घड्याळ बंद पडले तर मराठी निबंध | Ghadyal Band Padle Tar Marathi Nibandh |

वेळेचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती वेळ आपल्याला घड्याळामुळे समजते. ते घड्याळच बंद पडले तर.. अशा कल्पनेचा विस्तार करून घड्याळ बंद पडले तर हा निबंध (Ghadyal Band Padle Tar Marathi Nibandh) लिहायचा असतो. चला तर विस्तारपूर्वक पाहुयात कसा लिहू शकाल हा निबंध!

घड्याळ बंद पडले तर | Ghadyal Band Padle Tar Essay In Marathi

आज मला शाळेत जायला उशीर झाला होता. त्यामुळे एक तास बाहेर उभे राहण्याची शिक्षा देखील मिळाली होती. त्या एक तासात मी दहा – बारा वेळा तरी घड्याळ बघितले असेल. वेळेची एवढी चिंता आणि सतत घड्याळाकडे बघत राहणे, त्यावरून माझ्या डोक्यात एक विचार आला, समजा घड्याळच बंद पडले तर..

घड्याळ बंद पडलेच तर मानवी जीवनातील वेळ नाहीशी होईल. दिवस, आठवडा, महिना, वर्ष अशी कालगणना करता येणार नाही. माणसाचा जीवनकाळ ठरवता येणार नाही. सर्व सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था कोलमडून पडेल.

वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती वेळ आपल्याला घड्याळातून कळते. घड्याळाचे बंद पडणे म्हणजे आपल्या कामात आणि जगण्यात सुव्यवस्था राहणार नाही. कोणतीच कामे वेळेवर होणार नाहीत. कोणत्या गोष्टीला किती वेळ लागला पाहिजे त्यावर नियंत्रण राहणार नाही.

घड्याळ नसल्याचा एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे तणावमुक्तता! आपण सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त वेळेशी बांधले गेलेले आहोत. त्यामुळे आपले मन आणि विचार देखील सतत भविष्य आणि भूतकाळात गुंतलेले असते. जर घड्याळ बंद पडलेच तर प्रत्येक कामात जागरूकता आणि सातत्य येऊ शकेल.

आपले आरोग्य हे शारिरीक आणि मानसिक स्वरूपाचे असते. घड्याळ नसल्यावर अचानक मानसिक धावपळ नाहीशी होईल आणि आयुष्यात निवांतपणा येईल! कामे एकदम सुसंगत होतील. वैयक्तिक स्तरावर मानसिक शांती लाभेल. शारिरीक परिश्रम केले जाईल पण त्यातून कामावर संपूर्ण लक्ष देणे सोयीस्कर होईल.

घड्याळ नसल्यावर सामाजिक किंवा कौटुंबिक स्थिरता आणि व्यवस्था जाणवणार नाही. प्रत्येक काम आणि ते काम पूर्ण करण्याची गती यावर नियंत्रण राहणार नाही. वेळेवर कामाची गती अवलंबून असल्याने वेळेचे महत्त्व कामात राहणार नाही.

त्यामुळे सामाजिक प्रगती, औद्योगिक विकास मोजता येणार नाही. व्यक्तीचे कौशल्य वाढत आहे की घटत आहे तेही समजणार नाही. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक सुव्यवस्था नियोजित पद्धतीने राबवता येणार नाही.

घड्याळ बंद पडले तर वैयक्तिक स्तरावर फायदे आहेत पण कधी कधी व्यक्ती निवांत राहून आळशी बनू शकतो. त्याच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा कालखंड आणि मापदंड त्याला कळणार नाही. घड्याळाचा काटा सतत पाठीशी असल्यावर आपल्या आयुष्यात असणारी गती नाहीशी होईल.

घड्याळ कधीही बंद पडू नये परंतु वेळेची सतत टांगती असणारी तलवार मात्र नसावी. वेळ आणि घड्याळाचा वापर कळण्यासाठी नियोजित शिक्षण आणि व्यवस्था अवलंबली गेली पाहिजे जेथे घड्याळ तर असेल, सर्वजण वेळेचे महत्त्वसुद्धा जाणतील पण कोणीही वेळेशी बांधले गेले नसतील!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला घड्याळ बंद पडले तर (Ghadyal Band Padle Tar Marathi Nibandh) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा….

1 thought on “घड्याळ बंद पडले तर मराठी निबंध | Ghadyal Band Padle Tar Marathi Nibandh |”

  1. खूप छान निबंध लिहिला आहे सर तूमी 🙏👍👌👌👌👌

    Reply

Leave a Comment