Richa Bharati say no to Kuran distribution
image credit- ANI

फेसबुक वर धार्मिक भावनांना ठेच पोहचवल्या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेली रिचा भारती हिने
कुराण वाटण्यास नकार दिला आहे. ती या न्यायालयाच्या निर्णयावर अपील दाखल करणार आहे. जामिनावर
सुटल्यानंतर रिचा भारती यांना भेटण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी व पत्रकार यांनी रिचा भारती यांच्या घरी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी हे विधान केले व झालेल्या शिक्षेबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा करून आपले मत व्यक्त केले.

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील अशी पोस्ट रिचा भारती यांनी केली होती याबद्दल सुनावणी करताना न्यायालयाने रिचा भारती हिला शिक्षा सुनावली व धार्मिक काम करण्याचे आदेश दिले. यामध्ये तिला ५ कुराण च्या प्रती वाटण्याची शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रती १५ दिवसाच्या आत वाटण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर रिचा भारती व तिचे कुटुंबीय नाराज झाले असून त्यांनी कुराण वाटणार नाही पण त्याबद्दल त्यांनी या निकालावर अपील दाखल करण्याचे ठरवले आहे.

आपल्या शिक्षे बद्दल बोलताना रिचा भारती म्हणाल्या की मी सगळ्या धर्माचा आदर करते पण आम्ही कुराण वाटणार नाही. आज कुराण वाटायला सांगितल उद्या धर्म स्वीकारण्यास सांगतील असा सवाल रिचा भारती यांनी केला. तसेच रिचा भारती व तिचे कुटुंब याबद्दल कायदेशीर सल्ला घेत आहेत व या निर्णयाबद्दल ते वरच्या न्यायलायात जाण्याच्या तयारीत असून त्यांच्या घराची सुरक्षा सुद्धा वाढीवली आहे.

हे आहेत महाराष्ट्रातील ७ निसर्गसौदर्याचे वरदान..पाहून थक्क व्हाल!

रिचा यापुढे असा म्हणाली की जी शिक्षा तिला मिळाली तीच शिक्षा हिंदू धर्माविरुद्ध लिहणाऱ्या व्यक्तींना मिळेल का.? आणि जरी अशी शिक्षा मिळाली तरी ते ही शिक्षा पाळतील का.? त्यांना जर हनुमान चालीसा वाचायला लावली जिव्हा दुर्गा पूजा करायला सांगितली तर ते करतील का.? असे उलट प्रश्न विचारून ती म्हणाली की ती गेली ३ वर्ष झाली सोशल मीडिया वर आपले मत व्यक्त करत आहे आणि एक भारताची एक सुजाण नागरिक म्हणून ती यापुढे हे करत राहील.

रिचा भारती ही झारखंड राज्याची राजधानी रांची पासून २० किमी वर असणाऱ्या पिठोरिया येथे राहत असून ती बीकॉम ची विद्यार्थिनी आहे. १२ जुलै रोजी तिला सोशल मीडिया वरच्या पोस्ट मुळे धार्मिक भावना दुखावल्या या आरोपावरून अटक करण्यात आली होती आता ती जामिनावर आहे. तसेच याला विरोध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुध्दा केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here