हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज विजय रथावर स्वार आहेत. हात लावतील ती गोष्ट पूर्ण करण्याची धमक एकप्रकारे त्यांच्यात आहे. आज पर्यंत तुम्ही त्यांच्याबाबतीत किती तरी गोष्टी ऐकल्या असतील पण त्यांचे गुरू कोण हे खूप कमी लोकांना माहिती असणार आहे.

बालपणी रेल्वे मध्ये चहा विक्री करणारा मुलगा तिथून संघाशी असणार नात व थेट गुजरात चे मुखयमंत्री बनून १२ वर्षे गुजरातच्या जनतेची सेवा करून हे राज्यव्यापी नेत्रुव जेव्हा राष्ट्रीय नेतृत्व बनते व संपूर्ण देशाला विकासाची स्वप्न दाखवून २०१४ साली मिळवलेले पंतप्रधानपद आणि पुढे ही ५ वर्ष न थकता एकही सुट्टी न घेता देशाची केलेली सेवा व यावरूनच २०१९ मध्ये निवडणुकीमध्ये जनतेने त्यांच्याबाजूने दिलेला कौल यातून त्यांचा जीवनप्रवास किती थक्क करणारा आहे हे दिसून येते.

पण यामध्ये ते घडले कसे त्यांना घडवणारी लोकं कोण होती? ते कोणाला आपला आदर्श मानतात असे असंख्य प्रश्न आपल्याला मनात नेहमी येत असतात तर याचे आज आम्ही आपणास उत्तर देणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू आहेत कै.लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब). संघ परिवारात ते वकीलसाहेब म्हणून ते प्रचलित होतें. आयुष्यभर त्यांनी संघाचे विचार तळागळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम केले आहे. सहकार भारतीची स्थापना व विस्तार ही त्यांच्याच काळात झाला. कै.लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांचे गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लहापणापासूनच कै.लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांचे मार्गदर्शन लाभले. कै.लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांचें जन्मगाव असणाऱ्या खटाव मधील जिहे कटापुर ह्या योजनेचे नामकरण लक्ष्मणराव इनामदार जीहे कठापुर जलसिंचन योजना असे करण्यात आले असून या योजनेचे काम थोड्याच दिवसात पूर्ण होईल असा विश्वास येतील अधिकाऱ्यांना आहे.

“मी कुराण वाटणार नाही” न्यायालयाच्या आदेशानंतरही रीचा भारतीचा नकार !

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू कै.लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांच्या नावे असणारी ही महत्त्वाकांक्षी योजनेचे लोकार्पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होईल असे लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

1 thought on “हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू”

Leave a Comment