Upma recipe in Marathi । चविष्ट उपमा कसा बनवला जातो !

गोड शिरा आणि उपीट हे दोन मस्त रव्याचे पदार्थ आहेत जे आपण नाश्त्याला बनवू शकतो. उपीट या पदार्थाला दुसरे नाव म्हणजे ” उपमा “. लगच्यालगेच तयार होणारा आणि चविष्ट असा हा पदार्थ कसा बनवावा याची सोप्पी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Upma recipe ingredients :
साहित्य:

१. रवा – एक वाटी

२. पाणी – दीड छोटे ग्लास

३. तेल – १ चमचा

४.कांदा – बारीक चिरुन

५. हळद – अर्धा चमचा

५. मोहरी व जिरे – अर्धा चमचा

६. हिंग – चिमूटभर

७. काजू किंवा शेंगदाणे

८. कढीपत्ता पाने – २

९. हिरव्या मिरच्या बारीक चिरुन – ३

१०. कोथिंबीर

११. मीठ

१२. लिंबू – १

How to make Upma recipe ?
कृती:

१. कढईत रवा भाजून घ्या. थोडा खरपूस भाजा.

२. कढईत तेल गरम करून त्यात हळद, मोहरी, जिरे, हिंग घालावी. थोडे परतल्यावर कढीपत्ता, बारीक केलेल्या मिरच्या आणि चिरलेला कांदा टाकावा.

३. आवडीनुसार शेंगदाणे किंवा काजू टाका.

४. आता भाजलेला रवा घालून ३-४ मिनिटे परतून घ्या.

५. दुसऱ्या भांड्यात पाणी आणि मीठ घ्या. थोडे गरम करा.

६. आता गरम पाणी आणि चिरलेली कोथिंबीर रव्यात मिसळा.

७. रवा मस्तपैकी ढवळून आणि हलवून घ्या. रव्यात पाणी मिसळू लागल्यावर रवा घट्ट होत जाईल. आता कढईवर झाकण ठेवा.

८. उपमा तयार झाल्यावर मस्तपैकी सर्व्ह करा. सर्व्ह करताना लिंबू सोबत दिला तरी चालेल.

• टीप – पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करा.

1 thought on “Upma recipe in Marathi । चविष्ट उपमा कसा बनवला जातो !”

  1. quantity of water to be used not mentioned . This will be sufficient for how many persons ? How many dishes will be prepared?

    Reply

Leave a Comment