Aloo paratha recipe in Marathi |आलू पराठा बनवा अगदी सोप्या पद्धतीने!

उत्तर भारतात आलू पराठा खूपच प्रसिद्ध आहे. आता तर पूर्ण भारतभर देखील हा पदार्थ बनवला जातो. अगदी थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत बटाट्याचे सारण टाकून हा पदार्थ लगेच बनवू शकतो. ज्यांना नाश्ता पोटभरून करायची सवय आहे त्यांना हा पदार्थ खूपच आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिकष्ट घ्यायची गरज नसते. सोप्यात सोप्या पद्धतीने आलु पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

Aloo Paratha Ingredients –
साहित्य:

• बटाटे – ४

• लसूण – ७ ते ८ पाकळ्या

• खोबरे – बारीक तुकडा

• लाल तिखट (चटणी) – २ बारीक चमचे

• कोथिंबीर

• जिरे

• हळद – अर्धा चमचा

• मीठ

• गव्हाचे पीठ

• तेल

How to make aloo paratha
कृती:

१ – गव्हाचे पीठ मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. चांगली मऊसर कणिक तयार करावी.

२ – एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बटाटे शिजवून घ्यावेत. आता हे बटाटे किसून बारीक करावे.

३ – लसूण – खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.

४ – आता किसलेल्या बटाट्यात लसूण – खोबरे पेस्ट, लाल तिखट, हळद, जिरे, कोथिंबीर आणि थोडे मिठ टाकून चांगले सारण बनवून घ्यावे.

५ – बटाट्याच्या सारणाचे लहान लहान गोळे करावेत.

६ – गव्हाच्या कणकेचे गोळे करून थोडेसे लाटून घ्यावे त्यावर बटाट्याचे सारण ठेवावे. लाटलेली चपाती सारणावरून बंद करून घ्या.

७ – पुन्हा अलगद लाटून घ्या. आता हा पराठा चपाती बनवतो तसा बनवून घ्या.

टीप:
• लाल तिखटऐवजी हिरवी मिरची पेस्टदेखील वापरू शकता.
• तेलाऐवजी तूपाचा वापर करून पराठा बनवू शकता.

Leave a Comment