Khandaani shafakhana poor opening

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘खानदानी शफखाना’ रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची सुरुवात खूपच कमकुवत झाली असून रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याचा फक्त 75 लाख रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

पहिल्याच दिवशी सोनाक्षी सिन्हाच्या मुख्य भूमिका असलेला ‘खानदानी शफाखाना’ कलेक्शन च्या दृष्टीने बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. हा विनोदी चित्रपट समाजात वर्जित मानल्या जाणार्‍या विषयावर बनविण्यात आला आहे. असं म्हणतात की हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासमवेत बघु शकतो.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार शुक्रवारी या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 75 लाखांचा व्यवसाय केला आहे. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाची कमाई थोडीशी वाढू शकते असा विश्लेषकांचा विश्वास असला तरी द लायन किंग आणि फास्ट अँड फ्यूरियस या हॉलिवूड चित्रपटांच्या उपस्थितीचा त्याच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

या चित्रपटाच्या माध्यमातून प्रख्यात रॅपर बादशहा ने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात केली आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हाशिवाय वरुण शर्मा, अन्नू कपूर, प्रियश जोरा आणि कुलभूषण खरबंदासारखे कलाकार आहेत. शिल्पी दासगुप्ता दिग्दर्शित ‘खानदानी शफाखाना’ प्रेक्षकांना किती रुजवतो हे काही दिवसातच कळेल.

नवरा-बायकोच्या हलक्या-फुलक्या नात्यामधील गंमत ‘आणि काय हवं…?’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here