दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi |

दहशतवाद ही एक गंभीर समस्या आहे. संपूर्ण मानवजातीसाठी तो एक कलंक आहे, असे म्हणता येईल. दहशतवाद किंवा आतंकवाद म्हणजे काय हे कळण्यासाठी आणि त्याची कारणे, परिणाम व उपाय यांवर संपूर्ण माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना दहशतवाद हा मराठी निबंध (Terrorism Essay In Marathi) लिहावा लागतो.

दहशतवाद / आतंकवाद मराठी निबंध | Dahashatvad Marathi Nibandh |

दहशतवाद म्हणजे मानवी जीवन आणि सुव्यवस्था यांस धोका निर्माण करणे. दहशतवाद ही एक प्रकट स्वरूपाची हिंसा आहे. बॉंबस्फोट घडवून आणणे, गोळीबार करणे, शस्त्रास्त्र पुरवठा करून हिंसा घडवणे, असे एक ना अनेक प्रकारे दहशतवाद उफाळून येत असतो.

प्रथमतः दहशतवाद ही कुठल्या विशिष्ट देशाची समस्या नाही तर ती संपूर्ण मानवतेसाठी घातक असलेली जागतिक समस्या आहे. राजकीय स्वार्थासाठी धर्म, जात, स्वातंत्र्य, देशाची सीमा, समूहावर अत्याचार असे मुद्दे पुढे आणले जातात आणि मग हिंसा घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला जातो.

दहशतवादी कारवायांची सुरुवात अत्यंत छोट्या स्तरावरून होते. त्याचे संहारक परिणामसुद्धा पाहायला मिळतात. दहशतवादाला सहाय्यक असणारे दुवे सत्तेत असल्याने अशा संघटना कायम आतंकी हल्ला करतच असतात. त्यांना विरोध म्हणजे मग आपली सुरक्षा व्यवस्था त्यांच्या विरोधात लढते.

आतंकी हल्ल्याचे परिणाम संपूर्ण समाजमनावर होत असतात. त्यामुळे समाज कधीच स्वतंत्र आणि सुरक्षित अनुभव करत नाही. शिवाय हिंसाचार, प्राणहानी व वित्तहानी होतेच. त्याचे परिणाम मग कुटुंब स्तरावर, वैयक्तिक स्तरावर भोगायला लागतात.

मागील काही दशकांत भारत तसेच अन्य काही देशांनी दहशतवादाचे परिणाम भोगलेले आहेत. काश्मीर तसेच अन्य भारतीय प्रांतात आतंकवादी आणि नक्षलवादी हल्ले होतच राहतात, परंतु ते होण्याची कारणे काय असू शकतील? याचाही अत्यंत जाणीवपूर्वक विचार व्हायला हवा.

दहशतवादाचे प्रमुख कारण म्हणजे लहानपणापासून व्यक्तीच्या मनात भरवले जाणारे नकारात्मक विचार आणि भावना! त्या व्यक्तीला एखादा प्रांत, देश आपला शत्रूच आहे असे सर्वप्रथम शिकवले जाते आणि मग त्या देशाविरोधात लढण्यासाठी त्याला तयार केले जाते.

देशाच्या सुरक्षेसाठी आपण शस्त्र हातात घेतले आहे असे न शिकवता शत्रूला मारणे आणि हिंसा घडवणे असेच दहशतवाद्यांना शिकवले जाते. लहानपणी बंदूक हातात देऊन आप्तेष्ट, प्रिय व्यक्तींना मारून टाकणे, चुकीच्या पद्धतीने धर्माची शिकवण देणे आणि मोठेपणी हवा तसा व्यक्तीचा उपयोग करून घेणे, अशी उद्दिष्ट्ये आतंकवादी संघटनांची असतात.

दहशतवादी व्यक्तीला समजतच नाही की त्याचे संस्कार चुकीचे आहेत. त्यामुळे हिंसा, नशा आणि कत्तल करताना त्याला काहीच वाटत नाही. मनात प्रेम, करुणा या भावनांचा विकास न घडवता शस्त्रास्त्रांचे पारंगत शिक्षण मात्र दिले जाते. इथे व्यक्तीचा विकास दृष्टीत न ठेवता एका मोठ्या हत्याकांडात त्याला सामील करून घेतले जाते.

सर्व देशातील सरकार शिक्षणाबद्दल आग्रही असले पाहिजे. संपूर्ण पृथ्वीवर कोणी कोणाचा शत्रू नाहीये, असे मनात भरवले पाहिजे. देशाची सुरक्षा महत्त्वाची पण आक्रमणाला दुजोरा देता कामा नये. आतंकवादी संघटना समूळ नष्ट करून त्या विरोधात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक कायदे निर्मित झाले पाहिजेत.

प्रत्येक देशाने जर आपापल्या संस्कृती आणि धर्मानुसार जगण्याची प्राथमिकता ठरवली तर नागरिकांमध्ये योग्य शिक्षण आणि मूल्ये यांचा विकास करता येणे शक्य होईल. नाहीतर अजुन किती वर्षे संपूर्ण जग आणि विविध देश या दहशतवादाचे परिणाम भोगणार आहेत कोण जाणे!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला दहशतवाद मराठी निबंध (Terrorism Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi |”

Leave a Comment