151+ Famous Marathi Quotes | मराठी सुविचार संग्रह

marathi quotes

आज आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम Marathi Quotes घेऊन आलो आहोत. आजकाल खूप जण Quotes in marathi सर्च करत असतात. आणि त्यांना जसा हवा तसा सुविचार संग्रह मराठीमध्ये भेटत नाही. यासोबतच काही मराठी quotes images सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही डाउनलोड किंवा share करू शकता.

151+ Famous Marathi Quotes | मराठी सुविचार संग्रह

तुम्ही आयुष्यात किती पैसे कमावले यावरून नाही तर तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही .

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. कदाचित गुन्ह्याची तुमची संकल्पनाच बदलेल.

परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी…

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे

वाचन मनन आणि लेखन म्हणजेच खर अध्ययन .

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते

संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या…आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढच किंबहूना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल

ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव आणि मानवता हाच खरा धर्म.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

तुलना करावी पण कधी कुणाची अवहेलना करू नये कारण आपण जे पेरत असतो तेच उगवत.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका…संयम हेच त्यावरच उत्तर

marathi quotes images
marathi quotes images

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्वाचा आरसा असतो.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा आणि पुन्हा कामाला लागा.

आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे

अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.

Marathi Quotes

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा…

आयुष्यात प्रेम कराच पण त्या प्रेमाचं प्रदर्शन मांडू नका

प्रायश्वित्तासारखी दूसरी शिक्षा नाही…

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा…मग प्रत्येक संधी तुम्हाला शोधत येईल.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या…

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच…फक्त संयम हवा.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास तुमच्या आतल्या परमेश्वरावर ठेवा तो कधीही फसवणार नाही.

marathi quotes images 1

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही…

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन

अंथरूण बघून पाय पसरा.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत तर ते मिळवावे लागतात

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा…

संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

Quotes in marathi

गुणांचं कौतुक उशीरा होतं पण होतं हे नक्की…

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार.

marathi quotes images 2

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडला असतो…

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

आनंदी मन सुदृद शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावरून आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन व्यक्त होतो.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

आपण चुकतो तिथे आपल्याला सावरतो तोच खरा मित्र.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात सुद्धा…

हक्‍क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत…

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही .

marathi quotes images 3

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढता का?

हातोडीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. पुन्हा प्रयत्न करावे लागणार हाही होतो.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते. हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं

जगी सर्व सुखी असा कोण आहे’ विचारी मना तुच शोधूनी पाहे

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका कारण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात वेगळीच मजा असते.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण

तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.

शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे

हसा खेळा पण शिस्त पाळा

आयुष्यात काय गमावल ह्यापेक्षा काय कमावल ह्याचा विचार करा.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

marathi quotes images 4

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ नेहमी दुःखावर मायेची फुंकर घालत असतो .

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

मराठी कोट्स

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण…

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका… वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

marathi quotes images 5

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो..

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा . . . आत्ताच .

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते…

दुःख हे बैल्लालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते .

परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

ऐकावे जनाचे… करावे मनाचे.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा…

केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंत:शत्रूचीच अधीक भीती असते.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास नेहमी खुंटतो.


Quotes in Marathi । सुविचार संग्रह

marathi quotes images 6

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे… नव्हे त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा स्वतः झीजा आणि इतरांना गंध द्या.

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

आयुष्य जगून समजते… केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे कधीही योग्य .

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जे घाईघाईने वर चढू पाहतात त्यांची खाली कोसळण्याची शक्यता जास्त असते.

सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

marathi quotes images 7

मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठलेली असते.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

जगात सारी सोंगे करता येतात पण पैशाच सोंग करता येत नाही.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

जूनी खपली काढून भरलेल्या जखमा ताज्या करण्यात कधीच शहाणपणा नसतो.

सौंदर्य सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा…दया क्षमा शांती परमार्थ यांचे समीकरण सोडवा. . . हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

क्रांती तलवारीने घडत नाही’ तत्वाने घडते.

जो गुरू असेल तो शिष्य असेलच…जो शिष्य नसेल तो गुरू कधीच नसेल.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेत तर खाचखळगे पार करावेच लागतील.

तुम्हाना सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.

खोटी टीका करू नका नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

मनाविरूध्द गोष्ट म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरूध्द गोष्ट…

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. ते आपले अंतरंग खुले करते… कधी चुकवत नाही की फसवत नाही.

हृदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र दिसतात.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल पण शत्रू निर्माण करू नका.

एक चांगला विचार हा सुगंधासारखा असतो तो पसरावावा लागत नाही, आपोआप पसरतो.

marathi quotes images 8

वाईट गोष्टीशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते पण त्यासाठी संयम असावा लागतो.

दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हाही एक अनुभवच असतो.

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही स्वस्थ राहण्याने मात्र होते.

जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

एकमेका साहय्य करू, अवघे धरू सुपंथ ॥

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.

पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

मनाला आनंद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा.

आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार

जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही .

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.

मानवता हाच खरा धर्म आहे.

प्रयत्नांती परमेश्वर…

तर हे Marathi quotes (सुविचार संग्रह) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. आम्ही तुमच्या कंमेंट्स ची वाट पाहत आहे.

हे हि वाचा- Latest New Year Messages in Marathi | नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश.

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं…(?)

प्रेम हे स्त्री आणि पुरुष या दोन व्यक्तींमध्ये होणारा संवाद आहे की आकर्षणामुळे करावा लागणारा संवाद आहे. आजची प्रेमाची संकल्पना ही खूप विषाक्त होऊन राहिली आहे. चित्रपट किंवा मालिकेतून दाखवण्यात येणारे प्रेम आणि वास्तविक प्रेम यात खूपच फरक आहे.

भावना व वासना यातील फरक     

प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे. त्यामुळे दुसऱ्याची आपल्या आयुष्यात दखल किती असावी हे आपणच ठरवतो. त्यावरून मग आपणदेखील दुसऱ्याच्या आयुष्यात किती झाकून बघावे याचा विचार केला पाहिजे. ‘व्यक्तीला मदत करणे, आणि अडचणीत असेल तर करुणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे’ याला भावना म्हणायचे.   

‘एखाद्या व्यक्तीचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेणे, आणि त्याला स्वतंत्रता न देणे, सतत त्याला बदलण्याचा प्रयत्न करणे’ याला हिंसा किंवा वासना म्हणायचे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं? खरचं, तुमचं आमचं सेम असतं….?

– पुरुष आणि स्त्री जर एकमेकांबद्दल आदर बाळगून असतील तर ते नातं खूपच सुंदर होत जातं. 

– कोणीच परिपूर्ण नसतं याची जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे चांगलं.

– एखाद्या वादावर मिळून तोडगा काढणे केव्हाही चांगले. त्यातून तुम्हाला वास्तविकता समजायला मदत होते आणि ब्रेकअप, घटस्फोट यासारख्या प्रसंगातून तुम्ही दूर राहता.

– ‘हट्ट आणि वाद ‘ हे मानसिक आहेत हे समजून घ्या. नाहीतर तुम्ही नात्यात खूप अंतर वाढवचाल.

– शरीर, मन वेगवेगळे आहेत याची जाणीव करून घ्या. म्हणजे शारीरिक आकर्षण संपल्यानंतर सुद्धा तुमचे प्रेम अबाधित राहील.

हे सुद्धा वाचा- केस माझे ..पण केसांबद्दलच्या समजुती मात्र दुसऱ्यांच्या!

“मी तर कार्यकर्ता” – नेता आणि पक्ष दोन्हीत नेहमी विभागलेला.

भारतात राजकारणावर बोलणारे सगळे, त्यातील वाद करणारे निम्मे, मतदान करणारे निम्मे असे गणित असताना काहीजण भलतेच भाव खाणारे असतात. त्यांची वर्दी कुठल्या तरी नेत्याची असते तर झेंडा कुठल्यातरी पक्षाचा असतो. “कार्यकर्ता” नामक असा व्यक्ती नेत्याशी बांधला गेलेला असतो. त्याची पक्षनिष्ठा ही नेत्याप्रमाणेच बदलत असते. “आपला नेता जिकडे…आम्ही पण तिकडे…” अशा मताचे ते असतात. पण पक्षबदलीनंतर येणारे नैराश्य व दिनहीनता, ही त्याची राजकारणातील उमेदच हिरावून घेते.     

समाजातील किती जाती आणि धर्म या भारताला एक राष्ट्र समजतात? कितीजणांना लोकशाही माहिती आहे? त्यापैकी कितीजण नेत्यांना खरोखर आपला विकासपुरुष मानतात? आणि त्यातले कितीजण फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात? या प्रश्नातून उत्तरे काढत एखादा व्यक्ती कधी कार्यकर्ता म्हणून स्वतःचा मार्ग निवडत नाही तर पैशासाठी होणारा तात्पुरता फायदा करवून घेत असतो. अशातूनच जर त्याची पक्षात बढती झाली तर त्याच्या वाट्याला फक्त पैसे वाटण्याचे काम येऊन बसते. स्वतःसाठी पैसे ठेवणे आणि राहिलेले बाकीच्यांना देणे, अशा भ्रष्ट प्रक्रियेतून विकास तर लांबच राहतो फक्त विकासप्रश्र्न उभे राहतात. त्याची उत्तरे आणि त्याची रूपरेखा मग त्या पक्षांचे नेते प्रत्येक निवडणुकीत देत असतात. त्यासाठी कार्यकर्ता हा कोणत्या उद्देशाने पक्षासाठी कार्य करतो हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.   

एक मोठा प्रवर्ग आपल्या सोबती असला म्हणजे पक्ष उभारता येतो परंतु नेता त्यासाठी एकनिष्ठ, दृढनिश्चयी व उदात्त असला पाहिजे. नेत्याचा स्वार्थ पूर्ण होवो न होवो, एक पिढी तरी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहू शकेल अशी सामाजिक बांधणी त्याला करता आली पाहिजे. असे करताना त्या नेत्याला सच्चा कार्यकर्ता हवा असतो. एखादा नेताच एखाद्या पक्षाला मोठा बनवत असतो. हे आपण स्वातंत्र्योत्तर राजकारणात बघत आलेलो आहोत. नेत्याची बोलणी व करणी जर एकच असेल तर कार्यकर्ता त्यासाठी त्याचे पूर्ण आयुष्य देखील पक्षकार्यासाठी वाहून घेऊ शकतो.     

नेता जर फक्त सत्तेसाठी पक्ष बदलत असेल तर कार्यकर्ता हा कुठेतरी स्वतःला हीन समजू लागतो. त्याची पक्षनिष्ठा ही भावनेतून जन्मलेली असते. असे असताना जर नेता दुसऱ्या पक्षाचा हात धरत असेल तर कार्यकर्ता हा तेवढ्या उमेदीने काम करत नाही जेवढा अगोदर करायचा. आयुष्याची निम्म्याहून अधिक वर्ष एखाद्या पक्षाचा उदोउदो करण्यात घालवली असतील असा कार्यकर्ता एखाद्या सकाळी दुसरा झेंडा हातात घेऊन पूर्ण ताकदीनिशी प्रचारात कसा उतरू शकेल? वर्षानुवर्षे विचारात असणारे मतभेद, हे फक्त सत्तेसाठी एका रात्रीत पुसले जाऊ शकतात?

ग्रामीण भागात तर एखादे गाव दोन पक्षांमुळे विभागलेले असते. अशावेळी कालपर्यंत विरोधी असलेले कार्यकर्ते एकमेकांकडे बघून आज आपण मूर्ख ठरलो अशा भावनेने मिळालेले पैसे खिशात ठेऊन, ढाब्यावरचं फुकटचं जेवून एकदिलाने प्रचारात उतरतात. परंतु कोणाविरोधात उतरत आहोत? हेच त्यांना आज समजत नाही.

हे हि वाचा- आजचा शिक्षक दिन एका शिक्षकाच्या दृष्टीने…

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल च्या या काही गोष्टींचा आपल्याला आजही अभिमान वाटतो !

sawarkar

“हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन ! तुजविण जनन ते मरण” असा संदेश संपूर्ण जगाला देणारे व आपल्या मातृभूमीसाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करायला हवे असा संदेश देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आज आम्ही आपल्याला त्यांच्या जीवनातील अशा सात गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमान आजही अभिमान वाटतो.

१) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खरे नाव “विनायक दामोदर सावरकर” असे होते. त्यांचा जन्म सन १८८३ मध्ये झाला. ते भारताचे स्वतंत्र सेनानी, प्रख्यात वकील, कवी, लेखक, राजकारणी तसेच हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे होते.

२) वीर सावरकरांचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे झाले. तरुण वयात त्यांच्यावर त्या काळातील स्वातंत्र्य चळवळीत काम करणारे सामाजिक कामात असणारे बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपतराय यांचा प्रभाव होता.

3) कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी स्वदेशी चळवळी मध्ये सहभाग घेतला तसेच कॉलेज जीवनामध्ये आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी विदेशी कापड जाळले. आपले पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याकाळचे राष्ट्रप्रेमी नेते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सावरकरांना कायद्याचे शिक्षण इंग्लंडमध्ये जाऊन पूर्ण करण्यासाठी मदत केली.

4) इ.स १८५७ मध्ये भारतात झालेल्या उठावाबद्दल इतिहास सावरकरांनी आपल्या ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात लिहिला पण हा ग्रंथ ब्रिटिश सरकारने प्रकाशनापूर्वीच जप्त केला. शासनाविरुद्ध लिखाण केल्याबद्दल सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिशांनी जन्मठेपेची शिक्षा दिली.

5) इ.स १९११ मध्ये न्यायाधीश जॅक्सन यांच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षाच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.

6) १९२४ मध्ये सावरकरांची अंदमानातून सुटका झाली पण रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे, राजकारणात भाग न घेणे अशी बंधने ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर लादली. या दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नागिरीत अनेक समाजसुधारणा केल्या. हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली.

7) ब्रिटिशांनी अकरा वर्षे त्यांना काळकोठडीत ठेवले. त्यांचे आतोनात हाल केले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथा कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. मरणप्राय वेदना दिल्या पण स्वातंत्र्यवीर सावरकर सर्व गोष्टी सहन करत राहिले कारण त्यांच्यापुढे ध्येय होते ते फक्त आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य.

क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू समाजाला संघटित करणारे सावरकर, हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडणारे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अन्यायाविरुद्ध लेखन करणारे सावरकर, समाजसुधारक सावरकर, अशा अनेक रूपात सावरकरांनी आपल्या मातृभूमीसाठी योगदान दिले.

हे जरूर वाचा- गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण

जास्त टीव्ही बघत असाल तर तयार व्हा या परिणामांना सामोरे जायला…

tv effects

टीव्ही का बघावा? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर तो म्हणेल “गप बस..जा घरी..”परंतु नकळत होणारे टीव्हीचे दुष्परिणाम जर थोडेसे अभ्यासले तर कळेल की वर्षानुवर्षे एकच गोष्ट करीत राहिल्याने काही व्यक्ती त्यांच्या जीवनात फिल्मी वाक्ये बोलू लागतात किंवा सिरीयलमध्ये जसे घडत असेल तसेच वागत राहतात, मग ती स्त्रीच्या नटण्याची लकब असो किंवा पुरुषाचा फक्त एका स्त्रीसाठी हजारो लोकांचा केलेला घात असो.

सर्व काही नाटकीयदृष्ट्या एवढे सजवलेले असते की बोलायची सोय नाही. असेच काही परिणाम जे बालपणापासून ते तरुण होईपर्यंत होत राहतात ते या लेखात मांडण्यात आले आहेत आणि उपरोक्त आयुष्य कसे नाटकीय होत जाते याबद्दल देखील चर्चा केली आहे.

१. हिंसाचार        

आपण टीव्हीवर काय बघतो यावर आपला स्वभाव किंवा आपल्या सुप्त इच्छा काय आहेत हे समजू शकतं. आपला कल हिंसाचार बघण्यात असेल तर वेळीच सावधान व्हा, कारण आपल्या इच्छेनुसार जर आपण काहीही बघत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्यावर पर्यायाने आपल्या मुलांवर होऊ शकतो. सारखं एकच बघत राहिल्याने तस करण्याची जाणीव निर्माण होऊ लागते.

मग हिंसाचार झाला की त्याचे परिणामही स्वतःलाच भोगावे लागतात. एक अभिनेता त्याच्या वडीलाच्या झालेल्या अपमानाने पेटून उठून पूर्ण कत्तलखानाच उघडतो आणि ज्या गुंडाने अस केलं त्यापेक्षाही मोठा गुंड होऊन दाखवतो. तरुणाई तर सरळ सरळ भाईगिरीचीच भाषा बोलत असते. मुन्ना भाई ,जग्गु दादा हे त्यांचे आदर्श झालेले दिसतायेत.

२. व्यसन

आज जर आपण पाहिले तर सर्रास टीव्हीवर व्यसन केलेलं दाखवतात. मोठमोठे स्टार्स ज्यांना आपण देव मानतो (भारतात तरी) अशा लोकांनी सिगारेट ओढली आणि थोडी स्टायल मारली की तरुणाई लगेच आकर्षित! मग त्यांचा प्रेमभंग झाला की लगेच दारू! हे सर्व स्टार्स पुढील पिढीला एक संदेशच पोचवत असतात. मज्जा करा, काहीही करा, अशा संदेशाद्वारे पुर्ण पिढी नाकरती बनू शकते याची जाणीव त्यांना होत नसते.   

