भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडीजचा १३ सदस्यीय संघ _

जुलै महिन्यात भारत विरुध्द वेस्ट इंडीज हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात 12 जुलैपासून भारताविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

डॉमिनिकाच्या मैदानावर होणाऱ्या या कसोटी सामन्यात क्रेग ब्रॅथवेट हा विंडीज संघाचा कप्तान असणार आहे. अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलला देखील संघात स्थान मिळालेले आहे.

विश्वचषक पात्रता फेरी पूर्ण न करू शकलेला विंडीज संघ हा कमकुवत भासत असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले खेळाडू या संघात आहेत. त्यामुळे त्यांना कमी आखून चालणार नाही.

विश्वचषक पात्रता फेरीतील विंडीज संघातील जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांनाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय 2 नवखे खेळाडू कर्क मॅकेन्झी आणि अथानाज यांनाही संघात स्थान मिळाले आहे. या दोन्ही खेळाडूंचे पहिल्या कसोटीत पदार्पण अपेक्षित आहे.

बार्बाडोसमध्ये सराव पूर्ण करून विंडीज दौऱ्याच्या तयारीसाठी १० दिवस अगोदर पोहोचलेली टीम इंडिया आता पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी डॉमिनिकाला रवाना झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत.

पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजचा १३ सदस्यीय संघ –

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), अलिक अथानाज, तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रेफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

राखीव खेळाडू – टेविन इम्लेच आणि अकीम जॉर्डन.

Leave a Comment