जागतिक आरोग्य संघटना (WHO) – मराठी माहिती |

प्रस्तुत लेख हा जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation Marathi Mahiti) या विषयावर आधारित मराठी माहिती आहे. या लेखात या संस्थेची स्थापना, कार्य आणि उद्देश्य अशा बाबींची चर्चा करण्यात आलेली आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO meaning In MarathI) –

सर्व देशांत साहचर्य वाढून आपापसांत कोणताही कलह निर्माण न होता मैत्रीपूर्ण व्यवहार वाढावा यासाठी संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली. या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य संस्था (World Health Organisation) कार्यरत आहे.

WHO व्यतिरिक्त UNESCO, World Bank, IMF या संस्था देखील संयुक्त राष्ट्रांच्या निगराणी खाली काम करतात. जागतिक आरोग्य संस्था ही आरोग्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करते.

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व देशांतील सक्षम आणि कर्तबगार लोक या संस्थेशी निगडित असतात. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जेनेव्हा (स्विझरलँड) येथे आहे.

संपूर्ण जगभरात ६ मुख्य कार्यालये आणि १५० विभागीय कार्यालये आहेत. भारतातील मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. ७ एप्रिल रोजी या संस्थेची स्थापना झाल्याने या दिवशीच “जागतिक आरोग्य दिन” साजरा केला जातो.

उद्देश्य –

• जगातील सर्व देशांत आरोग्य संदर्भात सहकार्य आणि साहचर्य वाढले पाहिजे. गरीब देशांना महामारीच्या काळात मदत व्हावी म्हणजेच वैद्यकीय औषधे, सेवा आणि आर्थिक निधी या बाबींचा पुरवठा करता यावा.

• उत्तम आरोग्य संबंधित कोणतेही तंत्रज्ञान, वस्तू, यंत्रे अथवा उपचार पद्धती उपलब्ध असेल तर तिचा लाभ प्रत्येक व्यक्ती, समाज आणि राष्ट्राला देता यावा.

• आरोग्य संबंधित कोणीही स्वतःला वाटेल तसे उपचार न करता संशोधनातून सिद्ध झालेल्या उपचार पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही. त्यासाठी तशी नियमावली आणि उपचार पद्धती तयार करणे.

• प्रत्येक देशाला विशिष्ट आजाराबद्दल नियमावली पुरवणे आणि त्यासंदर्भात सूचना प्रदान करणे. जाहीर केलेल्या सूचना व नियमांचे पालन प्रत्येक स्तरावर होण्यासाठी तशी यंत्रणा स्थापन करून योग्य व्यवस्थापन करणे.

संशोधन कार्य –

• कमीत कमी वेळेत असाध्य किंवा दुर्धर आजारांवर परिणामकारक उपचार पद्धती विकसित करणे. त्यासाठी योग्य प्रकारे संशोधन पद्धतीचा अवलंब करणे.

• महामारीवर लवकरात लवकर औषध / लस उपलब्ध करून देणे. आत्तापर्यंत पोलिओ, ईबोला आणि स्मॉल पॉक्स या असाध्य आजारांवर मात करण्यात WHO या संघटनेने यश मिळवलेले आहे.

• कोरोना या विषाणूविरोधी देखील ज्या लसी तयार झाल्या त्यांना मान्यता देण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेने केले. या महामारी वेळी या संस्थेने जाहीर केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन केल्याचे निदर्शनास आले.

अत्यंत महत्त्वाचे अनेकदा विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)

प्रश्न १) WHO चा full form काय आहे?
उत्तर – World Health Organisation

प्रश्न २) जागतिक आरोग्य संघटनेसाठी निधी कसा गोळा केला जातो?
उत्तर – संशोधन, औषधनिर्मिती आणि वैद्यकीय यंत्रनिर्मीती अशा विविध कार्यांसाठी लागणारा निधी हा सभासद असणाऱ्या देशांकडून प्रत्येक वर्षी गोळा केला जातो.

प्रश्न ३) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जेनेव्हा, स्विझरलँड या देशात आहे.

तुम्हाला जागतिक आरोग्य संघटना (WHO) – मराठी माहिती (WHO Information In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…

Leave a Comment