विश्वचषक वेळापत्रक जाहीर – भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी _

आयसीसीने भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

२०११ विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण भारतवर्ष अजून एका चषकाची वाट पाहत आहे. यावर्षी असलेल्या विश्वचषकाचे आयोजन भारतात असल्याने विशेष करून भारतीय संघाला त्याचा फायदा होऊ शकतो.

भारतातील मैदाने आणि भारतीय प्रेक्षक हे सोबती असल्याने भारताची कमान उंचच उंच जात राहील अशी अपेक्षा या विश्वचषकात आहे.

विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर –

ICC ने २७ जून रोजी मुंबईत क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ ५ ऑक्टोबरला भिडणार आहेत.

भारतीय संघ आपल्या पहिल्या सामन्यात 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना ११ ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तानशी होणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Leave a Comment