पबजी खेळत असाल तर तयार व्हा या बदलांना सामोरे जायला…

आजच्या या टेक्नोलॉजी च्या युगात रोज नव नवीन गेम येत असतात. काही गेम्सना प्रसिध्दी मिळते तर काही गेम्स कधी येऊन जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पण या सगळ्याला अपवाद ठरली आहे ती म्हणजे पबजी ही गेम होय.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेली गेम आता एवढी प्रसिद्ध झाली आहे की असे खूप कमी युवक आहेत ज्यांच्या मोबाईल वर पबजी ही गेम नाही किंवा ते पबजी खेळत नाहीत. भारतातील युवा वर्गाला तर पबजीने अक्षरशः वेड लावले आहे. काहींना तर या गेम चे एवढे व्यसन लागले आहे की त्याचा दुष्परिणाम आता त्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.

अलीकडेच पबजी हे गुजरात मधील एका मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. त्यामुळेच आज आम्ही आपल्याला पबजी खेळल्यामुळे आपल्या आयुष्यावर होणाऱ्या चांगल्या व वाईट बदलांबद्दल सांगणार आहोत.

१) समाजापासून दूर होतो-

जेव्हा आपण मोबाईल मध्ये पबजी गेम इंस्टॉल करतो त्यानंतर आपण त्यात एवढे गुंतून जातो की आपला कोणाशी ही संपर्क राहत नाही. लोकांमध्ये उठणे बसणे तसेच मित्रांबरोबर वेळ घालवणे या पेक्षा पबजी खेळण्याला युवा वर्ग प्राधान्य देत असतो. त्यामुळे हळू हळू तो समाजापासून दूर होत जातो व यामुळे एकटेपणा येऊ शकतो तसेच नकारात्मक गोष्टींचा विचार आपल्या कडून केला जातो व त्यांचे नुकसान आपल्या सार्वजनिक जीवनावर होत असते

२) झोपण्याचे चक्र बदलते-

तासनतास मोबाईल वर पबजी गेम खेळल्यामुळे आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. रात्री उशिरा पर्यंत मोबाईल वर पबजी गेम खेळल्यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर सुद्धा होतो. आपला दिवस कंटाळवाणा जातो तसेच आपल्या रोजच्या जीवनावर याचा परिणाम होतो.

३) एकाग्रता वाढवते-

ज्या प्रमाणे पबजी खेळण्याचे अनेक वाईट परिणाम आहेत त्याच प्रमाणे काही चांगल्या गोष्टी सुध्दा गेम खेळल्यामुळे होऊ शकतात. त्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पबजी गेम खेळल्यामुळे आपली एकाग्रता वाढते कारण पबजी खेळताना प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवून खेळावे लागते त्यामुळे आपली एकाग्रता वाढण्यास त्याची मदत होते. तसेच आपल्या इतर कामांसाठी सुध्दा या सगळ्या बाबी आपल्या पथ्यावर पडतात.

४) मानसिक तणाव वाढला जातो-

पबजी खेळल्यामुळे आपला बाहेरच्या जगाशी संपर्क कमी येत जातो तसेच आपण गेम मध्ये
एवढे अधीन होऊन जातो की आपल्याला मानसिक तणाव येणे सुरू होतो. या सगळ्याच कारण आहे गेम खेळताना वाढत जाणारा तणाव.

आपण विजय मिळण्यासाठी झोकून व एकाग्रतेने खेळ खेळत असतो पण जेव्हा एकादी कोणती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध गेली तर आपण लगेच
तणावात येतो. व समाजात वावरताना सुध्दा आपल्या स्वभावात बदल जाणवत असतो. आपली कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे चिडचिड व्हायला सुरुवात होते व आपण मानसिक तणावात जातो.

५) सकारात्मकता वाढते-

काही लोकांना समाजापुढे बोलण्यात अडचणी जाणवत असतात व त्याचे कारण म्हणजे आत्मविश्वास नसणे. पबजी खेळल्यामुळे आपल्या मनात असणारा न्यूनगंड दूर होतो व सकारात्मकता वाढून आपला आत्मविशवास वाढला जातो व त्याचा चांगला परिणाम हा आपल्याला दिसून येत असतो.

Leave a Comment