एकदा कोणत्याही गोष्टीची सवय लागली की शरीर त्यासाठी वारंवार मागणी करू लागते. मग ते कोणत्याही प्रकारचं व्यसन असो. वयाच्या सोळाव्या वर्षी मज्जा म्हणून केलेलं व्यसन आज त्याला शांतपणे झोपू देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती का निर्माण झाली असावी. टीव्हीत दाखवण्यात येणारे स्टार्स व्यसन केल्यानंतर मज्जा करतात त्यांना तरुणाई कायम मिळालेली आहे, असे खोटे खोटे पण खरे करून दाखवलेले असते. परंतु सामान्य माणूस? खरा अनुभव जर कसोटी म्हणून वापरला तर लक्षात येईल की त्याच्या आयुष्याची कशी वाट लागत गेली आहे.

३. उच्च कोटीचा राग   

टीव्हीत जर बघितलं तर कोणी कोणाला नुसतं बोललं तरी त्याचा निर्घृण खून केला जातो अशा प्रकारचं भयानक दृश्य जर लहान मूल बघत असेल तर तो त्याची वागणूक म्हणून रागाचाच स्वीकार करेल. थोड्या थोड्या गोष्टींवर अति प्रतिसाद देणं आणि तेही रागाच्या भरात! याचा परिणाम खूप दुरगामी होऊ शकतो. आज नात्यात होत जाणारे बदल किंवा वारंवार होणारे घटस्फोट हे याचेच परिणाम आहेत हे कोणाला सांगूनही पटणार नाही.

टिव्हीत दाखवल्याप्रमाणे आपण आपली एक खोटी प्रतिमा प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे रचत जातो त्या प्रतिमेला जर कोणी धक्का लावला की झालेच वाद म्हणून समजा! या वादाची कलाटणी म्हणजे घे घटस्फोट! स्वैर आणि मुक्त स्वभाव हा टीव्हीत दाखवल्याप्रमाणे कधीही नसतो.

४. लोभ आणि शर्यत   

‘माझे स्वप्न आणि त्यासाठी होणारी शर्यत असे जीवन म्हणजेच काहीतरी वेगळं जगणं’ हे टीव्हीमार्फतच आपल्याला कळतं. त्याचा योग्य अर्थ न लावता आपण अवास्तव अशी स्वप्न घेऊन बसतो. मग लहान मुलांचे काय होत असेल? ते विनाकारण प्रौढ व्यक्तींसारखे वागत राहतात. त्यांच्या जगण्यातला निरागसपणा जाऊन एक वेगळीच गैरसमजूत आपल्याला नेहमी जाणवते. एक मोठी कार, मोठे घर असणे म्हणजे प्रतिष्ठा त्यासाठी आयुष्य गेले तरी चालेल अशी भावनाच जीवनाला उदात्त बनू देत नाही.

मग मोठा माणूस म्हणजे ज्याच्याकडे पैसा जास्त! मग अशातून राजकारण किंवा पिळवणुकीची सर्व माध्यमे करिअर म्हणून निवडली जातात. आयुष्य गेले तर गेले, वाट लागली तर लागली. आज एक मोठा नेता व्यवस्थित मरत नाही. बालमनावर झालेले हे असे लोभेचे व लालासेचे संस्कार, जीवनाबद्दल पाठ आणि एक न संपणारी जीवघेणी शर्यत त्यांना एका खोल गर्तेत घेऊन जाते.

५. नकारात्मकता

प्रेम फक्त हिरो आणि हिरोईन यांच्यातच असते बाकीचे सर्व आपापल्या घरी. मग फक्त एका जाणिवेतून येणारी नकारात्मकता खूपच छान दिग्दर्शित केली जाते आणि त्याला अवॉर्डसुद्धा दिला जातो. पण हीच नकारात्मकता ते समाजमनात किती खोलवर रुजवत आहेत याची जाणीव त्यांना नसावी. असेच घडते रोजच्या मालिकेतूनसुद्धा! वर्षानुवर्षे घरातून बाहेर न पडलेल्या व्यक्तींचे घराघरात कसे वाकयुद्ध होत असते हे बघणे म्हणजे एक पर्वणीच असते.

ती पर्वणी फक्त नकारात्मकता दाखवल्यामुळेच येते हे लोकांना कळत नाही. आणि रोजच्या जीवनातसुद्धा त्या मालिकेतल्या भावना कशा शिरकाव करून जातात हे त्या त्या व्यक्तीच्या वागण्यातूनच कळते. अलिकडे तर सर्रास वासनामय आणि व्यसनयुक्त अशा वेबसिरीज येतायेत. त्यांना त्यांचा मजबूत असा मोबदला मिळतो पण आपल्याला काय मिळते? त्यांची शरीरलालसा! त्यांचे व्यसन करण्याचे प्रकार! की आपल्या ज्ञानात थोडीशी भर म्हणून दारूच्या बाटल्यांची नावे!                 

या सर्वात आपला वेळ वाया जातोय पर्यायाने आयुष्यही! हे कळण्यासाठी थोडे दिवस या परिणामांव्यतिरिक्त काहीतरी चांगले आयुष्यात जोपासा जे अंतरप्रेरणेतून आलेले असेल.

हे हि वाचा- हि ५ राज्ये आहेत भारतातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध राज्ये.

गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण

gopalkalaa

“कृष्ण लीला” हे आपण फक्त दिलेले नाव आहे. जेव्हा विमुक्तपणे जगण्याची कल्पना अंतरंगात रुजू लागते तेव्हा लीला घडत जाते. कुठल्याही गोष्टीत आनंद शोधणे आणि कुठल्याही परिस्थितीला हसत सामोरे जाणे म्हणजेच लीला होय. अशा लीलेचा प्रकार म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो. 

काय असेल हा खेळ?       

हा प्रश्न सगळ्याना पडू शकतो. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो की कृष्ण आपल्या सवंगड्यासोबत हा खेळ खेळायचे. पण खरी स्थिती म्हणजे ती एक चोरी असायची. कृष्ण स्वतः जगण्याची कला जगण्यातूनच शिकवतात. ते लहान असताना एवढे खोडकर होते की प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासोबत कोणत्या ना कोणत्या तक्रारीने जोडलेले असायचे. त्या काळी किंवा कृष्ण ज्या कुळी वाढले ते कुळ म्हणजे म्हणजे गोकुळ. गायी, अनेक पाळीव जनावरे प्रत्येकाच्या घरी असणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जायचे आणि तो त्या कुळाचा धर्मच समजला जायचा. त्यामुळे दूध, दही याची कधी कमतरताच नसायची. कृष्णाच्या घरीसुद्धा कशाची कमी नव्हती पण गप्प बसेल तो कृष्ण कसला?       

