पाऊस पडलाच नाही तर – मराठी निबंध | Paus Padlach Nahi Tar Nibandh

प्रस्तुत लेख हा पाऊस पडलाच नाही तर (Paus Padlach Nahi Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. सजीवसृष्टीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस पडलाच नाही तर काय होईल? अशा कल्पनेचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

पाऊस पडलाच नाही तर – मराठी निबंध | Paus Padlach Nahi Tar – Marathi Nibandh |

शेतीतील पेरणी झाल्यावर दोन आठवडे चांगलाच पाऊस झाला. त्यानंतर एक आठवडाभर पाऊसाचे आगमन झालेच नाही. तेव्हा माझ्या मनात पाऊसाबद्दल अनेक विचार येऊ लागले. पावसाळ्यात चार महिने पाऊस पडत असतो हे आपण सर्वजण जाणतो, परंतु पाऊस पडलाच नाही तर काय होईल?

पावसाळा हा ऋतू अनेकांचा नावडता ऋतू असतो कारण पावसाळ्यात सर्वत्र दलदल आणि चिखल असतो. पावसाळ्यात घराबाहेर देखील पडता येत नाही. त्यामुळे पाऊस नसला तर किती बरे होईल असे सर्वांना वाटते. परंतु पाऊस नसेल तर सर्व सजीवसृष्टीला जीवन जगण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होईल.

पाऊस पडलाच नाही तर सर्व नद्या – सरोवरे अगदी कोरडी पडतील. नद्यांचे जे पाणी समुद्राला जाऊन मिळते ते मिळणारच नाही. निसर्गातील जलचक्र पूर्ण होणारच नाही. पाण्याचा प्रवाहित स्वभाव नाहीसा होऊन पृथ्वीवरून पाणीच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होईल.

मानवाला आणि इतर सजीवसृष्टीला पाण्याची नितांत गरज आहे. त्या गरजेनुसार निसर्गात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पाऊसामुळे सर्व सजीवांची पाण्याची गरज भागवली जाते. असा हा पाऊस पडला नाही तर सजीवांच्या जीवनात पाण्याची सोय होणार नाही.

प्रत्येक सजीव हा पाण्याचे महत्त्व जाणतो. भारतात तर पाऊसाच्या पाण्यावरच बहुतांश प्रमाणात शेती केली जाते. शेतीमुळे मानवाची अन्नधान्याची समस्या दूर होत असते. पाऊसाची उपलब्धता नसेल तर मात्र कोणत्याही देशात आणि प्रदेशात अन्नधान्याची कमतरता जाणवेल.

उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर जमिनीवर ओलाव्याची गरज भासू लागते. त्यामुळे पाऊस पडल्यावर ओलाव्याची गरज भागवली जाते. पाण्याचे सर्व स्त्रोत भरले जातात. त्यातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. काही प्रमाणात पाणी जमिनीत देखील मुरते. असा पाऊसच नसेल तर जमीन ओसाड पडून जमिनीखालील पाणी देखील संपुष्टात येऊ लागेल.

पाऊस नसल्याचे नुकसान सर्वप्रथम झाडांना जाणवेल. सर्व झाडे – झुडुपे मरून जातील. काही काळानंतर फिरणारे सजीव पाण्याच्या अभावाने जीव सोडून देतील. पाण्याचे मोठे साठे हळूहळू सुकून जातील. पृथ्वीवर पाऊसामुळे होणारे नुकसान कोणीही सहन करू शकणार नाही.

“पाऊस पडलाच नाही तर” हा विचारच माझ्या मनात पाऊसाबद्दल आदर निर्माण करून गेला. पाण्याचे आणि पर्यायाने पाऊसाचे असणारे महत्त्व कायमचे जाणवले असे वाटू लागले. पाऊसामुळेच आपण जिवंत आहोत आणि सर्व जीवनसृष्टी व्यवस्थित चालू आहे याची प्रचिती आली. त्यानंतर मी एकच प्रार्थना केली, ती म्हणजे, प्रत्येक वर्षी पाऊस भरभरून पडो…

तुम्हाला पाऊस पडलाच नाही तर हा मराठी निबंध (Paus Padlach Nahi Tar – Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment