Pm Modi Will Seen In Man Vs Wild

देशाचे पंतप्रधान पीएम नरेंद्र मोदी लवकरच डिस्कवरी चॅनलचा प्रसिद्ध शो मॅन वर्सेस वाइल्डमध्ये दिसतील. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शोच्या स्टार बीयर ग्रिल्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली की त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या उपाययोजनांविषयी खास कार्यक्रम शूट केला आहे. पंतप्रधान मोदीदेखील प्रसिद्ध शोच्या समर्थकांमधून भारताच्या विशाल नैसर्गिक विविधता आणि निसर्ग संरक्षण उपायांची चर्चा करणार आहेत.

बीयर ग्रिल्स यांनी ट्वीट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अज्ञात बाबींविषयी 180 देशांचे लोक लवकरच परिचित होतील. भारतातील वन्यजीवनाचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती मोहीम आणि भौगोलिक बदलांचे काम कसे केले जाते हे पंतप्रधान मोदी आपल्या शैलीत सांगतील. 12 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना डिस्कव्हरी वरील मॅन वर्सेस वाइल्डमध्ये पाहा. ‘ या शोसह #PMModionDiscovery ला ट्विट केले.

व्हिडिओमध्ये पंतप्रधानांची पूर्णपणे भिन्न दिसत आहेत. ते हसत आणि स्वतःच्या वेगळ्या शैलीत चर्चा करीत असल्याचे दिसते. या शो मध्ये एका नावेमधून ग्रिल्स नदी पार करताना दिसत आहेत तसेच मोदींसोबत चहा घेताना दिसत आहेत. तसेच दोघांची वेशभूषा सुद्धा वेगळी असलेली आढळते.

हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू

मॅन वर्सेस वाइल्ड हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे, जो डिस्कवरीवर प्रसारित होतो. या शोमध्ये जगातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. हा शो बर्‍याच देशांच्या भाषेतही डब केला जातो. या लोकप्रिय शो मध्ये अध्यक्षीय भेटीदरम्यान बराक ओबामा देखील सहभागी झाले होते. अलास्का फ्रंटियरवर चढताना ओबामा आणि ग्रील्स यांनी हा कार्यक्रम केला. या शोमध्ये माजी राष्ट्रपतींनी हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधने, वन्यजीव संवर्धनाविषयी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here