व्हॉट्सऍप मराठी निबंध । Whatsapp Marathi Nibandh ।

आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करत आहे. त्यामध्ये व्हॉट्सऍप हे खूपच प्रसिद्ध ऍप्लिकेशन आहे. व्हॉट्सऍपचे वापरकर्ते संपूर्ण जगभरात आहेत. लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना व्हॉट्सऍपची माहिती होण्यासाठी ते ऍप स्वतःहून वापरावे लागेल. त्यानंतर ते व्हॉट्सऍप निबंध (Whatsapp Marathi Nibandh) लिहू शकतात.

व्हॉट्सऍप मराठी निबंध | Whatsapp Essay In Marathi

हिरव्या वर्तुळाकार चिन्हामध्ये फोनचा लोगो कोणीही विसरू शकत नाही. दिवसातून बऱ्याच वेळा तो लोगो मोबाईलवर क्लिक केला जातो. तो लोगो म्हणजे एक ऍप आहे आणि त्याचे नाव आहे व्हॉट्सऍप! व्हॉट्सऍप उघडल्या उघडल्या पहिल्याच स्क्रीनवर व्हॉट्सऍप लोगोखाली “फ्रॉम फेसबुक” असे लिहलेले असते.

व्हॉट्सऍपचे सर्व मालकी हक्क आता फेसबुककडे आहेत. परंतु खरे पाहता जॅन कोम आणि ब्रायन अकटन हे दोघे व्हॉट्सपचे संस्थापक आहेत. व्हॉट्सऍप हे सर्वप्रथम नोव्हेंबर 2009 मध्ये आयफोनसाठी तयार करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट 2010 मध्ये अँड्रॉइड सिस्टिमसाठी या ऍपची निर्मिती झाली.

जर कोणाला या ऍपबद्दल माहीती नसेल तर गूगल प्ले स्टोअरमधून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता. व्हॉट्सऍप चालवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासते. व्हॉट्सऍप हे कितीतरी सुविधायुक्त असे ऍप आहे. त्यामध्ये कॉलिंग, मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध आहे.

एकमेकांस व्यक्तिगत संदेश पाठवण्यासाठी हे ऍप उपयुक्त आहे. मित्रांचे, नातेवाईकांचे, कर्मचाऱ्यांचे ग्रुप देखील आपण तयार करू शकतो. सर्वजण एकत्र त्या ग्रुपवर संवाद साधू शकतात. विविध ईमोजी आणि स्टिकर्स अशा संवादाचे आकर्षण वाढवतात. फोनमधील डॉक्युमेंट्स, लाईव्ह लोकेशन, संपर्क यादी अशी विविध वैशिष्टे व्हॉट्सऍपमध्ये उपलब्ध आहेत.

व्हॉट्सऍपवर आपण स्टेटस ठेवू शकतो. सध्या आपण काय करत आहोत याची माहिती आपल्या सर्व नातेवाईक आणि मित्रांना होण्यासाठी स्टेटस खूप आवश्यक ठरतो. विविध प्रकारचे फोटोज् आणि 30 सेकंद वेळ असलेले व्हिडिओज आपण स्टेटस म्हणून ठेवू शकतो.

काहीवेळा नेटवर्कची समस्या असल्यास व्हॉट्सऍप वरूनच आपण व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंग करू शकतो. व्हिडिओ कॉलिंगमध्ये अनेक जणांना एका वेळेस कनेक्ट करू शकतो. समोरील व्यक्तीचा स्पष्ट आवाज आणि व्हिडिओ कॉलिंगची गुणवत्ता ही व्हॉट्सऍप ची वैशिष्ट्ये म्हणता येतील.

ग्रुप ऍडमिनकडे विशिष्ट अधिकार प्राप्त झालेले असतात. कोणत्या सदस्याला ग्रुपमध्ये जोडायचे आहे त्याचा निर्णय ऍडमिन घेतो. व्हॉट्सऍप वर कमालीची सुरक्षितता पाळता येते. ऍपसाठी आपण पासवर्ड ठेवू शकतो. आपण कोणत्या वेळेस ऑनलाईन होतो याची माहिती इतरांना कळू शकते. तसेच त्याची प्रायव्हसी पाळायची असेल तरी सेटिंगमध्ये तसे पर्याय उपलब्ध आहेत.

व्हॉट्सऍप वापरणे फायदेशीर आहेच परंतु त्याची सवय लागता कामा नये. इतर महत्त्वाच्या कामात आपण व्हॉट्सऍप बंद ठेवले पाहिजे. सतत इतरांचे स्टेटस पाहणे आणि स्वतः स्टेटस ठेवणे हे अति होता कामा नये. कित्येक तास व्हॉट्सऍप वापरले तर डोळ्यांना थकवा येऊ शकतो. शरीरात आळस निर्माण होऊ शकतो.

व्हॉट्सऍपचा योग्य वापर वाढू द्या. अफवा, जातीधर्म, समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश पाठवू नका. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलात्मक ज्ञान वाढेल असे संदेश देखील तुम्ही पाठवू शकता. व्हॉट्सऍप हे आजच्या पिढीसाठी प्रभावी माध्यम आहे परंतु त्याचा जबाबदारीने वापर केला पाहिजे.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला व्हॉट्सऍप निबंध (Whatsapp Marathi Nibandh) कसा वाटला त्याबद्दल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Leave a Comment