Don't do these 5 things after food
Image credit- healthline

जेवण झाल्यावर कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत यासंबंधी समाजात अनेक समज गैरसमज आहेत. पूर्वी पासून अशा गोष्टी आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकत आलो आहोत. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी जर तुम्ही जेवणानंतर केल्या तर त्या तुमच्या आरोग्यासाठी धोकदायक ठरू शकतात व यातून किती तरी व्याधी निर्माण होऊ शकतात. अशा गोष्टींपासून दूर राहणे नेहमी सोयीस्कर पडते. तर बघुयात कोणत्या आहेत अशा गोष्टी!

१) धूम्रपान करू नये-

धूम्रपान करणे हे आपल्या आरोग्याला प्रचंड धोकादायक आहे. धूम्रपानामुळे आपल्याला कॅन्सर सारखा असहाय्य असा रोग सुध्दा होऊ शकतो. म्हणजेच धूम्रपान कधीही केला तरी ते धोकादायकच आहे पण ते अजून जास्त धोकदायक बनते जेव्हा आपण जेवण झाल्यावर धूम्रपान करतो. तेव्हा १ वेळा सिगारेट ओढणे म्हणजे १० वेळा सिगारेट ओढल्यासारखा धोका आपल्याला निर्माण होऊ शकतो त्यामुळे जेवण केल्या नंतर धूम्रपान चुकून सुध्दा करू नका. सगळ्यात म्हणजे कधीही धूम्रपान करूच नका.

२) अंघोळ करू नका-

काही लोकांना जगावेगळ्या सवयी असतात त्यातीलच एक म्हणजे जेवण झाल्यावर अंघोळ करणे होय. पण ही सवय खूप धोकादायक ठरू शकते. जेवण झाल्यानंतर जर आपण अंघोळ केली तर पोटाच्या बाजूला असलेल्या रक्ताचे प्रमाण खूप कमी होऊन ते शरीराच्या इतर भागात जाऊ शकते व याचा परिणाम आपल्या पचन प्रक्रिया बिघडू शकते व अन्न पचनहोण्यासाठी रक्ताची कमी जाणवते व अपचन सारख्या समस्या उद्भवतात त्यामुळे जेवण झाल्यानंतर अंघोळ न केलेलीच बरी.

३) फळे खाणे टाळा-

तुम्ही आता विचार करत असाल की फळे खाणे हे कसे आरोग्यास हानिकारक असू शकते पण फळे ही योग्य वेळी खानेच नेहमी उत्तम असते. जेवणापूर्वी अर्धातास व जेवणानंतर अर्धा तास फळे खाणे आपल्या आरोग्यास धोकदायक ठरू शकते. कारण फळे जेवणानंतर खाल्ली तर ती पचन क्रियेला अडथळा निर्माण करतात त्यामुळे शक्यतो जेवणानंतर फळे खाणे टाळावीत.

४) चहा व कॉफी पिणे टाळा-

जेवणानंतर चहा व कॉफी पिणे ही आजकाल फॅशन झाली आहे. पण हे किती तरी आरोग्यास हानिकारक असू शकते याचा विचारच न केलेला बरा. जेवणानंतर चहा व कॉफी पिल्याने आपल्या शरीरात घातक असे रसायन तयार होतात व त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे जेवण झाल्यावर चहा किंवा कॉफी पिणे टाळा.

५) लगेच झोपू नका-

जेवण केल्यानंतर सुस्ती येणे ही खूप सामान्य बाब आहे पण जेवल्यानंतर लगेचच झोपणे हे आपल्या आरोग्याला धोकदायक ठरू शकते. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यामुळे आपल्या पोटातील अन्न योग्य प्रकारे पचत नाही त्यामुळे विविध प्रकारचे धोके उद्भवू शकतात त्यामुळे जेवण झाल्यावर लगेचच झोपू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here