टाटा स्काय नव्हे आता “टाटा प्ले” म्हणा!
टाटा स्काय हा डिजिटल सेट टॉप बॉक्स आता टाटा प्ले म्हणून अस्तित्वात आलेला आहे. टाटा स्काय हा टाटा प्ले म्हणून रिब्रांड झालेला आहे. जवळजवळ १८ वर्षे टाटा स्काय डीटीएच सेवा पुरवित होता. परंतु सध्या OTT platform ची प्रसिद्धी पाहता टाटाने सेवा प्रणाली विकसित करत टाटा प्ले हा नवीन ब्रँड मार्केटमध्ये आणलेला आहे.
टाटा ग्रुप आणि वॉल्ट डिस्ने कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्या टाटा स्कायने आता स्वतःच्या ब्रँड मधून स्काय हे नाव वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी व्यावसायिक हित ध्यानात घेतल्याचे समजते. डायरेक्ट टू होम सेवा आता upgrade होत असल्याने त्यामध्ये सेवांसोबतच नावात देखील बदल करणे अनिवार्य होते.
OTT म्हणजे “ओव्हर द टॉप” सर्व्हिस! ही सेवा इंटरनेटद्वारे चॅनल्स पाहण्याची सुविधा पुरवते. यामध्ये प्रत्येक पिढीला आकर्षित करतील असे चित्रपट, वेबसीरिज समाविष्ट आहेत. ही सेवा आता टाटा प्ले आपल्या ग्राहकांना पुरविणार आहे.
तसेच DTH सेवेच्या पलीकडे जाऊन, टाटा प्ले ने आता फायबर-टू-होम ब्रॉडबँड आणि Binge समाविष्ट केले आहेत, जे एकूण चौदा OTT सेवा पुरवतात. टाटा स्काय बिंज+ सेवेद्वारे आपण इथून पुढे नेटफ्लिक्सचा देखील लाभ घेऊ शकतो.
टाटा प्ले आता त्याच्या Binge पॅकद्वारे Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar या OTT सेवा ऑफर करेल. नेटफ्लिक्ससाठी स्वतंत्रपणे पैसे देण्याऐवजी तुम्हाला टाटा प्ले नेटफ्लिक्स कॉम्बो पॅकनुसार तुमचे टाटा प्ले वॉलेट टॉप अप करावे लागेल.
DTH ब्रँडचे नवीन नामकरण झाल्याबद्दल टाटा प्लेचे एमडी आणि सीईओ हरित नागपाल म्हणाले…
“टाटा स्कायने ओटीटी आणि ब्रॉडबँडमध्ये प्रवेश करून सामग्री वितरणाची इकोसिस्टम तयार करण्यासाठी आपल्या मुख्य व्यवसायात बाजार नेतृत्वाचा फायदा घेतला. आमचा विश्वास आहे की आमच्या डीटीएच व्यवसायाच्या पलीकडे असलेल्या ब्रँड ओळखीची वेळ आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या व्यवसायाला पाठिंबा दिल्याबद्दल मी टाटा सन्स आणि वॉल्ट डिस्ने कंपनीचे आभार मानतो, ज्याने गेल्या काही वर्षांत 23 दशलक्ष घरांमध्ये विस्तार केला आहे आणि आमच्या सामग्री वितरण प्लॅटफॉर्मला बाजारपेठेतील एक मजबूत खेळाडू बनवले आहे.”
टाटा प्लेचे मुख्य कम्युनिकेशन्स ऑफिसर अनुराग कुमार म्हणाले…
“टाटा प्ले ब्रँडमार्क आणि प्ले मार्क हे “टाटा” चिन्हापासून प्रेरणा घेतात. टाटा प्ले भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँडचा विश्वास, गुणवत्ता आणि ओळख अधिक मजबूत करेल. “प्ले” हा शब्द आधीच विश्वासार्ह ब्रँडमध्ये तरुणपणा, सहजता आणि साधेपणा जोडतो.
गडद निळा आणि पांढरा सोबत गुलाबी आणि जांभळा हे ब्रँड रंग दोलायमान, तरूण आणि एकंदर ओळखीला वेगळेपण देतात. Tata Play सह, आम्ही तुम्हाला मजा, वैयक्तिकरण, लवचिकता, स्वातंत्र्य, गुणवत्ता, नावीन्य आणि उत्तम कनेक्शनचे वचन देतो.”