हे आहेत महाराष्ट्रातील ७ निसर्गसौदर्याचे वरदान..पाहून थक्क व्हाल!

महाराष्ट्र हे एक निसर्गसौंदर्याने नटलेला राज्य ज्याचा खर रूप बहरून येतं ते पाऊसाळयात. हिरवागार निसर्ग, थंड हवामान, पडणाऱ्या पाऊसाच्या सऱ्या ह्या किती तरी लोकांच्या मनाला भुरळ पाडून जातात. अशातच महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत ज्याचा सौंदर्य हे एक निसर्गाचा वरदानच आहे. तर पाहुयात कोणतीही आहेत ती ठिकाणी ज्याचा सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल

१) लोणावळा खंडाळा-

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसणार असा ठिकाणं आहे जिथे जायचं प्रत्येक मराठीच काय तर बाहेरील
राज्यातील लोक भेट देण्याचं सप्न पाहत असतो. तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी जायचं असेल जिथून
शहर जवळ आहे जिथून येण्या जाण्याच्या सुविधा उत्तम आहेत तर लोणावळा खंडाळा हे ठिकाण पुणे
शहरापासून फक्त ७० किमी आहे व मुंबई पासून पण २ तासाच्या अंतरावर असणार हे ठिकाण निसर्गाचं
एक वरदानच आहे ज्याला पाहून आपण थक्कच व्हाल एवढा निसर्गाचा खजिना या ठिकाणी लपला आहे.
२) माथेरान
माथेरान हे एक महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई शहरापासून फक्त ११० किमी
दूर असणाऱ्या या ठिकाणावर पर्यटक गर्दी करीत असतात. घनदाट जंगले , पठार, थंड व स्वच्छ हवामान हे
माथेरान च्या आकर्षणाचं केंद्र आहे.

३) पाचगणी महाबळेश्वर-

जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव करायचा असेल तर एकदा नक्की पाचगणी महाबळेश्वर ला भेट द्याला
विसरू नका. महाराष्ट्रीयन जोडप्यांमध्ये हनीमून साठी प्रसिद्ध असणार हे ठिकाणं संपूर्ण भारत देशात
प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, विविध प्राणी व पक्षी , दऱ्या खोऱ्यातून वाहणाऱ्या नद्या, असंख्य
पर्यटन ठिकाण ही पाचगणी महाबळेश्वर ची वैशिष्ट आहे. १२ महीने पर्यटक या ठिकाणी गर्दी करत
असतात. मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर, आपल्या जोडीदाराबरोबर फिरायला जाण्यास हे एक उत्तम ठिकाण
आहे.

४)माळशेज घाट-

ट्रेकिंग ची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी माळशेज घाट ही एक पर्वणीच आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरील हा घाट येतो. दरवर्षी हजारो ट्रेकर्स इथे आपली ट्रेकिंग ची हौस पूर्ण करण्यासाठी येत असतात. माळशेज घाट हा पुणे व ठाणे जिल्ह्यांना जोडतो. खूप उंची वरून पडणारे असंख्य असे धबधबे हे ह्या माळशेज घाटाचे वैशिष्ट्या आहे

५) आंबोली घाट-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट हा आपल्या वेगळ्याच अशा नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रचंड असा पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे धबधबे , घनदाट जंगले व तिथे दिसणारी जैवविविधता ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर व सावंतवाडी हे दोन रेल्वे स्टेशन आंबोली घाटात येण्यास सोयीस्कर पडतात.

६) चिखलदरा-

सातपुड्याच्या सात पर्वतरांगापैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट व आजूबाजूचा परिसर
हा व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला वाघोबाचे दर्शन होऊ शकते तसेच या ठिकाणी विविध वन्यजीव आपल्याला पाहायला मिळू शकतात. खोल दरी पाहण्यासाठी इथे लोक गर्दी करत असतात. तसेच चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे.

७) भंडारदरा-

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा साठी प्रसिद्ध असलेला ठिकाण म्हणजे भंडारदरा. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हे एक गाव. बॉलिवूडच्या किती तरी सिनेमांचा शूटिंग याठिकाणी पार पडलेला आहे. थंड हवामान, स्वच्छ हवा, सुंदर दृश्य, हिरवीगार झाडं हे ह्या भंडारदरा या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. कळसूबाई हे ठिकाण सुध्दा भंडारदरा या गावच्या परिसरातच येते.

बिग बॉस ला कसा संतुष्ट करशील? अभिनेत्री गायत्री गुप्ता ने ठोकली केस.

Leave a Comment