ऑस्ट्रेलियाची ऍशेस मालिकेत २-० ने आघाडी _ इंग्लंड विरूध्द ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका _

इंग्लंडचा ४३ धावांनी निसटता पराभव…

Daily Marathi News | Latest Marathi News |

दिनांक – ०३ जुलै २०२३

इंग्लंडविषयी आपल्याला नक्कीच दुःख वाटले असेल कारण मायदेशात खेळताना देखील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने पुढील सामन्यांत त्यांना आता खूपच जोर लावावा लागेल.

पाचव्या दिवशी २५७ धावांची गरज असताना डकेट आणि स्टोक्स यांनी सावध सुरुवात केली. आजच्या दिवशी भागीदारीत ६३ धावा जोडल्यानंतर डकेट वैयक्तिक ८३ धावांवर बाद झाला. त्याला हेझलवूडने कॅरीद्वारे झेलबाद केले. त्यावेळी संघाचा स्कोअर १७७ होता.

बेयरस्टो खेळपट्टीवर आला खरा पण अवघ्या १० धावांवर असताना स्वतःच्या चुकीने यष्टीचीत झाला. चेंडू निष्काम झाला नसताना बेयरस्टोने फलंदाजीची रेषा ओलांडली आणि तेव्हाच कॅरीने चेंडू स्टंपवर मारला. नियमांनुसार बेयरस्टोला तिसऱ्या पंचांकडून बाद ठरवण्यात आले.

बेयरस्टो बाद झाल्यानंतर स्टोक्सने संघाची धुरा सांभाळली. स्टोक्स अगदीच आक्रमक खेळ करू लागला. त्याने ब्रॉडसोबत शतकी भागीदारी केली आणि पुढे १०८ धावा जोडल्या. संघाचा स्कोअर ३०१ असताना बेन स्टोक्स १५५ धावा काढून बाद झाला.

इंग्लंडचे तळाचे फलंदाज काही जास्त धावा जोडू शकले नाहीत आणि ३२७ धावांवर इंग्लंडची फलंदाजी आटोपली. स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूड यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. इंग्लंडला या सामन्यात अवघ्या ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

Leave a Comment