दातांची काळजी कशी घ्याल?

शरीरातील सर्व अवयव चांगले कार्यरत असतील तर आपण स्वस्थ अनुभव करत असतो. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयव कसा काय निकामी होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

दात हा देखील महत्त्वाचा अवयव आहे. दातांचे विकार होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. तोंडात हिरड्या आणि दात असे दोन प्रकारचे अवयव असतात. त्यांची काळजी घेण्यासाठी होणाऱ्या विकारांबद्दल योग्य स्वरूपाची माहिती असणे गरजेचे आहे.

हिरड्या, जीभ या अत्यंत संवेदनशील तर दात हे टणक असतात. दातांचे प्रमुख कार्य म्हणजे तोंडातले पदार्थ ठीक पद्धतीने चावून खाणे. दातांना कीड लागणे, त्यांची झीज होणे, दात पिवळे पडणे असे दातांचे काही साधारणतः आढळणारे विकार आहेत.

ते विकार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा त्यांची योग्यप्रकारे काळजीच घेतलेली बरी ठरते. त्यामध्ये खालील बाबींचा अथवा सवयींचा लाभ तुम्हाला होऊ शकतो.

• दातांची साफसफाई –

आपण दररोज ब्रश करतो. परंतु निष्काळजीपणाने केलेला ब्रश हा कधीही घातक ठरू शकतो. त्यामुळे हिरड्यांना दुखापत होऊ शकते किंवा दात व्यवस्थित साफ होणार नाहीत.

दात पिवळे पडले असल्यास वेळोवेळी ते दंतरोगतज्ञाकडून साफ करून घेणे आवश्यक आहे. जशी आपण शरीराची स्वच्छता नियमित ठेवतो तशीच दातांची स्वच्छता देखील ठेवायला हवी.

• दातांची वेळोवेळी तपासणी –

दात वर्षातून दोनदा तरी तपासून घ्यावेत जेणेकरून आपले दुर्लक्ष झाले तरी दातांची योग्य ती काळजी घेतली जाईल. सध्या दातांचा दवाखाना हा ठिकठिकाणी उपलब्ध असल्याने आपण डॉक्टरचा सल्ला नक्कीच घेऊ शकतो.

• अति कठीण पदार्थ टाळणे –

चावायला कठीण असणारे अथवा शिळे झालेले खाद्यपदार्थ टाळावेत. तसे खाद्य पदार्थ खाल्ल्यास आपल्या दातांची झीज होऊ शकते आणि हिरड्यांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते.

• दातांचे विकार लगेच दूर करणे –

एखादा दात किडला असला तर तो दात भरता येतो, ती कीड खोलवर गेली असली आणि दात ठणकत असला तर दंतनलिका उपचार (रुट कॅनल ट्रीटमेंट) करुन घ्यावी. त्यामध्ये दातावर एक दातासारखी कॅप लावण्याचा सल्ला दिला जातो.

काहीवेळा गंभीर कीड असेल तर त्या परिस्थितीत दात काढावा लागतो आणि दुसरा नकली दात बसवता येतो. परंतु अशा उपचारात हिरड्या मजबूत असणे गरजेचे राहते.

• व्यसन टाळणे आणि पोषक आहार घेणे –

आपला आहार हा पोषक असायला हवा. ज्यामुळे शरीरातील सर्व अवयव हे स्वस्थ राहू शकतील अगदी दात आणि हिरड्या देखील! त्याशिवाय कोणताही घातक पदार्थ (व्यसन) चावून खाणे टाळावे. दातांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल.

दात स्वच्छ राहावेत म्हणून नियमित असाव्या अशा सोप्प्या सवयी –

१. दिवसातून दोनदा ब्रश करावा.

२. जेवणानंतर पाण्याने गुळणी / कुल्ला करावा.

३. आठवड्याला दातांचे निरीक्षण करावे. (आरशात पहावेत)

तुम्हाला दातांची काळजी कशी घ्याल हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment