातल्या नागरी भागामध्ये १४४ कलम लागू होईल. पाचपेक्षा अधिकजण एकत्र येऊ नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला यांच्यासह अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यासाठी गर्दी करू नका. बँक तसंच शेअर बाजारही सुरू राहील. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्के कर्मचारी असतील”.

“परदेशातून आलेल्यांनी घरीच राहावं. स्वत:च्या तसंच आप्तस्वकीयांची काळजी घ्या. होम क्वारंटाईन असलेल्यांनी घराबाहेर पडू नये. रविवारपासून परदेशातून येणारी विमानसेवा खंडित होईल. अन्य राज्यात जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या आहेत”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

एखाद्या परिसरातली शांतता भंग होऊ नये, यासाठी चारपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास मनाई केली जाते. त्यालाच जमावबंदी म्हणतात. जमावबंदी अंमलात आणण्यासाठी कलम १४४ कायदा लागू केला जातो ज्यांतर्गत काही नियम लोकांनी पाळायचे असतात नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. 

 महत्त्वपूर्ण मुद्दे –

• कलम १४४ हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrCP) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.
• परिसरात शांतता राहावी आणि तिचा भंग कोणाकडून केला जाऊ नये यासाठी कायद्या अंतर्गत काही नियम लागू केले जातात. जमाव एकत्र आल्यावर हिंसा होऊ नये. असा उद्देश यामागचा आहे.
• कलम १४४ ला जमावबंदी कायदा (संचारबंदी) म्हणजेच “कर्फ्यू” असे म्हणतात.
• जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी सूचना जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
• कलम १४४ लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावर बंदी असते.
• कलम १४४ लागू झालेल्या भागात सरकारी अधिकारी कोणत्याही व्यक्तीस कायद्याचे उल्लंघन केल्यास नोटीस देऊ शकतात. तरीही ऐकत नसल्यास पोलिस त्याला कलम १०७ किंवा कलम १५१ अंतर्गत अटक करू शकतात.
• कलम १४४ अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
• या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार ६ महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

कोरोना व्हायरस (Corona Virus) मध्ये कसा काय संबंध ?

कोरोना पसरण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे. हा जनसंपर्क रोखण्यासाठी कलम १४४ लागू केलेले आहे. ५ व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. 

तसेच हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, बाहेर जास्त न फिरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे अशी काळजी घेण्यास सांगितलेली आहे. 

PAN Card | सावधान ! ३१ मार्च नंतर १७ करोड पॅन कार्ड होतील रद्द ?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) देशातील १७ कोटी लोकांना मोठा इशारा दिला आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते रद्द केले जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

सीबीडीटीच्या मते, २७ जानेवारी २०२० पर्यंत ३०.७५ कोटी पॅन आधीच आधारशी जोडले गेले आहेत. तथापि, १७.५८ कोटी पॅन अद्याप १२-अंकी आधारशी जोडले गेलेले नाहीत.

वस्तुतः, १ जुलै, २०१७ पर्यंत प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ AA (२) नुसार, ज्या लोकांकडे पॅन आहे आणि आधार घेण्यास पात्र आहेत अशा लोकांना कर क्रमांकास आधार क्रमांकाची माहिती द्यावी लागेल.

पॅन आणि आधार जोडण्याची मुदत अनेक वेळा वाढवली गेली आहे आणि सध्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२० रोजी कालबाह्य होईल. तथापि, आधार आणि पॅन कार्ड लिंक कसे होऊ शकते ते जाणून घेऊया.

• पॅन-आधार जोडण्याची पद्धत –

 • सर्व प्रथम, आपण आयकर वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल.
 • येथे डाव्या बाजूला तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल.
 • यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्याच्यावर क्लिक करा (click here) असे लाल रंगात लिहिलेले असेल.
 • आपण आधीपासूनच आपला पॅन आणि आधार लिंक केला असेल तर त्यावर क्लिक करून त्याची स्थिती तपासली जाऊ शकते.
 • जर लिंक केले नसेल तर खालील बॉक्समध्ये क्लिक करा. पॅन, आधार क्रमांक, आपले नाव व दिलेला कॅप्चा एंटर करावा लागेल.
 • यानंतर लिंक आधारवर (link aadhar) क्लिक करा. याबरोबरच जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजा.
 • प्राप्तिकर विभागाच्या मते, ५६७६७८ किंवा ५६१६१ वर एसएमएस पाठवून आपण पॅन-आधार या लिंकचा दर्जा (status) समजून घेऊ शकता.
 • UIDPIN <१२ अंकी आधार क्रमांक> <१० अंकी पॅन नंबर> टाइप करून एसएमएस करावा लागेल.
 • यानंतर उत्तर (Reply) येईल ज्यामध्ये आपला आधार-पॅन जोडलेला आहे की नाही हे समजू शकेल.

Mahashivratri Information In Marathi | महाशिवरात्री – एक अद्भुत रात्र !

महाशिवरात्री कित्येक वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे, त्याची नोंद असणे अशक्य आहे. भारतात आणि आणि प्रामुख्याने हिंदू धर्मात भगवान शंकराचे महत्त्व अपार आहे. भारतीय कालगणनेनुसार आणि भौगोलिक रचनेनुसार असणारी ही रात्र अध्यात्मिक महत्त्व ठेवून आहे. या दिवशी वरवरचे कर्मकांड करून दिखावा करण्यापेक्षा त्यामागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

भारतात जे जे सण साजरे केले जातात त्यामागे एक नैसर्गिक, अध्यात्मिक, आणि भौगोलिकदृष्ट्या हेतू असतो त्यामुळे पृथ्वीवर एकच भूभाग असा आहे ज्यावर कित्येक वर्ष एकाच प्रकारची जीवनपद्धती अवलंबली गेली आहे. देवपूजा आणि भक्ती ही हिंदू संस्कृतीत महत्वाची मानली गेली आहे.

एकूण वर्षात बारा शिवरात्री येतात. त्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येणाऱ्या शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. या रात्रीचा भौगोलिक आणि अध्यात्मिक संबंध आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची जी स्थिती असते त्यामुळे या रात्री मनुष्यात ऊर्जेचा संचार होऊ शकतो. अध्यात्मिक उन्नती या रात्री होऊ शकते. त्यामुळे अनेक योगी, ऋषी हे तत्व जाणून आहेत. या रात्री प्राचीन काळापासून विविध अध्यात्मिक प्रयोग केले जातात. रात्रभर जागे राहावे लागते. आपल्यातील सकारात्मक ऊर्जा पूर्ण अस्तित्वात जागृत करून उत्सव साजरा करणे हे या रात्रीचे प्रतीक आहे.

सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी हि रात्र फलदायी ठरत असते. अध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी अध्यात्मिक उत्तेजना आणि प्रगती साधण्याची ही रात्र असते. महत्वकांक्षी तसेच संसारी व्यक्तींसाठी ही रात्र त्यांच्या उन्नतीसाठी सहाय्य करते. आहे त्यापेक्षा उदात्त आयुष्याचा अनुभव या रात्री होत असतो. ही रात्र लोक भगवान शंकराच्या लग्नाचा वाढदिवस तर काही लोक शंकराने त्यांच्या शत्रूंवर मात केली म्हणून साजरी करतात. योगी आणि ऋषी ही रात्र भगवान शंकर कैलास पर्वताशी एकरूप झाले म्हणजे स्थिर झाले अशा मान्यतेने साजरी करतात.

कित्येक वर्ष ध्यान केल्यानंतर या रात्री भगवान शंकर अत्यंत स्थिर झाले. अशा स्थिर स्थितीचा अनुभव या रात्री योगी लोकांना होतच असो अशी समजूत आहे. या रात्रीला स्थैर्याची रात्र म्हणून देखील ओळखले जाते. कित्येक समजुती काळानुसार बदलत जातील परंतु जे वैश्विक सत्य आहे ते कधी बदलणार नाही. आज आपल्या संस्कृतीत वैज्ञानिक दृष्टिकोन देखील विकसित झाल्याने या गोष्टी आपण मान्य करू शकतो की आकाशगंगा, विविध बल, आणि ऊर्जा जे पृथ्वीला सांभाळून आहेत त्या ऊर्जा मानवी ऊर्जेला गतिमान करण्यासाठी सहाय्य करत असतात. त्यामुळे असे काही दिवस आणि सण आपल्या संस्कृतीत साजरे केले जातात, त्यांचे अध्यात्मिक महत्त्व आणि स्थान वेगळेच आहे.

भगवान शंकराला आवडणाऱ्या वस्तू, आणि त्यांचे शारीरिक अस्तित्व समजून घेऊन त्यांची मनोभावे पूजा या पूर्ण दिवसभर आणि रात्री करत असतो. कोणतीही पदार्थवाचक ऊर्जा आपल्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा निर्माण करत असते परंतु या दिवशी उपवास करावा आणि उपजत ज्या सकारात्मक ऊर्जा शरीरात वास करत असतात त्यांना जागृत करावे. उत्सव साजरा करून अस्तित्वात हर्षोल्लास जागा करावा.

Octopus Information In Marathi | अष्टपाद म्हणजेच ऑक्टोपसबद्दल संपूर्ण माहिती!

मृदुकायकवची या वंशाचा “ऑक्टोपस” हा एक जलचर प्राणी आहे. ऑक्टोपसच्या जवळजवळ ५० प्रजाती आहेत. साधारणतः खोल पाण्यात हा प्राणी आढळतो. ऑक्टोपस लहानात लहान २.५ सेमी तर सर्वात जास्त ९.५ ते १० मी. एवढे उंच असतात. मराठीत याला अष्टपाद म्हणून ओळखतात. आठ पायांच्या या प्राण्याला तीन ह्रदये असतात आणि शरीरभर निळे रक्त असते. हे रक्त तीन ह्रदयांच्या मार्फत संपूर्ण शरीरभर फिरवले जाते.

ऑक्टोपस हा प्राणी स्वतःच्या आठ भुजांनी छोटे मासे, खेकडे, आणि विविध मांसल समुद्री प्राणी यांची शिकार करतो. कधीकधी स्वतःच्या बचावासाठी किंवा शिकारीसाठी हा प्राणी विषारी द्रव्य बाहेर सोडतो. शिकार करताना किंवा शिकार होताना या द्रव्याचा खूप उपयोग होतो. पुढच्या प्राण्याला नियंत्रणात ठेवण्याचे काम हे द्रव्य करते. अडचणीच्या ठिकाणी देखील असलेली शिकार करण्यासाठी आठ भुजांचा विकास झाला असावा अशी निष्कर्ष आहे. या प्राण्याचा जबडा पक्ष्यांच्या चोचीप्रमाणे असतो. भक्ष्य त्याच्या आठ भुजांमार्फत चोचीत पकडले जाते नंतर त्या भक्ष्याचा तो खात्मा करतो.

ऑक्टोपस हा प्राणी पळ काढण्यात खूप निपुण आहे. मोठे मासे जसे शार्क, डॉल्फिन आणि इल या ऑक्टोपसची शिकार करतात. अशावेळी वाचण्यासाठी तो एक विषारी काळे द्रव्य पिचकारी प्रमाणे बाहेर सोडतो ज्यामुळे शिकारी माश्याला काही दिसत नाही आणि ऑक्टोपस पळ काढण्यात यशस्वी होतो. अनेक वेळा त्याचे पाय म्हणजेच त्याच्या भुजा जर संकटसमयी तुटल्या तरी त्याचे शरीर त्या दोन भुजा पुन्हा निर्माण करते. हवेत जेट विमान जसे उडते त्याच पद्धतीने पाण्यात ऑक्टोपस पोहत असते.

ऑक्टोपस मादा दोन लाखाच्या वर अंडी देते. ज्यांचे संरक्षण करून त्यातून पिल्ले बाहेर काढणे असे महत्वाचे काम करीत असताना ती काहीच खात नाही. कदाचित कधीकधी पिल्ले बाहेर आल्यानंतर तिचा मृत्यूदेखील ओढवतो. ऑक्टोपस एकटे राहायला पसंत करतात. दिसायला थोडा विचित्र असणारा हा प्राणी निसर्गाची किमयाच आहे.

षटतिला एकादशी व्रत ! सर्व संकटे होतील दूर

षटतिला एकादशीचे महत्त्व अपरंपार आहे. खूप प्रयत्न करून देखील सुखाची, मोक्षाची प्राप्त होत नसेल तर या व्रताची सुरुवात करा. एकदा दालभ्य ऋषीने पुलस्त्य ऋषींना विचारले की मानवांनी इतकी पापे करुन देखील त्यांना नरक का मिळत नाही. यावर दिलेले उत्तर म्हणजे षटतिला एकादशी व्रत !नावावरूनच कळेल की सहा प्रकारे तिळाचा उपयोग करून हे व्रत पार पाडायचे असते. धार्मिकतेचा पडदा असलेले हे व्रत वैज्ञानिक दृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्टया देखील तेवढेच सत्य आहे. 

• व्रत पूर्वार्ध कथा व नियम –

दालभ्य ऋषी पुढे म्हणतात. लोकांची सर्व पापे कशी काय नष्ट होतात? त्यासाठी ते कोणते दानधर्म पुण्यकर्म करतात यावर कृपया मार्गदर्शन करावे. यावर पुलस्त्य ऋषी असे म्हणतात. तुम्ही खूपच गंभीर प्रश्न विचारला आहे तरीही अनादी देवकाना ज्याचे रहस्य माहीत नाही ते मी आज तुम्हाला सांगतो. माघ महिना सुरू होताच व्यक्तीने दररोज स्नान करुन शुद्ध रहावे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर आणि द्वेष टाळण्याचा प्रयत्न करावा. ईश्वराचे स्मरण करणे. पुण्य नक्षत्रात शेण, कापूस, तीळ घेऊन एकत्र हवन करावे. जर तो दिवस मूळ नक्षत्र आणि एकादशी तारीख असेल तर चांगले राहील. नियमित आंघोळ केल्यानंतर भगवान शिवची पूजा करावी आणि एकादशी व्रत ठेवावा. रात्री जागरण करणे आवश्यक आहे.

दुसर्‍या दिवशी धूप व दीप, नैवेद्य इत्यादी तयार करून देवाची पूजा करुन खिचडी अर्पित करावी. त्यानंतर पेठा, नारळ, सीताफळ किंवा सुपारी अर्पण केल्यावर स्वतःच्या चांगुलपणाचा पुरस्कार करावा तसेच आपल्याला जे मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद द्यावे व पुढील वाक्य बोलावे. 

“अरे माझ्या चांगल्या गुणानो, भगवान शंकरा या जगातील महासागरात अडकलेल्यांचा बचाव करण्यासाठी तुम्ही अत्याचार झालेल्यांना आश्रय देणार आहात. अहो पुंडरीक्षा! हे विश्वभवना! अहो सुब्रह्मण्य! हे पूर्वज! अहो जागो! हे क्षुल्लक अर्घ्य तुम्ही लक्ष्मीसमवेत घ्यावे.” त्यानंतर ब्राह्मणाला पाण्याने भरलेले भांडे दान करा. तीळ – अंघोळ आणि तीळ – जेवण दोन्ही उत्कृष्ट आहेत. अशाप्रकारे, अनेक तीळ दान करणाऱ्या व्यक्ती स्वर्गात हजार वर्ष जगतात.

१. तीळ आंघोळ

२. तीळ उकळणे

३. तीळ हवन

४. तीळ तर्पण

५. तीळ जेवण

६. तीळ दान 

अशा ६ प्रकारच्या तीळ वापरामुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. हे व्रत ठेवून अनेक प्रकारचे पाप नष्ट होते. हे बोलल्यानंतर पुलस्त्य ऋषी म्हणाले की आता मी तुम्हाला या एकादशीची कहाणी सांगत आहे.

• व्रत कथा – 

एकदा नारदजींनी भगवान श्री विष्णूला हाच प्रश्न विचारला आणि देवाने षटतिला एकादशीचे नारदजींना मोठे महत्त्व सांगितले – म्हणून मी तुम्हाला सांगतो. भगवंताने नारदांना सांगितले की अरे नारद! मी तुम्हाला खरे सांगतो. काळजीपूर्वक ऐका !

प्राचीन काळी, ब्राह्मण मृत्यूलोकात रहायचा. तेथे एकदा एक ब्राम्हणी नेहमी उपवास करायची. एकदा ती एक महिना उपवास करत राहिली. यामुळे त्याचे शरीर खूप अशक्त झाले. ती अत्यंत हुशार असूनही, तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नाहीत. याद्वारे मला वाटले की ब्राह्मणीने उपवास करून आपले शरीर शुद्ध केले आहे, आता हे विष्णुलोक मिळेल परंतु तीने कधीही अन्नदान केले नाही.भगवान विष्णु पुढे म्हणाले,असा विचार करून मी ब्राह्मणांकडे भिकारी वेशात गेलो आणि भीक मागितली. ती म्हणाली – महाराज, तू का आलास? मी म्हणालो – मला भीक पाहिजे. आणि त्याने माझ्या पदरात भीक म्हणून मातीची भांडी ठेवली. मी ते भांडे घेऊन स्वर्गात परतलो. थोड्या वेळाने ब्राम्हणी सुद्धा आपल्या देहाचा त्याग करुन स्वर्गात आली. त्या ब्राह्मणीला चिकणमाती दान केल्याने स्वर्गात एक सुंदर राजवाडा सापडला, परंतु ते घर, सर्व गोष्टी तिला शून्य असल्याचे आढळले.

