भारतात अशी एकाहून एक भव्य मंदिरे आणि इमारती आहेत जी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करतात. विशेषत: जर येथे असलेल्या मंदिरांबद्दल बोलले गेले तर कधी पाण्याने दिवा लावला जातो तर कधी मृत लोकांना जिवंत केले जाते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराविषयी सांगणार आहोत, जे सर्वसामान्यांना तर चकित करतेच परंतु जगभरातील वैज्ञानिकांनाही संभ्रमात पाडते.
येथे आपण ज्या चमत्कारीकर मंदिराबद्दल बोलत आहोत त्या मंदिराचे खांब जमिनीशी जोडण्याऐवजी हवेत तरंगतात. आणि हवेत तरंगणारे हे मंदिर आंध्र प्रदेशच्या अनंतपूर भागात आहे. ‘वीरभद्र’ नावाच्या मंदिराची भव्य मीनाकारी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तथापि, येथे कितीतरी शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी या मंदिरावर भरपूर संशोधन केलं, परंतु आजपर्यंत हे खांब हवेत का लटकतात हे रहस्य कोणालाही उलगडले नाही. येते विज्ञान देखील मागे पडते.
या मंदिरातील प्रमुख देवता श्री वीरभद्र आहेत. दक्ष यज्ञानंतर अस्तित्वात आलेल्या भगवान शिवांचे विरभद्र हे एक क्रूर रूप आहे. त्याशिवाय अर्धनारीश्वर, कंकाल मूर्ती, दक्षिणामूर्ती आणि त्रिपुरताकेश्वर हे शिवांचे अन्य अवतार देखील येथे आहेत. येथील देवीला भद्रकाली म्हणतात. हे मंदिर १६ व्या शतकात बांधले गेले आणि दगडी बांधकाम आहे. हे मंदिर विजयनगरी शैलीमध्ये बांधले गेले आहे.
दक्षिण आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात लेपाक्षी येते हे मंदिर आहे. हे हिंदुपूरच्या पूर्वेस १ किमी आणि उत्तर बंगळुरुपासून १२० किमी अंतरावर आहे. हे मंदिर टेकडीच्या माथ्यावर कासवाच्या कवचाप्रमाणे बनलेले आहे. म्हणून त्याला कुर्मा सैला बी म्हणतात.
हे मंदिर १५८३ मध्ये विजयनगर राजाबरोबर काम करणारे विरुपन्ना आणि वीरन्ना या दोन भावांनी बांधले होते. तथापि पौराणिक मान्यता अशी आहे की लेपाक्षी मंदिर परिसरातील वीरभद्र मंदिर अगस्त्य ऋषींनी बांधले होते.
येथे एक पाऊलखुण आढळते, ज्याबद्दल अनेक मान्यता आहेत. हि खूण त्रेता युगाची साक्षीदार मानली जाते. काहीजण याला रामाचे पदचिन्ह मानतात तर काही जण सीतेच्या पावलाचा ठसा मानतात. असे म्हणतात की जटायुंनी रामाला रावणाचा पत्ता इथेच सांगितला होता.
लेपाक्षी मंदिरापासून २०० मीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर एकाच दगडाने बनविलेली विशाल नंदीची मूर्ती असून ती ८.२३ मीटर रुंद व ४.५ मीटर उंच आहे. एका दगडाने बनविलेली ही नंदीची जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे.
नंदीच्या भव्य पुतळ्यापासून थोड्या अंतरावर शेषनागाची एक अनोखी मूर्ती आहे. त्याच्या बनवण्याची कहाणीही खूप रंजक आहे. नंदी आणि शेषनाग एकाच ठिकाणी एकत्र होते, याचाच अर्थ मंदिरात महादेव आणि भगवान विष्णू यांच्याशी आणखी एक आश्चर्यकारक कथा जोडली गेली आहे.
काही वर्षांपूर्वी, एका ब्रिटीश अभियंत्याला हे मंदिर स्तंभांवर कसे उभे आहे हे जाणून घ्यायचे होते. या प्रयत्नात त्याने आधारस्तंभ हलविला आणि जमिनीशी त्याचा संपर्क तुटला. तेव्हापासून हा खांब हवेत झुलत आहे.
हे हि वाचा- जेवणानंतर ह्या ५ गोष्टी करणे ठरू शकते धोकादायक