रुबी रोमन: जगातील सर्वात महाग द्राक्ष, ज्याची किंमत ऐकून तुमच्या तोंडच पाणीच पळेल…

जगभरात द्राक्षांचे शेकडो प्रकार आहेत. आपल्या देशात देखील द्राक्षे चांगलीच पसंद केली जातात. लहानपणी आपण द्राक्षे आणि कोल्हा यांची गोष्ट पुस्तकात वाचली आहे. परंतु आपण कल्पना करू शकता का, कि हीच द्राक्षे किती महाग असू शकतात? कारण आज आम्ही तुम्हाला अशा द्राक्षाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुमच्या तोंडचं पाणी पळेल. सत्य हे आहे की हा विशिष्ट द्राक्ष प्रकार विकला जात नाही, तर लिलाव केला जातो.

‘रुबी रोमन’ हे या द्राक्षाचे नाव आहे. त्याची कहाणी 1995 मध्ये सुरू झाली…

जपानमधील इशिकवा येथील द्राक्ष उत्पादकांनी प्रीफेक्चुरल एग्रीकल्चर रिसर्च सेंटरला मोठ्या आणि लाल द्राक्षाच्या जाती वाढवण्यास सांगितले. संशोधन केंद्राने प्रयोग क्षेत्रात ४०० द्राक्ष वेली लावल्या. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्या वेलींना फळ येण्यास सुरुवात झाली. या ४०० द्राक्ष वेलींपैकी केवळ ४ मध्ये लाल द्राक्षे होती. त्यापैकी फक्त एकच होता, ज्याने शेतकऱ्यांची मने जिंकली. मागील १४ वर्षांपासून, संशोधकांच्या या पथकाने या निवडलेल्या द्राक्ष जातीची लागवड केली आहे. लागवडीदरम्यान, द्राक्षाचा रंग, आकार, चव याची खास काळजी घेतली जाते.

 Ruby Roman

आज जगात रुबी रोमन द्राक्षाला ‘जपानचा खजिना’ असेही म्हणतात.

२००८ मध्ये, प्रथमच रुबी रोमन द्राक्षे बाजारात आणली. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची इतकी हवा झाली कि फक्त ७०० ग्रॅम द्राक्षाचा एक घड ९१० अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ६४,८०० रुपयांना विकला गेला. याचाच अर्थ एका घडातील प्रत्येक द्राक्षाची किंमत १८०० रुपयांपेक्षा जास्त होती.

२०१६ मध्ये एक विक्रम नोंदवला गेला, एक घड ७ लाखांत विकला गेला.

कालांतराने रुबी रोमनची ख्याती आणखीनच वाढली. जगातील सर्वात महागडा द्राक्ष वाण म्हणून याला महत्त्व प्राप्त झाले. काही वर्षांनंतर, २०१६ मध्ये २६ रुबी रोमन द्राक्षे ११ हजार डॉलर म्हणजेच ७ लाखांपेक्षा जास्त दराने विकली गेली.

रुबी रोमन द्राक्षाची खास गोष्ट अशी आहे की त्यातील प्रत्येक घड आणि प्रत्येक द्राक्ष बर्‍याच मानकांमधून जातात. उदाहरणार्थ, फ्लेक्समधील प्रत्येक द्राक्षाचे वजन कमीतकमी २० ग्रॅम आणि त्यातील साखरेचे प्रमाण कमीतकमी १८ टक्के असावे. याची प्रीमियम श्रेणी देखील आहे, ज्यामध्ये प्रत्येक द्राक्षाचे वजन ३० ग्रॅम आहे आणि एका गुच्छाचे वजन किमान ७०० ग्रॅम आहे. साधारणपणे हा द्राक्ष विकला जात नाही, तर लिलाव केला जातो.

अधिकृत रूबी रोमन वेबसाइटनुसार द्राक्ष कमी आंबट असतात. त्यामध्ये साखर आणि रस यांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जेव्हा आपण त्याचा एक चावा घेतो तेव्हा आपले तोंड द्राक्षाच्या रसाने भरले जाते. तुम्ही रुबी रोमन फ्लेक्सपैकी एक द्राक्ष देखील खरेदी करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला किमान १८०० रुपये खर्च करावे लागतील.

हे नक्की वाचा- कसलंही टेन्शन असो…त्यातून बाहेर पडा फक्त पाच मिनिटात!

Leave a Comment