आज काश्मीर तोडले उद्या मुंबई आणि विदर्भ असेल – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. EVM मशीन पासून काश्मीर प्रश्नावर त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

EVM मशीन बद्दल बोलताना ते म्हणाले की कलम ३७० रद्द झाले म्हणून सर्व जण पेढे वाटून आनंद साजरा करत आहेत पण देशातील लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या ३७१ मतदार संघात घोळ झाला त्यावर कोणीही बोलत नाही.

कोल्हापूर सांगली महापूर संबंधी बोलताना ते म्हणाले की जलसंपदामंत्री गिरीश महाजन सेल्फी काढतात त्यांना कसलाही फरक पडत नाही. यासागळ्यांना माज आला आहे. मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून सांगली-कोल्हापूर च्या परिसराची पाहणी करतात खाली उतरत नाहीत. या सगळ्यांना माहिती आहे की लोक आपल्याला मतदान करणार आहेत त्यामुळे यांना कसलाही फरक पडत नाही.

काश्मीर बद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘काश्मीर प्रमाणे उद्या महाराष्ट्राचे ही लचके तोडले जातील. आज काश्मीर उद्या मुंबई आणि विदर्भ असेल. उद्या तुमच्या घराबाहेर ते बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात मोबाईल, इंटरनेट, टिव्ही, या सगळ्या सेवा बंद केल्या जातील. काश्मीर प्रमाणे महाराष्ट्राचे ही लचके तोडले जातील आणि हे फक्त महाराष्ट्राला सीमित नसून इतर राज्यांना सुध्दा लागू आहे.

उद्या जेव्हा महाराष्ट्रावर वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहून नाही तर मराठी म्हणून फिरेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला की ,भाजप मधील एक व्यक्ती पाच सहा जणांशी बोलत होती. उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी,मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे EVM मशीन नाहीत.हे कोण व कधी बोलले हे बाळा नांदगावकर यांना माहिती आहे.

शिवसेनेचे जे चार खासदार पडले त्यांना प्लॅन करून पाडण्यात आल्याचा गौप्यस्फोट ही यावेळी त्यांनी केला. चंद्रकांत खैरे, अनंत गीते,आनंदराव अडसूळ , शिवाजीराव आढळराव पाटील यांना भाजप शिवसेनेने EVM मशीनच्या मदतीने पाडण्यात आले असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम तणाव रहावा म्हणून एम आय एम चे खासदार इम्तियाज पठाण यांना निवडून आणण्यात आले.

या सगळ्या EVM क्या करामती आहेत, त्या चार खासदार मंडळींना मंत्री करायचे नव्हते म्हणून त्यांचा पराभव प्लॅनिंग ने केला असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

1 thought on “आज काश्मीर तोडले उद्या मुंबई आणि विदर्भ असेल – राज ठाकरे”

Leave a Comment