खूप वेळा विनाकारण खूप अस्वस्थ वाटतं. अशावेळी तुम्ही फक्त पाच मिनिटं वेळ काढून अस्वस्थपणावर मात करू शकता. आपल्या अस्तित्वात मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी मानल्या गेल्या आहेत. लहानपणापासून ज्या प्रकारचे संस्कार आपल्या मनावर बिंबवले जातील त्याच पद्धतीचे विचार आपण करत असतो.

त्यामुळे जर तुम्ही सतत अस्वस्थ किंवा नैराश्यात जगत असाल तर तुम्ही समजून जा की लहानपणापासून मिळालेले वातावरण आणि झालेले संस्कार हे त्याच पद्धतीचे आहेत. यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर तुमच्या विचारांवर व मनावर मेहनत घेतली पाहिजे.

पूर्वसूचना? नक्की काय?

बुद्धीला ज्या गोष्टी चांगल्या वाटतील, किंवा जी कामे केल्यावर जीवनात आनंद निर्माण होत असेल अशा गोष्टींचा सतत पाठपुरावा करत मनाविरुद्ध देखील काही निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्याची क्षमता स्वतः मध्ये निर्माण करण्यासाठी काही उदात्त विचारांची पुनरावृत्ती सतत करावी लागते.     

तुमचे किती संकल्प आजपर्यंत पूर्ण झाले? असा विचार केल्यास कळेल की तुम्ही मनाच्या ताब्यात आहात की मन तुमच्या ताब्यात आहे. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला संस्कारांविरुद्ध काही विधायक सूचना स्वतःला वारंवार द्याव्या लागतील.म्हणजेच पूर्वसूचना द्याव्या लागतील. लहानपणी झालेले संस्कार हे स्वतःच्या अजाणतेपणात झालेले असतात. त्यांना आपण नाकारू शकत नाही. कारण विचारांची कुवत त्यावरून कळते. परंतु आपण नवीन संस्कार किंवा विचार स्वतःमध्ये रुजवू शकतो.

फक्त ५ मिनिटं मनाला दिलेल्या पूर्वसूचना या तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणतील हे नक्की.

१. मनाची पूर्वतयारी-

कुठलेही कार्य करताना अगोदर मनाची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. पूर्वसूचना द्यायच्या अगोदर तुम्हाला पूर्णपणे निर्विचार स्थितीत जावे लागेल. यानंतर दिलेली पूर्वसूचना ही मनात बिंबवली जाऊ शकते व त्याचे वारंवार पुनरुक्ती केल्याने आपण त्या पद्धतीचा स्वभाव बनवू शकतो. निराशा आणि अतिउत्साह या दोन्ही भावना टाळून तुम्ही जर स्थिरता अनुभवात आणली तर मनाची पूर्वतयारी करणे खूप सोपे होऊन जाते.

२. खोट्या संकल्पना-

“मी माझ्या मनासारखं जगणार”,  “काही झाले तरी मनासारखं करणार”. या संकल्पना अत्यंत खोट्या असून त्या आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेत नाहीत. तुम्ही जर थोडासा विचार केला तर तुम्हाला समजेल की मन एखाद्यावेळी खूप आनंदी असते, तर एखाद्या वेळी खूप दुखी असते अशा दोन्ही वेळी घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात.      

आज प्रसारमाध्यमे जसे की टेलिव्हिजन, मोबाइल्स याद्वारे दाखवले जाणारे सामाजिक चित्र आपण आपल्या मनावर बिंबवत असतो, व त्याच प्रमाणे जगत असतो. ते जीवनाचे खरे रूप नसून फक्त क्षणिक सुखाची वारंवार अनुभूती शरीराला व मनाला होत असते. नंतर तो क्षण गेल्यानंतर येणारे दुःख हे स्वस्थ बसून देत नाही व वारंवार त्याच सुखाची ची मागणी करत असते.    अशा सर्व खोट्या संकल्पना मनातून काढून टाकून एका आनंदी जीवनाच्या दिशेचा ध्यास आपण आपल्या जीवनात घेतला पाहिजे.

३. वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळे मन-

जीवनाचे जर चार टप्पे पाडले जसे लहानपण, किशोरावस्था, तरुणपण आणि उतारवय. तर आपल्याला या बाबी ध्यानात येतील की आपले मन कसे बदलत गेले आहे. सतत भविष्याची काळजी आणि भूतकाळातील आठवणी यातच आपले मन जगत असते.त्यामुळे लहान असताना मोठे होण्याची स्वप्ने आणि मोठे झाल्यावर लहान असण्याचा हव्यास हा असतोच. याची जर समज आली तर तुम्ही काहीही कार्य करताना मनाचा संबंध जास्त न येऊ देता आनंदी राहू शकता.
शरीराचा उपयोग. 

शरीर हे एका यंत्रासारखे कार्य करत असते. सतत कार्यरत राहणे हा भौतिक शरीराचा नियमच आहे. शरीर जेवढे जास्त कार्यरत राहणार, तेवढीच त्याची कार्यक्षमता देखील वाढत जाते. त्यामुळे मनाला फक्त पूर्वसूचना देऊन एखाद्या कार्यात शरीराचा पूर्ण क्षमतेने वापर करून घेणे हे आपल्याच हातात असते.वरील दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही छंद, खेळ किंवा कलेचा विकास करू शकता आणि कायम आनंदी राहू शकता.

५ पाच मिनिटं मनाला पूर्वसूचना देऊन करावयाच्या गोष्टी…

  • १. शारीरिक हालचाल अवश्य करा.
  • २. एखादा मैदानी खेळ खेळा किंवा रोज व्यायाम करा.
  • ३. आवडीचे संगीत ऐका.
  • ४. पोटभरून कधीच जेऊ नका. असे करण्याने शरीराला सुस्ती येते.
  • ५. पौष्टिक आहार घ्या.
  • ६. नकारार्थी भावना व व्यक्ती यांना टाळा.
  • ७. नैसर्गिक किंवा सांस्कृतिक पर्यटन अवश्य करा.
  • ८. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा.

यावर तुमच्या प्रतिक्रिया comment करून जरूर कळवा…आणि आमचं Daily Marathi news हे Facebook पेज जरूर like करा. “आपल्या हक्काचं पेज”

हे जरूर वाचा- या जिओ सिम ऑफर ने उडवले सगळ्या कंपन्यांचे होश! मार्केटमध्ये आला आहे हा नवीन प्लॅन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here