मकरसंक्रांत सण मराठी माहिती! Makarsankrant Information In Marathi ।

Makarsankrant Information In Marathi.

प्रस्तुत लेखात मकरसंक्रांत सण मराठी माहिती (Makarsankrant Information In Marathi) दिलेली आहे. मकर संक्रांत दिवस, त्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व या लेखात सांगण्यात आलेले आहे.

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व ठेवणारा हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जानेवारी महिन्यात येतो.

भारतातील पौष महिन्यात येणारा हा सण एक शेतीसंबंधित सण आहे. या सणाचे सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. या दिवसांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात.

हरभरा, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ असे सर्व पदार्थ देवाला अर्पण करतात. हिंदू पंचांगाप्रमाणे या सणाचा महिना पौष आहे.

मकरसंक्रांत सण । Makarsankrant Marathi Mahiti

• नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व – Geographical Importance of Makar Sankrant ।

डिसेंबर महिन्याच्या शेवटी सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षात, काही दिवसात सूर्य मकर राशीत संक्रमण करत असतो.

डिसेंबर २१, २२ तारखेनंतर सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, म्हणजे सूर्याचे उत्तरायण २१, २२ तारखेपासून सुरू झालेले असते.

उत्तरायण म्हणजे त्या तारखेपासून सूर्य उगवण्याची दिशा थोडी-थोडी उत्तरेकडे सरकलेली आपल्याला दिसते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य पूर्णपणे मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस हिंदू धर्मामध्ये एक पवित्र दिवस मानला गेला आहे.

• ऐतिहासिक संदर्भ – Makar Sankrant History


महाभारतात पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर पडले असताना उत्तरायणाची वाट बघत होते. त्यांना इच्छामरण हे वरदान प्राप्त असल्याने त्यांनी आपल्या मरण्यासाठी उत्तरायणाचा काळ निवडला होता. प्राचीन काळापासून उत्तरायण हा काळ दक्षिणायनापेक्षा शुभ समजला गेला आहे.

संक्रांत हा शब्द म्हणजे एक देवता मानली गेली आहे. ही देवता येताना प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. तिचे वाहन कधी हत्ती, कधी गाढव, तर कधी डुक्कर असते अशी समजूत आहे.

• भोगी । Bhogi Information ।

संक्रांतीअगोदरचा दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. या हवामानात  उपलब्ध असणाऱ्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तीळ यांची एकत्र अशी मिश्र भाजी बनवली जाते.

तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात. महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे हे तीन दिवस आहेत.

संक्रांतीच्या दिवशी सर्व कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व शेजारी-पाजारी सर्वांना तिळगुळ वाटले जातात. “तिळगुळ घ्या गोड बोला” असे बोलले जाते. तिळगुळ वाटण्यातून सर्वांप्रती असणारा स्नेहभाव व प्रेमभाव दर्शविला जातो.

स्त्रियांसाठी या दिवसापासून हळदी – कुंकू लावण्याची सुरुवात होते. हळदी कुंकू लावण्याचा शेवट “रथसप्तमी” या दिवशी होतो संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांसाठी काळी साडी नेसण्याची प्रथा आहे.

• मकर संक्रांतीचे आरोग्य महत्त्व । Health Importance Of Makar Sankranti ।

संक्रांतीसाठी तीळ हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. हा काळ थंडीचा असल्याने व सूर्याची किरणे कमी तीव्रतेचे असल्याने शरीरात उष्णतेची गरज भासते.

ही उष्णता नैसर्गिकरित्या उष्णता असणाऱ्या पदार्थातून मिळवली जाते, म्हणून या दिवशी बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, पावटे गाजर व विविध शेंगभाज्या अशा सर्व शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.

तीळात खूप स्निग्धता असल्याने त्याचा वापर तिळगुळ बनवण्यात करतात. स्नेहाची गोडी वाढावी म्हणून तिळगुळ बनवले जातात. येथे स्नेह म्हणजे तीळ असे अभिप्रेत आहे, तर गूळ हा गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे.


• सांस्कृतिक प्रथा । Makar Sankrant Cultural Events ।


नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम मकरसंक्रांतीला करण्याची प्रथा आहे. या दिवशी वधूला काळी साडी भेट दिली जाते.

हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे कौतुक केले जाते. काही ठिकाणी जावयाला भेटवस्तू देखील दिली जाते. लहान मुलांना देखील मकर संक्रांति दिवशी काळे कपडे घालतात. हे काळे कपडे शुभ मानले गेले आहे.

विविध खाद्यपदार्थांनी म्हणजे मुलांना आवडतील अशा खाद्यपदार्थांनी त्यांची बोरन्हाण केले जाते. आत्ताच्या काळात बर्फी, चॉकलेट या पदार्थांनी बोरन्हान केली जाते. याला लूट असेही म्हणतात. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हान केली जाते.

मकरसंक्रांत सण मराठी माहिती (Makarsankranti Information in Marathi) हा लेख कसा वाटला याबद्दल नक्की comment करा.

हे सुद्धा वाचा- 151+ Famous Marathi Quotes | मराठी सुविचार संग्रह

Latest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे.

Latest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे.

मराठी संस्कृती खूप सारे ऋणानुबंध जपून आहे. लग्न असो किंवा कुठलाही सामाजिक कार्यक्रम, स्त्रीला आणि पुरुषाला नाव/मराठी उखाणे (Marathi Ukhane) घ्यायला लावणे हे आपल्या संस्कृतीचे द्योतक आहे. लग्नात घेतला जाणारा उखाणा तर कायम लक्षात राहतो तोच उखाणा मग पुन्हा आयुष्यभर घेतला जातो. उखाणा घ्या किंवा नाव घ्या या स्वरूपात असणारा हट्ट दाम्पत्य पूर्ण करतेच. खालील सर्व उखाणे नवीनच आहेत. तुम्हीही त्यातला एखादा पाठ करू शकता. 

लग्नातले मराठी उखाणे – वधूसाठी

१. लग्नाचे दोन क्षण होत आहेत पूर्ण…..रावांचे नाव घेते जीवन झाले आता संपूर्ण.

२. असते जणू कर्तव्य नातेवाईकांचा आदर करणे…रावांसोबत एक नवा प्रवास आता सुखकर करणे.

३. माहेर आणि सासर दोन्ही घरे असतील मोठ्या मानाची आणि मनाची…..रावांसोबत माझे लग्न म्हणजे गोष्ट आहे सन्मानाची.

४. लग्नातील अक्षता असतात सर्वांचे आशीर्वाद…राव आणि माझी जोडी आहेच निर्विवाद.

५. फुलांचे सडे, पक्ष्यांचे थवे, निखळ हसणे.. माझा संसार, यांचा जिव्हाळा, असले सौख्य कोणास लाभणे..

६. या लग्नात समजले..चिल्लरचा जमाना आणि खर्च मात्र नोटांचा मला तर करावाच लागेल पण…..राव करतील का संसार नेटाचा….

७. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..माझे काम असेलच एक कर्तव्य..परंतु लाभेल का त्यांची साथ माझ्या पाठी..

८. आई – वडिलांचे आशिर्वाद लाभले जे इतके सुंदर जीवन झाले..नशीबाची साथ आणि समाजाचे देणे जे ..रावांचे आगमन माझ्या आयुष्यात झाले.

९. खूप शुभेच्छा मिळाल्या आज या मंगलदिनी…रावांची साथ मला labho जन्मोजन्मी..

१०. हा फुलांचा वास आणि ..रावांचा सहवास माझ्या आयुष्यात असेल असिमीत सुगंध..दोन जीवांचे नाही तर दोन कुटुंबाचे असतील आयुष्यभर ऋणानुबंध..

लग्नातील मराठी उखाणे – वरासाठी

१. खूप सारा स्ट्रगल..स्ट्रगल नंतर नोकरीस्ट्रगल आता थांबला..मिळाली मला छानशी छोकरी..

२. हे तुझं कामचं आहे तू केलंच पाहिजे..असा जाच असतो बॉसचा..बाहेर फिरायला चला ना..मला शॉपिंग करायला न्या ना..इथून पुढे असा हट्ट असेल मिसेसचा..

३. मला सांगा सुख नक्की मला कधी मिळेलया वाक्याचा अर्थ आणि …….चा स्वभाव मला लग्न झाल्यावरच कळेल.

४. मिळाला चांगला सहवास तर निर्माण होईल गोडी,…….सोबत संसार म्हणजे आयुष्याची चव थोडी थोडी

५. मनमोहक फुलणारे शब्द, हा पाया असावा संसाराचा,……..शी माझा  संवाद असावा आयुष्यभराचा.

६. जुळले रे क्षण प्रितीचे या भावनांच्या संगी,मिळाले रे मन …….शी आज या मंगलप्रसंगी.

७. ऐटीत चालावे परी नसावा अहंकार, …….सोबत आयुष्याचा संसार, नसावा कोणता विकार..

८. आज लग्न होताना भेट आहे अंतरीची,    साथ ……..ची आणि माझी    जन्म – जन्मांतरीची.

९. रुसवा फुगवा जाणून घ्या, नका धरू अबोला………शी आयुष्यभर नाते, दरवाजे मनाचे खोला.

१०. पावसाचे नाव ऐकताच का होते मोराची चाहूल,…….सह होईल संसाराची सुरुवात, ठेवुनी एक एक पाऊल.

लग्नानंतरचे मराठी उखाणे – बायकोसाठी

१. काही जुन्या आठवणी मनात घर करून राहतात..लग्नापासून आजपर्यंत…आमचे हेच भाजी आणतात.

२. खूप स्वप्ने दाखवून झाली की वास्तवात उतरायचं असतं,मी तुझ्यावर प्रेम करतो फक्त एवढंच बोलायचं असतं..

३. माहेरची साडी आणि माहेरची भांडीकधीच जुनी होत नाहीत,आमचा प्रत्येक दिवसच नवा असतो,…..रावांसोबत माझी कधीच भांडणं होत नाहीत.

४. अखेर तो दिवस उगवला ज्या दिवसाची स्वप्ने मला पडायची, …..राव चहा घेऊन आले आणि म्हणाले, ” झोप ग , तुला काय गरज आहे आज काम करायची! “

५.कधी कधी सीरियल आणि क्रिकेट मॅचचा दिवस एकच असतो.मग ……राव आणि मी दोघे पिक्चर बघायला जात असतो.

६. असेल जरी नदी वाहती, सर्व सुखदुःख उरात ठेऊन…….राव माझ्या सोबतच आहेत शॉपिंग मॉल मध्ये , माझ्या सर्व बॅगा धरून…

लग्नानंतरचे मराठी उखाणे – नवऱ्यासाठी

१. एकदा मी म्हणालो, जाणीव आहे मला माझ्या जबाबदारीची !…….ने मला झाडू हातात दिला आणि म्हणाली, सफाई करून घ्या मग घरादाराची!

२. लग्नाची वर्षे तिच्या लक्षात आहेत…माझ्या लक्षात आहेत लग्नाअगोदरचीम्हणून लग्नाचा वाढदिवस ती घालते आणि मी वाढदिवस घालतो तिचा…

३. कैवल्य जीवन आणि मनाची गुंतवणूक एकत्र नसतेशांत आयुष्य आणि …….सह आयुष्य देखील एकत्र नसते…

४. मला …..शी केलेल्या लग्नानंतर कळाले की, लहानपणी आईला मदत का करावी लागायची.ती तर पूर्वतयारी होती लग्नाअगोदरची.

