AUS vs ENG 2nd Test _ ऑस्ट्रेलियाचा दुसरा घाव की इंग्लंडचा असणार पलटवार _

दिनांक – २८ जून २०२३

Daily Marathi News | Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला निसटता पराभव स्वीकारावा लागला. क्षेत्ररक्षण आणि खेळाची रणनीती थोडीशी चुकल्याने अगदी पाचव्या दिवशी सामना रंगतदार स्थितीत पोचला असतानाही यजमानांना पराभवाचा स्वाद चाखावा लागला.

इंग्लंड मागच्या सामन्यातील पराभवाचा ओरखडा या सामन्यात नक्कीच ओढेल अशी शक्यता आहे. इंग्लंड संघाचा खेळ अप्रतिम झाला असतानाही फक्त ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिंसच्या खेळीने त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. ऍशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल.

इंग्लंड संघ यावेळी मजबूत अवस्थेत आहे. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि तिच स्थिती ऑस्ट्रेलियन संघाची आहे. ऑस्ट्रेलियन संघ हा प्रत्येक खेळाडूच्या मानसिकतेवर काम करतो आणि खेळ पुढे नेत असतो तर इंग्लंड संघाची आक्रमकता पाहण्याजोगी असते.

दोन्ही संघांत अगदी नावाजलेले आणि जगप्रसिध्द असे खेळाडू असल्याने उभय संघांतील सामना म्हणजे क्रिकेट शौकिनांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांत मजबूत असलेले हे दोन संघ एकमेकांविरुद्ध आज पुन्हा एकदा उभे राहणार आहेत.

स्मिथ आणि लबुशेनची जबाबदारी –

कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. त्यामध्ये स्मिथ, लबुशेन आणि हेडचा समावेश आहे. स्मिथ आणि लबुशेन हे अनुभवी आणि पूर्ण जगभरात नावाजलेले फलंदाज असल्याने त्यांच्याकडून धावांची अपेक्षा ऑस्ट्रेलियन संघ ठेऊन आहे.

अँडरसन आणि ब्रॉड –

ऑस्ट्रेलियन संघ जसा आपल्या फलंदाजीत अपेक्षा ठेऊन असतो तसेच इंग्लंड संघ आपल्या दोन हुकुमी गोलंदाजांवर सतत नजर ठेऊन असतो. ते गोलंदाज म्हणजे जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड!

या दोन गोलंदाजांनी आपल्या क्रिकेटिंग कारकीर्दीत अनेक सामने आपल्या कमालीच्या प्रदर्शनाने पालटलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात या दोन गोलंदाजांवर चांगलेच लक्ष राहील.

Leave a Comment