Paneer recipe in Marathi । स्वादिष्ट मटर पनीर कसे बनवाल?

महाराष्ट्रात पनीर खूपच प्रसिद्ध होत आहे. अगोदर फक्त हॉटेल किंवा धाब्यावर खाल्ले जाणारे पनीर आता घरोघरी बनू लागले आहे. थोड्याशा खर्चात मस्तपैकी ४ – ५ जणांचं जेवण होऊन जातं. पनीर रेसिपी म्हटल की पनीर मसाला, पनीर टिक्का, मटर पनीर या पनीरच्या रेसिपींचे नाव प्रामुख्याने ध्यानात येते. या सर्व रेसिपी बनवायला खूपच साध्या आणि सोप्या आहेत. आज आपण मटर पनीर खूपच सोप्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत.

Matar paneer recipe Ingredients
साहित्य –

१. पनीर – २०० ग्रॅम
२. मटर ( वाटाणे ) – ओले एक वाटी सोललेले
३. आले – लसूण पेस्ट
४. टोमॅटो – ५-६
५. कांदा – ३
६. हिरव्या मिरच्या – ५
७. जिरे – अर्धा चमचा
८. हळद – अर्धा चमचा
९. लाल तिखट – २ चमचे
१०. गरम मसाला – अर्धा चमचा.
११. कोथिंबीर
१२. मीठ चवीनुसार
१३. तेल ३ ते ४ चमचे.

Matar Paneer Recipe process
कृती –

१. टोमॅटो पेस्ट आणि कांद्याची पेस्ट बनवून घ्या. हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

२. प्रथमतः कढईत तेल घेऊन पनीर तांबूस होईपर्यंत तळून घ्या. पनीर आता बाजूला ठेवा. राहिलेल्या तेलापैकी स्वच्छ २-३ चमचे तेल कढईत राहू द्या.

३. जिरे, हळद आणि कांदा पेस्ट चांगली परतून घ्या. थोडा लालसर रंग येईपर्यंत परता.

४. आता त्यामध्ये आले – लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट टाका. पुन्हा सर्व मसाला चांगला हलवा.

५. मसाला एकजीव झाला की टोमॅटो पेस्ट टाका. हे सर्व मिश्रण थोडे कढले की मग लाल तिखट, गरम मसाला टाका.

६. ५ मिनिटांनी सर्व पनीरचे तळलेले तुकडे आणि वाटाणे टाका. वाटाणे चांगले शिजू द्या. २ – ३ मिनिटांनी मीठ टाका.

७. आता हवे तेवढे पाणी टाकून चांगले गरम करा. वरून कोथिंबीर बारीक करून टाकू शकता. पनीर तयार झाले की गरम गरम सर्व्ह करा.

टीप –
१. टोमॅटो शिजवून बारीक केले तरी चालतील
२. गरम मसाला जिरे आणि हळद यांच्यासोबत परतून घेतला तरी चालेल.
३. पाण्याचा वापर शक्यतो कमी करा. पनीर घट्ट असलेलेच चांगले लागते.

Leave a Comment