सुषमाजींनी साळवेंना पाठवलेल्या त्या मॅसेजने केलं सर्वांना भावुक…

मंगळवारी मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात विजय मिळवणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशी सुषमा स्वराज यांनी संवाद साधला. आणि त्यांना भेटण्यास बोलावले परंतु मंगळवारी रात्रीच किडनीच्या विकाराने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या.

साळवे त्यांच्या शेवटच्या संभाषणाची आठवण करुन खूप भावूक झाले. ते म्हणाले की, सुषमाजींनी उद्या बुधवारी त्यांना भेटायला बोलावले होते आणि आपली फी १ रुपये घेऊन जा असे सांगितले होते.

तुम्हाला सांगू इच्छितो की, माजी सॉलिसिटर जनरल साळवे यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेमध्ये लढा देण्यासाठी फक्त १ रुपया फी घेतली होती, तर पाकिस्तानने 20 कोटी रुपये खर्च केले होते. आयसीजेमधील साळवे यांच्या युक्तिवादावरून जेव्हा भारताच्या बाजूने निर्णय आला तेव्हा जाधव यांना पाकिस्तानला समुपदेशक प्रवेश देण्याचा आदेश मंजूर झाला.

हरीश साळवे म्हणाले की, मंगळवारी रात्री 8.50 वाजता सुषमा स्वराज यांच्याशी आपले संभाषण झाले. आणि आता ही बातमी ऐकताच मला धक्का बसला. खूप भावनिक संभाषण झाले. त्यांनी मला सांगितले की तुम्ही उद्या एक रुपयाची फी घेण्यासाठी 6 वाजता येऊ शकता. याप्रसंगी साळवे म्हणाले, ‘मला काय बोलायचे ते माहित नाही. त्या एक मजबूत आणि शक्तिशाली मंत्री होत्या. माझ्या दृष्टीने त्यांचा मृत्यू मोठ्या बहिणीला गमावण्यासारखा आहे.

हे साळवेंसोबत झालेले शेवटचे संभाषण ज्यावेळी सर्वाना समजलं तेव्हा प्रत्येक भारतीय भावुक झाला. मृत्यूच्या इतक्या जवळ असताना देखील आपल्या कर्तव्यापासून दूर हटल्या नाहीत. त्यांच्या जाण्याने नक्कीच भारतीय राजकारणात एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती भरून काढणे शक्य नाही. अशा या शक्तिशाली आणि कर्तव्यनिष्ठुर स्त्री ला आमच्या टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो…

आता होईल क्षयरोगाचा १००% उपचार, भारतीय वैज्ञानिकांचा शोध.

Leave a Comment