प्रत्येकाला स्वतःच्या चर्चेत गुंतवून ठेवणे आणि काहीतरी विलक्षण करत जाणे हेच लहानपणी कृष्णाचे काम. अशाच एका कामाची भर म्हणून दह्याची चोरी करणे. त्या काळी दही मडक्यात ठेऊन टांगले जायचे. लहान मुलांच्या हाती लागणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली जायची. कृष्ण आणि त्याचे सवंगडी रात्री घराची कौले काढून किंवा जसे शक्य होईल तसे घरात घुसून दही चोरत असत. दही चोरताना ते मडके हाती येण्यासाठी एकावर एक थर अशा प्रकारे रचना करून कृष्ण स्वतः ते दही चोरी करून सर्व सवंगड्यांसोबत खात असत.

हे हि जरूर वाचासांगलीतील पुरामुळे त्या निष्पाप मुलीला मिळालं नवं जीवन…

एक मजेशीर खेळ किंवा एक साहस म्हणून ते हा प्रकार करत असत. दही सर्वांच्याच घरी असायचे त्यामुळे त्याची चोरी करताना काही हेतू वगैरे नसायचा तर निखळ आनंद आणि मनमुराद खट्याळपणा हेच प्रत्येक क्षणी उद्देश्य असायचे. याचीच पुनरावृत्ती पुढील पिढ्यांतील लहान मुलांनी केलेली दिसते व त्याची परिणीती आज एका सामाजिक उत्सवात झालेली आहे…दहीहंडी!  

दैवी तरीही मानवी प्रतीक – श्रीकृष्ण…

krishna

ज्या गोष्टी आपल्याला उमजत नाहीत किंवा अनुभवात नाहीत त्याबद्दल न बोलने कधीही हितकारक ठरते, असा जर निकष ठेवला तर आपण काही सत्ये जाणून घेऊ शकतो. ती सत्ये आपल्या बुद्धीच्या व मनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वाशी निगडित होत जातात. माणूस जस-जसा उत्तरोत्तर शिकत जातो, तस-तसे त्याला जीवन आणखी कळत जाते.

“कृष्ण म्हणजे पूर्ण अस्तित्व, भगवंत, परमोच्च अवस्था, जीवनाची एक आनंदी अभिव्यक्ती, असे आपण फक्त लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. प्रत्येक मानवी जीवनाची ती अवस्था होऊ शकते का? असा जर प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला, तर आपले आयुष्य त्या दिशेने मार्गस्थ होऊ शकते”      

कृष्ण सगळ्याना माहित आहे तो म्हणजे एक सखा , एक प्रेमी, राजकारणी , अध्यात्मिक गुरू. प्रत्येक व्यक्तीसाठी कृष्ण हा वेगवेगळा भासत आलेला आहे. दुर्योधन व कौरव यांना तो एक मायावी पुरुष, पांडव व अर्जुन यांना तो एक गुरू,हितचिंतक तर अनेक गोपिकांना तो स्वतःचा प्रेमी, अशा विविध छटा एका व्यक्तीच्या असू शकतात? तर थोडा विचार केल्यास कळेल की आपल्याला जे हवं असतं तेच आपण दुनियेत बघत असतो. आपले पूर्ण अस्तित्व ज्या दिशेने चाललेले असते त्यासंबंधित सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटू लागतात आणि परिणामी तेच आपलं जीवन बनून जातं. महाभारतात तर इतक्या प्रकारच्या व्यक्ती सापडतात की सर्व मानवी अपेक्षा, ईर्ष्या, आनंद, महत्त्वकांक्षा, वासना यांचा एकत्र संगम असलेला भासतो. त्यामुळे कृष्ण इतका विविधरंगी होत गेला आहे.        

पाच हजार वर्षे उलटून देखील एखादे व्यक्तिमत्व इतके जीवंत वाटावे हा काही योग नव्हे तर प्रत्येक मानवी जीवन हे आपले सर्व अस्तित्व कृष्णावरच थोपवते. कृष्ण जिवंत असतानाही आणि आज नसतानाही. आपले जसे आयुष्य आहे किंवा आकांक्षा आहेत त्यापद्धतीनेच आपण कोणालाही जाणू शकतो, कृष्ण आपल्या बाजूने कोणतीही अपेक्षा, आकांक्षा निर्माण करत नाही याउलट ज्या व्यक्ती कृष्णाला जसे समजतात तसेच कृष्ण त्यांच्यापुढे व्यक्त होतो. जी व्यक्ती खूप आनंदी असेल त्या व्यक्तीला कृष्ण परमोच्च आनंद म्हणून जाणवला आहे. जी व्यक्ती धूर्त असेल त्या व्यक्तीला कृष्ण मायावी जाणवला आहे. जी व्यक्ती प्रेमळ असेल त्या व्यक्तीला कृष्ण प्रेमी म्ह्णून जाणवला आहे. जी व्यक्ती ज्ञानी असेल त्याला कृष्ण उत्तम ज्ञानी म्हणून तर जी व्यक्ती भक्त असेल त्या व्यक्तीला कृष्ण भगवंत म्हणून जाणवला आहे.     

व्यक्ती तशी प्रकृती, दृष्टी तशी सृष्टी, अन्न तसे मन. या म्हणी जशा प्रचलित आहेत त्या नुसार जर विचार केला तर आपण जसे तसे कृष्ण. व्यर्थपणे आपल्या देवाबद्दलच्या संकल्पना कृष्णापुढे सादर करू नये. आपले रोजचे जीवन कसे आहे? आपण कशाच्या शोधात आहोत? आणि आपण कुठल्या मार्गाने आणखी जीवनाभिमुख होऊ शकतो? याचा फक्त विचार करायचा. असे करत राहिल्यास फुकटचा विश्वास निर्माण न होता एक स्वतःबद्दल, अस्तित्वाबद्दल श्रद्धा निर्माण होईल .       

