Parineeti Chopra wants to work in marathi

परिणीती आजकाल तिच्या जबरिया जोडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्या सोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आहे. पुणे टाइम्सला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत परिणीती म्हणाली की तिला प्रियांकाप्रमाणेच हॉलिवूड आणि मराठी सिनेमातही काम करायचे आहे. ती पुढे म्हणाली, ‘मला प्रियांकाच्या मार्गावर जायचे आहे. पण सध्या मी bollyvood मध्ये काम करून खुश आहे आणि मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहे. ‘जबरीया जोडी’ मधील माझे पात्र आणि सिद्धार्थला पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.’

तिला कोणत्या प्रकारची भूमिका साकारायला आवडेल असे विचारले असता परिणीती म्हणाली की तिला एक दिवस मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. परिणीती म्हणाली, ‘मी सिद्धार्थशी मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलत होते. माझ्या मते मराठी चित्रपटात खरोखर गुणवत्ता आहे. वर्षात किमान चार चित्रपट येतात ज्यात नवीन गोष्टी, विषयांवर चर्चा असते.

आम्ही बॉलिवूड आणि बंगाली सिनेमाबद्दल बरेच बोलतो, पण मला वाटते की मराठी चित्रपट अप्रतिम आहेत. सचिन खेडेकर माझे आवडते आहेत. मला एक दिवस नक्कीच एक मराठी चित्रपट करायला आवडेल. जरी मला मराठी भाषा बोलता येत नसली तरी या चित्रपटांमधून ज्या प्रकारचे विषय उपस्थित झाले आहेत त्या मुळे मला नक्कीच मराठी चित्रपट करायला आवडेल.’

सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’ ची कमकुवत सुरुवात

निक जोनास बद्दल बोलताना परिणीती म्हणाली, निक एक फॅमिली मॅन आहे. त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्याभोवती असले पाहिजे. त्याला प्रत्येकाची जास्त काळजी आहे आणि तो एक सकारात्मक विचारसरणीचा माणूस आहे. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा कसा आनंद घ्यावा हे निकने मला शिकवले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here