माझा आवडता सण – दिवाळी मराठी निबंध | Essay On Diwali In Marathi |

माझा आवडता सण अशा विषयाचा एखादा निबंध शाळेत असताना लिहावा लागतो. त्यासाठी एखाद्या सणाबद्दलचे संपूर्ण ज्ञान आणि माहिती असणे आवश्यक असते. त्याचे सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्व जाणून घेतले पाहिजे. त्यावरून कोणताही सण तुम्ही आवडता सण म्हणून लिहू शकता.

दिवाळी या सणाबद्दल निबंध लिहताना तो सण का आवडतो, तसेच त्या सणाला केले जाणारे विविध विधी, उपक्रम यांच्याबद्दल माहिती लिहणे अपेक्षित असते. शक्यतो प्राथमिक शाळेत असताना हा निबंध लिहायला लावतात. चला तर मग बघुया दिवाळी – माझा आवडता सण हा निबंध! (Diwali Essay In Marathi)

My favourite Festival Diwali essay in marathi | दिवाळी – मराठी निबंध !

भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी! दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते. संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.

इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो. तब्बल चार दिवस या सणाचे महत्त्व असते. शेतीची सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो. त्याअगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.

दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो.

दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी केली जाते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीअगोदर एक दिवस आकाश कंदील आणि विजेच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते. सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात.

लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.

घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात. धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. सुगंधित उटणे आणि तेलाने स्वच्छ अंघोळ केली जाते. त्यानंतर फराळ केला जातो. त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा बलिप्रतिपदा! या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींचे आणि वस्तूंचे औक्षण केले जाते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण भावाला ओवाळते. भावाने नंतर काहीतरी भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो. त्यामुळे माझा दिवाळी हा आवडता सण आहे.

तुम्हाला माझा आवडता सण – दिवाळी हा मराठी निबंध (Essay On Diwali In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

6 thoughts on “माझा आवडता सण – दिवाळी मराठी निबंध | Essay On Diwali In Marathi |”

  1. Really your so great 👍 I mean thanks u lots of them to you support me please pray for me a good mark 1️⃣0️⃣ of 9️⃣or 1️⃣0️⃣🥇📝and one’s more thank u

    Reply

Leave a Comment