हल्ली आपण खरंच मराठी बोलतो का?

वेळोवेळी भाषेत होत गेलेले बदल सहजरीत्या समजत नाहीत परंतु असे शब्द जे नव्याने भाषेत मिसळून काही नवीनच शब्द मूळ भाषेत रुजू लागतात, मग त्या भाषेतच वारंवार लिहले व बोलले जातत.     

मराठी भाषेत काही नवीन शब्द जे मुळतः इंग्लिश भाषेतील आहेत ते शिक्षणपरत्वे एखादी पिढी आपल्या बोलीभाषेत वापरू लागली आहे व त्यांचा वापर हा कायमचा होऊ लागला आहे. हिंदी भाषेची तर शहरात “हिंग्लिश” च झाली आहे. मराठीत सर्रास पुढील इंग्लिश शब्द वापरले जातायेत…

१. Starting ला काय करू? सुरुवातीला काय करू? अशा अर्थाचे हे वाक्य starting या शब्दानेच सुरू होऊ लागले आहे. 
२. Problem काय आहे तुमचा?  “समस्या ” हा शब्द तर आजच्या लहान मुलांना माहीत असेल का? याबद्दल शंकाच आहे.
३. Use काय आहे त्याचा?  “वापर/उपयोग ” असा उच्चार करणे थोडे अवघडच जात असल्याने यूज हा शब्द सर्रास वापरला जाऊ लागला आहे.
४. Change कर ते.  बदलणे म्हणजे change करणे. याचा वापर दिवसातून खूपच वेळा केला जातो.
५. Time काय झाला?   “वेळ/काळ” हे शब्द कदाचितच कोणीतरी वापरत असेल.
६. नवीन Shirt/pant आहे हा!   Shirt आणि pant या दोन शब्दांना सदरा आणि पायजमा असे दोन अस्सल मराठी शब्द आहेत.
७. Doctor/Engineer आहे आमचा मुलगा!   वैद्य आणि अभियंता अशा अर्थाचे हे दोन शब्द खूप प्रचलित नाहीत. डॉक्टर आणि इंजिनिअर असेच शब्द मराठीत लिहले जाऊ लागले आहेत.
८. आजचा menu/dish काय आहे?   जेवणात काय पदार्थ आहेत असे न म्हणता आपण menu/dish असे शब्द वापरतो
९. Career च्या संधी. Career म्हणजे कारकीर्द असे खूप जणांना आज सांगावे लागेल.
१०. Copy करू नका. Copy म्हणजे ” नकल/ नक्कल ” . हा शब्द तर कॉपी असाच रुजू होणार आहे.
११. Pure ( पिव्वर ) “पिव्वर काहीच नाही आज, सगळीकडे नुसती भेसळ! ” असं वाक्य आपणदेखील किती वेळा बोलतो. 

याव्यतिरिक्त pen(पेन), cooker(कुकर), Colgate(कोलगेट), mixer(मिक्सर), table(टेबल), television(टीव्ही), Sorry(सॉरी), gate(गेट), pipe(पाईप), patient (पेशंट) असे खूप सारे शब्द मराठीत मिसळले गेले आहेत.   

मराठीतले मूळ शब्द आणि अर्थ वारंवार वापरले गेले तरच आपण मराठी ही अभिजात भाषा व्यवस्थित टिकवू शकू. तुम्हाला देखील असे शब्द माहीत असतील तर नक्की कळवा. कमेंट (comment) करा.

हे हि जरूर वाचा- हेच ते चमत्कारिक मंदिर ज्याचे खांब हवेत तरंगतात…शास्त्रज्ञांनाही अजून उलगडले नाही याचे रहस्य.

Leave a Comment