‘बॉइज’ आणि ‘बॉइज 2’ या दोन्ही सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर आता सज्ज झालेत ते मुलींच्या दुनियेत न्यायला गर्ल्स सिनेमातून. या आगामी सिनेमाचा Girlz marathi movie teaser आणि Girlz Marathi movie Poster नुकतंच रिलीज केलं गेलं आहे.
Table of Contents
Girlz marathi movie teaser । गर्ल्स टिझर
Girlz teaser Review: या वर्षी “गर्ल्स” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉईज आणि बॉईज – २ या दोन्ही चित्रपटांना टक्कर देईल असाच हा चित्रपट असेल. बॉईज चित्रपटात मुलांच्या तारुण्यात घडणाऱ्या घटना आणि त्यांचा मुलींविषयी असणारा दृष्टिकोन हा दाखवण्यात आला होता.
आता या वेळी गर्ल्स या चित्रपटात देखील अशाच मुलींचा अवखळपणा व मौज मस्ती थोड्याशा जुजबी स्वरूपात दाखवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट जसे सामाजिक आणि निर्भिड विषय हाताळत आहेत तसेच प्रयोग मराठीतही सुरू झालेले आहेत. कामुक विनोदी असा खूपच बोल्ड विषय यावेळी हाताळण्यात आला आहे. विशाल देवरुखकर या दिग्दर्शकानं उचललेलं हे पाऊल कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे चित्रपट आल्यावरच कळेल.
मुली ज्या पद्धतीत वागतात, बोलतात त्यांचा समन्वय लावणे कधीकधी अवघड होऊन जाते. परंतु मुलींची चर्चा, त्यांचे विषय हेदेखील मुलांसारखे खट्याळ असतात पण उघड नसतात. हा चित्रपट पाहताना मात्र मज्जा येईल हे नक्की !
Girlz Movie Cast । गर्ल्स मूवी कास्ट
- प्रमुख भूमिका – पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड, केतकी नारायण, अंकिता लांडे, अन्विता फलटणकर.
- दिग्दर्शक – विशाल सखाराम देवरुखकर.
- स्टुडिओ – एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स.
- निर्माता – नरेन कुमार, सुजाता कुमार.
- सहाय्यक निर्माता – अमित भानुशाली.
- कथा आणि पटकथा – हृषिकेश कोळी.
- छायाचित्रकार – सिध्दार्थ.
- संगीत – प्रफुल्ल आणि स्वप्नील, समीर.
Girlz Marathi Movie Poster । गर्ल्स मराठी मूवी पोस्टर
Girlz marathi movie poster: या मूवी चा बोल्ड पोस्टर देखील खूप चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये तिन्ही नायिका टॉपलेस होताना दिसत आहेत आणि हेच आजच्या तरुणाईला आवडलेल दिसतंय. कारण बॉलीवूड प्रमाणे मराठीमध्ये देखील बोल्डनेस येताना दिसत आहे.
“आईच्या गावात बाराच्या भावात” हे गाणं होतंय प्रसिद्ध.
नुकतंच हे गाणं आलेलं आहे. यूट्यूबवर आणि चॅनेलवर हे गाणं येताच प्रसारमाध्यमांनी चांगलच उचलून धरलं आहे. तब्बल चौदा प्रयत्नानंतर हे गाणं यशस्वीरीत्या रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. प्रफुल आणि स्वप्नील यांना प्रत्येक रेकॉर्डिंग नंतर हे गाणं काही अधुरं आहे असं वाटत होतं, असे १३ वेळा रेकॉर्डिंग झाल्यानंतर हे गाणं १४ व्या वेळी पूर्ण करण्यात आलं.
इथे पाहू शकता संपूर्ण गाणं-
Aaichya Gavat Song Video – Movie Girlz | Marathi Songs | Vishal Sakharam Devrukhkar | Praful-Swapnil
आईच्या गावात बाराच्या भावात’ हा प्रसिद्ध डायलॉग मंदार चोळकर यांनी हेरला आणि गाणं लिहल. त्यांच्या शब्दांना प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि वैशाली सामंत, कविता राम आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.