वनसंवर्धन दिन _ मराठी माहिती _ Forest Conservation Day 2023

प्रश्न – वनसंवर्धन दिन (Van sanvardhan Din) कधी साजरा केला जातो?
उत्तर – वनसंवर्धन दिन प्रत्येक वर्षी २३ जुलै रोजी साजरा केला जातो.

प्रस्तावना – मानवी लोकसंख्या वाढल्याने वनक्षेत्र कमी होत आहे. विकासाच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली अमाप वृक्षतोड केली जात आहे. त्याचा दुष्परिणाम हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीला भोगावा लागत आहे.

ही ज्वलंत समस्या ओळखून सार्वत्रिक वनसंवर्धन व्हावे अशी आशा ठेऊन आणि वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवून वनसंवर्धन दिन साजरा केला जाऊ शकतो.

वनसंवर्धन दिनाचे महत्त्व – Importance of Forest Conseravtion Day

• लोकसंख्या वाढ आणि त्यासोबतच विज्ञान – तंत्रज्ञान देखील विकसित झाल्याने मानवी गरजा वाढल्या. उच्चस्तरीय राहणीमान, आधुनिकता, भौतिक विकास हे जीवनाचे निकष बनून गेले.

• जीवनातील स्वकेंद्रित वृत्तीने निसर्गातील विविध घटकांचे नुकसान होत आहे याचे भानदेखील माणूस विसरत चालला असल्याने वनक्षेत्रे संवर्धित करण्याची गरज येऊन ठेपली आहे.

• वनक्षेत्र संवर्धित झाल्याने पृथ्वीवरील बहुतांश भाग हा प्रदूषण मुक्त राहण्यास मदत होईल जेणेकरून स्वच्छ पर्यावरण निर्मित होईल आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप असणार नाही.

• निसर्ग आपल्या पूर्ण स्वरूपात बहरू शकेल. पाऊस – वारा, पशुपक्षी, नद्या – नाले इ. सर्व प्रकारचे पर्यावरणीय घटक संतुलन साधू शकतील.

• वृक्षतोड विरोधात कायदे निर्मिती होणे गरजेचे आहे. सर्व जनसंख्या ही वृक्ष लागवड आणि त्यांची जोपासना याबाबतीत जागरूक व्हायला हवी. तसेच विकासाची संकल्पना ही आधुनिकता नसावी तर त्यामध्ये पर्यावरणीय समतोल देखील असावा.

• लोकसंख्या वाढ ही ज्वलंत समस्या असल्याने त्यावर देखील काम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच असजग रूपाने मानव निसर्गावर हल्लाबोल करत आहे.

• अशा सर्व प्रकारची विध्वंसक कारणे जाणून घेऊन आपल्याला नैसर्गिकरीत्या जगता येईल अशी एक समतोल दृष्टी निर्माण करावी लागेल.

• प्रत्येक पिढी ही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असावी असे वाटत असेल तर वनसंवर्धन दिन आणि अन्य पर्यावरणीय दिन मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायला हवेत.

• वनक्षेत्र वाढले तर अन्य प्रकारची सजीव सृष्टी देखील बहरेल. प्रत्येक प्रकारचा जीव येथे श्वास घेऊ शकेल. अशी दृष्टी ठेऊन आपण काम केल्यास येणारी काही वर्षे ही अत्यंत नैसर्गिक समतोल निर्माण करणारी असतील.

• वनसंवर्धन दिनाचे महत्त्व हे असाधारण पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे. फक्त जीवन जगण्याचा स्तर वाढवणे आणि त्यासाठी नैसर्गिक आपत्ती येईल अशी स्थिती निर्माण करणे याबाबतीत जागृती आवश्यक आहे.

• चला तर मग आपण २३ जुलै रोजी वन संवर्धित करण्याचा संकल्प करूयात आणि आपापल्या परीने वृक्ष लागवड, त्यांची जोपासना करणे याबाबतीत कृतिशील होऊयात…


तुम्हाला वनसंवर्धन दिन – मराठी माहिती (Van Sanvardhan Din Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment