हनी सिंग बद्दल या ५ गोष्टी कदाचित तुम्हाला अजूनही माहिती नसतील…

‘यो यो हनी सिंग….’ अस आपल्याला ज्या गाण्यात ऐकू येईल ते समजून जायचं की हनी सिंगचं गाणं आहे. रॅप व पाश्चात्य संगीताचा अभ्यास असणाऱ्या या गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेता अशा हरहुन्नरी ‘देसी कलाकार’ व्यक्तिमत्वाला आपल्या आयुष्यात गायनात खूप खस्ता खाव्या लागल्यात. आपल्या संगीत कौशल्याने पूर्ण जगाला वेड लावणाऱ्या या संगीतकाराबद्दल थोडं जाणून घेऊयात.

१.खरं नाव व शिक्षण– 

‘हिर्देश सिंग’ हे आपले मूळ नाव न वापरता ‘यो यो हनी सिंग’ नावाने करियर घडवणाऱ्या या व्यक्तीच संगीत शिक्षण ट्रिनिटी कॉलेज,यु.के. येथे झालं. संगीताचं शिक्षण घेतल्याने एखाद गाणं उत्तम बनवून ते कसं हिट होऊ शकतं याचं त्याला पुरेपूर ज्ञान आहे. त्याचा कल हा रॅप संगीताकडे जास्त आहे हे आपल्याला वारंवार जाणून येतं.

२. ‘यो यो’ चा अर्थ

‘यो यो’ म्हणजे ‘आपका अपना’ म्हणजेच मराठीत ‘तुमचा स्वतःचा’ किंवा ‘ तुमचा आपला’. या नावाबद्दल एका मुलाखतीत विचारले असता तो म्हणाला की जेव्हा मी गाण्यात यो यो वापरतो तेव्हा मला आपलेपणाची जाणीव होत असते.

३. सर्वात महागडा गायकसंगीतकार

सर्व चित्रपट कधी कधी १ कोटी रुपयांपर्यंत पूर्ण होतो. पण आपल्या फक्त आवाजाची जादु आजमावण्यासाठी व वाढती लोकप्रियता बघून ‘मसान’ आणि ‘कॉकटेल’ या दोन चित्रपटांकरिता गायनाचे त्याने तब्बल ७० लाख रुपये मानधन म्हणून स्वीकारलं. जे कुठल्याही संगीतकार गायकासाठी जास्तच आहे.

४.स्टाईल व लुक्स

२०१५-१६ या वर्षी तर सर्व तरुण हनी सिंगची जशी केशरचना होती तीच केशरचना करून घेण्यात व्यस्त होते. लहान लहान मुले तर गाण्याचा ‘हनी सिंग कट मारा’ असाच रट्टा घेऊन बसलेली असायची. या वर्षीदेखील त्याचा नवा लुक पहावयास मिळतो आहे. ‘मखना’ हे गाणं जर कोणी बघितलं असेल तर त्याच्या नवीन केशरचनेची कल्पना आपल्याला येईल.

५. ग्रॅमी अवॉर्ड जिंकण्याचं स्वप्न-

आजच्या युगात गाणं हिट पाहिजे तर रॅप पाहिजेच. जर कुणी खऱ्या अर्थाने रॅप संगीताला हिट केलं असेल तर तो आहे ‘हनी सिंग’. प्रत्येक संगीतकार आपल्या चित्रपटात यो यो ला गाणं गायला देणारचं असा ट्रेंडच निर्माण झाला होता. त्याला भारतातर्फे संगीतातील मानाचा समजला जाणारा ‘ग्रॅमी’ अवॉर्ड जिंकायचा आहे.

हे जरूर वाचा- आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गायक अॅकाॅन गाणार मराठीत?

Leave a Comment