५. संयमी व्यक्ती सगळ्यांचा राखत असतो मान.. …….ने माझ्या आयुष्यात दिले संसाराचे दान.

तर हे marathi ukhane तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्याकडे असेच काही ठसकेबाज उखाणे असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवा. त्यांना पब्लिश करण्याची जबाबदारी आमची…

Ganpati Atharvashirsha in Marathi PDF Download for free । गणपती अथर्वशीर्ष मराठी संकलन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महानिर्वाण दिवस तथ्य

mahanirvan diwas

भारतीय संविधानाचे जनक, बोधिसत्व, भारतरत्न, महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा “महानिर्वाण दिन” आहे. त्यांचे बौद्ध धम्म परिवर्तन आणि त्यासाठी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे असेच आहे.     

बुद्ध धर्म हा समानतेची वागणूक देणारा धर्म आहे आणि तो सर्व लोकांना समाविष्ट करून घेऊ शकतो अशा विचारसरणीत धम्मपरीवर्तन चक्र सुरू झाले होते. २० नोव्हेंबर १९५६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथील ” वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट” च्या चौथ्या परिषदेस बाबासाहेब हजर राहिले. तेथील प्रतिनिधींसमोर त्यांनी “बुद्ध की कार्ल मार्क्स” या विषयावर मार्गदर्शन केले. भगवान बुद्धांचा मार्गच शोषण समाप्त करून एक नवी दिशा प्राप्त करून देऊ शकतो आणि या मार्गात न्याय, प्रेम, विज्ञानवाद, बंधुत्ववाद समाविष्ट आहे अशी संकल्पना या परिषदेत त्यांनी मांडली.   

काठमांडूहून मायदेशी परत येताना त्यांनी बनारस मध्ये देखील भाषणे केली. दिल्लीत विविध बौद्ध समारंभात सहभागी झाले. नंतरच्या काळात राज्यसभेच्या अधिवेशनात देखील त्यांचा सहभाग होता. ‘बुध्द आणि कार्ल मार्क्स” या पुस्तकाचा शेवटचा भाग लिहून त्यांनी पूर्ण केला. ५ डिसेंबरला त्यांनी “बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाची प्रास्ताविक आणि परिचय ही दोन प्रकरणे आणून त्याची तपासणी केली.   

६ डिसेंबर १९५६ रोजी रात्री १२:१५ वाजता दिल्लीतील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. या दिवसाला “महानिर्वाण दिवस” म्हटले जाते. त्यांचे वय ६४ वर्षे व ७ महिने एवढे होते. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आले. अंत्यविधीसाठी निघालेली यात्रा ही जवळजवळ १५ लाख लोकांची होती. दादर वरून निघालेली ही यात्रा स्मशानभूमीत पोहचण्यासाठी ४ तास लागले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी ७ वा. ५० मि. त्यांच्यावर बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिक्षा समारंभ– उपस्थित १० लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 

– महापंडित बौद्ध भिक्खू डॉ.आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन उपस्थितांना बौध्द धर्माची दिक्षा दिली.

हे सुद्धा वाचा- “विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

GST Information in Marathi | जीएसटी म्हणजे काय?

GST information in marathi

What is GST? जीएसटी म्हणजे काय? वस्तू व सेवा कर काय आहे? ते कसे कार्य करते? त्याचा इतिहास काय आहे? जीएसटी भविष्यात कसा असेल? GST जीडीपीमध्ये काही बदल आणू शकेल? कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग होतील? यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील सोबतच हि सर्व माहिती मराठी मध्ये देखील हवी असेल त्यामुळेच आज आम्ही GST information in Marathi मध्ये घेऊन आलेलो आहोत. जीएसटीचे बरेच प्रकार आहेत. ते कोणकोणते आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर चला सुरु करूया.

दरवर्षी करात काही बदल होत असतो. कधीकधी सरकार स्वतःच्या फायद्यासाठी कर बदलत राहते. सामान्य माणूसच त्यात भरडला जातो. आपण पुस्तके, बिस्किटे, टीव्ही, फॅन वॉटर बॉटल यासारखी कोणतीही वस्तू खरेदी केल्या किंवा हॉटेल, रेस्टोरंट सारख्या काही सेवा उपभोगल्या तर आपल्याला कर भरावा लागतो. पण आता या करात बदल झाले आहेत. २०१६ मध्ये भाजपने याची सुरुवात केली होती. तर मग जीएसटी म्हणजे काय ते सविस्तर जाणून घेऊया. त्याचबरोबर या लेखात तुम्हाला GST ची माहिती मराठीत मिळेल.

What is GST? जीएसटी म्हणजे काय?

जीएसटी चा full form Goods and Services Tax आहे. मराठीमध्ये याला “वस्तू आणि सेवा कर” म्हणतात. भारतातील जुन्या कराच्या पद्धती या सर्वांमध्ये बदल घडवून हा कर संपूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे. टॅक्स तज्ञाच्या मते, या कराने भारताची कर रचना सुधारण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

हा अप्रत्यक्ष कर आहे. हा एकच कर असेल जो सर्व वस्तू आणि सेवांवर आकारला जाईल. आणि या करामुळे भारत एकात्मिक बाजार होण्यास मदत होईल. तसेच एक्साईज टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट (व्हॅल्यू अ‍ॅडिड टॅक्स), करमणूक कर यासारखे सर्व अप्रत्यक्ष कर जीएसटीच्या कक्षेत येतील.

जेव्हा एखादी वस्तू फॅक्टरीत बनविली जाते तेव्हा ती वेगवेगळ्या स्तरांवरून ग्राहकांच्या जवळ जाते. वस्तू तयार होण्यापूर्वी कच्चा माल खरेदी केला जातो. त्यावर व्हॅट जोडला जातो. पुढे जेव्हा ही सामग्री फॅक्टरीमध्ये जाते तेव्हा ती तेथे तयार केली जाते. आता वस्तू तयार झाल्यानंतर ती होलसेलरकडे जाईल, मग त्यावर व्हॅट जोडला जाईल. मग आता किरकोळ विक्रेता हा माल खरेदी करतो आणि त्यात होलसेलर व्हॅट जोडला जातो. शेवटी, किरकोळ विक्रेता त्यावर थोडा कमी व्हॅट लावून ग्राहकाला विकतो.

यावरून असे लक्षात येते कि, प्रत्येक स्तरावर बरेच टॅक्स जोडले जात आहेत, म्हणून किंमत खूप वाढत आहे. परंतु जीएसटी प्रत्येक स्तरावर लागू होईल आणि तो निश्चित राहील. यामुळे काही वस्तूंच्या किंमती वाढतील आणि काही वस्तूंच्या किंमती कमी होतील. जीएसटी वर 5%, 12%, 18% आणि 28% शुल्क आकारले जाईल. पूर्वी काही राज्ये त्यांच्या मनाप्रमाणे कर जोडायची पण आता तसे होणार नाही. जीएसटी म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते हे आता आपल्याला कळले असेलच. जीएसटी कधी लागू होतो आणि कधीपासून सुरू होतो ते जाणून घ्या.

GST Information in Marathi । GST बद्दल माहिती

GST Information in Marathi

GST चा Full Form काय आहे?

-Goods and Service Tax

GST कधी लागू झाला?

-GST भारतात 1 जुलै 2017 रोजी पूर्णपणे लागू केला गेला.

CGST, SGST आणि IGST म्हणजे काय?

भारत हे एक संघराज्य लोकशाही आहे, याचा अर्थ असा आहे की त्याच्या घटनेत राज्ये आणि केंद्र यांच्यात सत्ता, जबाबदारी आणि महसूल संकलनाबद्दल स्पष्टपणे सीमांकन आहे.

उदाहरणार्थ, कायदा व सुव्यवस्था ही राज्याच्या अखत्यारीत येते, तर देशाचा बचाव ही केंद्राची जबाबदारी आहे. त्याचबरोबर जीएसटीमध्येही अशा स्पष्ट तरतुदी आहेत, जेणेकरून या केंद्र व राज्याबाबत कोणतेही वाद होणार नाहीत आणि दोघेही त्यांच्या पद्धतीने महसूल गोळा करु शकतील.

CGST (सेंट्रल-जीएसटी)- यामध्ये केंद्राच्या कर संकलनाचा समावेश होतो.

SGST (स्टेट जीएसटी)- यामध्ये कर आकारण्याची जबाबदारी राज्याची असते. यामध्ये केंद्र हस्तक्षेप करत नाही.

IGST (इंटिग्रेटेड जीएसटी)- यामध्ये कर संकलन भारतीय संघराज्याच्या अखत्यारीत येते. ते युनियनद्वारे गोळा केले जाते परंतु नंतर ते राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाते.

भारताची सध्याची कर रचना फारच जटिल आहे. भारतीय राज्यघटनेनुसार वस्तूंच्या विक्रीवर कर लादण्याचा अधिकार आणि वस्तूंच्या उत्पादन व सेवांवर कर आकारण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामुळे, देशात विविध प्रकारचे कर लागू आहेत, ज्यामुळे देशातील सध्याची कर प्रणाली अत्यंत जटिल बनली आहे. कंपन्या आणि छोट्या व्यवसायांना वेगवेगळ्या प्रकारच्या कर कायद्याचे पालन करणे अवघड जात आहे. म्हणून GST त्यावरील उपाय आहे.

जीएसटी कायद्याचे घटक काय आहेत?

-याप्रणाली अंतर्गत 3 कर लागू आहेतः सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी.

जीएसटी कोणत्या वस्तू वर बसवला जातो?

-तुमच्या मनात असा प्रश्न पडेल की जीएसटी सर्व वस्तूंवर व सेवांवर लावला जाणार नाही. परंतु तसे नाही. दारू सोडून भात, भाजीपाला, चीज, मैदा, हरभरा पीठ, चहा, साखर, एलपीजी, केरोसीन, कॅल्शियम, लोणी, तूप, मेडिकेस, रस, तेल साबण, सूप, आईस्क्रीम, सिमेंट यावर हा टॅक्स लागेल. कार, बाईक, कार मोटर सेवा, हॉटेल, रेस्टोरंट अशा जवळजवळ सर्व वस्तू आणि सेवांवर कर आकारला जाईल.

जीएसटीचा अल्पकालीन परिणाम काय असेल?

-जीएसटीच्या आगमनाने अल्पावधीसाठी महागाई वाढेल. जीएसटी दर 5% आणि 18% कर सेवांसह सुरू होईल जसे की रेस्टॉरंट्स, चित्रपट इ. त्याच वेळी, जीएसटी अल्कोहोलवर लागू होत नसल्यामुळे, अनेक तज्ञांचे मत आहे की काही भांडवलदारांना त्यांचा काळा पैसा पांढरा करायचा आहे. कारण जीएसटीमध्ये अधिक कर भरावा लागतो.

जीएसटीमुळे काय स्वस्त आणि महाग असेल?

जीएसटीनंतर या काही वस्तू स्वस्त आणि महागड्या होतील. GST in marathi मध्ये जाणून घ्या.

1 # घरे स्वस्त होतील

जीएसटीमुळे बिल्डर्स खूप घाबरले आहेत. घर आणि फ्लॅटवर सरकार 12% जीएसटी घेईल. परंतु सरकारला इनपुट क्रेडिटची सूट मिळेल, ज्याचा थेट ग्राहकांना फायदा होईल. ज्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना इनपुट क्रेडिट दाखवावे लागेल आणि सरकार त्यांना सवलत देईल.

2 # किचन साहित्य स्वस्त

आपण सामान्य लोक स्वयंपाक घरातील वस्तू भरपूर प्रमाणात वापरतो. या सर्व वस्तू स्वस्त होतील.

3 # हे सर्व टॅक्स फ्री

धान्य, दूध, अंडी, दही, चीज, ताजी भाजी, आटा, हरभरा, मैदा, भाजी तेल, प्रसाद, मीठ, सुपारी, ऊस.

4 # बाइक स्वस्त असतील

चांगली गोष्ट म्हणजे बाइकवरील 1% कर कमी केला जाईल ज्यामुळे दुचाकी वापरणार्यांना काही दिलासा मिळेल.

5 # एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन देखील परवडणारी

पूर्वी या सर्व करांवर 30% ते 31% कर लावला जात होता, परंतु जीएसटीपासून तो 28% होईल. त्यामुळे या गोष्टी स्वस्त होतील.

6 # आता आपण अधिक चित्रपट पाहू शकता

चित्रपट पाहणाऱ्यांची चांगली बातमी आहे. आता आपण सिनेमा हॉलमध्ये अधिक वेळ घालवू शकता. आता फक्त 18% चित्रपटांवर कर आकारला जाईल. पूर्वी तो 28% होता.

7 # टॅक्सी स्वस्त होतील

प्रवासी आणि कर्मचारी जे ओला आणि उबर सारख्या टॅक्सींचा वापर करतात. त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे.

8 # मोठ्या कार महागड्या असतील आणि लहान कार स्वस्त

मध्यमवर्गीय लोकांसाठी चांगली बातमी आहे. ते आता त्यांच्या स्वप्नातील कार खरेदी करू शकतील.

आशा आहे की GST information in marathi तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ. आपल्याला इतर काही सूचना द्यायच्या असतील तर कृपया नक्की सांगा. जेणेकरून आम्ही आपल्यासाठी काहीतरी नवीन करू शकू.

Ganpati Atharvashirsha in Marathi PDF Download for free । गणपती अथर्वशीर्ष मराठी संकलन

Ganpati Atharvashirsha in Marathi PDF Download for free । गणपती अथर्वशीर्ष मराठी संकलन

atharvshirsh in marathi

Atharvashirsha । अथर्वशीर्ष

आज जगात सर्व ठिकाणी मान्यता पावलेला, सर्वाधिक प्रमाणात पूजला जाणारा देव म्हणजे श्री गणपती! भारतात तर प्रत्येक घरात कुलदैवत कोणतेही असले तरी गणेशाचे पूजन केले जातेच. त्यामुळेच आज आम्ही संपूर्ण Ganpati Atharvashirsha in Marathi मध्ये घेऊन आलोय. ते तुम्ही PDF form मध्ये download करू शकता. Ganpati Atharvashirsha PDF ची लिंक खाली दिली गेली आहे तरी तिथे जाऊन तुम्ही ते विनामूल्य मिळवू शकता.

सर्व शुभकार्यारंभी पूजला जाणारा हा ओंकाररूपी आदिदेव विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता व विद्येचा देव आहे. इतर देवतांचे पूजन, उत्सव यांच्या सुरवातीलाही गणेशाचेच पूजन केले जाते. ही परंपरा शास्त्रीय आहे. भारतीय संस्कृतीत हा देव एवढा एकरूप झाला आहे की, लग्न, मुंज, पूजा यात तर हा प्रथम पूजला जातो; कारण त्याच्या स्मरणाने, प्रथम पूजनाने कार्यसिद्धी होते. समर्थ रामदास स्वामी गणेशाच्या रूपाचे वर्णन करताना म्हणतात,

“गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।।” 

Ganpati Atharvashirsha in Marathi । गणपती अथर्वशीर्ष मराठीमध्ये.

सुख प्राप्ती व दुःख निवृत्ती ह्या दोन गोष्टीसाठीच प्रत्येक सजीवाची निरंतर धडपड चालू असते. अनुकूल संवेदना म्हणजे सुख व प्रतिकूल संवेदना म्हणजे दु:ख ही सुखदुःखाची व्याख्या. 

मनुष्येतर योनीमध्ये मन नावाचे उपकरण विकसित झाले नसल्याने त्यांना शरीर स्तरावरील अनुकूलता हेच सुख व प्रतिकूलता हेच दु:ख असते. मानवाचे तसे नाही. मानवाला मिळालेले अंत:करण (अंतर – आतील. करण – उपकरण, हत्यार Instrument) हे उत्क्रांत/पूर्ण विकसित आहे. 

… मनुष्य केवळ शारीरिक सुखसोयी मिळवून सुखी होत नाही. मनाच्या स्तरावर अनुकूल भावविश्व व बुद्धीच्या स्तरावर अनुकूल विचार विश्व प्राप्त झाले तरच मनुष्याला सुख वाटते, अन्यथा भावविश्व व विचार विश्वाची प्रतिकूलता मनुष्याला घोर दुःख प्रदान करते. सुख दुःखाच्या कल्पना भिन्न असतात (श्रद्धा-अमुक एका गोष्टीत, वस्तूत व्यक्तिंत, परिस्थितीत सुख वा दुःख आहे असे वाटते) अनेक जन्मोजन्मीच्या संस्काराप्रमाणे मनाची घडण होत असते. व श्रद्धेची पण व्यक्तीगणिक भिन्नता असते. 

श्री भगवान कृष्ण म्हणतात. त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ।। (गीता १७/२)

Ganpati Atharvashirsha Marathi Description । अथर्वशीर्ष सारांश

Atharvashirsha in Marathi

ह्या मानवी देहाच्या मध्ये तीन (मुख्य) श्रद्धा, त्याच्या स्वभावाप्रमाणे असतात.

  • १) सात्विक
  • २) राजसिक
  • ३) तामसिक 

त्यांच्या वर्तणुकीवरून त्या ओळखता येतात. त्यांच्या आहारविहाराच्या आवडीवरून त्याची भिन्नता कळते. सात्त्विक श्रद्धा (कल्पना Attitude / values) असणाऱ्या माणसाचे वागणे/ बोलणे भिन्न असते. 

सात्विक माणूस शुभ देवतांची आराधना करतो. जसे देवी, शंकर, गणपती, दत्त इत्यादी. सात्विक माणसाचा आहार सुख, प्रेम, वाढवणारा असतो. रसमय, स्निग्ध, कसदार, ताजे शाकाहारी पदार्थ सात्विक माणसाला आवडतात. 

तर राजसी श्रद्धेचा माणूस विकारयुक्त शक्तिस्थानाची आराधना करतो. ज्याच्या मनात यश, सिद्धि, पैसा प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे तो शक्तिवान व श्रीमंत माणसांशी मैत्री करतो. त्यांची आराधना करतो. 

राजसिक श्रद्धेच्या माणसाला चमचमीत खावेसे वाटते. तेलकट, तुपकट, अति खारट, तिखट, आंबट, दाहक पदार्थाची आवड ह्या प्रबल इच्छा अशा माणसामध्ये दिसतात. तर तामसी माणूस भूत प्रेत पिशाच्च अथवा गुंड, वाईट वृत्तीच्या लोकांचे भजन करतो. त्याला शिळेपाके, वाळके अन्न, कुजलेले, आंबलेले उष्टे असे पदार्थ आवडतात. 

हे सुद्धा वाचा- Prabodhini Ekadashi । प्रबोधिनी एकादशी – भगवान विष्णूचा प्रसाद, आपुलकी आणि मोक्ष!

श्रद्धेचा उहापोह करण्याचे कारण असे की केवळ रूची भिन्नतेमुळे प्रत्येकाचे सुख दुःख भिन्न असते. सुख दुःखांची कल्पना अथवा स्थाने भिन्न असतात. 

देवतेची आराधना प्रत्येक माणूस करतोच. फक्त ज्याची त्याची देवता त्याच्या श्रद्धेनुसार ठरत असते. सात्विक देवतेची आराधना मानवाला संकटातून मुक्त करतेच त्याचे हितच करते शिवाय त्याचे मन/अंत:करण अधिक विकसित करून त्याला ईश्वर तत्त्वापर्यंत नेते. 

Download Atharvashirsha in Marathi PDF

अथर्वशीर्ष मराठीमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा तसेच त्यासोबत संपूर्ण अथर्वशीर्षाचा अर्थ आणि त्यासंबंधीची माहिती सुद्धा त्यामध्ये दिली गेली आहे. तर मग Download Atharvashirsha in Marathi PDF

Atharvashirsha in Marathi PDF Download

{Download}

श्री गणपती दैवत हे सुखकर्ता दुःखहर्ता आहे ह्याचा अनुभव पुरातन काळापासून अनेकानी घेतला आहे. सर्व कार्यारंभी त्याचे स्तवन केले जाते. Ganpati atharvshirsh हे केवळ स्तुतीपर स्तोत्र नसून एक उपनिषद आहे. तेव्हा त्यावर चिंतन करावे हा विचार केवळ श्री गणपती उपासनेमुळे मनात येतो. त्यामुळेच ते तुमच्यापर्यंत पोचवावे हा आमचा अट्टाहास. 

Disclaimer

हि PDF त्या गरजू व्यक्तींसाठी आहे जे इंटरनेट वर atharvshirsh pdf ची मागणी करत असतात. आम्ही फक्त हि pdf त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचं काम करत आहोत. आम्ही Ganpati atharvshirsh pdf चे creator नाही किंवा त्याचा मालकी हक्क हि घेत नाही आहोत. आम्ही फक्त ती share करत आहोत जी already इंटरनेट वर फ्री मध्ये available आहे.

Prabodhini Ekadashi । प्रबोधिनी एकादशी – भगवान विष्णूचा प्रसाद, आपुलकी आणि मोक्ष!

Prabodhini Ekadashi

Prabodhini Ekadashi । प्रबोधिनी एकादशी

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी (Dev Prabodhini Ekadashi) किंवा देव उठाना एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. येत्या ८ नोव्हेंबरला ही एकादशी असणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या देखील या एकादशीतल्या उपवासाचे महत्त्व आहे.

पराना म्हणजे उपवास तोडणे. एकादशीच्या उपवासाच्या दुसर्‍या दिवशी सूर्योदयाच्या नंतर एकादशी पारण केले जाते. द्वादशी तिथीमध्ये पराना करणे आवश्यक आहे जोपर्यंत सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी संपत नाही. द्वादशीमध्ये पराना न करणे एखाद्या गुन्ह्यासारखेच आहे.