प्रत्येक क्षण जसे कृष्ण स्वतःला जाणत असतील त्याचा कधीतरी आपण अंगीकार केला पाहिजे. कृष्ण स्वतःहुन काय अनुभव करत असतील. जर ते परामावतार असतील तर ते तसाच अनुभव करत असतील. हे तर सामान्य बुद्धिला पण पटेल. आजपर्यंत आपण त्यांच्या फक्त कथा, घटना आणि त्यांचे कार्य ऐकलेले आहे. ते सर्व कार्य, घटना या दुसऱ्या व्यक्तींशी निगडित होत्या. स्वतः कृष्ण जर परम अस्तित्व असतील तर त्यांनी काय केले? काय नाही केले? काय करायला पाहिजे होते? या सर्वांचा विचार न करता, ज्या घटना त्यावेळी घडत गेल्या त्यानुसार सर्वात योग्य असा मार्गच त्यांनी निवडला असेल असासुद्धा विचार आपण करू शकतो.       

‘कृष्ण’ एक अस्तित्व म्हणून आपण जाणून घेऊ शकतो का? त्याबद्दल थोडीशी आपली जिज्ञासू वृत्ती वाढवू शकतो का? असा विचार करावा लागेल. तरच कृष्ण या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल, मुत्सद्दी राजकारण्याबद्दल, मनोरंगी प्रेमीबद्दल, सर्वोत्तम गुरुबद्दल, जिवाभावाच्या सख्याबद्दल थोडासा न्याय करता येईल. कृष्ण जसे जगले त्याचा गाभार्थ लक्षात घेऊन आपणही आपले जीवन कृतार्थ बनवू शकतो.     

कृष्ण, तथ्य म्हणून जीवन जगण्याची कला आणि सत्य म्हणून पूर्ण अस्तित्व असेच व्यक्त झाले आहेत. एक सहजच जगण्याची उर्मी देऊन जाणारा ‘कृष्णजन्माष्टमी’ हा सण सर्वांच्या जीवनात आनंदच घेऊन येईल अशी आशा. फक्त वरवर दिसणाऱ्या कृती जसे दहीहंडी फोडणे, उपवास धरणे, विविध कार्यक्रम आयोजित करणे या सर्वांमधून देखील एक निखळ आनंद शोधुया आणि या जन्माष्टमीला स्वतःचे आयुष्य कसे उदात्त बनेल याकडे लक्ष देऊया.

मराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत…

मराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत…

best marathi books

काही पुस्तके भलतीच छंद देऊन जातात. आज या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच खूप कमी लोक वाचनाचा छंद जोपासून असतील. तरीही जर पुढच्या पिढीला वाचनाचा अभिजात अनुभव जाणून घ्यायचा असेल आणि रोजच्या जीवनापेक्षा उदात्त अशा काही संकल्पना अनुभवायच्या असतील तर मराठी साहित्य आणि काही पुस्तके त्यासाठी खूपच उपयुक्त ठरतील

आज आम्ही अशाच प्रकारच्या ५ पुस्तकांबद्दल माहिती सांगणार आहोत जी तुम्हांला एक वेगळेच विश्व देऊन जातील. जीवनातल्या विविध पैलुंवर विचार करायला लावणारी अशी ही पुस्तके आहेत. 

१.श्यामची आई- 

Image result for shyamchi aai

आपला आईबद्दल रोजचा अनुभव तसा कुरकुर करण्यातच जात असतो. आईलाच खूप साऱ्या गोष्टी आपण समजवत असतो. आपण फक्त बुद्धीच्या पातळीवर विचार करत असतो पण तिचे काम व तिची कुटुंबात,आपल्या मुलांत असणारी समरसता आपण जाणून घेत नाही. श्याम, त्याची परिस्थिती, जीवनाची उत्सुकता, गुरुस्थानी असणारी त्याची आई,आणि मानवी संवेदनशील मन या सर्वांचे कथन “श्यामची आई ” या पुस्तकात केलेले आहे.

साने गुरुजी कसे घडले असतील याचं उत्तर या पुस्तकात सापडतं. आईने वेळोवेळी केलेले संस्कार साने गुरुजींच्या आयुष्यात कसे उपयोगी आले हे काही प्रसंगाच्या माध्यमातून योग्यरित्या मांडण्यात आले आहे. आज आपण मुलांना फक्त वरचेवर संस्कार देत असतो पण त्याचे प्रात्यक्षिक आपल्या आयुष्यात दिसत नाही, असे न करता लहान मुलांसाठी योग्य जडणघडण कशी असू शकते हे “श्यामची आई ” पुस्तक वाचल्यावरच कळते.

२.मृत्युंजय

Image result for mrutyunjay book in marathi

महाभारत म्हणजे सामाजिक, आध्यात्मिक, व राजकीय समीकरण. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित मिलाप. भगवान कृष्ण केंद्रबिंदु बनून जरी उपस्थित असले तरी एकाच कुटुंबातला संघर्ष फक्त लालसेने कसा उद्भवला व कृष्णाची लीला या सर्वांना कुठल्या धार्मिक दिशेला घेऊन गेली याबद्दल आपण सर्वजण जाणतो पण ‘शिवाजी सावंत’ यांनी कर्ण या व्यक्तिरेखेला एक वेगळीच छटा देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.    

कर्ण महाभारतात कसा घडत गेला, जन्मतः मिळालेली दिव्यशक्ती, स्वतःचे खरे कूळ काय याची त्याला माहिती न होणे, त्याचा वेळोवेळी होणारा अपमान , त्याची सर्वोत्तम धनुर्धर होण्याची दुर्दम इच्छाशक्ती, उत्तरोत्तर आयुष्यात घेतले गेलेले निर्णय हे सर्व  त्याला कोणकोणत्या मार्गाने घेऊन जाते व त्याचे परिणाम म्हणून त्याचा झालेला अंत या सर्व घटना एकत्रितपणे “मृत्युंजय” या पुस्तकात मांडलेल्या आहेत. या कथेचा नायक कर्ण हा अनेक मानवी श्रेष्ठ गुणांचा अधिपती म्हणून वर्णिला गेला आहे.

३. कोसला-

Image result for kosala  book in marathi

खानदेशातील एका खेड्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या पांडुरंग सांगवीकर या तरुणाची ही कथा आहे. शिक्षण, लग्न, अध्यात्म, राजकारण या सर्व पैलूंवर त्याचे विचार कसे बदलत जातात याचे ज्वलंत व मार्मिक कथन ‘कोसला’ या पुस्तकात भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे.

सर्व स्तरांवर कार्यरत असलेल्या लोकांचा खोटेपणा, जीवनाबद्दल असलेली उदासीनता, नीतिमत्तेच्या नावाखाली असणारा भंपकपणा अशा अनेक गोष्टी कथेतल्या तरुणाला समाजापासून तोडत जातात किंबहुना तोच तुटत जातो. संवेदनशील मन असलेल्या लोकांसाठी ‘कोसला’ म्हणजे वास्तववादी समाजातील जगण शिकवून जाते.

४. छावा

Image result for chhava  book in marathi

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले हे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाची गंगा, साहित्यप्रेमी, संवेदनशील तितकेच पराक्रमी, शूरवीर. दातृत्वात मिळालेली कर्तृत्वाची धार तशीच अविरत चालू ठेवत आपल्या पराक्रमाने पुरते मोगल साम्राज्य हादरवून सोडणारे संभाजी महाराज यांचे वर्णन शिवाजी सावंत यांनी ‘छावा’ या कादंबरीत केलेलं आहे.    

उद्दम पराक्रमाने शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते तसेच अबाधित राखण्यासाठी त्यांच्यानंतर केले गेलेले प्रयत्न, राणी सोयराबाई व त्यांचे पुत्र राजाराम यांची स्वराज्य हाताळण्यासाठीची भूमिका, संभाजी राजांचा त्याला असलेला अजाणता विरोध, एकही युद्ध न हरता वाढवलेल स्वराज्य, ऐन  तारुण्यात आलेला भयावह मृत्यु या सर्व घटनांचे ज्वलंत कथन शिवाजी सावंत यांनी केले आहे. भाषेचा कणखरपणा आणि इतिहासाची पुनरावृत्ती मांडण्यात शिवाजी सावंत पुरेपूर यशस्वी झालेले आहेत.

५. ययाती- 

Image result for yayati  book in marathi

ययाती नामक राजा महाभारत काळात होऊन गेला. त्याच्याकडे सर्व वैभव असूनदेखील त्याची न पूर्ण होणारी कामवासना , त्या वासनेसाठी त्याने घेतलेले निर्णय त्याला खूप कष्टदायी कसे ठरतात व कर्तृत्व असूनदेखील आयुष्य कसे नर्क बनत जाते याचे सादरीकरण वि.स.खांडेकर यांनी आपल्या ‘ययाती’ या कादंबरीत केले आहे.   

स्वतः वारंवार कामवासनेकडे आकर्षित होऊन स्वतःच्या मुलाचेदेखील आयुष्य जगणाऱ्या या राजाची कथा खूपच रंजक स्वरूपात मांडली गेली आहे. या पुस्तकातून जीवन, त्यातले उपभोग व मृत्यू यांची स्पष्टोक्त अशी माहिती मिळते.   

तस बघायला गेलं तर मराठी साहित्य हे अजरामर आहे. या पाच पुस्तकांव्यतिरिक्त देखील खूप सारी पुस्तके आहेत जी तुम्हाला मराठी म्हणून जन्माला आल्यावर वाचलीच पाहिजेत.

तुमच्यामते अशी कोणती पुस्तके आहेत, ती आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे.

मोदी सरकार लोकशाहीसाठी घातक की नवीन भारताचा विकासात्मक उदय?

Is Modi govt dangerous for Democracy

लोकशाही मध्ये त्या देशातील प्रत्येक व्यक्ती ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असते लोकशाही म्हणजे तरी काय? लोकांनी लोकांसाठी लोकांकडून निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. मग राज्य करताना आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधी कडून लोकशाही पाळली जाते का? हे बघणे त्या राज्यातील नागरिकांचे काम असते.

पण हल्लीची परिस्थिती ही खूप वेगळी आहे. वर वर बघता सगळ्या गोष्टी ह्या लोकशाहीच्या व्यवस्थेकडून पद्धतशीरपणे करून घेतल्या आहेत पण जर आपण बारकाईने विचार केल्यास एक विचार मनात येतो की, देशासाठी लाभदायक निर्णय घेण्यात जर लोकशाहीच आडवी येत असेल तर खरच ती लोकशाहीची व्यवस्था पाळणे आवश्यक असते का? मोदी सरकारचे काही निर्णय खूप धाडसी स्वरूपातील आहेत. मग ती नोट बंदी असुदेत किंवा जी.एस.टी चा निर्णय व इतक्यातच घेतलेले तिहेरी तलाक व कलम ३७० हटवण्याचा निर्णय, या सगळ्या गोष्टी देशाने आनंदाने स्वीकारल्या.

नोट बंदी घालण्यात आली तेव्हा या देशातील लोक काहीही प्रतिप्रश्न न करता ए.टी.एम व बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहिले. पण प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हे सगळे निर्णय लोकशाही साठी घातक तर नाहीत ना? एका मिनिटा मध्ये १००० च्या नोटेला किंमत राहत नाही. असच राहिलं तर कोणताही निर्णय घेताना लोकांना डावलण्यात येईल व एकप्रकारे हुकुमशाही सुरू होईल. मग कशाला पाहिजेत निवडणुका आणि कशाला पाहिजेत लोकप्रतिनिधी. सगळ्याच गोष्टी जर ठरवून कोणालाही विचारात न घेता होणार असतील तर या व्यवस्थेला कोणताच अर्थ राहत नाही.

मोदी सरकार लोकशाहीसाठी घातक आहे अस का वाटतं याच उत्तर त्यांनी घेतलेल्या अलीकडच्या काळातील निर्णयामुळे दिसून येत आहे. त्यांनी जो काश्मीर बद्दल निर्णय घेतला त्या निर्णयाला अक्षरशः या देशातील लोकांनी डोक्यावर घेतले. पण एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कलम ३७० काढून टाकणं हा एकवेळ संपूर्ण देशाचा मुद्दा आहे अस आपण समजू शकतो पण जम्मू आणि काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेश करणे तसेच त्याला विभागून अजून एक लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश करणे व त्या राज्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता तसेच त्यांच्या कडून कोणताही विचार न घेता निर्णय घेणे. तसेच तो निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना नजरबंद करणे. त्या राज्यातील कोणत्याही नागरिकाला घराच्या बाहेर पडू न देणे. प्रत्येक घराच्या बाहेर एक हत्यारबंद सैनिक उभा करणे, ही खरच लोकशाही आहे का? असा प्रश्न या ठिकाणी नेहमी पडत राहतो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशातील लोकांना या सगळ्या गोष्टी खूप सामान्य वाटतात. आज जे जम्मू आणि काश्मीर मध्ये झालं उद्या ते इतर राज्यात झाल तर, तेव्हा मात्र लोकशाहीचे रक्षक समोर येतील. शेवटी मात्र एक गोष्ट वाटत राहते ती म्हणजे मोदी सरकार हे लोकशाहीला घातक आहे की नाही हे ठरवणाऱ्या लोकांचाच खूप आधी लोकशाही वरून विश्वास उडाला आहे एवढे मात्र नक्की.

आता या देशात लोकशाहीच्या मुल्यांपेक्षा देशाचे हित कशात आहे हे बघितले जात आहे. आपल्या देशातील लोकशाही कोणत्याही एका सरकारमुळे धोक्यात येऊ शकत नाही किंवा कोणतेही सरकार त्याला घातक ठरू शकत नाही. कारण प्रत्येक सरकार हे आपआपल्या पद्धतीने लोकशाहीचा उपयोग करत असते. तसेच या शासन पद्धतीत पळवाटांचे प्रमाण इतके जास्त आहे की कोणाला ही दोष देणे बरोबर नाही. शेवटी देशाचा विकास होणं महत्वाचं आहे तसेच मोदी सरकार नवीन भारत तयार करण्यासाठी कामाला लागले आहे आता आपल्या देशाचा ते विकासात्मक उदय करते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जरूर वाचा- हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू

नक्की आहे तरी काय, हे कलम ३७0 व ३५ (अ)…

कलम ३७0 व कलम ३५ अ

आज सकाळीच भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये भारताच्या संविधानमधील कलम ३७0 व कलम ३५ अ काढून टाकण्यासंबंधी प्रस्थाव मांडला व तो राज्यसभेने बहुमताने मंजूर सुद्धा केला. मोदी सरकारने घेतलेल्या या ऐतहासिक निर्णयाचे स्वागत आज संपूर्ण देशाने केले. या क्रांतिकारक निर्णयाची नोंद हि इतिहासात केली जाईल.

काय आहे कलम ३५ (अ) व कलम 3७0?

१) कलम ३५ (अ) मध्ये जम्मू काश्मीर ला स्वताचा संविधान व राज्यासाठी काही विशेष कायदे तयार करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

२) कलम 370 मध्ये जम्मू आणि काश्मीर विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता व त्यामुळे भारतातले काही कायदे जम्मू काश्मीर मध्ये लागू होत नव्हते.

३) या कलमांमुळे जम्मू काश्मीर बाहेरील व्यक्तींना राज्यातील कोणतीही संपत्ती विकत घेता येत नव्हती तसेच राज्य सरकारने तयार केलेल्या विविध योजनांचा लाभ फक्त जम्मू काश्मीर मधील लोकांनाच मिळत होता.

४) जम्मू आणि काश्मीर मध्ये दुहेरी नागरिकत्व होते त्यामध्ये एक म्हणजे भारतीय आणि दुसर म्हणजे काश्मिरी पण आता हि कलम हटवल्यामुळे आता काश्मीर मधल्या लोकांना फक्त भारतीय हेच एक नागरिकत्व असणार आहे. यामुळे पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीला लगाम लावण्यात येऊ शकते.

५) कलम 370 मुळे केंद्र सरकारला कोणताही कायदा आणण्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारची परवानगी घ्यावी लागत असे.

६) कलम 370 मुळे सरकारला जम्मू आणि काश्मीर मध्ये आर्थिक आणीबाणी लादण्याचा कोणताही अधिकार नव्हता. तसेच राज्याबाहेरील व्यक्तींना नोकरी मिळणे सुद्धा कठीण होते.

७) कलम 370 मधील तरतुदीमुळे जम्मू आणि काश्मिर ची घटना बरकास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नव्हता तसेच फक्त संरक्षण , विदेशी, दळणवळण संबंधीचे कायदे बनवण्याचा अधिकार हा केद्र सरकारला होता.

८) या कलमातील तरतुदींमुळे जम्मू आणि काश्मीर ला स्वताचा स्वतंत्र असा झेंडा होता. आता हि कलम हटवल्या मुळे भारताचा तिरंगा हाच एक ध्वज असेल. मोदी सरकारनुसार जम्मू आणि काश्मीर मधल्या दहशतवादाचे व अशांततेचे कलम ३५ (अ) व कलम 370 अस्तित्वात असणे हीच कारणे आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

तसेच जम्मू आणि काश्मीर चा पूर्ण राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याचे २ केंद्र प्रदेशमध्ये विभाजन करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर हे आता विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश असेल तर लडाख हे चंडीगड प्रमाणे फक्त केंद्रशासित प्रदेश असेल.

अमरनाथ यात्रेवरील दहशदवादी हल्ल्याचा कट रोखण्यात सैन्यदल यशस्वी