Top 10 Best Marathi Movies । सर्वोत्तम मराठी चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टी तशी खूपच नावाजलेली आहे कारण दर्जेदार विषयांवर कमीत कमी खर्चात उत्तम फिल्म बनवणे हे खूपच विशेष म्हणावं लागेल. 10 Best Marathi movies निवडणे तसे अवघडच काम आहे. परंतु विशिष्ट प्रकारानुसार आणि विशिष्ट काळात बनवला गेलेला चित्रपट हा त्या काळातच तुलनात्मक असू शकतो. तरीही रंगीत सिनेमा आल्यापासून बनवले गेलेले खालील १० सर्वोत्तम मराठी चित्रपट हे प्रत्येक विषयानुरूप निवडले गेलेले आहेत आणि प्रत्येकाने ते पहावेत असेच आहेत. 

Best Marathi Movies । सर्वोत्तम मराठी चित्रपट

१. डोंबिवली फास्ट:

dombivali fast

माधव आपटे नामक सामान्य व्यक्तीची ही कहाणी आहे. साधा, सरळ व्यक्ती सिस्टिम विरूध्द बंड निवडतो आणि तो स्वतः मग भ्रष्टाचार आणि अन्यायात अडकतो. याची सविस्तर कथा या चित्रपटात दाखवली आहे.

हा व्यक्ती सुशिक्षित असल्याने बुद्धीची कुवत चांगली दाखवण्यात आलेली आहे.

Marathi Movie Download 2019 | नवीन मराठी चित्रपट डाउनलोड करा आता फ्री मध्ये

२. पिंजरा:

Pinjara

दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी पहिला रंगीत मराठी चित्रपट “पिंजरा” बनवला. श्रीराम लागू, संध्या आणि निळू फुले हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार होते.

एक सुसंस्कृत शिक्षक तमाशातील स्त्रीला बदलण्याचा प्रयत्न करतो परंतु स्वतः तिच्या प्रेमात पडतो याचे जिवंत चित्रण या चित्रपटात केले आहे.  

३. नटसम्राट:

natsamrat

Best marathi movies पैकी हा एक चित्रपट आहे. नाना पाटेकर यांच्या उत्तम अभिनयाने सुसज्ज झालेला हा सिनेमा अनेक प्रश्न मागे ठेऊन जातो. एका अभिनेत्याची होणारी तगमग आणि उतारवयात होणारा कौटुंबिक कलह उत्तमरित्या सादर करण्यात आला आहे. दर्जेदार अभिनय आणि संवाद ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत.

४. श्वास:

shwas

श्वास २००४ च्या ऑस्करमध्ये भारतीय प्रवेश म्हणून पाठविलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. आजोबा आणि नातू यांच्या नात्यातील मर्म आणि संवेदना दिग्दर्शकाने व्यवस्थित दाखवल्या आहेत. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे या चित्रपटातून कळते.

५. अशी ही बनवा बनवी:

Ashi hi banava banavi

हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत एक क्लासिक विनोदी चित्रपट म्हणून ओळखला जातो. सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा चित्रपट अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन बनवण्यात आला होता. यामध्ये सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुशांत रे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

६. जोगवा:

jogava

अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता “जोगवा” हा चित्रपट सामाजिक असमतोल दाखवतो. महाराष्ट्रातील देवदासी परंपरा आणि त्यांच्या समस्या या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आहेत. या चित्रपटातील विषय खूपच संवेदनशील असून दिग्दर्शक राजीव पाटील यांनी तो व्यवस्थित हाताळला आहे. चित्रपटात संगीत आणि अभिनय खूपच दर्जेदार आहे.

७. हरिश्चंद्राची फॅक्टरी:

 हरिश्चंद्राची फॅक्टरी

भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात कशी झाली आणि भारतातला पहिला चित्रपट बनवणारे दादासाहेब फाळके या मराठमोळ्या व्यक्तीची ही कहाणी आहे.  दादासाहेब फाळके यांच्या जीवनात चित्रपट बनवताना आलेले अनुभव या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत. दादासाहेब फाळके सतत हसतमुख आणि आत्मविश्वासाने भरलेले दाखवलेले आहेत. 

८. शाळा:

shala

मिलिंद बोकील यांच्या शाळा कादंबरीवरून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. शालेय जीवन आणि त्यातील किशोरवयीन प्रेम या दोन्हीतील गुंतागुंत या चित्रपटात मांडली आहे. शाळेतल्या खूपशा आठवणी या चित्रपटातून जाग्या होतात. एक सुंदर अनुभव हा पाहिल्यानंतर प्राप्त होतो.

९. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय:

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

दिनकर भोसले नामक मध्यमवर्गीय व्यक्तीची होणारी हेळसांड, त्याच्यावर असणारी जबाबदारी आणि त्याची त्यातून आलेली निराशा ही जीवन जगण्यास विरोध करते. आणि त्याचा दोष तो स्वतःला न देता स्वतःच्या जातीवर ठेवतो अशा परिस्थितीतून जात असताना स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्याला मोलाचे मार्गदर्शन करतात आणि त्याच्यात अमुलाग्र बदल घडवून आणतात. चित्रपटात सर्व अभिनेते उत्तम अभिनय सादर करतात. 

१०. देऊळ:

Deool

देऊळ चित्रपट मानवी स्वभावावर आणि सामाजिक नैतिकतेच्या दृष्टिकोनावर व्यवस्थित भाष्य करतो. धार्मिक विषय किती संवेदनशील असतो याचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे.

गावच्या ठिकाणी धर्मामुळे निर्माण झालेली तेढ,  व्यावसायिक संदर्भ आणि राजकारण यांचे मार्मिक उदाहरण हा चित्रपट स्पष्ट करतो. गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांनी दर्जेदार अभिनय केला आहे.

तर तुम्हाला हि Top 10 Best Marathi Movies ची लिस्ट कशी वाटली ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. आम्ही तुमच्या कंमेंट्स ची वाट पाहतोय.


Leave a Comment