Essay On Dog in Marathi | माझा आवडता प्राणी – कुत्रा!

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. त्याच्या अनेक प्रजाती प्रत्येक देशात आढळतात. कुत्र्याला इंग्लिशमध्ये डॉग असे म्हणतात. कुत्र्याला चार पाय, एक शेपटी, एक लांब असे तोंड, दोन कान आणि दोन डोळे असतात. कुत्रा हा भूचर सस्तन प्राणी आहे. कुत्र्याला शुद्ध भाषेत श्वान असेदेखील संबोधले जाते. कुत्र्याच्या आवाजाला भुंकणे असे म्हणतात. कुत्रा प्राचीन काळापासून मनुष्याच्या सहवासात असल्याच्या कथा आहेत. कुत्र्यामुळे मानवाची वन्य प्राण्यांपासून सुरक्षितता होते. कुत्र्याला अन्न दिल्याने तो त्याच घरी पाळीव बनून जातो.

कुत्रा हा त्याच्या इमानदारीमुळे प्रसिद्ध आहे. प्रत्येक घराच्या रक्षणाची जबाबदारी कुत्र्याला दिलेली असते. कुत्र्याची वास घेण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे श्वानपथक नावाने पोलिस यंत्रणा कुत्र्यांना गुन्हे तपासणीच्या मदतीसाठी वापरतात. अनेक आजारांतदेखील कुत्र्यांचा वापर होतो. त्यांचा फक्त सहवासच अनेक मानसिक रोग दूर करतो. अशा उपचार प्रक्रियेला “डॉग थेरपी” असे म्हणतात. त्यांच्या सहवासामुळे मानसिक ताण कमी येतो.

कुत्र्यांचा आवडता आहार म्हणजे मांसाहार! कुत्र्याचे दात अणकुचीदार असल्याने मासे आणि मांस तो खूप आवडीने खातो तसेच शाकाहारी पदार्थही खातो. जगभरात कुत्र्याच्या ४०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. कुत्र्याची जास्तीतजास्त ४ फूट एवढी उंची असते. कुत्रा आणि लांडगा थोडे मिळतेजुळते आहेत. त्यांची प्रजाती एकच आहे. कुत्र्याची उत्पत्ती किंवा जडणघडण लांडग्यापासून झाली असावी असा निष्कर्ष आहे.

कुत्र्यांचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. रायगडावर आपल्याला शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते. युधिष्ठिर स्वर्गात जात असताना त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. श्री दत्तात्रेय महाराज त्यांच्या सानिध्यात कुत्री ठेवत असत.

भारतात आढळणाऱ्या कुत्र्याच्या जाती त्या त्या प्रदेशानुसार बदलत जातात. भारतभर आढळणारी कुत्र्याची जात म्हणजे इंडियन परीहा! हे कुत्रे खूपच काटक असतात. हिमालय पर्वत, उत्तर भारत आणि बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या कुत्र्याच्या जातीला इंडियन माउंटन डॉग असे संबोधले जाते. हा कुत्रा केसाळ आणि ताकतवर असतो. कान्नी (कण्णी) नावाची काळी जात तामिळनाडूत आढळते. हा कुत्रा लगेच माणसात मिसळतो तसेच तो प्रामाणिकही असतो. दक्षिण भारतात “कोंबई” आणि “चीप्पी पराई” नावाची कुत्र्याची प्रजाती आढळते. शेतीचे रक्षण करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते.

मुधोळ हाऊंड, कारवान हाऊंड किंवा पश्मी या जाती प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये आढळतात. पांढऱ्या, काळया आणि करड्या रंगाचे हे कुत्रे स्वभावाने आक्रमक असतात. दक्षिण भारतात आढळणारा राजपलमय आणि हिमालयातील स्थानिक माउंटन डॉग अशा जाती सीमा सुरक्षादलातर्फे श्वान पथकात वापरल्या जातात.

2 thoughts on “Essay On Dog in Marathi | माझा आवडता प्राणी – कुत्रा!”

Leave a Comment