झाड मराठी निबंध – इयत्ता ८वी ते १० वी| Tree Essay In Marathi |

आपल्या परिसरात सर्वत्र झाडेच झाडे असतात. झाडाचे उपयोग, फायदे आणि उपयुक्तता माहीत होण्यासाठी विद्यार्थ्यांना झाड या विषयावर निबंध लिहायला लावतात. अतिशयोक्ती न करता अगदी मापक शब्दात स्पष्ट वर्णन करून झाड हा मराठी निबंध (Tree Essay In Marathi) लिहायचा असतो.

झाड मराठी निबंध | Tree Marathi Nibandh

झाड आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. जेवढे सजीव अस्तित्व या पृथ्वीवर आहे त्यासाठी झाड अतिशय उपयुक्त आहे. झाडे ही निसर्गाचाच भाग आहेत. पृथ्वीवर पर्यावरण संतुलित ठेवण्याचे काम झाडे करत असतात. झाडे नसतीच तर आपण निसर्गाची कल्पनाच करू शकत नाही.

आपल्या आसपास झाडांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये झुडुपे, फळझाडे, फुलझाडे, काटेरी, उंच, शोभेची असे विविध प्रकार आहेत. आपण जी शेती करतो ती पिकेसुद्धा झाडांचाच प्रकार आहे. झाडाच्या खोडाचा आणि फांद्यांचा रंग मातकट तर पानांचा रंग हिरवा असतो.

झाडाचे कार्य हे निसर्ग नियमानुसार होत असते परंतु मानवी संज्ञेनुसार झाडाचे कार्य ऑक्सिजन निर्मितीचे असते. हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे आणि ऑक्सिजन बाहेर सोडणे तसेच सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न निर्मिती करणे हे मुख्य काम झाडे करत असतात.

झाडांचे सर्व अवयव मानवी जीवनात जगण्यासाठी उपयोगी पडतात. झाडाची फळे आपण खाऊ शकतो. फुलांचा उपयोग आपण वातावरण सुगंधित करण्यासाठी आणि देवाला अर्पण करण्यासाठी करतो. झाडाचे खोड लाकडाच्या वस्तू बनवण्यासाठी आणि फांद्या आणि सुकी पाने आपण जळणासाठी वापरतो.

झाड निर्मिती ही फळामधील बियांपासून होत असते. काही झाडे ही त्यांच्या फांद्यांपासून पुन्हा निर्माण होत असतात. झाडे पूर्ण मोठी होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जात असतो. त्यासाठी त्यांना तोडणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे.

पर्यावरण संतुलन आणि पाऊस नियमित होणे यामध्ये झाडांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे पूर्ण जलचक्रच झाडांवर अवलंबून आहे. त्यासाठी झाडे न तोडणे, वृक्षलागवड करणे अशा मोहीमा सरकार वारंवार राबवत असते.

मुळे, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे, अशा विविध अवयवांनी तयार झालेलं झाड हे खरे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. झाडाच्या सावलीत जे सुख आणि शांती जाणवते तशी शांती कोणत्याही प्रकारच्या घरात जाणवणार नाही.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला झाड हा निबंध (Tree Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment