Kothimbir Vadi Recipe in Marathi | स्वादिष्ट कोथिंबीर वडी रेसिपी !

वडी कोणाला आवडत नाही? एकदा तयार केलेली वडी दोन दिवस देखील आपण खाऊ शकतो. वडीचा स्वादच काही निराळा असतो. ज्या पद्धतीने वडी बनवली गेली पाहिजे तशी एकदम सोप्पी पद्धत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. कोथिंबीर वडी बनवताना थोडी काळजी घ्यावी लागेल. चला तर मग सुरू करूया बनवायला – कोथिंबीर वडी!

Kothimbir Vadi Recipe Ingredients  साहित्य:

• कोथिंबीर – ३ जुड्या (बारीक चिरलेली)
• चण्याचे पीठ – एक वाटी
• हिरव्या मिरच्या – ५-६
• तांदूळ पीठ – १ चमचा
• हळद – १ चमचा 
• लसूण – ६-७ पाकळ्या
• आले – छोटा तुकडा किसून
• जिरे – १ चमचा
• तेल – २ चमचे
• मीठ – स्वादानुसार

How to make kothimbir Vadi कृती:

१ – अगोदर चणा पिठात पाणी आणि तांदूळ पिठ घालून घट्ट भिजवावे. गुठळ्या राहता कामा नये.
२ – लसूण, आले यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सरमध्ये मिरच्या बारीक करून घ्याव्या. सर्व लागणारे पदार्थ एकत्र ठेवावे.
३ – आता कढईत १ चमचा तेल गरम करावे. आले – लसूण पेस्ट, बारीक केलेल्या मिरच्या, हळद आणि जिरे या सर्वांची फोडणी द्यावी. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकावी. 
४ – भिजवलेले पीठ घालावे आणि सतत हलवत राहावे. चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण अशा प्रकारे ढवळावे की गुठळ्या होता कामा नये. गॅस मंद आचेवर ठेवावा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळावे. एकदम घट्ट झाले की त्यावर झाकण ठेऊन वाफ काढून घ्यावी.
५ – मिश्रण वाफलायला थोडा वेळ लागतो. प्रत्येक पाच मिनिटानंतर मिश्रण वडी बनवण्यासारखे तयार झाले आहे का ते पाहावे. एका परातीला तेल लावून ठेवावे. सर्व मिश्रण त्या परातीत थापून घ्यावे.
६ – मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या हव्या तशा वड्या पाडाव्यात. आता तयार झाल्या कोरड्या वड्या..
७ – त्या वड्या तळण्यासाठी एका कढईत थोडे तेल टाका. वरचेवर तळून घ्या. झाल्या तयार लुसलुशीत आणि खमंग वड्या…
८ – वड्या जास्त वेळ टिकवून ठेवायच्या असतील तर जास्त तेलात चांगल्या तळून घ्या.

Leave a Comment