हरि वासरा दरम्यान पारण करू नये. उपवास तोडण्यापूर्वी हरि वसराची वाट पहायला हवी. द्वादशी तिथीचा हरि वसरा हा पहिला चतुर्थ कालावधी आहे. उपोषणाचा सर्वात जास्त पसंत केलेला वेळ म्हणजे प्रथकाल. मध्यरात्री उपवास खंडित करणे टाळावे. काही कारणांमुळे जर एखाद्याला प्रातःकाळात उपवास खंडित करता येत नसेल तर ते एकाने मध्यान्हेनंतर केले पाहिजे.
कधीकधी एकादशीचे उपवास सलग दोन दिवस सुचविले जाते. असा सल्ला देण्यात आला आहे की कुटुंबासह फक्त पहिल्याच दिवशी उपवास करावा. संन्यासी, विधवा आणि ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांच्यासाठी वैकल्पिक एकादशी व्रत (Prabodhini Ekadashi vrat) , जो दुसरा आहे.

भगवान विष्णूच्या प्रेमाची आणि आपुलकीच्या शोधात असलेल्या कट्टर भाविकांना दोन्ही दिवसांची एकादशी उपवास ठेवण्याची सूचना आहे.

हे सुद्धा वाचा- असते तरी काय हे प्रदोष व्रत? आणि काय होतो याचा परिणाम?

असते तरी काय हे प्रदोष व्रत? आणि काय होतो याचा परिणाम?

pradosh vrat

प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीला ठेवला जातो आणि या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हा उपवास चांगला मानला जातो. दिवस आणि रात्र भेटत असताना प्रदोष काळ असतो. भगवान शिव यांची पूजा आणि उपवास- विशेष काळ आणि उपवास दिवस म्हणून ओळखला जाणारा हा प्रदोष काळ खूप चांगला काळ आहे. प्रदोष तिथीला खूप महत्त्व आहे, यावेळी केल्या जाणार्‍या भगवान शिवची पूजा निष्फळ परिणाम देते. 

जर हे व्रत युद्धाच्या अनुसार केले गेले तर शुभ परिणाम प्राप्त होतात. युद्धाच्या अनुषंगाने याचा अर्थ असा होतो की प्रदोष ज्या कल्पनेनुसार पडतात त्याच कथा वाचल्या पाहिजेत. यामुळे शुभ फळ अधिक वाढतात. वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, वारसांनुसार प्रदोष केल्यास तुम्हाला लाभ होतो. 

प्रदोष काळात केलेली पूजा आणि व्रत सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मानले जाते. त्याचप्रमाणे प्रदोष काल व्रत शुक्ल पक्षावर आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी किंवा त्रयोदशी तिथीला ठेवला जातो. काही विद्वानांच्या मते द्वादशी आणि त्रयोदशीची तारीख ही प्रदोष तिथी म्हणून मानली जाते.

हे सुद्धा वाचा- “विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

“विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

daily marathi news

काही शब्द किंवा वाक्य आज महाराष्ट्रात अशी काही प्रचलित झाली आहेत की त्यांचा अर्थ लावणे म्हणजे बुद्धी नसल्याचा प्रत्यय येतो. किशोरवयीन वयात मनावर व अस्तित्वावर अशी काही वाक्ये कोरली जातात ज्यांचा परिणाम पुढील पिढीवर होतोच होतो.

१. पार्टी हार्ड…!

काय आहे हा शब्द! आणि याचा अर्थ काय लावायचा? आज सर्रास कोणाचा वाढदिवस असो की लग्नसमारंभ, यात्रा असो की मिरवणूक, पार्टी हार्ड म्हणजे रात्रभर जागरण करणे, दाबून दारू पिणे आणि काहीही वेडसरपणा करणे. हे सर्व तरुण वयात केलं जातं आणि परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

२. अपना टाईम आयेगा…!

आजचे चित्रपट केवळ वासनामय आणि महत्वकांक्षी भावनेने भरकटलेले असतात. इच्छाशक्ती कोणत्याही वाईट मार्गाने प्रक्षुब्ध करून तरुणाई फक्त आणि फक्त अडचणीच निर्माण करत असते. “गल्ली बॉय” या चित्रपटातलं हे वाक्य खूप काही न सांगता केवळ विरूध्द भावनेने तरुणाईला उत्साह देत आहे. आज शालेय वयातील मुलेदेखील हे वाक्य बोलू लागलेली आहेत.

३. जय पबजी…!

ही गेम आणि हे वाक्य लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी एक व्यसन बनून गेले आहे. ही गेम एक क्रूर प्रवृत्ती जन्माला घालत आहे. गेममध्ये आपण कोणाला तरी मारत आहोत आणि त्यातून मिळणारा खोटा आनंद हा वास्तविक जीवनात एखाद्या व्यक्तीला संयमी राहू देऊ शकत नाही. लहान मुले तर “विनर विनर चिकन डिनर” आणि “जय पबजी” अशीच करत बसलेली असतात. 

४. राडा

हा शब्द अगोदर चिखलाचा राडा, पिठाचा राडा म्हणून ओळखला जायचा पण आता, जर काही विक्षिप्त, विलक्षण करायचे असेल तर “राडा राडा”, “नुसताच राडा” किंवा “राडा तर होणारच” अशी वाक्ये सहज बोलली जातात.अशा अर्थाची तर गाणी पण आलेली आहेत. त्यामुळे हा शब्द जीवन चांगले करून जात नाही, पण मूर्खपणा मात्र नक्कीच करवून जातो.
याव्यतिरिक्त टीव्ही मालिकेतील वाक्य, बोलीभाषेतील वाक्य ही खूप खोलवर परिणाम करून जातात. 

हे नक्की वाचा- केस माझे ..पण केसांबद्दलच्या समजुती मात्र दुसऱ्यांच्या!

हल्ली आपण खरंच मराठी बोलतो का?

वेळोवेळी भाषेत होत गेलेले बदल सहजरीत्या समजत नाहीत परंतु असे शब्द जे नव्याने भाषेत मिसळून काही नवीनच शब्द मूळ भाषेत रुजू लागतात, मग त्या भाषेतच वारंवार लिहले व बोलले जातत.     

मराठी भाषेत काही नवीन शब्द जे मुळतः इंग्लिश भाषेतील आहेत ते शिक्षणपरत्वे एखादी पिढी आपल्या बोलीभाषेत वापरू लागली आहे व त्यांचा वापर हा कायमचा होऊ लागला आहे. हिंदी भाषेची तर शहरात “हिंग्लिश” च झाली आहे. मराठीत सर्रास पुढील इंग्लिश शब्द वापरले जातायेत…

१. Starting ला काय करू? सुरुवातीला काय करू? अशा अर्थाचे हे वाक्य starting या शब्दानेच सुरू होऊ लागले आहे. 
२. Problem काय आहे तुमचा?  “समस्या ” हा शब्द तर आजच्या लहान मुलांना माहीत असेल का? याबद्दल शंकाच आहे.
३. Use काय आहे त्याचा?  “वापर/उपयोग ” असा उच्चार करणे थोडे अवघडच जात असल्याने यूज हा शब्द सर्रास वापरला जाऊ लागला आहे.
४. Change कर ते.  बदलणे म्हणजे change करणे. याचा वापर दिवसातून खूपच वेळा केला जातो.
५. Time काय झाला?   “वेळ/काळ” हे शब्द कदाचितच कोणीतरी वापरत असेल.
६. नवीन Shirt/pant आहे हा!   Shirt आणि pant या दोन शब्दांना सदरा आणि पायजमा असे दोन अस्सल मराठी शब्द आहेत.
७. Doctor/Engineer आहे आमचा मुलगा!   वैद्य आणि अभियंता अशा अर्थाचे हे दोन शब्द खूप प्रचलित नाहीत. डॉक्टर आणि इंजिनिअर असेच शब्द मराठीत लिहले जाऊ लागले आहेत.
८. आजचा menu/dish काय आहे?   जेवणात काय पदार्थ आहेत असे न म्हणता आपण menu/dish असे शब्द वापरतो
९. Career च्या संधी. Career म्हणजे कारकीर्द असे खूप जणांना आज सांगावे लागेल.
१०. Copy करू नका. Copy म्हणजे ” नकल/ नक्कल ” . हा शब्द तर कॉपी असाच रुजू होणार आहे.
११. Pure ( पिव्वर ) “पिव्वर काहीच नाही आज, सगळीकडे नुसती भेसळ! ” असं वाक्य आपणदेखील किती वेळा बोलतो. 

याव्यतिरिक्त pen(पेन), cooker(कुकर), Colgate(कोलगेट), mixer(मिक्सर), table(टेबल), television(टीव्ही), Sorry(सॉरी), gate(गेट), pipe(पाईप), patient (पेशंट) असे खूप सारे शब्द मराठीत मिसळले गेले आहेत.   

मराठीतले मूळ शब्द आणि अर्थ वारंवार वापरले गेले तरच आपण मराठी ही अभिजात भाषा व्यवस्थित टिकवू शकू. तुम्हाला देखील असे शब्द माहीत असतील तर नक्की कळवा. कमेंट (comment) करा.

हे हि जरूर वाचा- हेच ते चमत्कारिक मंदिर ज्याचे खांब हवेत तरंगतात…शास्त्रज्ञांनाही अजून उलगडले नाही याचे रहस्य.

सरकारचा हा नवीन कॉम्प्युटर कोर्स नक्कीच आहे परिपूर्ण

GCC-TBC

आज कॉम्प्युटर ज्ञान किती आवश्यक आहे, हे सांगण्याची कोणाला गरज भासणार नाही. २००० सालानंतर technical क्षेत्रात होत गेलेले बदल भारतात व महाराष्ट्रात खूप स्वीकारले गेले. कमी वेळेत व कमी कष्टात तंत्रज्ञान हाताळणे व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून घेणे आज आवश्यक व महत्त्वपूर्ण बनले आहे.

कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान वगळता जर थोडे थोडे टप्पे शिकत गेलात तर तुम्ही खूप सारे technical ज्ञान मिळवू शकता. असाच एक GCC-TBC (government certificate in computer typing basic course) हा कोर्स तुम्ही शिकून विशिष्ट टायपिंग पदांकरिता apply शकता करू शकता. तसेच त्याव्यतिरिक्त डिजिटल एज्युकेशन मध्ये असणारे विविध सॉफ्टवेअर सहज हाताळू शकता.

या कोर्स मध्ये असणारे कॉम्प्युटर बेसिक फंडामेंटल पुढीलप्रमाणे,

  • १.मायक्रोसॉफ्ट वर्ड
  • २.मायक्रोसॉफ्ट एक्सेल
  • ३.मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट
  • ४. गूगल टूल्स तसेच इंटरनेट व आऊटलुक देखील या कोर्स मध्ये उपलब्ध आहेत.   

विद्यार्थ्यांनी आपल्या हायस्कूल शिक्षणातच हा कोर्स पूर्ण करून घ्यावा म्हणजे आज ज्या पद्धतीनं डिजिटल जग चाललेलं आहे, त्याच्या स्पर्धेत कुठेतरी आपण टिकू शकू. नाहीतर खुपजण आज पदवीधर झाल्यानंतरच नोकरीसाठी प्रयत्न करतात परंतु तसे न करता थोडे थोडे डिजिटल शिक्षण घेऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्ही रोजगाराच्या संधी निर्माण करू शकता तसेच स्वतःसाठी एक उज्ज्वल भविष्य घडवू शकता.

हे हि वाचा- हि लक्षणे असतील तर सावधान ! तुमचं मानसिक संतुलन बिघडत आहे.