Daily Marathi News
दिनांक – २८ जून २०२३ : मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यास एखाद्या विभागाला, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो. तेथील प्रशासन, नागरिक यांच्यासाठी तो सतर्कतेचा इशारा असतो.
हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मागील दोन दिवसांत पुणे, मुंबई मध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे. आजही पुण्यात आणि मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मराठी बातम्या – ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना लागू –
नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला. तर मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या आठवडाभरात पाऊसाची चांगलीच शक्यता आहे. पुढील ४ – ५ दिवस तर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मागील चार दिवसांत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग मात्र अति आनंदात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
Latest Marathi News साठी dailymarathinews.com या आमच्या वेबसाईटला वारंवार भेट देत राहा…