शिवसेनेत येण्यासाठी राज्यातील नेते उत्सुक

राजकारणात पक्षनिष्ठा कशी असावी याचे सर्वात चांगले उदाहरण द्यायचे झालेच तर शिवसैनिक हा शब्द त्यासाठी योग्य ठरेल. पण ज्याप्रमाणे सत्ता बदलत जाते त्याप्रमाणे सत्तेच्या मागे जाणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. गेल्या ५ वर्षात भाजपा मध्ये झालेले पक्षप्रवेश हे त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ३० जुलै रोजी भाजपामध्ये अनेक जणांचे इन्कमिंग झाले त्यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप आता फुल्ल झाला आहे त्यामुळे यापुढे पक्षप्रवेश करताना मर्यादा येणार आहेत. याचाच अर्थ असा की भाजप आणि शिवसेना युती होणार असून पक्षात घेण्यासाठी आता भाजप कडे जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.

युतीत जरी अजून जागा ठरल्या नसल्या तरी दोघांनी आपआपल्या प्रभावाखाली असणाऱ्या जागांवर लढायची तयारी केलेली आहे. अशातच शिवसेनेत होणारे प्रवेश हे सुध्दा एक यात विशेष बाब समोर आली आहे. राज्यातील अनेक नेते शिवसेनेत यायला तयार आहेत. त्यासाठी मातोश्री वर येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक जिल्ह्यात छोटे मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. अशातच अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित. कारण त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे.

निर्मला गावित या काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. आदिवासी बहुल भागातून निवडून येणाऱ्या निर्मला गावित यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा हा काँग्रेस साठी आगामी काळात डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक असणारे दुसरे नाव आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी च्या नेत्या रश्मी बागल.

रश्मी बागल यांचे वडील मंत्री तर आई ह्या आमदार होत्या. त्यांचाही लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. एवढंच काय तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सुध्दा शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ मांडण्यात येत आहे.

जरूर वाचा- हि ५ राज्ये आहेत भारतातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध राज्ये.

Leave a Comment