ती ब्राम्हणी घाबरुन माझ्याकडे आली आणि म्हणाली की मी बर्‍याच उपवासात तुझी पूजा केली, परंतु तरीही माझे घर सर्व गोष्टींपेक्षा कमी आहे. यामागील कारण काय आहे? यावर मी म्हणालो- आधी तू तुझ्या घरी जा. देवशास्त्री आपल्याला भेटायला येतील. प्रथम त्यांच्याकडून षटतिला एकादशीचे पुण्य आणि पद्धत ऐक, मग दार उघड. माझे बोलणे ऐकून ती तिच्या घरी गेली. जेव्हा देवशास्त्र्यांनी येऊन दार उघडण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणी म्हणाली – तुम्ही मला भेटायला आला असाल तर षटतिला एकादशीचे मोठेपण सांगा.

मोठेपण ऐकल्यानंतर ब्राह्मणी दार उघडते. काही काळातच तिच्या घराची भरभराट होते.  त्यांच्या विधानानुसार ब्राम्हणी प्रत्येक वेळी माघ महिन्यात उपोषण करायला लागली. या प्रभावामुळे ती सुंदर बनली आणि तिचे घर सर्व सामग्रीने परिपूर्ण झाले. म्हणून मानवांनी मूर्खपणाचा त्याग करावा आणि षटतिला एकादशीला उपवास करावा आणि लोभाऐवजी तीळ दान करावे. हे व्रत गरीबी आणि अनेक प्रकारचे दु: ख दूर करून मोक्षप्राप्ती करून देते.


सत्य आणि तथ्य – पूर्वीच्या कथनानुसार कथेवर ध्यान केंद्रित न करता व फळाची अपेक्षा न करता मनोभावे हे व्रत करावे. या दिवसात आवश्यक असलेली ऊर्जा आपल्याला तीळ प्राप्त करून देते. तीळाचा योग्य प्रकारे वापर करून मनोभावे पूजा करावी. 

Shiv Tandav Stotram । शिव तांडव स्तोत्र !

शिव तांडव स्तोत्र
(संस्कृत : शिवताण्डवस्तोत्रम्)
शिवभक्त लंकाधिपति रावण हा अनेक गुणांनी समृद्ध होता. त्याची शिवभक्ती सर्वांना माहीत आहेच. असा हा महान शिवभक्त जेव्हा एखादी रचना करतो तेव्हा त्यातून त्याची भक्ती प्रकट होते. शिव तांडव स्त्रोत अनेक उर्जांनी भरलेला आहे. याची अनेक गीते तयार करण्यात आलेली आहेत. तरी आम्ही याचा संपूर्ण अर्थ मराठीमध्ये सांगणार आहोत.

जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्‌।

डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव: शिवम्‌ ॥१॥

त्यांच्या केसातून वाहणाऱ्या जला मुळे त्यांचा कंठ पवित्र आहे.
आणि त्यांच्या गळ्यात जो साप आहे तो हारासारखा लटकलेला आहे.
आणि डमरू मधून डमट् डमट् डमट् चा आवाज निघत आहे.
भगवान शिव शुभ तांडव नृत्य करत आहेत , तो आपल्या सर्वांना संपन्नता प्रदान करो.

जटाकटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि।

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥२॥

माझी शंकरामध्ये खूप रुची आहे,
ज्यांचे डोके अलौकिक गंगा नदीच्या वाहत्या लाटांच्या धारांनी सुशोभित आहे,
ज्या त्यांच्या केसांतल्या जटांच्या आर्त खोलीत उसळत आहेत
ज्यांच्या मस्तकाच्या भागावर चमकदार अग्नी प्रज्वलित आहे
आणि जे आपल्या डोक्यावर अर्ध्या चंद्राचे आभूषण परिधान करून आहेत.

धराधरेंद्रनंदिनी विलासबन्धुबन्धुर स्फुरद्दिगंतसंतति प्रमोद मानमानसे।

कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचिद्विगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि ॥३॥

माझ्या मनाने भगवान शंकरा मध्ये स्वतःचा आनंद शोधावा
अद्भुत ब्रह्मांडाचे सारे प्राणी ज्यांच्या मनात स्थित आहेत
ज्यांची अर्धांगिनी पर्वत राजाची मुलगी पार्वती आहे
जे आपल्या करुणा दृष्टीने असाधारण संकटांना नियंत्रित करतात, जे सर्वत्र व्याप्त आहेत
जे दिव्य लोकांना ( तिन्ही लोक – पाताळ, भू, आणि पर ) स्वतःच्या वस्त्राप्रमाणे धारण करतात.

जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्व धूमुखे।

मदांधसिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनोविनोदद्भुतं बिंभर्तुभूत भर्तरि ॥४॥

मला भगवान शंकरामध्ये अनोखे सुख मिळो, जे साऱ्या जीवनाचे रक्षक आहेत,
त्यांच्या रेंगाळत्या सापाचा फण लाल – भुरा आहे आणि त्याचा मणी चमकत आहे.
तो सर्व दिशांच्या देवी आहेत त्यांच्या सुंदर चेहऱ्यावर वेगवेगळे रंग उधळत आहे,
जो विशाल मदमस्त हत्तीच्या कातड्याने बनलेल्या लखलखत्या दुषाल्याने झाकलेला आहे.

सहस्रलोचन प्रभृत्यशेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणी विधूसरां घ्रिपीठभूः।

भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः ॥५॥

भगवान शिव आम्हाला संपन्नता देवो,ज्यांचे मुकुट चंद्र आहे,
ज्यांचे केस लाल नागाच्या हाराने बांधलेले आहेत,
ज्यांचे पायदान फुलांच्या वाहत्या धुळीने गडद रंगाचे झाले आहे,
जी इंद्र, विष्णू आणि अन्य देवतांच्या मस्तकातून खाली पडते.

ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा निपीतपंच सायकंनम न्निलिंपनायकम्‌।

सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तुनः ॥६॥

शंकराच्या केसांच्या गुंतागुंत झालेल्या जटांनी आम्ही सिद्ध तेची दौलत प्राप्त करो,
ज्यांनी काम देवतेला आपल्या मस्तकावर प्रदिप्त अग्नीच्या ठिणगीने नष्ट केले होते.
जे सर्व देवलोकांच्या स्वामींद्वारे आदरणीय आहेत, जे अर्धाचंद्रा ने सुशोभित आहेत.

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल द्धनंजया धरीकृतप्रचंड पंचसायके।

धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्र कप्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचनेरतिर्मम ॥७॥

माझी रुची भगवान शंकरा मध्ये आहे ज्यांना तीन नेत्र आहेत,
ज्यांनी शक्तिशाली काम देवाला अग्नीला अर्पित केले,
त्यांच्या भीषण मस्तकाची जागा डगद् डगद् च्या ध्वणीने जळत आहे,तेच फक्त एक मात्र कलाकार आहेत जे पर्वतराजाची पुत्री पार्वतीच्या स्तनाच्या
टोकावर सजावटी रेषा ओढण्यात निपुण आहेत. ( येथे पार्वती प्रकृती आहे आणि कलाकारी सृजन आहे. )

नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर त्कुहुनिशीथनीतमः प्रबद्धबद्धकन्धरः।

निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुरः कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥८॥

भगवान शंकर आम्हाला संपन्नता देवो, साऱ्या संसाराचा भार तेच उचलतात.
ज्यांची शोभा चंद्र आहे, ज्यांच्याकडे अलौकिक गंगा नदी आहे,
ज्यांची मान ढगांच्या थरांनी झाकलेल्या अमावस्येच्या अर्धरात्रीप्रमाणे काळी आहे.

प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम्‌।

स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥९॥

मी भगवान शंकराची प्रार्थना करतो, ज्यांचे कंठ मंदिराच्या लकाकीने बांधले गेले आहे. पूर्ण उमललेल्या निळ्या कमळाच्या मोठेपणाने लटकलेले,
जे पूर्ण ब्रह्मांडाच्या काळीमेप्रमाणे दिसते, ज्यांनी कामदेवाला मारले आहे ज्यांनी त्रिपुराचा अंत केला,
ज्यांनी सांसारिक जीवनाच्या बंधनांना नष्ट केले, ज्यांनी बळीचा अंत केला,
ज्यांनी अंधक दैत्याचा विनाश केला जे हत्तींना मारणारे आहेत, ज्यांनी मृत्यूची देवता यमाला पराभूत केले आहे.

अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्‌।

स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥१०॥

मी भगवान शंकराची प्रार्थना करतो ज्यांच्या चारी बाजूस मधमाशा उडत राहतात कारण शुभ कदंबच्या फुलांच्या सुंदर गुच्छाचा येणारा मधाप्रमाणे सुगंध येत असतो ज्यांनी कामदेवाला मारले आहे ज्याने त्रिपुराचा अंत केला, ज्यांनी संसारिक जीवनाच्या बंधनांना नष्ट केले आणि ज्यांनी बळीचा अंत केला,
ज्यांनी अंधक दैत्याचा विनाश केला आणि जे हत्तींचा विनाश करणारे आहेत, आणि ज्यांनी मृत्यू देवता यमाला पराजित केले.

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुरद्ध गद्धगद्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट्।

धिमिद्धिमिद्धि मिध्वनन्मृदंग तुंगमंगलध्वनिक्रमप्रवर्तित: प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥११॥

शिव, ज्यांचे तांडव नृत्य नगाड्याच्या तेज ढिमिड ढिमिड आवाजाच्या शृंखलेसोबत लयीत आहे,
ज्याच्या महान मस्तकावर अग्नी आहे, ती अग्नी नागाच्या श्वासाने गरिमामय आकाशात गोल गोल फुलत आहे.

दृषद्विचित्रतल्पयो र्भुजंगमौक्तिकमस्र जोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः।

तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥१२॥

जे सम्राट आणि लोकांच्या प्रति समभाव दृष्टी ठेवतात, गवताच्या पातिप्रती, कमळाच्या प्रति, मित्र आणि शत्रूंच्या प्रति,
सर्वाधिक मूल्यवान रत्नांच्या प्रति आणि धुळीच्या ढीगा प्रति,
साप आणि हारा प्रति आणि विश्वातील विविध रूपांप्रति समभाव दृष्टी ठेवतात,
मी अशा शाश्वत शुभ देवता भगवान शंकराची पूजा कधी करू शकेन.

कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌ विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌।

विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌ ॥१३॥

अलौकिक नदी गंगेच्या शेजारी गुहेत राहून,
स्वतःच्या हातांना प्रत्येक वेळी जोडून स्वतःच्या डोक्यावर ठेवून,
स्वतःच्या दूषित विचारांना धुवून, दूर सारून, शिवमंत्र बोलत बोलत,
महान मस्तक आणि जिवंत नेत्रांचे भगवान शंकराला समर्पित, मी कधी प्रसन्न होऊ शकतो.

निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः।

तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥१४॥

देवतांच्या डोक्यात फुलांचे सौंदर्य, सुंदर परागकणासह, महाशिवाच्या भागांचे सौंदर्य, परम सौंदर्याचे निवासस्थान,
नेहमीच आपल्या मनाचे आनंद संतोषाने वाढवते.

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना।

विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌॥१५॥

प्रचंड बरवानल या पापांच्या भक्तीमध्ये, शिव स्वरुपाची स्त्री अणिमादिक अष्ट महासिद्धी आणि देवकन्या यांच्याशी खेळकर डोळ्यांनी,
मंगळध्वनीमध्ये गायलेल्या सर्व मंत्रांनी, ऐहिक दु:खांचा नाश करून विजय प्राप्त केला आहे, जे सर्वोत्तम शिव मंत्राद्वारे पूरक आहे.

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं पठन्स्मरन्‌ ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्‌।

हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथागतिं विमोहनं हि देहनां सुशंकरस्य चिंतनम् ॥१६॥

या उत्कृष्ट शिव तांडव स्त्रोताचे वाचन करून किंवा ऐकून जीव शुद्ध होतो,
परात्पर गुरु शिवात विराजमान होतो आणि सर्व प्रकारच्या भ्रमांपासून मुक्त होतो.

पूजावसानसमये दशवक्रत्रगीतं यः शम्भूपूजनपरम् पठति प्रदोषे।

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥१७॥

सकाळच्या शिवपूजनाच्या शेवटी लक्ष्मी स्थिर राहते आणि या रावणयुक्त शिव तांडव
स्तोत्रांच्या गाण्याने भक्त सदैव रथ, अंगण, घोडा इत्यादी वस्तूंनी परिपूर्ण असतो.

।। इति रावणकृतम शिव तांडव स्तोत्रम् संपूर्णम् ।।

Shevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड.

शेवगा लागवड महाराष्ट्रात आता रुजू लागली आहे. व्यापारी दृष्टीने शेवग्याची लागवड मागील काही वर्षात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. अनेक दृष्टिकोन तपासल्यावर केली जाणारी ही लागवड कशी फायदेशीर आहे आणि शेवगा झाडाबद्दल सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या पिकाची लागवड दक्षिण भारतात प्रामुख्याने केली जाते.

शेवगा जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर त्याचे दर सुद्धा तरकारी भाजी प्रमाणे स्थिर असतात किंवा वाढतात. शेवगा हा स्थिर उत्पन्न देणारा एक मार्ग बनला आहे. आता तंत्रज्ञान आणि दळणवळण वाढल्याने तुम्ही तुमचा शेवगा मोठ्या बाजारपेठेत देखील विकू शकता.

सुधारित शेवग्याच्या जाती :

ओडिसी –
शेंगा जाड असतात. या शेंगांना बाजारभाव देखील चांगला आहे. शेंगांचे उत्पन्न तसे कमी आहे परंतु वर्षातून दोनदा बहर येतो. वर्षाला एका झाडापासून ३० किलो पर्यंत शेंगा मिळतात.

पी के एम-१ (कोईमतूर-१) आणि
पी के एम-२ (कोईमतूर-२) –
या जातीच्या शेंगा पौष्टिक असतात आणि काढणीचा काळ देखील लवकर असतो. या शेंगा तामिळनाडू कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित केल्या जातात.

भाग्या (के. डी. एम.- ०१) –
या शेंगांची चव उत्तम असून २५० शेंगा प्रती झाड एका वर्षात मिळतात.कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठातर्फे ही जात प्रसारित केली जाते.

कोकण रुचिरा – उत्पादन भरपूर मिळते. एका झाडापासून एका वर्षात ४० किलोपर्यंत उत्पन्न मिळते. या शेंगा कोकण कृषी विद्यापीठा तर्फे प्रसारित केल्या जातात.

• शेवगा लागवड प्रकल्प –

हा प्रकल्प तुम्हाला योग्य उत्पन्न मिळवून देईलच शिवाय शेवग्याची पाने, फुले सतत गळत असल्याने जमिनीचा कस आणि पोत टिकून रहण्यासाठी राहते. जास्त रासायनिक खते, कीटकनाशके मारायची गरज नसते. खालील मुद्दे तुम्हाला लागवडी दरम्यान उपयोगी पडतील.

१. हवामान –

तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसले पाहिजे. नाहीतर फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. या झाडास लागणाऱ्या फुलांची संख्या जास्त असते. परंतु गळण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला याची लागवड समशीतोष्ण किंवा दमट हवामानात करावी लागेल. तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच अतिथंड प्रदेशात देखील हे झाड लावू नये.

• जमीन व लागवडीचा काळ –

जमीन निवडताना जास्त काळवट जमीन निवडू नये. पाण्याचा योग्य निचरा होईल अशा प्रकारची जमीन निवडावी. जून – जुलै महिन्यात कोरडवाहू जमीन किंवा कमी पावसाच्या क्षेत्रात शेवग्याची लागवड उत्तम ठरते.

अति पावसाच्या क्षेत्रात तुम्ही ही लागवड पुढे ढकलू शकता. साधारणतः ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये लागवड करून घ्यावी. उत्पन्नाच्या दृष्टीने लागवड करावयाची
असल्यास २ फूट खोल खड्डे खणावे. त्यामध्ये शेणखत आणि अन्य रासायनिक खत ( कृषी माल विक्रेता मार्गदर्शनानुसार ) टाकावे. दोन झाडांतील अंतर २.५ × २.५ मी. ठेवावे. जमिनीचा पोत चांगला असल्यास हे अंतर वाढवावे. ३.० × ३.० मी. ठेवावे.

• काढणीचा काळ

शेवगा जातीनुसार जास्तीत जास्त ५ – ६ महिन्यांत झाडाला शेंगा येतात. त्यानंतर तोडणी ३ ते ४ महिने असते. शेंगा मांसल, हिरव्यागार आणि मध्यम अवस्थेत तोडव्या. त्यांना कोवळा शेवगा म्हटले जाते. याला बाजारात मागणी देखील असते. शेंगा टिकवण्यासाठी ओल्या कापडात, पोत्यात गुंडाळून ठेवाव्या. एका वर्षात एका झाडापासून साधारणतः ३० किलोपर्यंत शेंगा मिळतात. जमीन पोषक असेल तर जास्त प्रमाणात पण शेंगा मिळू शकतात.

• घ्यावयाची काळजी – शेवगा बियाणे मिळाल्यानंतर १ महिन्याच्या आत लागवड झाली पाहिजे. प्रथमतः बियाणे छोट्या पिशवीत लावावी. रोपे छोटी असतानाच शेतात लावावी.