Cake recipe in Marathi । मस्त चॉकलेट केक बनवा घरच्या घरी

केक खाणे कोणाला आवडत नाही ? प्रत्येक वाढदिवशी तर एका व्यक्तीचे २- ३ केक कापलेच जातात. प्रत्येक वेळी बाहेरूनच केक आणला पाहिजे असे नाही. तर तुम्ही घरच्या घरी एखादा स्वादिष्ट केक बनवू शकता. चॉकलेट केकची तर गोष्टच वेगळी. चला तर मग बनवूया चॉकलेट केक!

Chocolate cake ingredients
साहित्य:

१. मैदा – २ कप

२. कोको पावडर – १ कप

३. साखर – दीड कप

४. अंडी – ४

५. दूध – अर्धा कप

६. लोणी – १ कप

७. बेकिंग पावडर – २ चमचे.

८. व्हॅनीला इसेन्स – १ चमचा.

How to make chocolate Cake !
कृती:

१. मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका भांड्यात चाळून घ्या. तिन्ही पदार्थ एकत्र करा.

२. साखर मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यामध्ये लोणी टाका. मिश्रण फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळून लोणी आणि साखर एकजीव झाले पाहिजे.

३. आता एका छोट्या भांड्यात अंडी फेटून घ्या. फेटलेली अंडी आणि साखर – लोणी मिश्रण एकत्र करा. छानपैकी फेटून घ्या. सर्व मिश्रण एकजीव असले पाहिजे.

४. मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये हे एकजीव केलेलं मिश्रण टाका. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत फेटून घ्या. आता सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये दूध टाका. पुन्हा एकदा फेटून घ्या. आता मिश्रणात व्हॅनीला इसेन्स मिसळा.

७. बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि थोडासा मैदा टाका. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे. मैदा जास्त होता कामा नये.

८. एकजीव केलेले केकचे मिश्रण भांड्यात ओता. हाताने किंवा वाटीच्या उथळ भागाने पसरून सपाट करून घ्या.

९. ओव्हन चालू करा. थोडा अगोदरच गरम झाला तरी चालेल. त्यामध्ये २५ – ३० मिनिटे केक बेक करा. केक भांड्याच्या कडा सोडू लागला याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. एखादी पिन किंवा टोकदार पदार्थ केक मध्ये रोवून काढा. त्या पिनला जर केक चिकटला नाही तर केक तयार झाला असे समजावे.

१०. आता केक व्यवस्थित कापून सर्व्ह करू शकता.

११. मार्केट मध्ये रेडिमेड विविध फ्रूट नट्स आणि क्रिम देखील मिळते. केकवरुन ती सजवू शकता.

Leave a Comment